लेलेंच्या निमित्तानं...

Submitted by झुलेलाल on 19 July, 2008 - 00:59

`लेलें'च्या `शोधा'त अनेकजण सहभागी होऊ इच्छितात, हे त्या कथेवरील प्रतिक्रियांवरून लक्षात आलं.
`.... त्यामुळे हे लेले कोणीही असु शकतात, अगदी आपल्यातही एखादा लेले असेल!' हे केदार जोशींचं मत अगदी पटलं, आणि वाटल,
आपण सगळेच त्या `आपल्यातल्या' लेलेंना शोधू या.
मागं मी समतोल फाऊंडेशनविषयी लिहिलं होतं. अनेकांनी त्यांना मदत करायची इच्छा व्यक्त केली होती. आज त्यांचा व्याप वाढतोय. रेल्वे फलाटावर भरकटलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी कल्याणजवळ एक कायमस्वरूपी शिबीर सुरू असते.
या मोठ्ठं काम करणार्‍या संघटनेच्या छोट्याशा कार्यालयाला आता एखाद्या जुन्या, कामचलाऊ संगणकाची गरज भासू लागलीये.
आपला दिवस संगणकासमोरच उजादतो, आणि मावळतो.
`समतोल'साठी काही करायची इच्छा आहे? फाऊंडेशनचे तळमळीचे कार्यकर्ते विजय जाधव यांच्याशी ९८९२९६११२४ या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क साधा, आणि सत्कार्याचे समाधान मिळवा.
हे केवळ आवाहन आहे.
अधिक माहितीसाठी, http://loksatta.com/daily/20080614/ch06.htm इथे भेट द्या...
लेलेंच्या कामात खारीचा वाटा उचलू या.

गुलमोहर: 

ह्या समतोल बद्दल मागे मी माझ्या बर्‍याच ओळखीच्यांना सांगितले होते पण कोणी प्रतिसाद दिला नाही (सांगायला वाईट वाटते की बहुतेक वेळा असेच होते).

जर अनेक मायबोलिकर तयार असतील तर आपण contribution करून समतोल ला कॉम्प्युटर घेण्यासाठी काही रक्कम जमा करुयात का? जे कोणी तयार असतील त्यानी इथेच लिहा मग पूढचे ठरवता येइल.

मी त्यांना लगेच कॉल केला होता. तिन चार वेळेस तो ऑट ऑफ ऐरीया होता. त्यामुळे अजुन माझा कॉल झालेला नाही. मी तयार आहे. आपण ठरवुयात.

good, केदार फोनवर बोलणे झाले तर नक्कि माहिती दे. झुलेलाल तुम्हाला पण मी http://www.rd.com/makeitmatter.do
ह्या लिन्क वर जाऊन पहायला सांगेन. त्या बद्दल माहिती "हेमलकसा" च्या लेखवरील माझ्या प्रतिसादामधे आहे. लवकरात लवकर केलेत तर बरे. तुमचे भाषाज्ञान चांगले आहे तेव्हा नक्कि जमेलच.
केदार अजुन कोणी ह्यात प्रतिसाद देते का ते पाहू. खरेतर १०० लोकांनी प्रत्येकी कमीतकमी १०$ (जास्तीत-जास्त कितीही) टाकले तरी काम होऊ शकते.

मी ही आहे तुमच्या बरोबर. माझ्या इतर मित्र-मैत्रिणींनाही विचारते. ३-४ जण तर नक्की तयार होतील. ऍडमिन ला विचारुया की हे आवाहन मुखपृष्ठावर टाकता येइल का?

नमस्कार मंडळी,
मी पण जुना कामचलावु संगणक शोधत आहे त्या जाधवांसाठी,

मायबोलीकर ईंद्रा (बहुतेक) संगनक विकतो. जुना मीळेल की नाही माहीत नाही पण नविन संगनकाची किंमत साधारण २५००० होईल. सरी तु पुण्यात राहतेस का मुंबईत? त्यांना फोन टाकशिल का? मला त्यांना विचारायचे होते की संगनक द्यावा की पैसे.
त्यांचा कार्याचे स्वरुप ईतके चांगले आहे की अनेक नविन गुन्हेगार निर्मान होनार नाहीत. नाहीतर बेवारस मुल लगेच गुन्हेगारी कडे वळु शकतात.

मी पुण्यात असते केदार. ज्याची गरज असेल ते देऊ आपण. मी ह्या वीकअएंडला फोन टाकते त्याना.

मी मदत करु इच्छिते, सध्यातरी फक्त आर्थिक स्वरुपात मदत करणे शक्य आहे, जसे ठरेल तसे कृपया कळवावे.

केदार, माझी बॉस कदाचित देऊ शकेल तिचा संगणक. मी बोललेय तिच्याशी. फक्त तिने २-३ महिन्यापुर्वी एका शिकणार्‍या गरजू मुलाला (जो directly तिच्या ओळखीचा नाहिये) संगणक देईन सांगितले होते. त्याची पुन्हा एकदा विचारणा करून सोमवारी सांगते म्हणालिये. त्याला नको असेल तर नक्कि देते म्हणाली आहे. हो म्हणाल्यास याच ठीकाणी तिचा e-mail ID देउ का?

