असा केला साजरा "स्वातंत्र्यदिन" (ऑफिसात)

Submitted by जिप्सी on 13 August, 2011 - 12:37

यंदा स्वातंत्र्यदिन सोमवारी आल्याने आणि शनिवार/रविवार आम्हाला सुट्टी असल्याने आम्ही शुक्रवारीच स्वातंत्र्यदिन ऑफिसात साजरा केला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही वेगळ्या थीमवर आधारीत स्वातंत्र्यदिन साजरा करायचा ठरला (गेल्यावर्षी प्रत्येक टिमला भारतातील एक राज्य घेऊन त्याची संस्कृती सादर करण्याची थीम आली होती). यावर्षी "भारतात साजरे होणारे विविध सण" हि थीम ठरली. त्याप्रमाणे प्रत्येक टिमला एक सण सादर करावा लागणार होता. आमच्या टिमला "जन्माष्टमी/दहिहंडी" हा सण आला. Happy विविध राज्याचे/धर्माचे सण यासर्वांमुळे खरोखरच एक वेगळे वातावरण ऑफिसात होते (क्लाइंटला याबाबत पूर्वसुचना दिली होती, त्यामुळे काम कमीच ;-)). प्रत्येक टिमने अगदी जीव ओतुन आपआपल्या सणाचे प्रेझेंटेशन सादर केले होते. यात पारंपारीक कपडे, विविध पक्वान्न, नैवेद्य, नृत्य असं सारं काही होतं. सगळे सण एकाच वेळी एकाच ठिकाणी अनुभवणे शब्दातीत होते. त्याचीच एक झलक खास मायबोलीकरांसाठी. Happy

"सारे जहां से अच्छा हिन्दोस्ता हमारा"

तळटीप: आमच्या टिमला जन्माष्टमी/दहिहंडी सण असल्याने (आणि अस्मादिकच फोटो काढत असल्याने) त्याचे फोटो जरा जास्त आहेत :फिदी:. यात आमच्या टिमने श्रीकृष्णजन्मावर आधारीत काहि देखावे सादर केले होते. Happy

=================================================
गुढिपाडवा (चैत्रपाडवा)
=================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

=================================================
जन्माष्टमी/दहिहंडी
=================================================
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
बोलsssssss बजरंग बली कि जयssssssss
प्रचि १०

प्रचि ११

=================================================
दुर्गापूजा (দুর্গা পূজা)
=================================================
प्रचि १२

प्रचि १३

=================================================
गणेशोत्सव
|| गणपती बाप्पा मोरया ||

=================================================
प्रचि १४

================================================
होळी
होळी रेssssssssss होळी, पुरणाची पोळी
=================================================
प्रचि १५

=================================================
सरस्वती पूजन
=================================================
प्रचि १६

=================================================
ईद मुबारक (‎عيد الفطر)
=================================================
प्रचि १७

=================================================
नवरात्रौत्सव (નવરાત્રી)
अंबे मां थारो गरबो रमतो जाय
=================================================
प्रचि १८

=================================================
नारळी पौर्णिमा
सण आयलांय गो आयलांय गो नारली पुनवेचा, मनी आनंद मावेना कोल्याच्या दुनियेचा

=================================================
प्रचि १९

प्रचि २०

=================================================
लोहरी (ਲੋਹੜੀ)
आया ख़ुशी का त्यौहार है, फसलों में भी लोहरी की बहार है

=================================================
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

=================================================
बैसाखी (ਵਿਸਾਖੀ)
=================================================
प्रचि २४

=================================================
ओनम (ഓണം)
=================================================
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

=================================================
दिवाळी/दीपावली
सप्तरंगात न्हाऊनी आली, आली माझ्या घरी हि दिवाळी
=================================================
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

=================================================
नाताळ/ख्रिसमस (Merry Christmas)
=================================================
प्रचि ३४

=================================================

गुलमोहर: 

|| सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!! ||

किती सुंदर कल्पना. ऑफिस मधे एकदम आपुलकीच आणी टीम चे वातावरण आले असणार.

जन्माष्टमी चे, ओनम चे आणी बैसाखी चे डेकोरेशन फार आवडलं. जन्माष्टमी मधे कृष्णाच्या बाललीला
दाखवणार्‍या छोट्या मुर्ती खरचं गोड आहेत. जरी काम केलेलं भांड पण खूप आवडलं.

सग्ळ्यानी खूप मेहनत घेतलेली दिसतिये. Great Job you guys !!!

खूपच छान आहेत्.तुम्हा सर्वांचेही कौतुक वाटते.कुठल्या गावात आहे तुमच्हे ऑफिस?
राष्ट्रीय एकात्मतेचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.

