लोणचे कसे टिकवावे?

Submitted by प्रतिभा on 30 July, 2008 - 01:32

गेल्या तिन चार वर्षांपासुन घरी केलेले आंब्याचे तसेच लिंबाचे लोणचे टिकतच नाहि. म्हणजे दोन ते तिन महिन्यातच त्याला बुरशी येते. लोणच्याला तेल तर अगदि भरपुर असते.बरणीहि अगदि काळजीपुर्वक साफ केलेली असते, लोणचे बरणीतुन काढताना व पुन्हा बरणीचे झाकण लावतानाही काळजी घेतली जाते. मग असे का होते? चांगले वर्षभर टिकणारे पण लोणच्याचा भरपुर खार असलेली कृती कोणी सांगेल का? शिवाय ते टिकवायचे कसे तेहि कृपया सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारणपणे लोणचे टिकण्यासाठी, दिलेल्या प्रमाणात मीठ वापरावेच लागते.
कैर्‍या वा इतर पदार्थ पुर्ण कोरडे असावेत. पूसून घ्यावेत.
इतर सर्व साहित्य व हातहि पूर्ण कोरडे असावेत.
फोडणी पूर्ण गार झाल्यावरच वापरावी.
बरण्या स्वच्छ धूवुन कोरड्या केलेल्या असाव्यात. शक्यतो उन्हात ठेवून वाळवाव्यात.
आतून गरम करुन थंड केलेले मोहरीचे तेल लावून घ्यावे.
बुरशी आलीच तर तेवढा भाग काढून टाकावा. आणखी फोडणी करुन गार करुन घालावी. तत्पूर्वी आंबूस वास येत नाही ना याची खात्री करावी.
आवडत असेल किंवा हरकत नसेल तर व्हीनीगर अवश्य वापरावे.
ताजी लोणची करुन खाणे कधीही उत्तम. त्यात जास्त मीठ आपण घालत नाही, आणि मीठ कमी खाणेच हितकर.

लोणचं टिकण्यासाठी आणखी एक उपाय :
मीठ आणि लाल तिखट भाजून घेतात . अर्थातच दोन्ही वेगवेगळे. म्हणजे त्यातलाही मॉइश्चरचा अंश निघून जातो.

दिनेशजी,धन्यवाद.
व्हिनिगर का आणि कसे वापरावे.
लाल तिखट आणि मीठ किती भाजावे?

प्रतिभा
तिखट व मीठ २/३ मिनिटे भाजावे. एकदा कढई(जे भांडे असेल ते) तापले की गॅस बारीक करून मग भाजावे. जळणार नाही याची काळजी घ्यावी.

व्हीनीगर पदार्थ टिकवण्यासाठी उत्तम. त्यात सर्व मसाल्याचा स्वाद उतरतो.
मीठ जर ओलसर वाटले तर भाजावे. पण तिखट भाजताना मात्र खुप काळजी घ्यावी लागते. तिखट व हळद चटकन करपतात.
त्यावर गरम तेल ओतणे हा चांगला पर्याय आहे.

धन्यवाद दिनेशजी. पण अंदाजे १ किलो कैरीच्या लोणच्याला किती व्हिनिगर घालावे ?

एक किलो कैरीला एक कपभर व्हीनीगर पुरेल. ते गरम करुन त्यात थोडी साखर घालायची. मग थंड झाले कि लोणच्यात मिसळायचे. साखरेने त्याचा उग्र वास जाईल. आणि तसेही लोणच्यात घातल्यावर त्याला मसाल्याचाच स्वाद लागतो.
चवीप्रमाणे पांढरे किंवा तपकिरी व्हीनीगर वापरले तरी चालेल.

.

चान्गला प्रश्न विचारलास प्रतिभा. माझेही लोणचे असेच खराब झाले यावेळी.

एकदा सगळे मिश्रण बरणीत भरल्यावर किती वेळा आणि कसे हलवावे?

दिनेश, व्हिनेगार कोणत्या कम्प्नीचे चान्गले?
लोणचे सोडुन असे कोणते असे पदार्थ (नेहमी केले जाणारे) आहेत जे व्हिनेगार मुळे छान टिकतात?

पांढरे व्हीनीगर हे बहुदा सिंथेटिक असते. ते असेटिक आम्लापासून करतात. तपकिरी व्हेनीगर हे सफरचंद, द्राक्ष वा तांदळापासून करतात.
कुठलिही भाजी हि व्हीनीगरमूळे टिकते.

मी आजच कैरीला मिठ व हळद लावुन ठेवलेय. संध्याकाळी फोडणी ओतेन. पण असे केल्याने पाणी खुप सुटते. पाच मिनिटात एक इंच पाण्याच थर जमा झाला बरणीत. आता या पाण्यासकट कै-यांवर फोडाणी ओतली तर खार खुप पातळ होईल. बरणीत जमा झालेले पाणी काढुन टाकावे आणि मग लोणच्याचा मसाला मिसळावा काय? लोणच्याचा आंबटपणा कमी तर होणार नाही ना?

व्हिनेगर टाकायचे असल्यास नेहमीच्या प्रमाणात तेल वगैरे सगळे टाकल्यावर अधिकचे व्हिनेगर टाकायचे की तेवढे तेल कमी करायचे? (म्हणजे १ कप व्हिनेगर टाकले तर १ कप तेल कमी टाकायचे?)

मी आज कैरीला मिठ व हळद लावुन उन्हात ठेवले होते पण फोडी पुर्णपणे वाळल्या नाहीत, परातीत थोडे पाणी सुटलेले आहे.
जर आजच लोणचे घातले तर चालेल का? की पाण्यामुळे लोणचे टिकणार नाही.
आणि उद्या पुन्हा उन्हात सुकवून घ्यायचे तर आज रात्रभरात कैर्या पाणी सुटल्यामुळे खराब होतील का?

मी एक्पर्ट नाहिये यात पण सगळ्या फोडि चाळणीत टाकुन निथळुन घ्या आणि पन्चा,साडि तत्सम वर टाकुन पन्ख्याखाली मोकळ्या पसरुन ठेवा.. म्हणजे वास येणार नाही.
ओल्या फोडिचे लोणचे टिकत नाही.
(आइला हे सगल करताना बघितलय त्यावरुन लिहतेय मी स्व्तः कधिही लोणच घातल नाही.)