Submitted by मी मुक्ता.. on 11 August, 2011 - 07:24
स्वप्नभरल्या लोचनांना त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता..
परतवूनी लावले मी आसवांना
मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता..
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..
भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
एकही उरणार नाही प्रश्न
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..>>> व्वा!!
बघ अबोली गंध मी केलेत गोळा तू
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..>>>> अत्तिशय सुंदर!
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..>> वा वा
भास सारे भास अंती हे उमजता
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..>> सुंदरच!
खूप आवडली गझल!
आवडली
आवडली
एकही उरणार नाही प्रश्न
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता......
क्या बात...क्या बात...क्या बात...
निव्वळ खास...
निव्वळ खास...
मी मुक्ता, खूप दिवसानी आलीय
मी मुक्ता,
खूप दिवसानी आलीय गजल. एकदम टॉप. अवाडली. पुलेशु
बघ अबोली गंध मी केलेत गोळा तू
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..
भास सारे भास अंती हे उमजता
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..>>> मुक्ताई, मस्तच गं ! एकदम आवडेश...
भास सारे भास अंती हे उमजता मी
भास सारे भास अंती हे उमजता
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता.
वा,मस्तच!
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
बघ अबोली गंध मी केलेत गोळा -
बघ अबोली गंध मी केलेत गोळा - व्व्वाह!
भास सारे भास अंती हे उमजता
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
क्लास!
भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
असं केलं तर?
बघ अबोली गंध मी केलेत गोळा तू
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता.. !!!!!
__/\__ ... !!
छान आहे आवडली
छान आहे
आवडली 
<<एकही उरणार नाही प्रश्न
<<एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता<<
सुंदर !!
सर्वांचे आभार.. आनंदयात्री,
सर्वांचे आभार..
आनंदयात्री, केला बदल.. धन्यवाद.!
एकही उरणार नाही प्रश्न
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता........वा वा वा
बंधनात राहिली मुक्त अव्यक्त
बंधनात राहिली मुक्त अव्यक्त मुक्ता
बंधने झुगारण्याचा प्रयास नुसता
अभासातील भास शोधणारी अप्रतिम रचना !
मुक्ता अभिनंदन!!!!!
शेवटाचे तिन्ही शेर सुंदर.
शेवटाचे तिन्ही शेर सुंदर.
किंकर.. सर्वांचे खूप खूप
किंकर..
सर्वांचे खूप खूप आभार...
एकही उरणार नाही प्रश्न
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता....
क्या बात है.....
बघ अबोली गंध मी केलेत गोळा तू
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..
भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
__/\__
मस्त! सर्वच शेर अफाट!
"मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता.."
वृत्त गडबडलंय का इथे?
गझल आवडली!
अप्रतिम!
अप्रतिम!
खरोखर अप्रतिम!!
खरोखर अप्रतिम!!
तू उधारीने मला दे श्वास
तू उधारीने मला दे श्वास नुसता..
----सुंदर मिसरा
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
निवडुंग,
माझ्या माहितीप्रमाणे तर योग्य वृत्त आहे..
आइ ग!!! खत्तरनाक झालीये गझल.
आइ ग!!!
खत्तरनाक झालीये गझल.
"मग मुक्याने" - गा गा गा
"मग मुक्याने" - गा गा गा गा
असं होतंय ना?
असो. आपला अभ्यास मोठा आहे, मी चुकत असेन तर क्षमस्व.
मग मुक्याने..=...........गा ल
मग मुक्याने..=...........गा ल गा गा
'मुक्क्याने' असे वाचल्यास गा गा गा गा होईल.
हे समजलं नसेल तर
बेफींचा हा लेख वाचा
http://www.maayboli.com/node/21889 ह्यातील मात्राहे सदर जास्त चांगलं मार्गदर्शन करील....
अरे वा! मुक्ता बर्याच
अरे वा! मुक्ता बर्याच दिवसांनी..
जोरदार जमलिये...
एकाच मिसर्यावर (मिसराच ना? :अओ:) कित्येक जणांनी गझला रचल्यात.
सर्वांच्याच सुरेख, सर्वांचे दृष्टीकोन वाचायला मिळाले, निरनिराळे.
पुलेशु!
प्राजु, आभार.. दक्षिणा,
प्राजु,
आभार..
दक्षिणा, धन्यवाद.. बर्याच दिवसांनी आलेय खरी...
बघ अबोली गंध मी केलेत गोळा तू
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..---------- मस्त !!एकदम "मुक्ता" स्टाईल...!!
Pages