मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षे आणि लिंब्या हे तुमच्यासाठी..
>>> काही डोके त्या अ‍ॅडवाल्यांना सुध्दा आहे हे लक्षात असु द्या नाही तर ते मायबोलीवर प्रतिसाद देत आणि मायबोलीवाले अ‍ॅड बनवत असते. <<<
Proud Wink Light 1

विनोद कळण्यासाठी दोन पाने मागे जा. संदर्भ बघा. कळल्यास हसा.. Wink

नी Rofl

धोनी ला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यासाठी तयारी करणारे तिन्ही अ‍ॅक्टर्स मस्तच. सुंदर अ‍ॅक्टिंग अन फ्रेश चेहरे. जाहिरातदार बहुतेक एयरसेल असावा.

ती एक बाई धोनी ला म्हणते. आज मैने भी यलो पहना है. सो क्यूट. तो कुठे ती कुठे. पण एक कनेक्षन निर्माण केले आहे.

जाहिरातींबद्दल इंट्रेस्ट असेल तर इकॉनॉमिक टाइम्स मध्ये दर बुधवारी ब्रँड इक्वीटी पुरवणी येते ती जरूर वाचावी. खूप माहिती व बेस्ट. बेकार अ‍ॅड्स असतात

जाहिरातींबद्दल इंट्रेस्ट असेल तर इकॉनॉमिक टाइम्स मध्ये दर बुधवारी ब्रँड इक्वीटी पुरवणी येते ती जरूर वाचावी. खूप माहिती व बेस्ट. बेकार अ‍ॅड्स असतात
<<< +१. याखेरीज मिन्ट, बिझनेस लाईनच्या देखील अशा खास पुरवण्या असतात. एजन्सीएफ ए ज्युज.कॉम (agencyfaqs.com) ही साईट देखील नियमित बघू शकता.

मामी, ओएनएम बद्दल जरा लिहा की तुम्हीच. Happy

>>> काही डोके त्या अ‍ॅडवाल्यांना सुध्दा आहे हे लक्षात असु द्या नाही तर ते मायबोलीवर प्रतिसाद देत आणि मायबोलीवाले अ‍ॅड बनवत असते. <<< नीरजे, आहे हो हे लक्षात, तरी बर झाल तू आठवण करुन दिलिस ते,
आता तसच हातासरशी माबोवरल्या अन तमाम मिडीयावाल्या जाहिरातपटून्नाही सान्ग की
लक्षात असूदे, प्रेक्षकान्नाही डोके नावाचा अवयव अस्तो, अन तो कित्येकान्चे बाबतीत वापरलाही जातो! Proud
(प्रेक्षकान्ना अगदीच बिनडोक समजायचा मक्ता हिन्दीशिनेमावाल्याकडेच राहूदे म्हणावं Proud तो त्यान्चा अगदी "पेटन्टेड हक्क" आहे असे का म्हणेनास! Wink )

>>>> अरे याला कोणीतरी विनोद समजावून सांगा रे <<<<<
"तू माझी कविता ऐक, मी तुझी कविता ऐकतो,
मग तू माझी कविता समजुन घे, नी मी तुझी कविता समजुन घेतो"
बहुधा असच कैतरि आपल विनोदाचे बाबतीत होत असावे नीरजा Proud

काही डोके त्या अ‍ॅडवाल्यांना सुध्दा आहे हे लक्षात असु द्या नाही तर ते मायबोलीवर प्रतिसाद देत आणि मायबोलीवाले अ‍ॅड बनवत असते.>>> हे वाक्य ह्या धाग्याची टॅगलाईन म्हणून लावले पाहिजे Proud

>>दाग अच्छे है मधे ते वाक्य लक्षात राहतं खरं, पण जाहीरात एरियलची आहे कि सर्फची आहे हे नाही राहत ध्यानात.

अगदी अगदी.

>>पोर पण वात्रट, दात हालवणारी फळं खात फिरतेय.. नशिब फणस खात आली नाही
>>गंमत म्हणजे तो बाबा डेंटिस्ट असतो ना? वेळच्यावेळ पोरीचे दात चेक करत नाही का? आम्हाला मात्र वर्षातून दोन वेळा दात तपासणी करून घ्या असा सल्ला द्यायला विसरत नाहीत

बाप रे! __/\__ Happy दात दाखवून अवलक्षण कशाला करून घ्या असा सुज्ञ विचार पोरीने केला असेल.

>>सैफ करीनाची एक अ‍ॅड आहेना, ज्यामधे सैफ येऊन करीनाचे केस ओढतो वगैरे,,, ती जाहिरात पाहिली की मला रॅटॅटूईचा उंदीरमामा आठवतो

लग्न झाल्यावर आता ती जन्मभर त्याचे केस ओढायला मोकळी आहे. बिचार्‍याला एक तरी चान्स नको का?

