रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील

Submitted by केदार on 2 August, 2011 - 23:57

अकथीत सावरकर
लेखक मदन पाटील
प्रकाशक - जिजाऊ प्रकाशन
मुल्य - ३०० रू
प्रथमावृत्ती - २३ मार्च २०११

खरेतर लेखक आणि प्रकाशनाचे नाव पाहून मी पुस्तक विकत घेणार नव्हतो कारण दोहोंवरून त्याची दिशा नक्की झाली होती, केवळ ब्राह्मणांचा तिरस्कार करणारे लेखन. तरी धीर धरून हे पुस्तक घेतले, म्हणलं सावरकरांबद्दल जे आधी कळाले नाही ते वाचायला मिळेल.
प्रस्तावना वाचली आणि हतबुद्ध झालो, सावरकरांवर बोलायच्या ऐवजी संघ, ब्राह्मण, टिळक, आर्य, वैदिक ब्राह्मण, जिनोम प्रोजेक्ट व त्याची भलतीच माहिती आणि मुस्लीम आज देशात का जास्त झाले ह्याचे श्रेय (अर्थातच ब्राह्मणांना) आणि गांधी हत्या व त्यातून होणार्‍या ब्राह्मण समाजाच्या सामूहिक हत्यांबद्दल चे जोरदार समर्थन (उदा " वाघाप्रमाणे खवळलेल्या जनतेंन जी कृत्यं केली, ती इतकी नैसर्गिक व शंभरातील नव्याण्णव बाबतीत अचूक होती की, देशातील बहूजन समाजाचं डोक व हिम्मत अजून शाबूत आहे हेच सिद्ध झाले" हे वाचून मला लेखकाची किव करावीशी वाटली. हे वाक्य ज्या गोर्‍यांनी लिहिले त्यांनी कदाचित आज मी चुकीचे बोललो असे विधान केले असते, पण ही व अशा कोट करून हे पुस्तक चालू होते. पेशन्स ठेवून पुढे वाचायचे ठरविले.

एक भन्नाट उदाहरण, ते (पाटील) म्हणतात की "सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म होय" आता ज्या माणसाने थोडेफार सावरकर वाचले आहे त्याला कळेल की सावरकर म्हणाले, "श्रृती-स्मृती इ ग्रंथानां आज अवास्तव महत्त्व द्यायचे कारण नाही" ," गाय हा पशू आहे, पशू सारखे वाटले तर मारावे व खावे", "पंचंगव्याला जे महत्त्व देतात ते माणसाला पशू हून हिण वागवतात व पशूला देवस्थानी माणतात", " गायीच्या शरीरात जर ३३ कोटी देव असले तर, एखाद्याने जर सहज तिला काठी मारली तर पाच पन्नास देव धारातिर्थी पडायचे, हे कसे परवडेल? आणि तो देवच काय जो स्वतःचे रक्षण करू शकणार नाही?" "गायीच्या पोटात हा देव, पाठीत हा देव इतकेच काय पायात हा देव असे माणने म्हणजे देवालाही पशूपेक्षा हिण समजणे हे होय", ही सर्व वाक्य सावरकरांचे आहेत, माझे नाहीत. जो माणूस असे लिहू शकतो त्याच्या हिंदूत्वाचा कल्पनेला वैदिक म्हणता येईल का? केवळ ब्राह्मण आहे म्हणून उचलली जीभ असे कसे करता येईल?

