मोठ्या हॉटेलांचं छोटं सत्य

Submitted by अपूर्व on 15 August, 2011 - 03:42

सी-फूड म्हणजे माझ्या प्रचंड आवडीचा विषय. सी-फूड साठी प्रसिद्ध असलेल्या ’महेश लंच होम’ मधे काही महिन्यांपूर्वी गेलो होतो. पहिल्यांदाच. एकूणच वर्णनं खूप ऐकलेली होती त्यामुळे त्याबद्दलची, तिथे मिळणा-या पदार्थांबद्दलची उत्सुकता फार वाढली होती.

मेनू इतर हॉटेल्सच्या तुलनेत लिमिटेड वाटला. पदार्थांच्या किमती पदार्थांच्या क्वांटिटीच्या व्यस्त प्रमाणात होत्या. म्हणजे अर्धी वीत पापलेट ची हातभर किंमत असा प्रकार. माशातल्या काट्यांपेक्षा त्या व्यंजनांच्या किमतींचे काटे जास्त खुपले. आणि एवढं असून पदार्थ जगावेगळे चविष्ट आहेत असंही नाही. त्यापेक्षा कोप-यावरच्या कुठल्याही मालवणी हॉटेलमधे जास्त भारी पदार्थ मिळतात.

आणखीही काही अशी नावाजलेली हॉटेल्स बघून आलोय, तिथे खाऊन आलोय; आणि सगळीकडे माझी काहीशी अशीच गत झाली. एकूणच सगळ्या मोठ्या हॉटेल्स चा हाच प्रकार असतो. अर्थात हा सगळा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि इच्छेचा प्रश्न आहे. पण या प्रकारानंतर मी मात्र म्हटलं,

’आकडे मोठे, आणि तुकडे छोटे’

- अ. ज. ओक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश लंच होम माझ्यातरी अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत आवडीचं. हो, महाग आहे. पण हल्ली मासे खुपच महाग झाले आहेत की. चवीच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येकाच्या घरचं, प्रत्येकाच्या हातचं जेवण जसं वेगळं लागतं तसंच प्रत्येक हॉटेलची चव वेगळी. महेश हे मंगलोरीयन फूड देणारं हॉटेल आहे. त्याच्याकडे तुम्ही मालवणी, सीकेपी अशी चव शोधलीत तर मिळणार नाही. त्याची त्याची आवड!

महेशची किंमत कोपर्‍यावरच्या हॉटेलात नाही पण महेशची क्वालिटी, स्वच्छता, अ‍ॅंबियन्सही कोपर्‍यावरच्या हॉटेलात नाही.

मला वाटलं तुम्ही हॉटेल्स कशी चालवतात, त्यांच्यामागचं अर्थकारण, त्यात गुंतलेला काळा पैसा यावर काही लेख लिहिला आहे. Happy

पूर्वी महेश मधे खूप गेलो होतो आणि खूप आवडायचे. आणि जो काय डिश चा रेट होता त्यात निदान भरपूर असायचे. ते मंगलोरी होते वगैरे तेव्हा कळत नव्हते. आता चव बदलली आहे की काय कोणास ठाऊक. तरी सुरमाई खाऊन बघ, आवडेल एखादेवेळेस.

माशांचा विष्य निघाला की प्रतिसाद दिल्यावाचुन राहवत नाही. महेश चांगलेच आहे पण खरी मँगलोरी चव चाखायची असेल तर माहीम चे फ्रेश कॅच ( भंडार लेन च्या अगदी विरुद्ध बाजुला जोर रस्त्ता नॅशनल हॉस्पीटल कडे जो रस्ता जातो त्याच्या कोपर्‍यावर) आणि इर्ला इथले हरीश ( बार आणि रेस्टॉरंट).
बाकी कथा आवडली Happy

ओ हे काय? गंडवलात की राव... कथा म्हणून वाचायला आलो आणि हॉटेलचे परिक्षण? Happy

आता तुमच्या मुद्द्याबद्दल - मोठ्या हॉटेलात चांगले आणि भरपूर अन्न मिळणे हे भारत भूषण, राजेंद्र कुमार, प्रदीप कुमार, सुनील शेट्टी, दिपिका पदुकोणे, कत्रिना सैफ इ. लोकांना अभिनय येणे इतके दुरापास्त आहे. आणि एका अनुभवावरुन ते लगेचच कळते मग इतक्यावेळा अनुभव का घेतला हे काही कळले नाय बा ... Happy

तुमचा कोणी मालवणी मित्र नाहीय का? नसेल तर नक्की पकडा मग तुम्हाला मालवणी जेवाणाची चव काय असेल ते कळेल. नाहीतर पावसात एकदा कोकणला जावुन या. ट्रीप सुद्धा होईल आणि मालवणी जेवण सुद्धा भरपुर मिळेल. Happy

माझा आणि माझ्या नवर्‍याचा महेश लंच होमचा अनुभव एकदम वेगळा आहे.
भरपूरची नक्की व्याख्या काय? कारण जनरली एक डीश आम्ही दोघात खाऊनही उरते. आता तुम्हाला एका डिशमधेच ६ जणांनी जेवणे अपेक्षित असेल तर लोचा आहे. Happy

महेशची क्वालिटी, स्वच्छता, अ‍ॅंबियन्सही कोपर्‍यावरच्या हॉटेलात नाही.<<<< याला प्रचंड अनुमोदन.