समतोल फाऊंडेशन

Submitted by झुलेलाल on 31 July, 2008 - 00:46

लेलें'च्या `शोधा'त अनेकजण सहभागी होऊ इच्छितात, हे त्या कथेवरील प्रतिक्रियांवरून लक्षात आलं.
`.... त्यामुळे हे लेले कोणीही असु शकतात, अगदी आपल्यातही एखादा लेले असेल!' हे केदार जोशींचं मत अगदी पटलं, आणि वाटल,
आपण सगळेच त्या `आपल्यातल्या' लेलेंना शोधू या.
मागं मी समतोल फाऊंडेशनविषयी लिहिलं होतं. अनेकांनी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली होती. आज त्यांचा व्याप वाढतोय. रेल्वे फलाटावर भरकटलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कल्याणजवळ एक कायमस्वरूपी शिबीर सुरू असते.
या मोठ्ठं काम करणार्‍या संघटनेच्या छोट्याशा कार्यालयाला आता एखाद्या जुन्या, कामचलाऊ संगणकाची गरज भासू लागलीये.
आपला दिवस संगणकासमोरच उजादतो, आणि मावळतो.
`समतोल'साठी काही करायची इच्छा आहे? फाऊंडेशनचे तळमळीचे कार्यकर्ते विजय जाधव यांच्याशी ९८९२९६११२४ या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क साधा, आणि सत्कार्याचे समाधान मिळवा.
हे केवळ आवाहन आहे.
अधिक माहितीसाठी, http://loksatta.com/daily/20080614/ch06.htm इथे भेट द्या...
लेलेंच्या कामात खारीचा वाटा उचलू या.

(यापूर्वीच्या प्रतिक्रिया इथे वाचा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुलेलाल, मी पुण्यात असते. पण एखाद्या रविवारी येउन तुम्हाला कामांत मदत करु शकते. मला सांगा तसं. पैसे कसे आणि कुठे द्यायचे? एक रक्कम निश्चित केली आहे की जसे जमेल तसे देऊया. मला असं वाटतंय की आपण सगळे दर महिना एक विशिष्ट रक्कम देत जाऊ आणि एक फंड उभारु. म्हणजे समतोल ही फक्त सुरुवात असेल. दर महिन्या/दोन्/तीन महिन्यानी आपल्याला एका नव्या प्रकल्पाला मदत करता येइल. मायबोलीकर नसलेले मित्र ही सभासद करुन घेउया म्हणजे जरा ठीकठीक रक्कम गोळा होईल. तुम्हा सगळ्यांचं मत काय??

माझी बॉस वीकेंडला काँप्युटर जोडून पहाणार आहे (तीने तो १ वर्षभर तसाच पाडून ठेवलाय). त्यानंतर पुढच्या स्टेप्ससाठी इथेच पोस्ट टाकेन. आपण सर्वजण हे काँप्युटरचे काम करुन देऊच.

कृपया कुणीतरी विजय जाधवांशीही थेट संपर्क साधा. फंड उभारण्याची कल्पना समतोलपुरती मर्यादित न ठेवता, अशा स्वरूपाचे काम करणार्‍या गरजू उपक्रमांसाठीही व्यापक ठेवावी.
हेही पाहा : http://maayboli.com/node/1485

झुलेलाल, तुमचा व विजय जाधवांचा फोन नं. मी नोट केलेला आहे. काय होते त्याप्रमाणे इथे व तुम्हाला कळवेनच.
अशा उपक्रमांसाठी जमेल तसे फंड्स देउ शकेन (ज्याने आपल्याला जे दिलेले असते, ते त्याच्याच इतर लेकरांसाठी उपयोगात आले तर छानच ना!) पण वेळ देऊ शकणार नाही कारण माझे व्याप सांभाळून ऑलरेडी मी एका NGO शी संलग्न आहे.

... हा वेगळा बी बी केला हे छान झाले..

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
अहं त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||

खूपच छान उपक्रम आहे. पैसे कसे आणि कुठे पाठवायचे ते कृपया सांगा.

मी मागे फंड उभा करन्याची कल्पना मांडली होती. फंड खालील रित्या उभा करता येऊ शकतो.