दुसरे एक महान वाक्य म्हणजे "सावरकरांच्या लिखाणातून बहुजन दु:स्वास स्पष्ट दिसून येतो आणि स्वजातीयांची वारेमाप भलावण व कौतूक द्सितं." काय म्हणावे ह्याला हे काही कळत नाही. अहो ज्या माणसाला खुद्द गांधी पण म्हणाले की तुम्ही जे काम रत्नागिरी, नाशकात केलं त्याला तोड नाही, कित्येक देवळ, पानवटे हे अस्पृश्यांना खुले केले ते पाटीलांना दिसत नाही वा केवळ जातीमुळे मान्य नाही. अहो खुद्दा सावरकर सत्यनारायण घालायला नको कारण त्याची गरज नाही असे म्हणत होते हे पाटील विसरले! पुढे ते म्हणतात की "काही नाटकांचे प्रयोग लोकांनी बंद पाडले ह्यावरूनच त्यांचं सामाजिक लेखन बहुजन संमत नव्हत हे दिसत", अरे बा पाटला, जो माणूस सर्वणांविरुद्ध खुद्द ब्राह्मण असून आवाज उठवत होता, त्याला सर्वण विरोध करणारच. की ते सत्यनारायणविरोधी नाटक पाहायला ज्यांना दोन वेळचे जेवन मिळत नव्हते ते अस्पृश्य येणार? उलट बा पाटला तू दोन्ही वाक्ये सलग मांडून ती दोन्ही परस्परविरोधी आहेत हे तुज कळले नाही असे खेदाने म्हणावे वाटते.

पुढे पहिल्या प्रकरणात पाटील गाजलेल्या उडीचा आढावा घेतात. ह्या उडी बद्दल अनेक प्रवाद आहेत. धनजंय कीर (चरित्रकार) जरी ही उडी महान होती असे मांडत असले तरी खुद्द उडी तितकी महान नव्हती हे य दि फडके म्हणतात, ज्यावर सावरकरांनी मौन बाळगले व आम्हास य दिं फडक्यांचे म्हणणे पटते. पण ही उडी लाक्षणिक दृष्ट्या महान होती असे आमचेही मानणे आहे कारण ह्यात खुद्द क्रिया (म्हणजे उडी) जरी महान नसली तरी ज्या रितीने तिचा प्रसार व प्रचार झाला. ब्रिटीशांना कोणी असेही टक्कर देऊ शकते हेच त्यातून साध्य झाले त्यातून अनेक क्रांतीकारक जन्माला आले हे सत्य कसे नाकारता येईल? पाटलांनी नेमके हेच नाकारले आहे. ब्राह्मण लेखकाबद्दल ते पुढे म्हणतात की " एका सामान्य दर्जाच्या कृतीला आंतरराष्ट्रीयख्यातीची कृती ठरवणे आणि तिचे बेसुमार उदात्तिकरण करणं, ह्यामागे "जातीनिष्टा" ही एकच बाब असल्याचे दिसून येते" अहो पाटील, अहो जरा य दि फडके वाचा हो, आणि ते ही ब्राह्मणच आहेत तरी त्यांनी ही उडी सामान्य होती पण तिच्यामुळे जे बुडबुडे निर्माण झाले ते असामान्य होते असे मांडले आहे.

पुढे ते म्हणतात की १९०७ साली जो माणूस मुस्लीम हिंदू भाई भाई म्हणतो, तो पुढे अचानक हिंदूत्वाकडे का वळतो? त्यांनी वैचारिक कोलांटउडी मारली असे लेखक म्हणतो. जे त्याचा दूरदृष्टीला कळाले नाही ते आम्ही इथे सांगू इच्छितो. सावरकरांनी १८५७ चे बंड पुनः जागृत केले व त्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. त्याची प्रसिद्धी केली, इतकी की हे पुस्तक ज्या कडे मिळेल त्याला तुरूंगात जावे लागत होते. ह्या बंडाला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक आयुध म्हणून वापरले. बहादुरशहा जफरचा एक शेराचा त्यांनी फारच प्रचार केला तो म्हणजे
"गाझियोमें बू रहेगी जबतलक इमान की,
तब तो लंडनतक चलेगी तेग हिंदूस्थान की "
तेंव्हा सावरकरास उर्दू माहिती नव्हते. गाझी म्हणजे मुस्लीम योद्धा, जो धर्मासाठी व मुस्लीम राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करतो, अल्लाचेच राज्य स्थापण्यात झगडतो. होमवर्क म्हणून आमची पाटलांना विनंती आहे की बहुजन समाजातीलच एका लेखकाने, श्री शेषराव मोर्‍यांनी लिहिलेले, "१८५७ चा जिहाद" हे पुस्तक वाचावे. लेखक ब्राह्मण नाही, त्यामुळे कृपया वाचाच असा आग्रह. मग आपल्याला कळेल की ही कोलांटौडी का? उर्दूत एक शब्द आहे दार-उल-इस्लाम व दार-उल-हरब . दार-उल-हरब म्हणजे हे इस्लामचे राज्य नाही असे येथील मुस्लीमांचे म्हणने आहे व होते. त्यामुळे १८५७ च्या पत्रांमध्ये तसे उल्लेख आहेत जे शेषराव मोर्‍यांनी व्यवस्थित मांडले आहेत.

