सुश्राव्य संगीत - मला देवाचं दर्शन घेऊ द्या - सुरेश बापट

Submitted by संयोजक on 4 September, 2011 - 03:24


मला देवाचं दर्शन घेऊ द्या.
निवेदक: श्री. विद्याधरपंत नारगोलकर
गायक: श्री. सुरेश बापट
(मायबोली सदस्य 'उपासक' यांच्या सौजन्याने)


जय हेरंब! गणपती बाप्पा मोरया!

सालाबादप्रमाणे मायबोली गणेशोत्सवात सहभागी व्हायला खूप आनंद होतोय..
मंडळी, गणरायाच्या कृपेने ’गान-वीर काव्याचे’ या मी संगीत दिलेल्या गीत-संग्रहाचे काम संपूर्ण झाले आणि पुण्यात ३ सप्टें. २०११ रोजी सकाळी १२ वाजता आणि अमेरिकेत कॅलिफोर्नियात त्याचवेळी म्हणजे २ सप्टेंबरला रात्री ११.३० वाजता एकत्रितपणे त्याचे प्रकाशन ही झाले.
पुण्यात श्री. शरद पोंक्षे यांच्या हस्ते, आणि पद्मश्री पद्मजा फेणाणी, श्री. अजय जोगळेकर यांच्या उपस्थितीत, तर अमेरिकेत डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या हस्ते, डॉ. हरी सहस्रबुद्धे आणि बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे श्री. विवेक पंडित यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.. पुण्यात मुसळधार पाऊस असूनही एकदाही connection drop न होता, वीज न जाता आमचा skype video conference चा वापर करून केलेला हा प्रयत्न संपूर्णपणे यशस्वी झाला! विघ्नहर्त्याच्या कृपेशिवाय हे शक्य होईल काय?.. जय हेरंब!!

मायबोली गणेशा समोर संग्रहातील काही गाणी प्रस्तुत करताना आणखी विशेष आनंद होतोय!!
मायबोलीकरांच्या प्रतिक्रियांची उत्सुकता आणि गीतसंग्रह खरेदी करण्याच्या क्रियेची अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नसावी.
संग्रहा मागची भूमिका, इतर गाण्यांची झलक आणि खरेदी करण्याविषयी माहिती http://www.jayheramb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या गीतसंग्रहाच्या विक्रीतून होणारा सर्व फायदा हा सामाजिक कार्य, स्वा. सावरकरांचे विचार पुस्तिका वाटप, सावरकरांच्या जीवनावर लहान मुलांकरिता Animation Video निर्मिती इत्यादि करिता वापरण्यात येणार असून त्यात कोणताही व्यावसायिक हेतू नाही हे मी विशेषत: नमूद करू इच्छितो. तरी मायबोलीकर रसिकांनी या प्रकल्पास भरभरून पाठिंबा द्यावा अशी नम्र विनंती...

--उपासक
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुरेख !!!