१. ईच्छुक मायबोलीकर व ईतर लोकांकडुन देनग्या ऐका ठिकानी जमा करने. त्यातील अर्धा भाग हा कायमस्वरुपी गुंतवनुकीत टाकायचा ( जसे शेअर्स, मुदत ठेवी, म्युच्वल फंड ई) व त्यापासुन आलेले उत्पन हे देनगी म्हणुन वापरायचे. जेने करुन ते पैसे अर्धा भाग लगेच ऐक वा अनेक संस्थाना देता येईल.

किंवा

२. सरळ सरळ मासीक वा वाटेल तेव्हा पैसे त्या फंडाला देने व सर्व पैसे देनगी स्वरुपात देने.

पण त्यात अडचनी येऊ शकतात. जसे
१. तो फंड धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर असावा लागतो.
२. कोणीतरी ऐक दोघेजन त्या फंड कडे पाहानारे असावे लागतात.
३. दरवर्षा कदाचीत ऑडीटही करावे लागेल.
४. दर महिन्यात लोक देनगी देतीलच असे नाही. बरेच जन पहिले ऐक दोन महीनेच देतात. ( हा माझा नेहमीचा अनुभव कारण मी संघ परिवारासाठी मासिक निधी गोळा करायचो, अगदी २५ रु मासिक साठी कित्येकदा दोन तिन चकरा मारल्या आहेत).
५. बँकेत अकांऊट उघडावे लागेल वैगरे.

मी वरिल दोन्हीला तयार आहे. पहिल्या योजनेत मात्र ऑनलाईन ट्रेंडीग पण उघडावे लागेल. जे मी मॅनेज करु शकेन / लो रिस्क पोर्टफोलीओ तयार करता येईल.

आताही आपण सर्व पैसे उभे करायला तयार आहोत पण अमेरिकेतील लोकांनी ते पैसे कुठे पाठवायचे ( ऐखाद्या मायबोली कराच्या अंकाऊट वर का थेट तिकडेच हा प्रश्न आहेच.)

या पानावर कृपया फक्त समतोल विषयी किंवा त्याना सध्या जी मदत करणे चालू आहे त्याबद्दल लिहा. इतर दूरदर्शी कल्पनांबद्दल याच गृपमधे नवीन धागा सुरू करुन लिहा.

Agree with admin.

मदत करण्याची इच्छा होणे ही चांगलीच गोष्ट आहे, मग ती कुठल्याही कारणासाठी असो. पण प्रत्येकाचे काही हळवे कोपरे असतात. जसे कुणाला वृद्धांसाठी काम करावेसे वाटते, कुणाला मनोरूग्णांसाठी. हा धागा अश्या लोकांसाठी आहे की ज्यांना घरातून पळून गेलेल्या आणि वाईट मार्गाला लागण्याचा धोका असलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे.

    अमेरिकेतून पैसे पाठवण्याविषयी काही सूचना:

      समतोलला अमेरिकेतल्या एखाद्या संस्थेमध्ये रजिस्टर करता येईल. उदाहरणार्थ CRY, Usa. यासाठी काय करावे लागेल याविषयी जास्त माहिती कदाचित चाफा देवू शकेल.

        मागे आम्ही पुण्यातल्या सोफोश संस्थेच्या प्रीतांजली प्रोजेक्टसाठी फंड रेझींग केले होते तेंव्हा अमेरिकेतल्या Wide Horizons For Chidren या संस्थेतर्फे डोनेशन पाठवले होते.

          http://www.whfc.org/

            या पद्धतीने पैसे पाठवल्यास, तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्यांचा डोनेशन मॅचिंग प्रोग्रॅम असेल तर डबल फंड्स पाठवता येतात.