बरं हे अजून एक बघा, " प्रामुख्याने उत्तर भारतात झालेल्या उठावात किती हिंदू सहभागी होते, ते पाहिलं तर मोजकी नावे समोर येतात, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि मंगल पांडे. सावरकरांनी ह्या सर्वांना रणदेवता, संग्रामदेवता असे गौरविले आहे आणि ते सगळे ब्राह्मण आहेत" असे मांडून पुढे लगेच आम्ही वरच्या प्यारात जे म्हणत आहोत तेच ते मांडतात, " दार-उल-इस्लाम" चा विचार स्वत्;च्या ताकदीवर अंमलात आणंण मुस्लीमांना शक्य नव्हतं, त्यासाठी त्यांना हिंदूंची मदत लागणार होती, परंतू हिंदू माणसिकता तेवढी कडवी नव्हती हे उठाव कर्त्यांना ठावूक होते" आता घ्या. दोन्ही कडून आपलीच टिमकी अन वर परत ब्राह्मणांना मोठे केले म्हणून ओरडा.

एके ठिकाणी अजून एक गमतीदार वाक्य बघा, " प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि 'रामदास हे शिवरायांचे गुरू नसून अदिलशहाचे हेर होते' असे पुराव्यानिशी हायकोर्टात सिद्ध करणारे प्रा मा म देशमुख ह्यांच्या मते, सावरकरांना अवघे दोन आठवडे कोलू ओढण्याचं काम दिलं गेलं. आणि काथा कुटण्याचे काम अवघं महिना भर दिलं गेलं." अशी कष्टाची काम बहुजनसमाजातील महिला देखील शेतात नांगरणी करताना विना थकवा करतात.

आता ह्या वाक्यातून महाशय दोन उद्दिष्ट साध्य करतात ब्राह्मण रामदास अदिलशहाचा हेर होता, हे त्यांना इथे सांगायचेच आहे, अन्यथा ह्या वाक्याची गरजच नव्हती पण ते सावरकरांवर वरील आरोपही करतात की त्यांना तेवढी सजा नव्हतीच म्हणे कारण मा म देशमुख तसे म्हणतात म्हणे! शिवाय हे काम महिला देखील करते ते सावरकरांनी कधी कधी केले व त्याचा प्रचार केला!! अहो पाटील किती तो द्वेष! अन लगेच पुढे सावरण्यासाठी ते लिहितात, "दिल्ली दरबार महोत्सवाची तयारी चालू होती तेंव्हा कैद्यांना वर्षाला १ महिन्याची सवलत (म्हणजे सावरकरांना ५० महिने) मिळणार होती, पण सावरकरांकडे एक आक्षेपार्ह पत्र सापडल्यामुळे तीन महिने एकातंवासाची शिक्षा दिली व सात दिवस हातकडीत राहण्याची शिक्षा दिली." म्हणजे वरच्या प्यार्‍यात शिव्या द्यायच्या व लगेच खाली असे लिहायचे. पण पाटील तुम्हाला एक कळतं का? की ही अशी शिक्षा कधी होते? तर इंग्रजांविरुद्ध कोठडीतून काही तरी केले म्हणून. उलट तुम्ही वर तर इंग्रजांनी त्यांना सवलतीत राहायला दिले असे म्हणता अन हे ही लिहिता? अहो काही तरी एकावर राहा. म्हणजे एकीकडे सावरकरांच्या शिक्षा कश्या साध्या असताना ब्राह्मणी प्रचारकांनी गवगवा केला हे म्हणायचे व पुढे लगेच नाही हो, त्यांना एकांतवासाशी शिक्षा केवळ पत्र सापडल्यामुळे झाली हे ही म्हणून मी तसा द्वेष करत नाही बरं हे ही साध्य करायचे.

