काही अनुभव हे शब्दातीत असतात. ते सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त गम्मत असते. असाच एक चिंब भिजलेला दिवस १० जुलैचा. मुसळधार पावसात ७०-८०च्या स्पीडने धावणारी मोटारबाईक. कोसळता पाऊस पिऊन निघालेले बाईकवीर, अर्जुनाच्या तीरासारखा अंगावर येणारा पाऊस, चिंब पावसात भिजुन खाल्लेली गरमागरम कांदाभजी, तीन टप्प्यात कोसळणारा विहिगावचा धबधबा. तिसर्या टप्प्यातील १२० फूट उंचीच्या सहस्त्रधारातुन केलेले रॅपलिंग. मध्यावर येताच वर-खाली, आजुबाजुला फक्त पाणी पाणी आणि फेसाळते पाणीच आणि मी. निसर्गावर केलेली हि एक प्रकारची मातच होती. पण त्याच निसर्गासोबत अनुभवलेला १५ मिनिटांचा "तो" कालावधी थरारक होता.
निमित्त होते "ऑफबीट सह्याद्री" यांनी विहिगाव येथे आयोजित केलेला वॉटरफॉल रॅपलिंगच्या इव्हेंटचे. गेल्यावर्षी काही अपरिहार्य कारणांमुळे जाता आले नाही. पण मायबोलीकरांनी केली धम्माल पाहिली/वाचली आणि एका थराराक अनुभवाला मुकलो हे लक्षात आले.
त्यानंतर ऑगस्ट महिन्यात विहिगावला जाऊन मस्तपैकी भिजुन आलो. यंदाच्या इव्हेंटचा समस सुन्याकडुन आला आणि मायबोलीवरही या कार्यक्रमाचा बाफ प्रदर्शित झाला होता. यंदा काहिही झाले तरी जायचेच हे ठरवलं. त्याप्रमाणे सुन्याला कळवलं. सुरुवातीला फक्त ४ जणच तयार होतो, फोटो पाहिल्यानंतर अजुन ३ जण तयार झाले. :-). यातील बरेचसे कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळ्याचे असल्याने आम्ही बाईकवरूनच जाण्याचा निर्णय घेतला. एकुण ९ जण आणि बाईक्स ५ होत्या. (यातील दोघेजण रॅपलिंग करनार नव्हते) :-). त्याच दिवशी रोहित मावळ्याचाही फोन आला. त्यालाही यायचे होते पण आयत्यावेळी त्याचे मित्र टांगारू झाल्याने यंदाची त्याची वारी हुकली. 
आदल्या दिवशी यो रॉक्सला फोन करून माहिती विचारली :-).
"काहि नाही रे. दोन पायांमध्ये समान अंतर ठेवुन काटकोनात मागे वाकायचे नि उतरायला सुरवात करायची. एकदम सोप्प आहे " - इति यो.
"अरे पण, काटकोनाचा सरळकोन झाला तर? किंवा ३६० अँगलने फिरलो तर आपटायचो नाही का भिंतीवर? आणि उतरताना डावीकडे/उजवीकडे तोल नाही का जात? कड्यावरून उतरताना पाय घसरतो का? शूज कोणते घालायचे, सोबत काय न्यायचे? - माझ्या शंका/कुशंका
सर्व शंकांचे व्यवस्थित समाधान झाल्यावर दुसर्या दिवशी सकाळीच निघालो. विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडच्या कॉर्नरला आम्ही ६ जण भेटलो. पुढे कल्याण फाटा (भिवंडी-बायपास) जवळ अजुन दोघेजण सामील झाले. आमच्यातला एकजण खडवली फाट्यावर (पडघ्याजवळ) भेटणार होता. भिवंडी बायपास यायच्या आधीच पावसाला सुरुवात झाली. पडघ्याच्या आधीच पावसाने जोर धरला आणि आम्ही धबधब्याच्या आधीज नखशिखांत भिजलो. मुसळधार पावसात, रिकाम्या रस्त्यावरुन ७०-८० च्या स्पीडने बाईकवरून जाण्यात फुल्ल टु मजा येत होती. :-). संपूर्ण परीसरच हिरव्या रंगात रंगला होता. त्याच हिरव्या रंगाच्या छटाही वेगवेगळ्या दिसत होत्या. पुढे पडघ्याला प्रशांत आमच्यासोबत जॉईन झाला. एव्हाना पावसाने बराच जोर धरला, त्यामुळे थोडा स्पीड कमी करून आम्ही चाललो. पुढे कसारा फाट्यावरून आत जाऊन मस्तपैकी नाश्ता केला आणि पुढे निघालो. सुन्याला फोन केला असता ते कसार्याच्या जवळपासच होते असं समजलं. म्हणुन जरा आरामात आम्ही विहिगावला निघालो. 
विहिगावात फुललेला निसर्ग