            सरिविना आणि केदार तुमच्या दोघांच्या कल्पना छानच. admin नी सांगितल्याप्रमाणे दूसरीकडे नक्की चर्चा करू.
            अश्विनीच्या बॉस चा संगणक व्यवस्थीत चालेल असेल असे गृहीत धरून माझे प्रश्न असे,
            - त्या संगणकावर काय काय भरायचे ते कोण सांगेल?
            - ते कोणाकडून भरून घ्यावे लागेल तो शोध कोण करेल?
            - त्याना इंटरनेट हवे असेल तर ते पण पहावे लागेल. (माझ्या मते असलेले बरे कारण प्रचंड माहिती मिळेल त्यांना), म्हणजे मग स्पायवेअर किंवा तत्सम काही पण भरावे का?
            - संगणक डेस्क व खूर्ची पण आपण द्यायचे ठरवले तर ते कुठून घ्यावे ते कोण सांगू शकेल?
            - वरील कामे जे जे करतील ते खर्च किती येईल ते पण सांगतीलच, त्या नंतर पैश्याची व्यवस्था. ते इथून जास्तीत जास्त रेटवर कसे पाठवता येतील.
            - मी पण देशाबाहेर असल्याने मझा सहभाग इथे लिहिणे, जरूर असेल तर फोनवर बोलणे आणि आर्थिक भार उचलणे ह्या करताच होउ शकेल. माझ्यातरी तिकडे ओळखी नाहीत.
            सध्या इतकेच प्रश्न आहेत Happy

            ठीक आहे. admin ने सुचवल्याप्रमाणे पुढच्या योजना दुसरीकडे ठरवू. software, डेस्क, खुर्ची ह्यांची खरेदी मुंबईकर तुम्ही करु शकाल का? कारण मुंबईहुन डोंबिवलीशी हे सगळं coordinate करणं सोपं पडेल. मी सांगाल तेव्हा रविवारी येऊ शकते तुम्हा सगळ्यांच्या मदतीला.

            ऍडमिन,
            तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही नुसते हुशारच नाही तर कल्पकही आहात. कुणीही मनापासून प्रेम करावं आणि अनपेक्षितपणे भरभरून मिळवावंही अशी नितळ पारदर्शक प्रामाणिक आणि संवेदनशील जागा उपलब्ध करून दिलीय सर्वांना. तुम्ही वेळोवेळी करत असलेले बदलही अतिशय समर्पक उपयुक्त आणि त्वरित असतात. दृष्य आणि अदृष्य दोन्ही स्वरूपात तुम्ही उत्तमोत्तम आहात. तुम्हाला कधीही कमी न पडणार्‍या शुभेच्छा !!
            .....................................अज्ञात

            नमस्कार झुलेलाल,
            माझ्या बॉसचा PC वापरण्याजोगा राहिला नाहिये. पण एक व्यक्ती नवा कोरा असेंबल्ड PC देउ इच्छितेय. आपण जरा required configuration मला urgently मेल करता का?

            या आठवड्यातच काँप्युटर टेबलची व्यवस्था "समतोल फाऊंडेशन"च्या ऑफिसमधे झाली तर बरे होईल.

            अरे, इकडचे सगळे कुठे गायबले?? मित्रहो, पैसे किती आणि कोणाकडे पाठवायचे? संगणकाशिवाय इतर गोष्टींची खरेदी कुठे करुया? झुलेलाल, तुम्हाला फोन करते आज-उद्या कारण इकडे काही हालचाल दिसत नाहिये. म्हणजे पुढचं ठरवुया....चालेल ना?

            हो, सरी आणि अश्विनी.. तुम्हालाच ठरवावे लागेल झुलेलाल ह्यांच्याशी बोलुन आणि आम्हाला कळवा.

            सुनिधी, अगं कॉम्प्युटरचे काम झाले आहे, आजच मिळाला त्यांना :-). बाकी झुलेलाल मला म्हणाले होते की समतोलच्या एका सदस्याने मायबोलीवर रजिस्ट्रेशन केले आहे व त्यालाच ते मायबोली सदस्यांकडून जे काही सहकार्य मिळणार आहे त्याबद्दल co-ordinate करायला सांगणार होते. त्यांनाच इथे पोस्ट टाकून काय व्यवस्था असणार आहे ते सांगायला सांगितले पाहिजे. आणि मी वेळ नाही गं देऊ शकत कारण मी already एका संस्थेच्या सामाजिक कामांमध्ये जमेल तेवढा वेळ देतेय. मी हे झुलेलाल व श्री जाधव यांनाही सांगितले आहे.

