सखा श्रावण निघाला.......

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2011 - 08:00

सखा श्रावण निघाला....

रोम रोम आतुरला किती दिसा संग झाला
झरे मनात श्रावण सप्तरंग कमानीला

जाई-जुई फुललेली प्राजक्ताचा दारी सडा
दूर रानात घालती रानफुले पायघड्या

थेंब मोतीयांचे पानी आगळीच गळामिठी
उन्हे कोवळी कोवळी लोलकात तळपती

भक्तिभाव आरतीचा मंदिरात झंकारला
असा सुखावून जीव सखा श्रावण निघाला.......

गुलमोहर: 

भक्तिभाव आरतीचा मंदिरात झंकारला
असा सुखावून जीव सखा श्रावण निघाला.......

एरवी देवळातली आरती आणि श्रावण महिण्यातली देवळातली आरती अनुभवलीय मी किती फरक असतो.
सुंदर कविता.