एके ठिकाणी पाटील म्हणतात की "सावरकरांनी ने मजसी ने" हे गीत कोठडीत लिहिले कारण आपल्या जीवनाकडे (भविष्याकडे) पाहून ते उदास झाले, त्यांनी मृत्यूपत्र तयार केले त्या उदासीतच हे गीत लिहिले. आम्ही पाटलांस मराठी काव्याचे धडे गिरवायला पाठवावे असे इच्छितो. कारण ते काव्य ब्रायटन इथे लिहिले आहे, तेंव्हा मदनलाल धिंग्रा एपीसोड चालू होता, अशातच त्यांना त्यांचा मुलगा वारल्याचे पत्राने कळले म्हणून त्यांनी " तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ सागरा प्राण तळमळला" अशी रचना केली. ज्यांना साधे हे गीत कधी व कुठल्या परिस्थितीत लिहिले गेले हे माहिती नसते त्यांनी पुस्तक लिहिण्याच्या अट्टहास का करावा? हे कळले नाही.

आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, " सावरकरांनी आपली लेखणी राबविली ती खुज्यांचं कौतूक करण्यासाठीच. चंद्रगुप्ताला दासीपुत्र, धनानंदाला भेकड, जुलमी रंगवून आणि पळपुट्या चाणाक्याला मात्र राष्ट्र निर्माता ठरवून सत्य इतिहासाचा मुडदा पाडला" ह्यावर मी टिपण्णी करणार नाही कारण ह्या विषयावर भरपुर साहित्य उपलब्ध आहे. खोट कोण लिहितं ते वाचल्यावर कळेल. आणि शिवाजीची आठवण त्या काळच्या मृतप्राय जनतेत सतत तेवती ठेवली ती सावरकरांनी हे मात्र पाटील विसरतात.

इतर अनेक शुल्लक घटनांना देखील त्यांनी बाऊ करून मांडले आहे. गांधी हत्या, संघ इत्यादी मध्ये ते कुठेही ब्राह्मणाला शिव्या देण्याचे कमी करत नाहीत. इतकेच नव्हे तर सावरकर क्रांती कारक की इंग्रज मित्र? असा प्रश्न ते विचारतात. आम्ही त्याचे उत्तर देत नाही, गरज वाटत नाही पण पूर्ण पुस्तकच असे विरोधाभासाने व केवळ बाम्हणद्वेषाने भरले आहे. इतकेच काय त्या कुठल्याश्या जिनोम प्रोजेक्टने म्हणे ब्राह्मण हे आर्य असल्याचे सिद्ध झाले आणि ते युरोशियनच आहेत असे मत टिळकांपासून अनेक ब्राह्मणाचे होते असे लेखक म्हणतो. टिळकांच्या काळी मॅक्समुलर मुळे आर्य बाहेरून आले हे सर्वमान्य होते, तो इंग्रजी प्रचाराचा एक भाग होता, पण पुढे जाऊन हडप्पा-मोहंजदाडोचा शोध लागल्यावर (१९२१) ते आजपर्यंत अनेक नवीन संशोधन होऊन ही थेअरी बाद असल्याचे निष्पन्न होत आहे, तरी लेखकू जुन्याच थेअरीस कवटाळून बसले आहेत व ब्राह्मण हे बाहेरचे आहेत असे प्रतिपादत आहेत.

आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून आम्हास ते खपले नाही असा कीव करण्याजोगा विचार कृपया करू नये तर आम्ही केवळ पुस्तक परिचय घडवून देत आहोत. पुस्तक परिचय का? तर पुस्तक कसे लिहू नये? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय. सावरकरांचे विचार खोडायला काहीच हरकत नाही पण ते जातीय चष्मा लावून पाहू नये. सावरकर व्यक्ती म्हणून पाहावे व सारासार विचार करून त्यांचे विचार खोडावेत असे आम्हाला वाटते. पुढे असे पुस्तक पाटलांनी लिहिले तर आम्ही त्याचे स्वागतच करू. तूर्तास पाटील जातीय द्वेष वाढीस लावत आहेत असे मात्र आम्ही म्हणू इच्छितो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

छान

केदार, नेमके पुस्तक निवडलेस Happy नेमक लिहिलहेस
(अर्थात १९८५ पासुनच याला जोर चढलेला आहे हे माहित असल्याने या पुस्तकाचे आश्चर्यही वाटत नाही)

लेखकाची ची मती भ्रष्ट झाली आहे, निव्वळ जात ब्राम्हण आहे म्हणुन विरोधी लिखाण केले आहे हे स्पष्ट आहे पण अशी हिंमत करणारेही अनेक आहेत. हे अती होते आहे.

हे असे आहे होय..
केदार,
येथिल ऊद्देश जरी निव्वळ रसग्रहण (प्रकाशित) करणे असा असला तरी पुढे जावून तुझा हा लेख व त्याच्या अनुशंगाने (किमान ईथल्या) वाचकांच्या सह्या असलेले पत्र थेट लेखकाला व प्रकाशकांना पाठवले जावे असे वाटते.
लेखाच्या आधी/शेवटी- पुस्तक प्रकाशक, तारीख, आवृ. क्र. वगैरे दिलास तर अधिक ऊपयुक्त ठरेल असे वाटते.

योग, हे परिक्षण व आणखी अजून भर घालून खुद्द पाटलांना पाठवणार आहे. पुस्तक प्रकाशक, तारीख, आवृ.वगैरे अपडेट केले आहे.

पुस्तक अर्थात संभाजी ब्रिगेडच्या लोकांचे आहे हे दिसून येतेच, पण असे पुस्तक लिहिताना जो थोडा अभ्यास करावा लागतो तो ही दिसत नाही. आणखी बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या लिहायचा मलाही कंटाळा आला कारण सारखी सुई तिकडेच फिरते.

ह्याउलट य दि फडक्यांचे एक पुस्तक आहे, ज्यात सावरकरांच्या काही घटनांचा ते आढावा घेतात, ते पुस्तक मला आवडले. जरूर मिळवून वाचावे.

केदार, मला आपला हा लेख 'रसग्रहण' वाटला नाही. क्षमस्व!

(अवांतर, बेफकिर http://www.maayboli.com/user/23612 व मी वेगळे आहोत हे सहज आपले लिहीत आहे.) Happy

मात्र लेखातील मुद्यांशी सहमतच! Happy (स्पर्धेसाठी शुभेच्छा!)

-'बेफिकीर'!

मुळात जिजाई प्रकाशनाची (काही) पुस्तके ही ब्राम्हणविरोधीच असतात. मग ती समर्थ रामदास स्वामींवर असोत की बाबासाहेब पुरंदर्‍यांवर हे पहा
मग त्याच प्रकाशनच पुस्तक घेऊन इथे लिहण्याचे काय कारण असू शकते बरे?

त्याच प्रकाशनच पुस्तक घेऊन इथे लिहण्याचे काय कारण असू शकते बरे? >> गेलात ना माझ्या जातीवर!!

पुस्तक ते ही सावरकरांबद्दल, त्याचा परिचय इथे का होऊ शकत नाही? ब्राह्मणांना शिव्या द्या, वाटल्यास मी देखील देईन पण ज्या माणसाबद्दल पुस्तक लिहितो आहोत, त्याच्या विषय काय?, व्याप्ती काय? आणि मांडतो काय? ह्याची जाण लेखकाला हवी.