            अश्विनी , खूप मोठे काम केले आहेस तु आणि अगदी थोड्या वेळात. मला कौतूक वाटते तुझे. आता समतोल चे सदस्य जे आहेत त्यांची वाट पाहू.

            अश्विनी,
            इथे लिहिण्यासाठी आत्ता शब्द नाहीत.
            पण, एक सांगायचंय...
            मी शोधत होतो,
            ते लेले कालच मला भेटले.
            ते काल्पनिक नाहीत, याची खात्री पटली...
            असे अजूनही लेले आसपास आहेत..
            भेट`लेले', न भेट`लेले',
            पाहि`लेले', न पाहि`लेले'...
            ऐक`लेले', आणि दिस`लेले'ही...
            ह्या सगळ्या `अव्यक्त `लेलें'ना मनापासून प्रणाम!

            अश्विनी. ग्रेट... खरचं शब्द नाहित ग. तुझं कौतुक करायला...आताच झुलेलाल याच्यांशी बोलले मी. समतोल कडे टेबल सध्या आहे आणि दुसरी काही immediate requirement आता तरी नाही. त्यामुळे समतोल चे सभासद coordinateकरतील तेव्हा पुढचे ठरवु. दरम्यान आणखी एका दापोडीच्या संस्थेची मला माहिती कळली आहे. मी ह्या आठवड्यात जाउन येइन. मग त्यांच्यासाठी काय, कसं करता येइल ते ठरवू.

            मी आत्ताच मायबोलीची सदस्य झाले आहे.
            अजून पूर्णतः या उपक्रमाची माहिती घेऊन झाली नाही. या उपक्रमाला कशी आणि कोणत्या प्रकारे मदत करावी याबाबत आपल्या सर्वाकडून सल्ल्याची अपेक्षा आहे.
            घरातून पळून गेलेल्या आणि वाईट मार्गाला लागण्याचा धोका असलेल्या मुलांसाठी मानसिक समुपदेशनाची खूप गरज आहे असे वाटते.

            भारतात 'सोस्वा' नावाची एक संस्था आहे जी, समाज कार्य करणार्या लोकांना त्यांच्या उपलब्धतेनुसार काम देते. कोणाला माहित आहे का? google केल पण सापडल नाही. ( ह्या बद्द्ल चा एक लेख मागे म.टा. च्या रविवार पुरवणी त वाचला होता ). क्रुपया माहित असल्यास सांगा.

            समतोल फाऊंडेशनच्या श्री विजय जाधव यांचा फोन आला होता. या फाऊंडेशन ला या मुलांची ते सज्ञान होईपर्यंत किंवा त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देईपर्यंत व्यवस्था पहावी लागते. एखाद्या वसतीगृहात कुणाची ओळख असल्यास १७-१८ वर्षे वयापर्यंत मुलांची व्यवस्था करण्यासाठी काही मदत होऊ शकते का असे विचारत होते. माझी अशी ओळख नाहिये पण मायबोलीवर कुणी ही मदत करु शकत असल्यास कृपया त्यांच्याशी संपर्क करावा.

            म्हणजे मुंबईतच सोय करावी लागेल ना? माझी पण काही ओळख नाही Sad

            मी विजय जाधवांना फोन करते. वसतीगृहाबद्दल काही कल्पना नाही. वैयक्तिक पातळीवर काही करता येतं का पाहते....

            सरीवीणा, दापोडी चे काही लिहिणार होतीस ना तु? जाऊन आलीस का? लिही ना त्या बद्दल किंवा नवीन दोरा उघड.

            दापोडीचे श्री. सुरवसे का? मागच्या वेळेस मी भारतात गेले होते तेंव्हा त्यांचा आश्रम शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांचे म्हणून जे काही फोन नंबर्स मिळाले होते ते लागतच नव्हते. कुणाला त्यांची करंट contact info माहिती असेल तर प्लीज द्या.

            माझा शेजारी तिथे जाऊन आलाय. ऑफिस (फिरत्या) आणि घर (गणपती, पाहुणे) ह्या धांदलीत मला अजुन जाता नाही आले. सॉरी.....आता लवकरात लवकर जाते आणि सगळी माहिती कळवते...

            Pages