नाश्ता करून कसारा घाटाच्या अलिकडे जव्हारला जाण्याकडे वळलो. साधारण १०-११ किमी अंतराव विहिगाव आहे. गेल्यावर्षी जाऊन आल्यामुळे तो रस्ता माहित होता. विहिगावात पोहचल्यावर ऑफबीट सह्याद्री तर्फे आलेल्यांची बस उभीच होती. तेथेच ओळखपरेड झाली. आमच्या प्रमाणेच बरेच जण पहिलटकर असल्याचे ऐकुन समाधान वाटले.
सुन्या मात्र मुख्य धबधब्यावर सगळी सेटिंग करण्यात मग्न होता. काहि वेळासाठी भेटायला आला (पहिल्यांदाच आम्ही भेटत होतो. :-)) आणि परत मोठ्या धबधब्याकडे गेला आणि शेवटपर्यंत तेथेच होता.
ओळखपरेडचा कार्यक्रम आटपल्यावर संयोजक प्रीती पटेलने आणि ऑफबीट सह्याद्रीचे लिडर्स रॅपलिंगबद्दल सांगत होते. त्यांनी ग्रुप केला होता त्याप्रमाणे ३-३ जण धबधब्यात उतरणार होते.
विहिगावचा हा धबधबात तीन टप्प्यात कोसळतो. पहिला छोटासा सुंदर धबधबा, दुसरा त्याहुन थोडा मोठा आणि तिसरा मोठ्ठाच मोठ्ठा (त्यातुनच उतरायचे होते.
)


हँडग्लोव्हज, हेल्मेट आणि सेफ्टी लॉक याबद्दल माहिती देताना ग्रुप लीडर प्रीती
हेच ते रोप, ज्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही स्वतःला धबधब्यात लोटुन देणार होतो. 


रॅपलिंगची तयारी करताना सुन्या आणि ऑफबीटचे लीडर्स


डेमो दाखवताना ऑसचा एक लीडर. हेल्मेट, ग्लोव्हज न घालता हा पठठ्या दोरीच्या सहाय्याने सरसर खाली उतरून गेला सुद्धा.

रॅपलिंगची तयारी करताना सुन्या 

सुरूवातीला हे तिघे तयार होऊन आले. 

धबधब्यात उतरायला पहिल्यांदा हे आले आणि पहिल्याच पायरीवर धडपडले.
नंतर मात्र सरसर उतरून गेले. 

थोड्यावेळाने आमचे मित्र किशोर आणि प्रशांत तयार होऊन आले धबधब्यातुन उतरायला.
नंतर या दोघी आल्या

यांनी फक्त पहिलीच पायरी पार केली आणि घसरले.
"रॅपलिंग करायचेच नाही" असे सांगुन सपशेल माघार घेतली. 

थोड्यावेळाने कॅमेरा मित्राकडे सुपूर्त करून अस्मादिक निघाले धबधब्यातुन विहार करायला. 


