रसग्रहण स्पर्धा - २०११ - घोषणा
दरवर्षी पुस्तक प्रदर्शनं, ग्रंथजत्रा, पुस्तकांची दुकानं, ऑनलाईन पुस्तकविक्री करणारी (मायबोलीसारखी) संकेतस्थळं अशा अनेक वाटांनी नवनवीन पुस्तकं आपल्या भेटीला येतात. वाचायची आवड असेल तर आपण नियमितपणे दुकानं-प्रदर्शनांना भेटी देतो, पुस्तकं चाळून पाहतो. कधीतरी वर्तमानपत्र अथवा नियतकालिकात आलेला एखाद्या पुस्तकाचा परिचय लक्ष वेधून घेतो. वेगवेगळी पुस्तकं मग यथावकाश आपल्या पुस्तकसंग्रहात, वाचनयादीत दाखल होतात. पुस्तकं घेण्यापर्यंतचा कुठल्याही दोन व्यक्तींचा प्रवास हा साधारण असाच असतो.
पण एकदा पुस्तक हाती आलं की, एकाच पुस्तकाबरोबर होणारा प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा! कुणी एका बैठकीत एखादं पुस्तक संपवेल, तर कुणाकडून पहिली दहा पानंही वर्षानुवर्षं उलटली जाणार नाहीत. कुणी वाचून संपवलं की, पुस्तक शेल्फात ठेवून देईल, मग त्याची त्याला पुढे कधी आठवणही येणार नाही. तर तेच पुस्तक कुणाच्यातरी मनात अधूनमधून डोकावून जाईल. एखादं पुस्तक मात्र वाचून संपवलं तरी आपली पाठ सोडत नाही. त्यासंबंधी आपण विचार करत राहतो, कधी चार लोकांबरोबर त्याची चर्चा करतो. कधी त्याबद्दल आपल्याला लिहावंसं वाटतं. लिहिताना कधी पुस्तकाचे काही पैलू नव्याने सामोरे येतात, तर कधी आधी वाचताना पडलेल्या प्रश्नांची उकल नंतर आपोआप होते. चर्चेतून कधी आपल्याला एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाल्यासारखा वाटतो, एखाद्या विषयाबद्दलच्या आपल्या आकलनात भर पडते. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकागणिक असे विविध अनुभव प्रत्येकाच्या पोतडीत जमा होतात. आपला विचारप्रवास त्या पुस्तकाबरोबरीनं चालू राहतो.
तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी 'मायबोली.कॉम' आयोजित करत आहे रसग्रहण स्पर्धा. या स्पर्धेनिमित्त तुम्ही अशाच एखाद्या आवडत्या पुस्तकाबद्दलचे तुमचे विचार शब्दबद्ध करायचे आहेत, त्या पुस्तकाचं रसग्रहण करायचं आहे. कविता, कथा, कादंबरी, ललितलेख, अनुभवकथन, आत्मकथन, प्रवासवर्णन, समीक्षा, संपादित साहित्य असा कुठलाही साहित्यप्रकार या स्पर्धेसाठी वर्ज्य नाही. मात्र, कोणत्या पुस्तकांचं रसग्रहण केलं जावं, याबाबतची एक लहानशी अट मात्र आहे. या स्पर्धेसाठी १ जानेवारी २००८नंतर प्रकाशित झालेली मराठी पुस्तकंच विचारात घ्यायची आहेत.
मायबोलीवर नेहमीच पुस्तकांबद्दल चर्चा रंगते, हिरीरीनं मतं मांडली जातात, खोडली जातात. त्यामुळे मायबोलीकर आपल्या आवडत्या पुस्तकांबद्दल भरभरून लिहितील, याबद्दल शंकाच नाही.
स्पर्धेचं स्वरूप -
१. १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट, २०११, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपात नवीन लेखनाचा धागा उघडून रसग्रहण लिहू शकता. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
२. धाग्याच्या शीर्षकात पुस्तकाच्या आणि लेखक/लेखिकेच्या नावाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भालचंद्र नेमाड्यांच्या 'हिंदू' या कादंबरीचं रसग्रहण करणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - रसग्रहण स्पर्धा - 'हिंदू' - ले. भालचंद्र नेमाडे - असं असावं.