कृपया ब्राह्मण व इतर असे स्वरूप इथे येऊ देऊ नका. हा धागा पुस्तक परिचयाचा आहे

स्पर्धेसाठी शुभेच्छा >>. बेफिकीर मीच त्या धाग्यावर लिहिले की रसग्रहणाची स्पर्धा कशी होऊ शकेल? Wink ह्या निमित्ताने असे पुस्तक आहे व त्याचा परिचय मला करून द्यायचा होता, हे झाले हे ही नसे थोडके. अ

रसग्रहण चांगलं आहे पण हे पुस्तक निवडून त्याला अवास्तव महत्व देण्याची गरज नव्हती. अशी अनेक पुस्तके येतात. 'रसग्रहण' हे एखाद्या कसदार , काही किमान साहित्यिक मूल्य असलेल्या पुस्तकाचे असावे कारण ते इतर रसिकजनांपर्यंत पोहोचणार असते. उगा असल्या पुस्तक आणि लेखकांना प्रसिध्दी का द्या? मनापासून वाटलं ते सांगितलं.

रसग्रहण चांगलं आहे पण हे पुस्तक निवडून त्याला अवास्तव महत्व देण्याची गरज नव्हती. >>>> अनुमोदन. Happy
तू मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहेत. तू ते प्रकाशकांना नक्की पाठव. मायबोलीवर 'वाचू आनंदे' मध्येही हे लिहू शकला असतात.
तू इतकं वाचत असतोस तर ह्या उपक्रमामध्ये तुला आवडलेल्या आणि पटलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल लिहिलं असतस तर ते वाचायला जास्त आवडलं असतं.

पण ज्या माणसाबद्दल पुस्तक लिहितो आहोत, त्याच्या विषय काय?, व्याप्ती काय? आणि मांडतो काय? ह्याची जाण लेखकाला हवी.<<<

अहो केदारभाऊ ह्याचीच तर त्यांना जाण नाही आहे ना आणि तो त्यांचा हेतूही नाही.
ज्यालोकांनी 'समर्थ रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव' यांना सोडले नाही. बाबासाहेब पुरंदर्‍यांना आणि जेम्स लेनलाला एकाच रांगेत बसवले त्यांच्या कडून चांगल्या लेखनाच्या कसल्या अपेक्षा करताय.

>> गेलात ना जातीवर!! <<
आणि हो मी कोणाच्याही जातीवर गेलो नाही. जे वाटले ते स्पष्टपणे लिहले पटत असेल तर बघा नाहीतर सोडून द्या असो.

केदार,
रसग्रहण वाचलं. पण रसग्रहण हे आवडलेल्या पुस्तकाचं करतात ना? म्हणजे पुस्तक का आवडले याचे विश्लेषण करतात ना? मग तुम्हाला न आवडलेल्या पुस्तकाचे रसग्रहण होऊ शकते का?
वरची माहिती चांगली आहे. प्रकाशकांना जरूर पाठवावी. पण मामी आणि परागशी पुस्तकाच्या निवडीबाबत सहमत.

केदार ~~

मी स्वतः "पाटील" आहे, मराठा आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर नसलो तरी या ना त्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक चळवळीशी निगडीत आहे. अगदी सीनिअर सिटिझन नाही तरी पन्नाशी गाठत आलो आहे आणि इतक्या वर्षाच्या आयुष्यात जे काही अनुभव घेतले आहेत त्यावरून प्रामाणिकपणे आपणास सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या पुस्तकातील पहिल्या पानाच्या वाचनानंतर ते कायमचे बाजूला ठेवणे गरजेचे होते असे वाटते त्या पुस्तकावर इथे (सविस्तर) लिहून त्याचे महत्व वाढवित आहात. कोण हे मदन पाटील ? काय त्यांची या विषयातील अभ्यासातील गती ? किती निबंध यापूर्वी विविध जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत ? अनुभवसंपन्नता किती? याचा लेखाजोखा त्यांच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या लिखाणावर सर्वप्रथम घेणे गरजेचे असते. ज्या हेतूने ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले तो तर जातीजातीत तेढ वाढविण्याच्या दृष्टीने केला आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना परत त्याला अशा संस्थळावर आणून त्याचा टीआरपी वाढविण्यात काय हशील ? किंबहुना तुम्ही इथे हा धागा काढल्याचे दिसल्यावर मदन पाटील आणि को. यांचा अंतस्थ हेतू साध्य झाला. शक्यता अशीही असेल की 'मदन पाटील' हे घोस्ट नेमही असेल, पण जाऊ दे.