उतरायला तय्यार

फुल्ल टु धम्माल
मध्येच भरपूर पाऊस पडत असल्याने पाण्याचा जोरही वाढत होता. त्या धबधब्यातुन उतरताना आलेला अनुभव शब्दांच्या पलिकडचा होता. १२० फूट उंचावरून कोसळत्या धारात रोपच्या सहाय्याने स्वतःला झोकुन देत उतरताना एक विलक्षण, थरारक क्षण अनुभवत होतो. मध्यावर आल्यावर काहि सेकंद तिथेच थांबलो आणि ते जलतुषार झेलु लागलो. हेल्मेटवर आदळणार्या पाण्याचा आवाज एव्हढा होता कि कान अक्षरश: बधीर झाले होते :-). तिकडे मी, पाणी, पाणी आणि फक्त पाणीच. यावेळी मी एका वेगळ्याच दुनियेत होतो यावेळी काटकोन, सरळकोन, ३६०डिग्री अशी भौमितिक भीती कुठल्याकुठे गायब झाली होती. एका विलक्षण अनुभवाचा साक्षात्कार होत होता.
शेवटी खाली येताना मात्र माझे हेल्मेट पडले.
आणि त्या जलतुषारांचे घणाघात डोक्यावर झेलत थोडा गोंधळलो
मात्र लगेचच कातळाला चिकटलो (तेथे पाणी माझ्या गळ्यापर्यंत होते :-)) आणि डोक्यावर पडणार्या जलधारांपासुन वाचलो.
थोड्यावेळाने लीडर्स माझे हरवलेले हेल्मेट घेऊन आला. हा सगळा अनुभव अप्रतिम होता. जो सांगण्यापेक्षा अनुभवण्यातच जास्त मजा आहे.
आमचा एक मित्र सुधीर. इथे आला आणि घसरला
रॅपलिंग करायचेच नाही म्हणुन अडुन राहिला. पण परतीचे दोर कापल्याने नाईलाजाने खालीच उतरायला लागले. रॅपलिंग झाल्यानंतर हाच
आपला अनुभव अभिमानाने सांगत सुटला. 


मायबोलीकर दिपक डी
या SIWS कॉलेजच्या प्रोफेसर
विहि धबधब्याचा संपूर्ण फोटो (यावरून लक्षात येईल धबधब्याची उंची :-))

