रावण पिठले

Submitted by तृप्ती आवटी on 21 July, 2008 - 13:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी नारळाचा चव, १ वाटी लसुण, १ वाटी गोडेतेल, १ वाटी तिखट (होsssय १ वाटीच), २ वाट्या पाणी, १ वाटी कोथींबीर बारीक चिरुन, मीठ चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

लसुण, तेलाशिवाय वरील सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे. तेलात हिंग-मोहोरीची फोडणी करावी. त्यात लसुण चांगला लाल होईतो परतुन घ्यावा. मग वरील मिश्रण घालावे. नीट हलवुन झाकण घालुन शिजवावे. अगदी वड्या पडण्या सारखे नाही पण जरा घट्टसर पिठले होते.

वाढणी/प्रमाण: 
२ साधारण खाणारी मोठी माणसे (बहुतेक)
अधिक टिपा: 

ही मला माहिती असलेली रावण पिठल्याची कृती. हा कोल्हापुरी प्रकार आहे असे ऐकुन आहे. इथे लय कोल्हापुरी बाया-बापे हायेत. त्यांनी कृपया डोळ्यांखालुन घालावी. मी काही सुगरण नाही. त्यात नवर्‍याने पिठले कायम मेसमधे खाल्लेले. त्यामुळे मी लग्नानंतर पहिल्यांदाच हे पिठले केले तर त्याने स्वतःसाठी चिकन मागवले. चवीसाठी म्हणुन एक घास खाल्ला आणि चिकन बाजुला ठेवुन पिठल्यावरच ताव मारला Happy

माहितीचा स्रोत: 
माझे बाबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे याचा रंग तांबडा असतो. तिखट वापरतात. पण रावण पिठले म्हणतात हे ठाऊक नव्हते. बेसन म्हणतात आमच्याकडे.

पा़कृ झकास वाटतेय पण १ वाटी तेल!
ते कदाचित एक वाटी तिखटाला कम्पन्सेट करायला असेल ना?
कमी तेलात, तिखटात करुन पहातो.

मंजूताई Lol

मानव पिठले म्हणता येईल.

Pages