सुश्राव्य संगीत - सकल कलांचा उद्गाता - केदार पावनगडकर

Submitted by संयोजक on 1 September, 2011 - 13:43


सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता ||धृ||
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता ||१||
आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा तू विद्येचा दाता ||२||


कवयित्री : क्रांति साडेकर
संगीत : प्रमोद देव
गायन : श्री केदार पावनगडकर
हार्मोनिअम : श्री केदार पावनगडकर
तबलासाथ : श्री सुहास कबरे
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह. मजा आली. गीत, संगीत आणि गायनही सुंदर.

प्रमोद देवांची संगीतकार म्हणून नवी ओळख झाली.
धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

वा!

धन्यवाद मंडळी आपल्या कौतुकमिश्रित प्रतिसादांनी भारावून गेलोय. ह्या प्रतिक्रिया मी संबंधित कलाकारांपर्यंत पोचवल्या आहेत...त्यांनीही त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद कळवायला सांगितलंय.

समस्त प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!

क्रांतीच्या ह्या गीताला मी जवळपास दोन वर्षांपूर्वी दोन चाली लावल्या होत्या...एक भूपमध्ये(हीच ती) आणि दुसरी मालकंसातली. अगदी आयत्यावेळी गाण्यासाठी केदारजींना जेव्हा मी ह्या दोन्ही चाली ऐकवल्या तेव्हा त्यांनी भूपमधली चाल निवडली आणि आपल्या सुरेल आवाजात गातांना मला ती ध्वनीमुद्रित करता आली हे मी माझे भाग्य समजतो. ह्या गाण्यासाठी मी गायक केदारजी आणि माझे तबलजी मित्र सुहास कबरे ह्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

मायबोलीने संधी दिली नसती तर कदाचित हे गीत अशा स्वरूपात अस्तित्त्वातही आले नसते..म्हणून मायबोली प्रशासनाचेही मनःपूर्वक आभार मानतो.

Pages