विहिगावचा निसर्ग 



इतर लोकांचे रॅपलिंग सुरूच होते. आम्ही सुन्याचा निरोप घेऊन साधारण ४:३० वाजता परतीच्या प्रवासासाठी निघालो. थोडा अजुन वेळ हाताशी असता तर तेथुनच पुढे २०किमी अंतरावर असलेल्या खोडाळा-देवबांध येथील "सुंदर विनायक" गणेश मंदिराला भेट देण्याचा विचार होता. पण दाटुन आलेलं आभाळ आणि वेळेच्या बंधनामुळे सरळ घरीच निघालो. गेल्या वर्षीचा "मामा"चा अनुभव लक्षात असल्याने कसारा हायवेवर आम्ही बिनधास्त राँग साईडने बाईक चालवत होतो.:फिदी: मुसळधार पाऊस कोसळत होता. वाटेवर कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये थोडावेळ थांबुन भर पावसात गरमागरम कांदाभजी, बटाटाभजी आणि चहावर ताव मारला :-).
अशा तर्हेने अजुन एक विकांत थरारक अनुभव अनुभवत सत्कारणी लागला. 
थँक्स टु ऑफबीट सह्याद्री अॅण्ड सुन्या. 
तटि: ३० जुलै रोजी पुन्हा विहिगावात वॉटरफॉल रॅपलिंग आहे. शक्य असल्यास हा थरारक अनुभव जरूर घ्या. 
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
एकदा जायलाच हवं... >>> एकदा का दरवर्षीच जायला हवं
विही म्हणजे एक अविस्मरणिय थरार जो शब्दात मांडण कठिण.
>>>>अगदी अगदी
जिप्सी... हेल्टमेट शिवाय डोकं आऊट झालं असणार तुझं? >>>>कम्प्लीट आऊट झालं
शेवटच्या टप्प्यात त्या कातळाला चिकटुन राहिलो. 
मलाही अश्या कार्यक्रमात सहभागी व्ह्यायला आवडेल ,जिप्सी क्रुपया सान्गू शकता का याचे registration कुठे करायचे असते ??>>>>>>vegayan, तुम्ही www.offbeatsahyadri.com या साईटवर registration करू शकतात किंवा अधिक माहितीकरीता मायबोलीकर सुनिल गावडे (सुन्या) याच्याशी संपर्क करा.
२४ जुलै पनवेलला आणि ३० जुलै पुन्हा विहिगावला वॉटरफॉल रॅपलिंग आहे.
आहाहा योग्या मस्त फोटो आणि वृतांत.. काय फाटली कि नाहि थोडी?>>>>>बिलकुल नाही
उलट एकदा उतरल्यानंतर दुसर्यांदा पुन्हा जाणार होतो. पण वेळेअभावी जमले नाही. 
हेल्मेट न घालणे हे 'इथेही' अभिमानास्पद आहे का? त्यातून लीडरनीच हा आदर्श ठेवला तर आनंदच आहे!>>>सॅम :-). लीडर फक्त तेव्हढ्यापुरता हेल्मेट न घालता गेला. बाकीच्या सगळ्यांसाठी हेल्मेट "मस्ट" होते. शेवटच्या टप्प्यात जेंव्हा माझे हेल्मेट पडले तेंव्हा ते एकाने आणुन दिले आणि अगदी काहि फुटाचे अंतर असुन देखील हेल्मेट घालुनच जायची सक्ती केली.
धमाल आहे नुसती. समस मिळाला
धमाल आहे नुसती. समस मिळाला होता पण त्याच दिवशी मैत्र जिवांचे चे उद्घाटन होते. पण आता नक्की जाणार. यावर्षीच जाणार. फोटो मस्त आलेत.
सहीच !
सहीच !
ज ब र द स्त!!!!
ज ब र द स्त!!!!
सहीच... जबराट अनुभव... फोटोज्
सहीच... जबराट अनुभव...
फोटोज् पण मस्त...
आचाट रे , मस्त
आचाट रे , मस्त
३० जुलैसाठी संपर्क क्रमांक दे
३० जुलैसाठी संपर्क क्रमांक दे ना!! फोटो नि माहिती झक्कास!!! विहीगांववरूनच कसारा घाटातल्या बळवंतगडावर जायला रस्ता आहे. तो करुन यायचा नां!
प्रतिसादाबद्दल धन्स पण आता
प्रतिसादाबद्दल धन्स
पण आता नक्की जाणार. यावर्षीच जाणार. >>>>हबा, एकदा हा थरारक अनुभव अवश्य घे. मस्त, मस्त, मस्त
धन्स हेम :-), या लिंकवर सगळी डिटेल्स आहेत.
पनवेल - वॉटरफॉल रॅपलिंग — २४ जुलै, २०११.
विहिगाव - वॉटरफॉल रॅपलिंग — ३० जुलै, २०११
३० जुलै नाव नोंदावले हाये.
३० जुलै नाव नोंदावले हाये. घाबरत घाबरत का होईना पण मी धबधबा उतरणार आहे.
हबा..घाबरला???
हबा..घाबरला???
सह्हीये हबा. ऑल दि बेस्ट
सह्हीये हबा. ऑल दि बेस्ट
रॅपलर्सचा सगळा साज चढवुन
रॅपलर्सचा सगळा साज चढवुन सर्वात वरची पायरी उर्फ छोटा धबधबा उतरायला मी पण तयार आहे. खाली तुम्ही नेट लावालच म्हणा.!
आर्या,
आर्या,
मस्त
मस्त
३० जुलै नाव नोंदावले हाये.
३० जुलै नाव नोंदावले हाये. घाबरत घाबरत का होईना पण मी धबधबा उतरणार आहे.
>>>>:हाहा: ऑल दि बेस्ट...शुभेच्छा!
तुम्ही नेट लावालच म्हणा! >>>
तुम्ही नेट लावालच म्हणा! >>> हो नक्कीच. मी तर एवढं नेट लाविन की छोट्या धबधब्यातून पडता पडता तू मोठा धबधबा कधी मागे टाकलास हे तुलासुध्दा कळणार नाही.
बाय द वे, सुरक्षेची सर्व साधने आयोजक आणतात ना? आणि वर पडलेल्या दोघांची तब्बेत कशी आहे?
बाय द वे, सुरक्षेची सर्व
बाय द वे, सुरक्षेची सर्व साधने आयोजक आणतात ना?>>>>>येस्स, सगळी साधने आयोजक आणतात. तुम्ही सोबत फक्त "आत्मविश्वास" घेऊन या
आणि ग्रीप वाले शूज असतील तर उत्तमच.
आणि वर पडलेल्या दोघांची तब्बेत कशी आहे?>>>>त्यातला एकजण सरसर उतरून खाली गेला सुद्धा आणि दुसर्याने (घसरल्यामुळे) लगेच आत्मविश्वास गमावला

