विविध मूळाक्षरे

Submitted by अवल on 22 July, 2011 - 04:28

आपल्याला माहिती असलेल्या विविध भाषांची मूळाक्षरे इथे लिहूयात.

ही घ्या मराठी भाषेतली मोडी मूळाक्षरे :

यातली शेवटच्या ओळीत मुद्दाहून ककाकीकुकेकैकोकौकंकः

गुलमोहर: 

झक्की कुठे आहेत? थांबा सांगतो तेंना नाव. Proud Light 1

मंजिरीबै, जटिनीगिरी राखलीत होऽ . सावलीबै, वर्षाबै, रैनाबै तुमीबी. Happy

अवल, ते एडिट कराच्च जमल्यास. उगाचच चुकीचे गैरसमज कशाला नाही का ? Happy

हो.. आणि जशी आपल्या इथे बाराखडी असते तशी जपानी मधे पाचाखडी (बहुदा हेच म्हणता येइल..) असते..

आ इ उ ए ओ

मला महित असलेले काहि शब्द

आकाइ - Red
उवागी - Overcoat
सायोनारा - Bye
कोंबावा - Good Evening

मंजिरी,

हिरागाना किंवा काताकाना मध्ये सुझुकी बसवायचा आहे. सु आणि की सापडले. झु कसा बसवायचा? तसंच तोयोदा (=टोयोटाचा जपानी उच्चार) कसा बसवता येईल? तो आणि यो सापडले. दा दिसत नाही.

आपला नम्र,
-गा.पै.

मंजिरी,

तुमच्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद! ही एक व्यवस्थित व्यंजने आणि स्वर असलेली मुळाक्षरलिपी वाटते. कदाचित वर्णमालाही बनवता येईल किंवा बनवलेली असावी. मग एक प्रश्न पडतो की जपानी लिपीला चित्रलिपी का म्हणतात?

आपला नम्र,
-गा.पै.

गा. पै.,
चित्रलिपी वेगळी. ती 'कांजी'.

उदाहरणार्थ, 傾国 म्हणजे 'सुंदर स्त्री'.
国王 म्हणजे 'राजा'
花火 म्हणजे 'फटाके'

गा.पै.

जपानी भाषेत तीन लिप्या आहेत. हिरागाना, काताकाना आणि कांजी (चित्रलिपी)
त्यापैकी काताकाना ही लिपी जपानी भाषेत जे शब्द दुसर्‍या भाषेतुन आले आहेत, त्यासाठी वापरली जाते.
जसे, आपली नावं लिहिताना आपण काताकाना लिपी वापरणे अनिवार्य आहे. तसंच इतर देशांची/शहरांची नावं, coffee, supermarket, arbeit सारखे दुसर्‍या भाषेतुन आलेले शब्द यासाठी काताकाना लिपी वापरतात.
मूळ जपानी शब्दांसाठी/वाक्यांसाठी हिरागाना आणि कांजी वापरली जाते. तसं कांजी न वापरता देखील फक्त हिरागाना मधे आपण वाक्य लिहु शकतो. (इयत्ता पहिली मधे मुलं आधी फक्त हिरागाना, काताकानाच शिकतात. मग हळुहळु कांजीचा अभ्यास सुरु होतो.)
पण त्यामुळे शब्दांना मर्यादा येतात. म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ हा त्यासाठी कुठली कांजी वापरली आहे ते पाहुन बर्‍याचदा कळतो पण नुसत्या हिरागानात वाचुन कळत नाही. आता सगळ्या कांजी मिळुन ५०,००० च्या वर आकडा असेल. त्या सगळ्या वाचता आल्या नाहीत, तरी शब्दकोषात शोधता येतात.

चिनूक्स, माझ्या महिती प्रमाणे "傾国" हा शब्द फार चांगल्या अर्थानी 'सुंदर स्त्री' म्हणुन वापरला जात नाही. त्यासाठी नेहमीच्या वापरा 美人 किंवा 美女 असा शब्द आहे.

गा.पै.
वर लिहिलेल्या 美人 ह्या कांजीमधे 美 आणि 人 ह्या दोन कांजी मिळुन 美人 हा एक शब्द तयार झाला आहे. तसंच 美女 मधे देखील 美 आणि 女 ह्या दोन कांजी मिळुन 美女 हा एक शब्द तयार झालाय. त्यातल्या 美 चा अर्थ सुंदर आणि 人 चा अर्थ व्यक्ती असा होतो. 女 चा अर्थ स्त्री हा होतो.

मंजिरी आणि चिनूक्स,

धन्यवाद!

जपानी अक्षरे फायरफॉक्सात दिसायला काय करावं लागेल? की माझ्या विंडोज एक्सपीचा लफडा झालाय?

आपला नम्र,
-गा.पै.

Pages