अरे, संस्कारांचा काय संबंध.
त्या फ्रुटीच्या अ‍ॅडचा हेच दाखवण्याचा उद्देश आहे की पिणारा सगळं (सो कॉल्ड संस्कार) काही विसरुन फ्रुटी पितो आणि ज्याला मिळत नाही ते लोक परत सो कॉल्ड संस्कार विसरुन लालसेने त्याच्याकडे बघत बसतात. थोडक्यात लहान मुलाला जसे अशा भावना आवरता येत नाहीत तसे मोठी माणसेही करतात कारण फ्रुटी इतकी टेम्प्टिंग आहेच..
ते लोक आपापल्या प्रॉडक्टची युएस्पी एन्कॅश करताहेत, जाहीरातीच्या माध्यमातुन प्रेक्षकांवर ठसवताहेत.. दॅट्स इट.

अरे लोक्स, परवा परवाच एक मोठ्ठी काँट्रोवर्सी झालेली जाहिरात जगात.

अ‍ॅबी, क्लिओ कान गोल्डन लायन अशी ह्या जगातील मोठी बक्षिसे असतात व ती मिळणे फारच प्रेस्टिजिअस मानले जाते. क्रिएटिव्ज फार जान टाकतात अस्ल्या बक्षिसासाठी. तर ते मिळविणयासाठी जाहिरात कुठेतरी प्रकाशित झालेली असावी लागते. काही अ‍ॅड्स नुसत्याच बनवून अगदी कुठेतरी एक्च प्रकाशित करवतात व अ‍ॅवार्ड्ला एंट्री करतात. ह्यास स्कॅम अ‍ॅड म्हणतात.

तर जेडब्ल्यू टी मुंबई हपिसाने एका कारची स्कॅम अ‍ॅड बनविली. तीबी फार ऑफेन्सिव. गाडीच्या डिकीत( बूट) मध्ये तीन ललना हात बांधलेल्या अवस्थेत आणि पुढे इटालिअन प्राइम मिनिस्टर
बर्लोस्कुनी. जो वाह्यात पार्टी साठी प्रसिद्ध आहे - तो व्ही ही विजयाची खूण करताना.
टॅग लाइन - तुमचे सर्व त्रास ह्या गाडीच्या मोठ्या डिकीत ठेवा. आणी विसरा. अश्य स्वरुपाची.
ही अ‍ॅड बनविली गेली तेव्हा भारतात निर्भया घटना जस्ट घडलेली होती.

तर ही अ‍ॅड अ‍ॅड्स ऑफ द वर्ल्द नावाच्या साइट वर पोस्ट केली व अ‍ॅबी साठी एंटर केली. नेटवर काहीच छुपून राहात नाही त्यामुळे ते सर्वांच्या लक्षात आले व क्लायंट कंपनीने राग व्यक्त केला.
दोन लोकांच्या नोकर्‍या गेल्या. अ‍ॅड काढून घेतली. पण डॅमेज झालेच.

जाहिरातीच्या जगात ख्रळ्बळ मा़जविणारी एक पडद्यामागची घटना. त्या अनुषंगाने स्कॅम अ‍ॅड्स,
बक्षिसे जिंकण्याचे प्रेशर आदि चर्चा चालू होती फोरम्स व ब्लॉगोस्फीअर मध्ये. बहुत विंट्रेस्टिन्ग जगह है बाबू.

चिंगे... +१००००००००००००००

ज्यात त्यात संस्कार संस्कार करत तांडवनृत्य कशाला?

न्यु यॉर्क लाइफच्या सगळ्या अ‍ॅड मस्त असतात. हल्लीची तर एकदम ट्ची आहे.

एक पोलिस हवालदार आपल्या मुलीला शिकवुन आयपीएस ऑफिसर बनवतो, तिची बदली नेमकि त्याच्याच पोलिस स्टेशनमध्ये होते. तिच्या स्वागतासाठी आयोजलेल्या परेडमध्ये बाप तिला सॅल्युट करतो आणि ती जवळ जाऊन - त्याचा हात खाली करते आणि त्यालाच एक कडक सॅल्युट मारते. आउट्स्टँडिंग!

अश्विनीमामी, या कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल वाचल्याचं आठवतंय.

'एन्डीटीव्ही-प्रॉफिट' वर ऑल अबाउट अ‍ॅड्स हा एक कार्यक्रम असतो.

जाहिरातीच्या जगात ख्रळ्बळ मा़जविणारी एक पडद्यामागची घटना. त्या अनुषंगाने स्कॅम अ‍ॅड्स,
बक्षिसे जिंकण्याचे प्रेशर आदि चर्चा चालू होती फोरम्स व ब्लॉगोस्फीअर मध्ये. बहुत विंट्रेस्टिन्ग जगह है बाबू.
>>अमा +१.

यंदाचे गोवा फेस्टिवल पण वादविवादांसाठीच जास्त रंगले होते ना...

तुटलेली बातमी

.
व्होल्टास एअर कंडीशन च्या जाहीरातीत...शेवटी मुर्तीची बायको आली घरी ...;)
बिचारा चेरापुंजी, कोटा मुक्तेश्वर...एकटा गेला... शेवटी दिल्लीत आली त्याची बायको Wink

Pages