जनलोकपाल बिल - सर्व भारतीयांना शुभेच्छा!

Submitted by केदार on 27 August, 2011 - 22:57

जनलोकपालबिल पास होणार. आज अण्णा १० वाजता उपोशन सोडणार. अण्णांनी हे सर्व करून दाखविले. सर्व भारतीयांना शुभेच्छा!

आता वाट लोकपाल नियुक्त होण्याची .. तो पर्यंत हा क्षण साजरा करायला काय हरकत? जय हो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता वाट लोकपाल नियुक्त होण्याची .. तो पर्यंत हा क्षण साजरा करायला काय हरकत? >> नक्कीच.
पण याबरोबरच आपली सगळ्यांची जबाबदारी वाढणार आहे. आता नुसता लोकपाल नियुक्त होण्याची वाट बघायची नाही तर आपण आपल्याकडुन कुठल्याही प्रकारची लाच देणे बंद करणेही महत्वाचे आहे. जितके लोक आंदोलनात प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहभागी झाले त्यापेक्षा जास्त लोकांनी उत्फुर्तपणे लाच देणे आणि स्विकारणे बंद करणे हे जरुरी आहे.
आता वातावरण तापलेले आहे तेव्हाच या गोष्टी घडवुन आणता येईल नाहीतर पुन्हा एकदा सामान्य माणसासाठी ये रे माझ्या मागल्या...
तेव्हा सर्वांनी मिळुन हा क्षण साजरा करताना इथुन पुढे लाच देणे आणि घेणे बंद करायचे हे ही ठरवुयात.

आण्णांच्या मागण्या मान्य.

आण्णानी जनतेला नवा संदेश दिलेला आहे.... रिकामटेकड्या खासदाराना घरी बसवा.

बिल पास होणार आणि बिल पास झाले यात जमीन अस्मानचा फरक आहे. बिल पास झाल्यावरच कायदा होणार.

मला अनेक शंका आहेत (काही अज्ञानातुन आहेत). भ्रष्टाचार निपटण्यासाठी कडक कायदे नव्हते म्हणुन तो फोफावत होता हे मानणेच चुकीचे आहे. कायदा झाला तरी त्याचा अंमल करणारी यंत्रणा सर्व काळ प्रामाणिक असेलच याबद्दल काहीच शास्वती नाही.

अण्णांचे अभिनंदन..

दुर्दैवाने या आंदोलनाने २ संदेश दिले आहेत.
१. आंदोलन केल्याशिवाय भारतात काही मिळत/मिळणार नाही.
२. आंदोलन कराल "तरच" आम्ही तुमच्या मागण्यांचा गांभीर्यपुर्ण विचार करु..अन्यथा नाही.

असो. पाहुया पुढे काय होतय ते.

काल किरण बेदी ने सगळ्यात शेवटी भाषण केले त्यात तेच सागितले आहे.
आत्ता आपल्या सर्वांची जबादारी वाढली आहे.कायम तुमच्या ब्याग मध्ये अण्णांची टोपी ठेवा
कोणी तुमच्या कडे लाच मागितली तर लगेच डोक्यावर ठेवा आणि सांगा मी अण्णा हजारे आहे.
मी लाच देणार नाही.
तरुणांना असही सांगण्यात आल आत्ता घरी जाताना आनंदाच्या भरात वाहन जोरात चालू नका.
नियम कायदे पाळा.
जय हो:)

उपोषण सोडल्यानंतर अण्णा सर्व सहकार्‍यांना मार्गदर्शन करताना म्हणाले ...
" ... केवळ मी अण्णा हजारे अशी टोपी घालून अण्णा हजारे बनता येणार नाही. अण्णा हजारे बनायचे असेल तर उक्ती आणि कृती यामध्ये फरक असता कामा नये. जीवनामध्ये शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, सर्वांवर प्रेम आणि अपमान सहन करण्याची ताकद या पाच गोष्टी अंमलात आणल्या तरच तुम्ही अण्णा हजारे बनू शकाल. अशा अण्णांची देशाला गरज आहे ..."

भारतीय जनतेचे अभिनंदन. प्रगतीच्या टप्प्यावर पहिले पाऊल पडले. अजून बरेच लांब जायचे आहे, पण निदान सुरुवात झाली, रस्ता सापडेल, ठेचा लागतील, दमायला होईल, पण पुढे जात रहाणे हे महत्वाचे.

या विषयावरील विवेचनात एक गोष्ट मला कळली नाही. यात मुख्यतः सरकारी अधिकारी, विशेषतः उच्च पदावरील, यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रारी होत्या. त्या अधिकार्‍यांच्या हाताखाली काम करणारे लोकहि सामान्य जनच होते. फक्त खरे काय, खोटे काय हे जवळून पाहिल्याने त्यांना माहित असेल. त्यावर काय उपाय करता येतील, याबद्दलहि त्यांच्या काही कल्पना असतील. त्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न झाला आहे का?
माझ्या मते आत्तापर्यंत खरोखर फक्त एक पाउल उचलल्या गेले आहे. खरे काम तर पुढेच आहे. कार्यपद्धतींचा अभ्यास, त्यात भ्रष्टाचार होणार नाही अश्या तर्‍हेने त्यांची योजना करणे, चेक्स अँड बॅलन्सेस, इ. गोष्टी करायला उपोषण, मोर्चे यांचा उपयोग नाही. त्यासाठी सरकारी कायदे इ. ची योग्य माहिती असणार्‍या लोकांनाच ते काम करावे लागेल.
त्या दृष्टीने कोण काय करताहेत?

कारण गोमांस खाण्यावरून 'आपण' आणि 'ते' असा भेदभाव करता येतो.
भ्रष्टाचाराबद्दल असे काही नाही.
इट हॅज नो सेपरेशन व्हॅल्यू!