आयुष्य म्हणजे

Submitted by सारन्ग on 6 August, 2011 - 02:52

आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी
आयुष्य म्हणजे जीवाधानचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वतच्या हातावर पेललेला तुमचा भर
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर
आयुष्य म्हणजे पावनखिंड , हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा
आयुष्य म्हणजे एक रात्र , चार मित्र , नानेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी
आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ , कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास
आयुष्य म्हणजे नळीची वाट , कोकणकडा आणि तारामती मंदिर
आयुष्य म्हणजे बालेकिल्ल्यावरचा सूर्योदय, लंगोटी मित्र आणि मित्राने दिलेली "क्षत्रीयाकुलावंत ....." आरोळी
आयुष्य म्हणजे वासोटा , चुकलेली वाट आणि मावळतीला जाणारा सूर्य
आयुष्य म्हणजे जंगलातून जाणारी वाट, पानांची होणारी सळसळ आणि कॅमेरा ON करेपर्यंत दिसेनासे होणारे नागराज
आयुष्य म्हणजे जंगली जयगडचा चढ , पाण्याच्या संपलेल्या बाटल्या आणि घशाला पडलेली कोरड

Dedicated to Sahyadri & all my Trek mates

- सारंग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! Happy

आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र>>>> Happy

अरे मीच लिहिली आहे मला देखील आज दोघांकडून मेल मध्ये आली.
काय कराव तेच कळत नाही . गडवाट या community च्या मालकाने मात्र ती माझ्या नावाने टाकली आहे

मस्त !!!!

मस्त

गडवाट या community च्या मालकाने मात्र ती माझ्या नावाने टाकली आहे
अरे पण त्याने स्वतःच्या नावाने टाकली आहे ती कविता...!!!हवे तर गडवाट ग्रुप देखिल बघु शकतो...!!!

अनुराग, मला कळतंय रे , बघितलं मी , पहिल्यांदा त्याने माझं नाव टाकलं होत.
जाऊ दे रे, माग सेना नी पण बराच लिहील होतं याबद्दल.

सारंग... कोणाच्या नावने काय लिहीले, कोणी कोणाचे नाव टाकले हे महत्वाचे आहेच पण त्याही पेक्षा महत्वाच्या आहेत त्या भावना त्यामात्र अप्रतीम आहेत Happy

आणि म्हणुनच आज कोणीतरी आपल्या नावावर खपवेलही पण परत ते त्याला सुचणार नाही त्या तुमच्याच रहातील .....:)

अहो ह्याही पेक्षा अजुन काहीतरी चांगले लिहाल Happy

पु ले शु

मित्रा लय भारी सारंग... कोणाच्या नावने काय लिहीले, कोणी कोणाचे नाव टाकले हे महत्वाचे आहेच पण त्याही पेक्षा महत्वाच्या आहेत त्या भावना त्यामात्र अप्रतीम आहे