अश्विनीची बॉस तयार झाली तर आपण काही जरूरी सॉफ्टवेअर किंवा अजून काही एकंदर कॉम्प्युटर चांगला चालवण्यासाठी लागणारे साहित्य देउ शकू.
अश्विनी मला वाटते तु तुझ्या बॉस लाच विचारावेस की तिला तिचा ईमेल पब्लीक मधे दिला तर चालेल का.

ठिक आहे. सोमवार पर्यंत समजायला हरकत नाही.

धन्यवाद! `समतोल'ला एक भक्कम आधार उभा राहातोय, ही खूप समाधानाची बाब आहे. माणूसकीचा एक धागा आपण सर्वांना नव्या नात्याने एकत्र आणतोय... या साखळीतला एक दुवा व्हायला मीही उत्सुक आहे. आपले जे ठरेल, त्यामध्ये मी पण सहभागी होईन.

माझी बॉस तयार आहे संगणक द्यायला. फक्त तिला तो पुन्हा connect करुन तिचा personal data काढून घ्यावा लागेल. समजा तिने PC format करुन दिला तर पाहिजे ती OS व इतर softwares टाकता येतील. ती पवईला रहाते. फक्त पुढे हे सर्व कसे करायचे ते कुणीतरी सांगा.

त्या साठी एखाद्या संगनकाच्या दुकानदाराला गाठावे लागेल. तो विडोंज व ईतर स्फॉप्टवेअर्स लोड करुन देईल. तो फॉर्मॅट झाल्यावर तु जाधवांना फोन करु शकतेस, कोणीतरी नक्कीच येऊन घेऊन जाईल.
कॉम्प जर त्यांना मिळत असेल तर बाकीच्या कार्यासाठी मी त्यांना ईकडुनच पैसे पाठवेल.

चांगली बातमी अश्विनी, आणि वेळेत काम केलेस. केदार वर ज्यानी प्रतिसाद दिला आहे त्या शिवाय अजुन १-२ जण तयार आहेत, तेव्हा जास्तीचे पैसे आपण ५-६ मिळून पाठवुयात ना? सर्व ठरले की आपण बोलू. माझ्या मते memory पण जास्त टाकता येइल का ते पाहुया का. कॉम्प्युटर डेस्क नसेल तर त्याचा पण विचार करत येईल. भारतात जे रहातात त्यानाच expert शोधावे लागतील हे करायला. वरील पैकी कोणी तिथे आहेत का?

खूप खूप धन्यवाद! विजय जाधवना फोन केला, तर घेऊन जाण्यासाठी ते नक्कीच व्यवस्था करतील. पाठपुराव्यासाठी मला, ९८७०३३९१०१ वर फोन केला, तरी चालेल. म्हणजे, या कामात सहभागी होण्याचा आनंदही मला मिळेल...
भारावलो.

काळाच्या ओघात हे पान ललीत मधे आत कुठेतरी जाऊन बसेल. तसंच "समतोल" बद्दल परत काही माहिती द्यायची असेल तर सापडणार नाही. त्यापेक्षा "समतोल" असा गृप चालू केला तर नेहमीसाठी, त्यांच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी एक जागा तयार होईल. इतरानाही त्यात सामील होणे सोपे जाईल. "समतोल" चे अधिकृत प्रतिनिधिही त्यात सामील होऊ शकतात. कामाचे वाटप, तयारी याची वर्गवारी करणेही गृपमधे सोपे जाईल.

तुम्हाला ही कल्पना आवडत असेल तर इथे सांगा मग लगेच गृप तयार करतो. (गृप केला आणि कुणिच सामील झाले नाही असे व्हायला नको म्हणून आधी विचारतोय).

चांगली कल्पना.
चांगल्या कामाला चालना मिळेल.

हो. खरचं. वेगळा ग्रुप केला तर नक्कीच response वाढेल. हे आवाहन मुखपृष्ठावर टाकता येइल का? केदार संगणकाबरोबर इतर ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळे मिळुन देऊया नं. काय म्हणतोस??

वेगळ्या ग्रुपच्या सुचने बद्दल फर अतिशय आभार! दरम्यान कुणी मुंबईकर आता पुढाकार घ्या अन पटापट निर्णय घेवुन टाका. बेसिक डाटाबेस व वर्ड प्रोसेसिंग
साठी ते उपयोग करणार असतील तर उगिच इतर सॉफ्टवेअर देउन मशिन
भरुया नको.

हो चालेल सुनीधी / सरी.
पण ऐक मुंबईकर त्यासाठी पुढे आला पाहीजे. झुलेलाल / अश्विनी तुम्ही मुंबईत राहाता का? आम्ही ईकडील मंडळी तुमच्या अंकाऊट वर पैसे देऊ शकतो व तुम्ही खर्च वजा जाता तो कॉम्प व पैसे त्यांना देऊ शकता.

ऍडमिन, समतोल असा गृप न करता समाजसेवा असा गॄप तयार केला तर? त्यात सर्वच समाजोपयोगी लेख, माहीती ई लिहीता येईल.

मी मुंबईतच राहातो. मला हे जमविणेही शक्य आहे. समतोलशी संपर्कही असतो. काही विधायक सामाजिक काम करणारे मुंबई-ठाण्यातील काही प्रतिष्ठित लोक ह्या कामाशी जोडलेले आहेतच. त्यांची मदत/ सहकार्य घेणे शक्य होईल. संपर्काच्या सोयीसाठी मी माझा आणि विजय जाधवचाही मो. क्र, दिला आहे.