शेवट सुचवा...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गणेशोत्सवाम्धे मी लिहिलेली ही अर्धवट कथा.

माझ्या डोक्यात असलेला शेवट मी इथे लिहिलेला आहे.
=========================================

अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.

"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्‍या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...

इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काजलमॅडम नाव मोबाईलवर दिसताच तो जवळ जवळ उडालाच.

"आता कशाला केला या बयेने फोन??" पुटपुटतच त्याने कॉल घेतला.

"अभिजीत." हेलो वगैरे बोलायची पद्धती आता संपुष्टातच आलेली आहे. "कितना सीन हुआ?"

"काजल, आत्ता एक शिफ्ट संपलीये. पाचवा सीन चालू आहे. अजून दोन सीन होतील"

"रब्बिश, अजून चार सीन घ्यायला सांग त्या आझमीला. आणि लवकरच एक नविन कॅरेक्टर घालायचं सीरीयलमधे. त्याची बॅकग्राऊंड तयार करायला सांग आजच्या एपिसोडमधे" काजलने फोन कट केला.

अभिजीत हातातला फोन जवळ जवळ फेकूनच देणार होता. साला.. काय आयुष्य आहे आपलं... गेली पंधरा वर्षं या लाईनमधे स्ट्रगलच स्ट्रगल केला आणि आता कुठे जरा चांगली पोझिशन मिळत होती तर ही बया आणून बसवली आपल्या डोक्यावर. बँकग्ग्राऊंड कोण बनवणार? रायटर की डिरेक्टर? आणि कोण् कॅरेक्टर? बुवा आहे का बाई ते तरी सांगायचे कष्ट घ्यायचे होते. इतक्यात स्पॉटने चहाचा कप आणून दिला.

"साब, आता काय करायचं?" आझमी त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसत म्हणाला.

"नेक्स्ट सीन. काजलमॅडमचा फोन होता, पुढचे पण सीन घेऊन टाक."

आझमीने त्याच्याकडे दयाद्र नजरेने पाह्यलं. एखाद्या लहान बाळाला गणित समजावल्यासारखा बघत तो म्हणाला.
"आता सगुणाच्या लग्नाचा सीन घेतला. पुढचा सीन रायटरने सगुणाच्या एक्स बॉयफ्रेंड जेलमधून पळून जातो असा घेतलाय. सेट डीझायनरवाल्याने बंगल्याचाच सेट अजून चार दिवस कायम ठेवायचा ठरवलाय. आता मी काय करू?"

अभिजीत हसला. काय करू म्हणून मलाच काय विचारतोस?

"सगुणाच्या बिदाईचा सीन घेऊन टाक."

"पण रायटरने तो सीन अजून दिला नाहिये"
अभिजीत मूग गिळल्यासारखा चहा प्यायला. अरे साल्या बबिदाईच्या सीनला राय्टर लागत नायरे. बादलीबभर ग्लिसरीन लागतं... सांग कधी कळणार तुला...

सांग कधी कळणार तुला.. अभिजीतच्या मनामधे गाण्याची धून आपोआप वाजायला लागली.

भाव माझ्या मनातला... आज तरी ती येइल का सेटवर.. हा एकच प्रश्न सतत त्याच्या मनामधे नाचत राहिला. खरंतर जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासून त्याच्या मनामधे तिच्यासाठी पुष्कळ गाणी वाजून गेली होती. अगदी त्याच्या मनाचा एफेम रेडिओ झाला होता. सावरी..सावरी... सावरी...जेव्हापासून तिला बघितलं होतं तेव्हापासूनच...

सावरी. आसावरी चित्तरंजन. त्याच्या प्रोड्युसरची मुलगी. अभिजीत भानावर आला. हे प्रकरण आपल्या हातामधले नाही हे त्याला कधीच समजलेले होते.पण काय करणार दिल है के मानता नही... टणॅव, टणॅव...

खरंतर सावरी अभिजीतच्या मनात हा विचार यायला आणि सेटवर एक पॉश इंपोर्टेड गाडी येऊन थांबायला एकच वेळ झाला. त्याचबरोबर एक सुगंधाची लेकेर सर्व आसमानात पसरली. आणि सावरी गाडीतून खाली उतरली.

अभिजीतचे हृदय जागच्याजागी टणाटणा उड्या मारू लागले. सावरी मेकप रूममधे जाईस्तोवर अभिजीत नजरेने तिचा पाठलाग करत होता.

"आता ही बघणार आहे ही सीरीयल." आझमी म्हणाला. अभिजीतला भानावर यायला अजून पाच क्षण गेलेल. "म्हणजे तो जाड्या येणार नाही रोज?"

"नाही, तो वेगळी सीरीयल बनवतोय,, मारूती जमादार डिरेक्टर घेतलाय." आझमी म्हणाला. मारूती जमादारने या आधी ओळीने चार पिक्चर सुपरडुपर फ्लोप दिलेत.

तितक्यात मेकपरूमाम्धून अभिजीतला बोलावणे आले. सावरी तिथेच असेल या उद्देशाने त्याला भरपूर उत्साह आला आणि तो नाचत नाचत मेकपरूममधे गेला.

"अहो, ऐकलं का?" सावरीच्या या वाक्याने अभिजीत सुपरमॅनसारखा उडाला. त्यानंतर त्याला लक्षात आलं. सावरीला कॉन्व्हेंट मराठी येत आणि आपलं नाव तिच्या लक्षात नसल्याने तिला आपल्याला अशी आदराथी हाक मारलेली आहे. "मेनका कायतरी म्हणतेय. तुम्ही पण म्हणा तिच्यासोबत"

मेनका मॅडम ( हे अर्थातच तिचे खरे नाव नव्हते.) हाततल्या कागदावर्चे डायलोग वाचत होत्या. अभिजीत हताशपणे खाली बसला आणि मेनका सोडून इतराचे डायलॉग वाचायला लागला.

सावरी तोपर्यंत सेटवर निघून गेली. तिथे आझमी सेट डिझायनरला काहीतरी समजावत होता. "हाय.." सावरी त्याला म्हणाली.

"हेलो मॅडम"

"व्हॉट्स दिस? आझमी, मी तुला कितीवेळा सांगले की मला मॅडम सांगू नका. सावरी सांग ना.." लाडात ती म्हणाली.

"माझ्या लक्षातच राहत नाही. तुम्ही किती वेळा सांगली आपलं चुकलं बोलली तरी..." आझमी हसला.

"आझमी, मी तुला एक विचारू?"

"विचार ना?"

"तू माझ्यासोबत आज येशील? डिनरला?"

आझमी जागच्याजागी धसकला. सावरी आपल्याला डिनरला बोलावते??? तेही इतकं गोड गोड बोलत.. आयला ही पण सीरीयल हातातून गेली का काय?? नक्की विचार काय आहे काय हिचा?

अभिजीत तेच तेच डायलॉग वाचून वैतागला. मेनका मात्र अजून प्रॅक्टिस करू म्हणत होतीच. इतक्यात स्पॉट धावर मेकपरूममधे आला. काजल मॅडम आयेली है, असे सांगून गेला.

मेनका मॅडम अचानक उठून उभी राहिली. आरश्यामधे स्वतःचा मेकप नीट आहे की नाही ते बघितले. आणि अभिजीतला म्हणाली. "अभिजीत, आता तू सेटवर जा. आझमीला सांग मी तासाभरात सीनसाठी येते."

"तासाभरात? पण सेट तयार आहे. तुम्ही पण रेडी आहात. मग हा सीन पटकन घेऊन टाकू. "

मेनका मॅडम एकदम लाजून हसली. "काजलशी मला जरा पर्सनल काम आहे, ते झाले की सीन घेऊ ना.. तू जा ना तवर सेटवर"

अभिजीत चिडून उठला. काजलला दिवसाभरात चार चार सीन शूट करायची घाई आणि ही म्हणे तासाभराने येणार. मेनकाचे काम असून असून काय असणार? चॅनलवाले परत एखादा डान्सचा प्रोग्राम करर्त असतील त्याम्धे हिचे नाव आतातरी येऊ दे म्हणून काजलच्या हातापाया पडायच्या असतील, दुसरे असून असून काय असणार? तो उठून बाहेर येऊन बसला. त्याने खिशामधले पत्र पुन्हा काढून वाचले.

सीरीयलसाठी लिहिणार्‍या तीन चार लोकाकडून त्याने हे पत्र लिहून घेतले होते. सावरीला देण्यासाठी. पत्राची सुरूवातच मुळात "ओ मोरे प्यरी सावरिया" अशी सुंदर होती. आज सावरीला हे पत्र द्यायचेच. आपल्या मनातल्या भावना तिलाच सांगायच्या असे त्याने मनोमन ठरवले होते. हातातले पत्र त्याने पुन्हा खिशात ठेवले आणि तो सावरी जिथे बसली होती तिथे निघाला....

तित्क्यात काजल कारमधून खाली उतरली. तिच्या हातामधे एक भला मोठा खोका होता.

================================================

काय आहे हे? अभिजीतने काजलला विचारले.

काजलने आश्चर्ययुक्त चेहर्‍याने अभिजीतकडे पाहिले. "तुला माहित नाही?"

"काय माहित नाही?"

"आज सावरी मॅडम आझमीला.. प्रपोज करणार आहेत"

अभिजीत घसरून खालीच पडला.

"काय सांगतेस काय?" कसाबसा त्याच्या घशातून आवाज आला.

"हो, तिनेच मला सांगितलं. आझमीला ती आज डिनरलाघेऊन जाईल आणि मग तिथेच विचारेल. आणि मग चित्रंजनला सर्वच सीरीयलसाठी घरचा फुकटचा डिरेक्टर मिळेल"

"अरे. पण तो आझमी सावरीबरोबर.. आय मीन, थोडे विचित्र नाही वाटत,"

"जाऊ देत ना. आपल्याला काय करायचं आहे. बरं ऐक, ते कॅरेक्टरंच बॅकग्राऊंड केलंस?"

"कसं करणार. तू मला काहीतरी इन्फोदेना"

काजल एकदम हळूच म्हणाली, "मेनकाची प्लास्टिक सर्जरी"

अभिजीतच्या डोक्यात हॅलोजनच दिवा पेटला. म्हणजे मेनका सीरीयलमधून जाणार. दुसरे कोण का येइना. आपल्याला काय...

काजलचा फोन वाजत होता. चॅनलच्या ऑफिसमधून फोन होता. आझमी आणि सावरी हे ऐकल्यापासून अभिजीतला गरगरत् होतं. स्पॉटकडून त्याने एक कप चहा घेतला. आणि उठून बाहेर गेला.

थंड डोक्याने त्याने विचार केला आणि मनाशी काहीतरी ठरवले. वर्षानुवर्षं चालणार्‍या सीरीयलमधले एखादे पात्र निघून गेल्यावर आपण काय करतो??

खिशातले पत्र त्याने काढून पुन्हा एकदा पाहिले. सावरिया अशी ओळ खोडली आणि तिथे काजल नैनोवाली अशी ओळ लिहिली. पुन्हा खिशात पत्र ठेवले. आणि काजलकडे हसून पाहिले.

समाप्त.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एवढ्यात समाप्त काय? सीरीयल आहे ही शेवटी? दळण दळाय नको का?

एस टी वाय करायचं का? मग करा सुरूवात... Happy

विषय: 
प्रकार: 

काय आहे हे? अभिजीतने काजलला विचारले.

काजलने आश्चर्ययुक्त चेहर्‍याने अभिजीतकडे पाहिले. "तुला माहित नाही? नवीन कॅरेक्टरंसाठी लागणार सामान आहे "

"बरं ऐक, ते कॅरेक्टरंच बॅकग्राऊंड केलंस?"

"कसं करणार. तू मला काहीतरी सांग तरी "

काजल एकदम हळूच म्हणाली, "मेनकाची प्लास्टिक सर्जरी"

अभिजीतच्या डोक्यात हॅलोजनच दिवा पेटला. म्हणजे मेनका सीरीयलमधून जाणार. दुसरे कोण का येइना. आपल्याला काय...

काजलचा फोन वाजत होता. चॅनलच्या ऑफिसमधून फोन होता. सगळ ऐकल्यापासून अभिजीतला गरगरत् होतं. स्पॉटकडून त्याने एक कप चहा घेतला. आणि उठून बाहेर गेला.

पण अभिजितला जास्त विचार करावाच लागला नाही ...
काजलने त्याला सांगितलं, 'आसावरी स्वत: मेनकाची जागा घेणार आहे काही दिवसासाठी... आझमीच्या जागी बहुदा तुझी वर्णी लागते... म्हणून तर आज आझमीला डिनरला घेऊन जाणार आहेत. '
मी उगाच माझ्या खिशातले पत्र काढून पुन्हा एकदा पाहिले. सावरिया... ओ सावरिया.... पुन्हा खिशात पत्र ठेवले. आणि काजलकडे हसून पाहिले.