निराली, रेव्युजी धन्यवाद Happy

ऑफिस मधे एकदम आपुलकीच आणी टीम चे वातावरण आले असणार.>>>>अगदी अगदी. स्वतःचे डेस्क सजवून इतरांनाही मदत करत होतो. एकदम धम्माल वातावरण होतं. Happy

कुठल्या गावात आहे तुमच्हे ऑफिस?>>>>मायानगरी मुंबईतील पवई नामक गावात Happy

जिप्सि अरे किती चांगल्या टिम्स आहेत तुमच्या. आणि संयोजकांचे आणि तुमच्या मॅनेजमेंटचे कौतुक करायला पाहीजे की असे प्रोग्रॅम्स ते तुमच्यासाठी करतात. खुप छान वाटल. फोटो पण खुप सुंदर आहेत.

खूप छान.
सगळ्यांनीच खूप मनापासून, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन डेकोरेशन केलय.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! Happy

कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृतीचे कौतूक तर आहेच
पण ऑफ़िसचेही.
तूझे नाही केले तरी चालेल,म्हणतो !!!

छानच की! Happy
त्या-त्या सणाचं नाव त्या-त्या लिपीत देण्याची कल्पना पण आवडली. (दक्षिणी लिपी माबोवर नीट दिसत नाही हे पण यानिमित्तानं कळलं Wink )

बाकी ते राम-लक्ष्मण-सीता पाहून 'येकदम शाळांच्या ग्यादरिंगला खुन्नस' असं वाटलं Wink Light 1

इतके सगळे निर्निराळे सेट्स उभे करण्याइतकी, फुलांच्या रांगोळ्या काढण्याइतकी, ओणमचे नृत्य करण्याइतकी जागा आहे तुमच्या हापिसात?

धन्यवाद लोक्स Happy

जागू, वेगळं असं संयोजन नव्हतंच. संयोजक सगळ्या टिमचं होत्या. Happy चिट्ठी काढुन कुठल्या टिमला कुठला सण ते ठरवलं. Happy

any vacancy sir ???>>>> Wink

तूझे नाही केले तरी चालेल,म्हणतो !!!>>>>दिनेशदा, माझंही कौतुक पाहिजेच Happy जन्माष्टमी/दहीहंडीची संकल्पना माझीच आणि डेकोरेशन मी स्वत: (टिम मेंबर्सची मदत घेऊन) केले होते. Wink सहा भागात श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत देखावा सादर केला होता.

बाकी ते राम-लक्ष्मण-सीता पाहून 'येकदम शाळांच्या ग्यादरिंगला खुन्नस' असं वाटलं>>>>>अगदी अगदी Proud Wink

इतकी जागा आहे तुमच्या हापिसात?>>>>>येस्स Happy ओणम नृत्य, कोळीनृत्य, भांगडा, रास गरबा, गोविंदा (दहीहंडी) हि सगळी नृत्य सादर केली. Happy

फारच सुंदर उपक्रम! मॅनेजमेंटचे कौतुक आणि तुम्हा सर्व एंम्प्लॉयीजचे पण खुप कौतुक Happy

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!!

छानच... सर्वच छान.
फोटोज, सेट्स , डेकोरेशन...
जिप्सि अरे किती चांगल्या टिम्स आहेत तुमच्या. आणि संयोजकांचे आणि तुमच्या मॅनेजमेंटचे कौतुक करायला पाहीजे की असे प्रोग्रॅम्स ते तुमच्यासाठी करतात. >>> १००% अनुमोदन

any vacancy sir ???>>>>>> i m also in Q Wink

सुरेख!

हे सगळ खरच भन्नाट आहे! खूप सुरेख कल्पना.........सगळे सण प्रत्यक्षातही इतके सुन्दर भासत नसतील जसे फोटो पाहून वाट्ले. काय धम्माल करता यार तुम्ही!

लोहरी काय असते?>>>>>>लोहरी पंजाब/हरियाणामध्ये साजरा होणारा एक सण आहे जो पौष महिन्याच्या अखेरीस (साधारण १३ जानेवारी, म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधी) साजरा केला जातो. यात संध्याकाळच्या वेळेस लाकडं रचून (होळीसारखी) आग लावली जाते, त्याच्या भोवती फिरत त्यात तीळ टाकले जातात. नंतर त्याच्या भोवती गोल बसुन भाजलेले शेंगदाणे, रेवडी आणि मक्याचे कणीस खात एकमेकांना लोहरीच्या शुभेच्छा दिल्या जातात. Happy

धन्यवाद लोक्स Happy

जिप्स्या, खरं सांग - लोहरीबद्दल तुलाही कालच कळलंय ना?>>>लले Proud
पहिल्यांदा लोहरीबद्दल समजले ते कुठल्यातरी (बहुतेक "बागबान") हिंदी चित्रपटातुन. Happy नंतर एका पंजाबी मित्राने वरील माहिती सांगितली. Happy

हापीसात काम कंदी करता वो?>>>>>वर्षभर कामच करतो कि वो Wink

धमाल च दिसतय ऑफिस....
this happens only in India......
सगळे देखावे, नाच, खाण्याचे पदार्थ , सजावट, रांगोळ्या.. वा वा.....

सहीच .. फोटो मस्त आलेत..
आमच्या हाफिसात भारतीय वेशभुषा साठी पण परवानगी नाहीये Sad

Pages