नियम व अटी -
१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे.
२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी
) जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.
३. फक्त मराठी पुस्तके या रसग्रहणासाठी स्वीकारली जातील.
४. रसग्रहणासाठी निवडलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ जानेवारी, २००८नंतर प्रकाशित झालेली असावी.
५. रसग्रहणासाठी विषयाचं व साहित्यप्रकाराचं बंधन नाही. फक्त अनुवादित साहित्याचं रसग्रहण स्वीकारलं जाणार नाही.
६. एखाद्या काव्यसंग्रहातल्या एकाच कवितेचं, कथासंग्रहातल्या एकाच कथेचं, किंवा पुस्तकातल्या एका प्रकरणाचं / वेच्याचं रसग्रहण ग्राह्य धरलं जाणार नाही. रसग्रहण संपूर्ण पुस्तकाचंच असावं.
७. रसग्रहणासाठी शब्दमर्यादा - किमान ७५० शब्द आणि जास्तीत जास्त १५०० शब्द.
८. रसग्रहणासोबत पुस्तकाचं, लेखकाचं व प्रकाशकाचं नाव, तसंच प्रकाशनाची तारीख देणं आवश्यक आहे.
९. रसग्रहणात संपूर्ण कविता अथवा एखाद्या कवितेचा / कथेचा मोठा भाग असू नये.
१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
या स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील भरघोस रकमेची बक्षिसं! स्पर्धेचे प्रायोजक आणि परीक्षक लवकरच जाहीर केले जातील. तुम्हांला स्पर्धेसाठी तयारी करायला पुरेसा वेळ मिळावा, म्हणून ही घोषणा.
फक्त अनुवादित साहित्याचं
फक्त अनुवादित साहित्याचं रसग्रहण स्वीकारलं जाणार नाही.>>>
ओके! आता नवं पुस्तक शोधतो एखादं आणि मग ठरवतो भाग घ्यायचा की नाही ते.
अरे वा! मस्तच. भाग घ्यायचा
अरे वा! मस्तच.
भाग घ्यायचा की नुसतं वाचक-मोडात रहायचं त्यावर विचार करते.
उपक्रम आवडला. परीक्षक कोण
उपक्रम आवडला.
परीक्षक कोण आहेत? त्याची यादी कधी जाहीर होणार आहे?
मस्त उपक्रम. घरबसल्या
मस्त उपक्रम. घरबसल्या जाणकारांनी करुन दिलेली पुस्तकांची ओळख वाचायला मिळणार तर !
शैलजा, एक दोन दिवसांत सर्व
शैलजा,
एक दोन दिवसांत सर्व माहिती कळवूच. तसेच मायबोलीकरांच्या सोयीसाठी लवकरच २००८ नंतर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची यादी पण देणार आहोत.
मिनोती,
परिक्षक मायबोलीबाहेरील मान्यवर असणार आहेत. पुस्तकांची माहिती त्यांना असेलच पण त्याचबरोबर एकंदर रसग्रहणावरून निकाल लावतील.
परिक्षक मायबोलीबाहेरील
परिक्षक मायबोलीबाहेरील मान्यवर असणार आहेत. >>> सहीच !! (स्वगत : अरे बापरे! आपण आपलं वाचक-मोडातच रहावं :फिदी:)
>>एकंदर रसग्रहणावरून निकाल
>>एकंदर रसग्रहणावरून निकाल लावतील. >> लिहिणार्याचा निकाल लागणार असं दिसतं आहे!
पुस्तकांची यादी देणार हे बेस्ट.
यादी येतेय हे बेस्ट.
यादी येतेय हे बेस्ट.
अरे वा! थँक्यु फॉर द यादी.
अरे वा! थँक्यु फॉर द यादी.
मी दोन दिवस शोधतेय की २००८ नंतरचे प्रसिद्ध झालेले चांगले पुस्तक कोणते.
सेम पिंच रैना!
सेम पिंच रैना!
<<मी दोन दिवस शोधतेय की २००८
<<मी दोन दिवस शोधतेय की २००८ नंतरचे प्रसिद्ध झालेले चांगले पुस्तक कोणते.>>
रसग्रहण चांगल्या वाटलेल्या पुस्तकाचंच करावं असा नियम आहे का?
भरत, तुम्ही 'हाना, हाना
भरत, तुम्ही 'हाना, हाना त्यानला' छाप रसग्रहणाला दाद तरी मिळाल्याचे पाहिले आहे का?

'हे का वाचू नका'- याला रसग्रहण कसे म्हणणार? (म्हणजे म्हणायला पाहिजे खरंतर)
नुसते 'ग्रहण' म्हणावे काय
रैना, आजकाल जास्त लोक
रैना, आजकाल जास्त लोक `हिंदू'पेक्षा तिच्यावर लिहिलेलेच वाचतात.
तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा
तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा हा प्रवास जाणून घेण्यासाठी 'मायबोली.कॉम' आयोजित करत आहे रसग्रहण स्पर्धा. या स्पर्धेनिमित्त तुम्ही अशाच एखाद्या आवडत्या पुस्तकाबद्दलचे तुमचे विचार शब्दबद्ध करायचे आहेत, त्या पुस्तकाचं रसग्रहण करायचं आहे. >>>>>>>>>>
नियम नाही; आवाहन आहे.
खूप चांगला उपक्रम
खूप चांगला उपक्रम अॅडमिन-टीम.
भरत, समिक्षा आणि रसग्रहण यात माझ्यामते फरक आहे. रसग्रहण हे आवडलेल्या कलाकृतीचे असते असे माझे मत आहे.
या दुव्यावर २००८ जानेवारीनंतर
या दुव्यावर २००८ जानेवारीनंतर प्रकाशित झालेली काही पुस्तके दिली आहेत. प्रकाशकांकडून जशी माहिती मिळत जाईल तशी या दुव्यावर ती टाकत राहू.
खुपच चांगला उपक्रम. मी सहभागी
खुपच चांगला उपक्रम. मी सहभागी होणारच्चाय. २००८ नंतरची पुस्तके हे फक्त जरासे नकोच असायला हवे होते असे वाटले. पण नियम ते नियम.
मस्त उपक्रम! यादीबद्दल
मस्त उपक्रम! यादीबद्दल धन्यवाद अॅडमिन टीम.
या दुव्यावर आता
या दुव्यावर आता अक्षर्/पद्मगंधा प्रकाशनांच्या पुस्तकांची यादी टाकली आहे.
मला हंसराज बहर यांच्या गालिब
मला हंसराज बहर यांच्या गालिब बेनकाबचे रसग्रहण करायची इच्छा आहे. पुस्तक कालावधीसंदर्भातल्या अटी पूर्ण करते मात्र देवनागरीतून हिंदी भाषेतील आहे. माझा हा प्रश्न वेडगळपणाचा आहे हे माहीत असूनही विचारायची फार उत्सुकता आहे की त्या पुस्तकाचे रसग्रहण सादर केले तर चालेल काय? याचे कारण ते पुस्तक माणूस व कवी यांच्यातील आंदोलनांचे भेदक वर्णन करतानाच एक नवा दृष्टिकोन देण्यास समर्थ ठरते व तरीही काही पातळ्यांवर कवितेसमोर हतबलही! माझ्यामते ते पुस्तक महत्वाचे आहे.
-'बेफिकीर'!
बेफिकीर, आपला विचार स्तुत्य
बेफिकीर,
आपला विचार स्तुत्य आहे पण सुरुवतीलाच नमूद केल्याप्रमाणे ही स्पर्धा मराठी पुस्तकांपुरतीच मर्यादीत आहे. तुम्ही या पुस्तकाबद्दल "वाचू आनंदे" ग्रूपमध्ये लिहू शकता.
धन्यवाद अॅडमीन महोदय, त्वरीत
धन्यवाद अॅडमीन महोदय, त्वरीत प्रतिसादासाठी व सूचनेसाठीही!
मी नुसतेच 'स्पर्धबाह्य' रसग्रहण प्रकाशित करेन.
(नोंद - वाचू आनंदेमध्ये कसे लिहायचे हे कुणालातरी विचारून घेतो.)
-'बेफिकीर'!
(मराठी कवितासंग्रह रसग्रहणासाठी चालू शकेल अशी आशा आहे.)
Pages