ग्रीप असलेले शूज नसल्याने तो घसरला असावा.
ग्रीप वाले शूज >>> त्यात पाणी
ग्रीप वाले शूज >>> त्यात पाणी घुसत नाही का हो उतरताना? मी शँडेल घालून गेल्यालं बरं असच समजत होतो.
हबा घुसतं ना पाणी पण
हबा
पण घसरायला होत नाही.
आमचे काही मित्र अदलाबदल करत होतो शूजची 
घुसतं ना पाणी
हबा.. जिप्स्या... मला सांग,
हबा..
जिप्स्या... मला सांग, त्या पाण्याशी/ दगडाशी असा विशालकोन करुनच उतरतात ना? म्हणजे पाय घसरला तर डायरेक्ट ३६० डिग्री..बरं ओरडायचाही चान्स नाही. पाण्याचा जोर नि आवाज इतका असणार. मग 'वर'च्यांना किंवा 'खाल'च्यांना कसं कळत???
मग 'वर'च्यांना किंवा
मग 'वर'च्यांना किंवा 'खाल'च्यांना कसं कळत??? >>> ते घसरणार्याच्या रियाजावर आवलंबून आहे. अशा सदरिकरणासाठी गल्लीत जोरजोरात किंचाळ्त भांडण्याचा रियाज करावा लागतो.
ओके आता जास्त चर्चा करून त्यादिवशीची मजा घालवत नाही. 'आधी केरतो मग सांगतो'. पण मी घाबरलोय हे नक्की. सुन्या किंवा यो भेटल्याशिवाय आत्मविश्वासाच्या पातळीत वाढ होणार नाही. दोघही आहात ना रे ३० ला?
आर्या, कमरेला असलेल्या सेफ्टी
आर्या, कमरेला असलेल्या सेफ्टी गार्ड मधुन एक रोप वरच्यांकडे आणि एक दोर खालच्यांकडे असते.



डाव्या हाताने तुम्ही तो रोप हळु हळु पुढे सरकवत खाली उतरायचे. ३६० डिग्री झाले तरे डाव्या हाताचा रोप वर सरकवत खाली जायचे
ऑफबीट सह्याद्रीतर्फे वॉटरफॉल रॅपलिंग १००% सेफ आहे.
सुरक्षिततेची सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाते, हे स्वानुभवावरून सांगतोय.
मस्त अनुभव.
मस्त अनुभव.
मस्त ! फोटो मस्त आलेत.
मस्त !
फोटो मस्त आलेत.
डाव्या हाताने तुम्ही तो रोप
डाव्या हाताने तुम्ही तो रोप हळु हळु पुढे सरकवत खाली उतरायचे.
>>> खरेतर रोप सरकवायची गरजच नसते. मुळात रोप वर सरकतच नाही.
तुम्हीच खाली सरकत असता. तुमचे वजन पूर्णपणे मागे टाकले तर आपोआप तुम्ही खाली सरकता. ज्यांचे वजन कमी असते त्यांना जरा हाताने रोप पुश करावा लागतो.
जिप्स्या... मला सांग, त्या
जिप्स्या... मला सांग, त्या पाण्याशी/ दगडाशी असा विशालकोन करुनच उतरतात ना? म्हणजे पाय घसरला तर डायरेक्ट ३६० डिग्री..बरं ओरडायचाही चान्स नाही. पाण्याचा जोर नि आवाज इतका असणार. मग 'वर'च्यांना किंवा 'खाल'च्यांना कसं कळत???
>>>> जो बिले उर्फ सुरक्षा दोर घेऊन बसलेला असतो तो इतका अनुभवी असावा की त्याला रोप घर्षण किंवा मुव्हमेंट वरून समजून येते की खाली जाणारा माणूस काय करतोय...
फार कठीण नसते ते पण अनुभवावरून लक्ष्यात येते.
रोहन, अधिक माहितीबद्दल धन्स
रोहन, अधिक माहितीबद्दल धन्स रे
जबरी रे !!!
जबरी रे !!!
थरारक अनुभव रे. हे राहिले
थरारक अनुभव रे. हे राहिले होते बघायचे !
विहीच्या धबधब्याचा फोटो मस्त
विहीच्या धबधब्याचा फोटो मस्त आलाय. बाकी तुमचे रॅपलिंग थरारक आहे, अनुभवायला पाहिजे एकदा तरी. धन्यवाद
Pages