Submitted by मी मुक्ता.. on 11 August, 2011 - 07:24
स्वप्नभरल्या लोचनांना त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता..
परतवूनी लावले मी आसवांना
मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता..
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..
भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वाह!! सुंदर! आवडली गझल...
वाह!! सुंदर!
आवडली गझल...
मस्तच...!!!!!!!!!!!!!!
मस्तच...!!!!!!!!!!!!!!
ग्रेट! मस्त गझल.सगळे शेर
ग्रेट! मस्त गझल.सगळे शेर आवडले.
व्वा...व्वा छानच की.
व्वा...व्वा छानच की.
एकही उरणार नाही प्रश्न
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता
मुक्ता,ग्रेटच.
परतवूनी लावले मी आसवांना मग
परतवूनी लावले मी आसवांना
मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता.
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता.............मस्त अप्रतिम!
सर्वांचे खूप आभार..
सर्वांचे खूप आभार..
एकही उरणार नाही प्रश्न
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता.
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता---------------सुंदर
आवडली
आवडली
मस्त !! बघ अबोली गंध मी केलेत
मस्त !!
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता >>> सॉलीड जमला आहे शेर!
धन्यवाद सुहासिनी,
Pages