दोनचार फुटकळ गट सोडल्यास हे पुस्तक ज्ञातही झाले नसते...अगदी आमच्यासारख्या मराठा समाजातील मोठ्या गटाला सुद्धा, पण आता प्रतिसादांची संख्या आणि त्यातील भाषा पाहता मूळ लेखक आणि संबंधित प्रकाशन संस्था खूशच असतील.

वीर सावरकर हे 'सूर्या' इतके प्रखर नाव आहे आणि आमच्या हृदयी त्यांचे जे स्थान आहे त्याला मदन पाटील धर्तीच्या लेखनामुळे कदापिही ढाळ लागणार नाही. भारतीय संविधानात मत प्रकटनाला मुक्त वाव दिला असला तरी एखाद्याच्या मताला कितपत उचलून धरावे याचा विचार सर्वप्रथम होणे जरूरीचे ठरावे.

थोडक्यात हा विषय निदान 'मायबोली' सारख्या अत्यंत सुसंस्कृत संस्थळावर वाढीस लागू न देणे हेच त्यातल्यात्यात अंती शहाणपणाचे होते हे सिद्ध होईल.

>>>>त्याच प्रकाशनच पुस्तक घेऊन इथे लिहण्याचे काय कारण असू शकते बरे? >> गेलात ना जातीवर!!
गेलात ना जातीवर???? अत्यंत रुचीहीन कमेंट!!!

वरची माहिती चांगली आहे. प्रकाशकांना जरूर पाठवावी.<<<
त्याने काही होणार नाही. त्या माहीतीची साधी दखल ही घेतली जाणार नाही.
<<ज्या हेतूने ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले तो तर जातीजातीत तेढ वाढविण्याच्या दृष्टीने केला आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना परत त्याला अशा संस्थळावर आणून त्याचा टीआरपी वाढविण्यात काय हशील ?>> हे वर अशोक साहेबांनी लिहलेच आहे.
तरीही बघा प्रयत्न करून. Happy

अवांतर - <<<वीर सावरकर हे 'सूर्या' इतके प्रखर नाव आहे>>> मानवाला 'लार्जर दॅन लाईफ' मानणे आपल्या मातीत जन्मलेल्या सर्वांना पटतेच. सावरकरांच्या चुका झालेल्याही असतील, सावरकर हे 'अगदीच' सांगीतले गेले तसे नसतीलही वगैरे व्यावहारिक मते आपण (आपण म्हणजे आपण सर्वच) सहसा स्वीकारणार नाही आणि यात अर्थातच सावरकरांबाबत कोणतेही नकारात्मक मत नसून (देण्याचा अधिकार तर नाहीच) केवळ दृष्टिकोनाबाबत म्हणायचे आहे.

आता मुद्याबाबत लिहू इच्छितो. काही चुकल्यास जरूर कळवावेत.
================================================

<<<थोडक्यात हा विषय निदान 'मायबोली' सारख्या अत्यंत सुसंस्कृत संस्थळावर वाढीस लागू न देणे हेच त्यातल्यात्यात अंती शहाणपणाचे होते हे सिद्ध होईल.>>>

का???????

पुस्तकाच्या रसग्रहणाची स्पर्धा आहे. त्यांना 'ते' पुस्तक निवडावेसे वाटले. ते स्पर्धेच्या नियमात सांगितलेल्या कालावधीतील असल्यास त्यांना त्याचे रसग्रहण करण्याचा अधिकार आहे. तसेच, त्यांच्या लेखनात कोठेही (हे मात्र सापेक्ष मत) आग लावण्याचा हेतू आढळत नाही. मग या पुस्तकाचे 'रसग्रहण' करण्यात अडचण काय आहे??

'रसग्रहणच' झाले नाही हे माझे मत मात्र पुन्हा लिहिण्याचा अधिकार नम्रपणे पळवत आहे.

-'बेफिकीर'!

"पुस्तकाच्या रसग्रहणाची स्पर्धा आहे. त्यांना 'ते' पुस्तक निवडावेसे वाटले. ते स्पर्धेच्या नियमात सांगितलेल्या कालावधीतील असल्यास त्यांना त्याचे रसग्रहण करण्याचा अधिकार आहे."

~ मान्यच. पण सद्यस्थितीत 'त्या' विषयाबाबत आपल्या लिखाणामुळे [जरी त्यास 'रसग्रहण' असे सुंदर नाम दिले गेले असले तरी] या राज्यातील दोन जातीमध्ये तेढ वाढीस लागण्याची शक्यता असेल (कमी होणे दूरच) तर ते कार्य केदारसारख्या भाषेवर आणि लिखाणावर छान प्रभुत्व असणार्‍या एका युवकाने का करावे ? हाच प्रश्न सर्वप्रथम माझ्या मनी आला.

सर्वश्री धनंजय कीर आणि य.दि.फडके अशा ऋषितुल्य लेखकांच्या नावांचाही त्यांच्या लेखात तुलनेच्या दृष्टीने उल्लेख आला आहे. आता यात या दोघांचे अवमूल्यन कि मदन पाटलांचे उर्ध्वमूल्यन ? हे तुम्ही स्वतः एक नामवंत लेखक असल्याने जाणू शकाल.

रसग्रहणाच्या स्पर्धेसाठी त्यानी ते पुस्तक निवडले असल्यास तो श्री.केदार यांचा अधिकार कुणीच अमान्य करीत नाहीत. पण रसग्रहणाच्या नावाखाली अशा पुस्तकाला आपण एक अवाजवी महत्व [तसेच प्लॅटफॉर्म] उपलब्ध करून देत आहोत याचे भान ठेवणे फार गरजेचे आहे.

इतकेच.

अशोकराव, आपल्या या प्रतिसादामुळे मला अनेक नवे तपशील समजले. Happy

१. केदार यांचे भाषेवर व लेखनावर प्रभुत्व आहे.

२. केदार युवक आहेत.

३. मी नामवंत लेखक आहे.

धन्यवाद!

माझ्यामते आता सर्वच प्रतिसादकांच्या भूमिका संपलेल्या असून आता केवळ निवड समितीचे काम राहिलेले आहे. मी कुणाला दुखावलेले असल्यास क्षमस्व व सुखावलेले असल्यास ते चुकून झाले असेल याचीखात्री बाळगणे! (दिवा)

अशोकराव, 'प्रिन्सिपली' सहमत नाही कारण तेढ मायबोलीवरील लेखनाने उद्धृत होईल किंवा वाढेल अशी शक्यता कमी वाटते कारण यापुर्वी असे धागे अनेकदा येऊन गेले व निदान येथे काही प्रश्न आला नसावा असे वाटते.

पण आपल्याशी चर्चा करून आनंद वाटला. Happy

-'बेफिकीर'!

अशोकराव तुम्ही व इतर (मामी, पराग, अंजली) म्हणता तसे अवाजवी महत्त्व मी देत नाहीये, पण आजकाल कोणीही उठून काहीही लिहितो, लिहिताना निदान सर्व शहनिशा करावी एवढीच अपेक्षा एक वाचक म्हणून आहे. मी इथे लिहिणे आणि पुस्तक प्रसिद्ध करणे ह्यात फरक आहे. पण सर्व म्हणतात त्याप्रमाणे मी ही प्रवेशिका रद्द करून फक्त वाचू आनंदे मध्ये ठेवेल. प्रशासकांना तसे मी सांगेन.

केदार्...तुम्ही हे पुस्तक वाचुन त्यावर माबो वर प्रतिक्रिया देऊन त्याची नकळत प्रसिद्धीच करत आहात. ईथे माबोवर धागा सुरु करण्याजोग तरी ते पुस्तक महत्वपुर्ण वाटत नाहीय.

Pages