तीळकूट

Submitted by bedekarm on 30 July, 2008 - 18:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक वाटी तीळ खमंग भाजून ,
लाल सुक्या मिरच्या ८-१०(किंवा लाल तिखट),
मीठ,
कढीलिंब तीन्-चार काड्या,
थोडी चिंच ,
थोडा गूळ,
पाव चमचा हिंग,
तेल १ टे स्पून

क्रमवार पाककृती: 

तीळ भाजताना कढीलिंब टाका म्हणजे तो चुरचुरीत होतो. मग तेल गरम करा. त्यात चिंच भाजून घ्या, हिंग टाका, मग मिरच्या घालून जरासे परता. हे सर्व मंद आचेवर करा. मिक्सरमधे सगळ घालून बारीक करायचे. यामधे थोडे कोरडे खोबरेही भाजून घातले तर छान लागते.

अधिक टिपा: 

हे खास कोकणी तीळकूट आहे. लिहिताना लहानपणीची आठवण आली. तेंव्हा मिक्सर नव्हता. हे सगळ लोखंडी खलबत्त्यात घालून कुटायला लागे.

माहितीचा स्रोत: 
स्वतः
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: