नशिबाचे खडे

Submitted by अपूर्व on 20 August, 2011 - 09:34

‘नवग्रहांचे खडे... अमूक अमूक ज्वेलर्स... आजच घ्या.. ७ दिवसात परिणाम पहा’ अशा अनेक अ‍ॅड्स बघतो आपण. खड्यांवर अती विश्वास असलेल्या माणसांची गणती तर त्याहून अधिक. त्या दिवशी गाडीत एक माणूस बघितला. दहा बोटात दहा अंगठ्या होत्या त्याच्या. विविधरंगी, विविधढंगी. आणखी बोटं असती तर आणखी घातल्या असत्या त्याने नक्की. पायातल्या बोटांकडे तरीही मी बघितलं नाही पण गळ्यात सुधा ’चैनी’ होत्याच अनेक; खडेवाल्या.
मला या शास्त्रासंबंधी काही म्हणायचं नाहीये, पण लोकांच्या आहारी जाण्याबद्दल म्हणायचं आहे. की, अशा जाहिराती बघून माणसं दुकानात जातात, ते सांगतील तो खडा घेतात, हातात/गळ्यात घालतात आणि आता आपलं नशीब बदलेल अशा मोहक भावनेत गुरफटतात. तेंव्हा असं वाटतं, की,

‘खडे घालून नशीब आजमावण्यापेक्षा, खडे टाकून नशीब आजमावणं बेहतर.’ - अ. ज. ओक

वरील मजकूर माझ्या ब्लॉगवरचा आहे. त्याची लिंक
http://ajstates.blogspot.com

गुलमोहर: 
शब्दखुणा: