असा केला साजरा "स्वातंत्र्यदिन" (ऑफिसात)

Submitted by जिप्सी on 13 August, 2011 - 12:37

यंदा स्वातंत्र्यदिन सोमवारी आल्याने आणि शनिवार/रविवार आम्हाला सुट्टी असल्याने आम्ही शुक्रवारीच स्वातंत्र्यदिन ऑफिसात साजरा केला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही वेगळ्या थीमवर आधारीत स्वातंत्र्यदिन साजरा करायचा ठरला (गेल्यावर्षी प्रत्येक टिमला भारतातील एक राज्य घेऊन त्याची संस्कृती सादर करण्याची थीम आली होती). यावर्षी "भारतात साजरे होणारे विविध सण" हि थीम ठरली. त्याप्रमाणे प्रत्येक टिमला एक सण सादर करावा लागणार होता. आमच्या टिमला "जन्माष्टमी/दहिहंडी" हा सण आला. Happy विविध राज्याचे/धर्माचे सण यासर्वांमुळे खरोखरच एक वेगळे वातावरण ऑफिसात होते (क्लाइंटला याबाबत पूर्वसुचना दिली होती, त्यामुळे काम कमीच ;-)). प्रत्येक टिमने अगदी जीव ओतुन आपआपल्या सणाचे प्रेझेंटेशन सादर केले होते. यात पारंपारीक कपडे, विविध पक्वान्न, नैवेद्य, नृत्य असं सारं काही होतं. सगळे सण एकाच वेळी एकाच ठिकाणी अनुभवणे शब्दातीत होते. त्याचीच एक झलक खास मायबोलीकरांसाठी. Happy

"सारे जहां से अच्छा हिन्दोस्ता हमारा"

तळटीप: आमच्या टिमला जन्माष्टमी/दहिहंडी सण असल्याने (आणि अस्मादिकच फोटो काढत असल्याने) त्याचे फोटो जरा जास्त आहेत :फिदी:. यात आमच्या टिमने श्रीकृष्णजन्मावर आधारीत काहि देखावे सादर केले होते. Happy

=================================================
गुढिपाडवा (चैत्रपाडवा)
=================================================
प्रचि ०१

प्रचि ०२

=================================================
जन्माष्टमी/दहिहंडी
=================================================
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
बोलsssssss बजरंग बली कि जयssssssss
प्रचि १०

प्रचि ११

=================================================
दुर्गापूजा (দুর্গা পূজা)
=================================================
प्रचि १२

प्रचि १३

=================================================
गणेशोत्सव
|| गणपती बाप्पा मोरया ||

=================================================
प्रचि १४

================================================
होळी
होळी रेssssssssss होळी, पुरणाची पोळी
=================================================
प्रचि १५

=================================================
सरस्वती पूजन
=================================================
प्रचि १६

=================================================
ईद मुबारक (‎عيد الفطر)
=================================================
प्रचि १७

=================================================
नवरात्रौत्सव (નવરાત્રી)
अंबे मां थारो गरबो रमतो जाय
=================================================
प्रचि १८

=================================================
नारळी पौर्णिमा
सण आयलांय गो आयलांय गो नारली पुनवेचा, मनी आनंद मावेना कोल्याच्या दुनियेचा

=================================================
प्रचि १९

प्रचि २०

=================================================
लोहरी (ਲੋਹੜੀ)
आया ख़ुशी का त्यौहार है, फसलों में भी लोहरी की बहार है

=================================================
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

=================================================
बैसाखी (ਵਿਸਾਖੀ)
=================================================
प्रचि २४

=================================================
ओनम (ഓണം)
=================================================
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

=================================================
दिवाळी/दीपावली
सप्तरंगात न्हाऊनी आली, आली माझ्या घरी हि दिवाळी
=================================================
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

=================================================
नाताळ/ख्रिसमस (Merry Christmas)
=================================================
प्रचि ३४

=================================================

गुलमोहर: 

प्रचि तर सुंदरच असतात तुझे, त्यात काय नवल Wink (बाकींचेही छानच)
पण..,
जिप्स्याआआआआ तुझे ऑफिस फार्रफार आवडले......
अश्या ऑफिसात दांडी मारायलाही मन राजी होणार नाही...
'काम' आणि नविन संकल्पनांची 'मज्जा' एकत्र Happy
(बॉसचे कौतुक करावे तितके कमी)

अरे, खरंच तुझ्या ऑफिसातल्या लोकांचं करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे - मॅनेजमेन्ट आणि एम्प्लॉयीज दोघांचंही. प्रचि ६ आणि ७ मधला बाळकृष्ण खरोखर कसला क्यूट आहे. २६ मधली थाळी रीड ओन्ली मोड होती का खाल्ली पण कोणी? Happy

अरे हे कुठलं ऑफीस आहे असं???? सही...अगदी रेअरेस्ट ऑफीस!! ओणम, दुर्गापुजाच काय मराठी सणही पारंपारीक पद्धतीने साजरे!!!
मस्त रे जिप्स्या!! Happy

कसली धमाल कल्पना आहे राव.........

फारच सुंदर उपक्रम! मॅनेजमेंटचे कौतुक आणि तुम्हा सर्व एंम्प्लॉयीजचे पण खुप कौतुक

आमच्या इकडे असल काय बी नसत ...........

मी माझा रिझ्युमी मेलते रे. मला घेच तुमच्या हापिसात. हवे तर मी हापिसला पगार देइल असल्या टिममधे घेतले तर Wink

मस्त.. मस्त.. मस्तच Happy

सही. मज्जा आहे बुवा. ओ तुमच्या हापिसात वेक नसेल तर चालेल. बॉसला आमच्या ईथे वेकन्सी आहे असे कळावा नी द्या पाठवुन.
मोस्त येल्लकम.

सही रे... भारी ऑफिस आहे तुझं.... सगळीकडे बरं तुझ्या थीम्सला साजेश्या जागा मिळतात Happy

बॉसला आमच्या ईथे वेकन्सी आहे असे कळावा नी द्या पाठवुन.>>>>>> Lol बॉसबरोबर त्याची अख्खी टीम मागवावी लागेल

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!! Happy

बॉसला आमच्या ईथे वेकन्सी आहे असे कळावा नी द्या पाठवुन.>>>>>> बॉसबरोबर त्याची अख्खी टीम मागवावी लागेल>>>>:फिदी:

जिप्सी ~

तुम १०० साल जिओगे !
कारण ?
कळविण्यास आनंद होतो की, वरील तीन दिवस + ज्यादाचे दोन दिवस आम्हीही भटकंतीत होतो. मार्लेश्वर, पावस, गणपतीपुळे तसेच देवरूख भागातील काही नातेवाईक यांच्याकडे जाणे झाले. मार्लेश्वरचा धबधबा अशा काही उग्र अवस्थेत होता की लांबून पाहातानाच धडकी भरत होती....तीच गोष्ट गणपतीपुळ्यातील गर्दीच्या महापूराची ! बालाजी दर्शनाला लागलेली रांग फिकी पडावी अशी गर्दी. लोक धमाल करत होते लागोपाठच्या सुट्ट्यांमुळे....आणि अशावेळी मला आठवण झाली ती "योगेश जगताप" यांची. मनी वाटू लागले, "अरे ! या ठिकाणी आपले जिप्सी हवे होते या गर्दीचे फोटो काढायला....एरव्ही शांत असलेल्या पुळे गणपतीच्या चेहर्‍यावरील त्या दिवशी फुललेले हास्य टिपण्यासाठी जिप्सीचा कॅमेराच पाहिजे....येरागबाळ्याचे काम नोहे !"

त्या पवित्र ठिकाणी तुमचे नाव आणि त्यामागील कारण मी ग्रुपमधील इतरांनाही सांगितले [ज्याना नेटजगत म्हणजे काय याची खोलवर माहिती नाही, त्याना],

वरील प्रचि मधील गुढी पाडवा आणी मोरयाची चित्रे पाहताना आमच्या सहलीची आठवण झाली.

सो...बी रेडी टु एंजॉय दॅट मच स्पॅन ऑफ लिव्हिंग....ग्रेसफुली !

अशोक पाटील

जिप्सी माझं घर तुझ्या हापिसा जवळच आहे, स्थानिक लोकांना प्राधान्य या तत्वावर I'm the most eligible candidate Proud

प्र चि मस्तच.

तुमच्या हापिस च्या मॅनेजमेंट व टीम चे कौतुक. Happy

वाव.. काय मस्त मजा केलीत तुम्ही .. मजाच आली असेल नाही. Happy
तुमच्या मॅनेजमेंटचे खरच कौतुक वाटते. Happy
आणि सगळ्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यावरचा उत्साहच सांगतो की केवढी धम्माल केलीत ते.

Pages