हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन गर्ल्स हायस्कूल, पुणे

Submitted by नीधप on 15 July, 2011 - 22:57

पुण्यातली सगळ्यात जुनी मुलींची शाळा. १२५ वर्ष पूर्ण होऊन गेली.
आमच्या शाळेचं हेच्च नाव आहे. बाकी नावांनी हाक मारू ने. Happy पुणे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय माहित काय ते पण पहिल्या ३० मुलींना कॉम्प आणि पुढच्या ३० मुलींना टायपिंग असला सगळा मार्कवर्चस्ववादी प्रकार होता.. Happy

मी गीता, मी पण हुजुरपागेचि... हत्ती आठवला आणि हसु आले Happy मी कम्पुटर ला होते, डोस सिस्टिम असायचि... आगटे बाई चि आठवण आली Happy काकतकर बाई फ़ेसबुक वर आहेत. शाळे मधे बान्धकाम चालु आहे असे एकले.

शाळेचे लक्ष्मी रोडचे दार सध्या बंद आहे गीता. सध्या मागच्या बोळातून प्रवेश आहे. गायन वर्ग, पर्यवेक्षकांचे ऑफिस असलेली इमारत पाडून तिथे एक बहुमजली इमारत बांधणे सुरू आहे.

बायदवे, परवाच माझ्या आईच्या हुपा बॅचमधील (बहुतेक १९६६-६७ ची बॅच) वर्गमैत्रिणींचे एक छोटे गटग झाले. सगळ्याजणी ज्ये. नागरिक! पण धम्माल चालली होती नुसती! हशा, शाळेतील शिक्षिकांच्या आठवणी (दाणी बाई, वझे बाई, सुप, मालती साठे, शांता निसळ बाई, गंगूताई पटवर्धन (ह्या सोसायटीच्या, शिक्षिका नव्हेत!)) ....
सुपंनी वर्गात तेव्हा रिबेक्काची ष्टोरी सांगितली होती. आणखी काही इंग्रजी चित्रपट / कादंबर्‍यांच्या ष्टोर्‍या सांगायच्या त्या.

आठवणींमध्ये आणखी, बालिका वस्तू भांडार - स्टोअर - तिथे काम केल्यावर कशी ऑरेंजची गोळी मिळायची किंवा चिक्की मिळायची ते, गुलमोहराची व अशोकाची झाडे, प्लेशेड, घंटा, मधुमालती-बोगनवेलीचा मांडव (जो आता अस्तित्त्वात नाही), तेव्हा त्यांना साडीचा युनिफॉर्म होता, त्याच पदर कसा घ्यायचा हेही शिक्षिका सांगायच्या (कमरेला खोचायचा म्हणे तो पदर!) वगैरे खूप आठवणी निघाल्या. सगळ्यांनी सांगितले की आजही लोक मधेच रस्त्यात वगैरे किंवा इतरत्र अचानक विचारतात, ''तुम्ही हुजूरपागेच्या का? चेहर्‍यावरून कळते लग्गेच्च!!!'' (???? म्हणजे नक्की कॉय? ;-)) सरते शेवटी मैतरणी शाळेतील काही कविता उत्स्फूर्तपणे आठवताना, सगळ्यांना त्या कविता आपल्या आजही तोंडपाठ आहेत हे लक्षात आले. अगदी श्रावणमासी पासून ते बाळ जातो दूर देशा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या वगैरे वगैरे. जोरात आणि जोषात म्हणून झाल्या कविता.

"दुकान' बंद ; प्रवेशद्वार सुरू

पुणे - स्त्री-शक्तीने एकत्र येऊन केलेल्या आंदोलनामुळे "हुजूरपागा' नरमली असून, येत्या आठ दिवसांत लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात येईल, असे आश्‍वासन शाळा प्रशासनातर्फे गुरुवारी देण्यात आले. यावर तातडीने स्त्री-शक्‍तीने "आश्‍वासन नको आम्हाला कृती हवी', अशी मागणी केल्यामुळे दुपारपासूनच प्रवेशद्वाराजागी बांधण्यात आलेली भिंत पाडण्याचे काम प्रशासनाने सुरू केले. येत्या आठ दिवसांत मुख्य प्रवेशद्वार पुन्हा सुरू होणार आहे.
http://www.esakal.com/esakal/20110923/5161850117925521112.htm

उद्या दुपारी ३ वाजता, २४ सप्टेंबर, शनिवार रोजी शाळेत माजी विद्यार्थिनींची या विषयासंदर्भातील महत्त्वाची मीटिंग! सर्व माजी विद्यार्थिनींनो, उद्या नक्की उपस्थित रहा! जय हिंद!! Happy

आणि या कालच्या मिरर (टाईम्स ऑफ इंडियातील) बातमीच्या लिंका

आणि या कालच्या मिरर (टाईम्स ऑफ इंडियातील) बातमीच्या लिंका

लिंक 2

आयला कसला वेडेपणा आहे.. बाकीची सगळी दारं छोट्या रस्त्यांवर उघडतात.. तिथे तर अजूनच गर्दी होईल... आणि नू.म.वि.च्या समोरचे दार वापरायचे ठरवले तर ते वापरताच येणार नाही.. अजूबाजूला दुकानं असल्यामुळे ते अगदीच छोटं झालय.. आणि दोन्ही शाळा जवळपास एकाच वेळेस सुटतात..म्हणजे तर बाजीराव रोड वर अभूतपूर्व गर्दी होईल.. तिचं काय करणार..

तिथेच पुढे अजून एक शाळा आहे.. तिला पण असंच लक्ष्मीरोड वरचं दार बंद करायला सांगितलं आहे की काय?

हिम्स, बातमी वाच सगळी म्हणजे अंदरकी बात लक्षात येईल. पोलिसांची सूचना, ट्रॅफिक जॅम वगैरे फक्त वरवरची कारणे आहेत. कारण नुसते प्रवेशद्वार बंद ठेवता येऊ शकते. इथे शटर लावून, भिंत घालून, शाळेच्या नावाची पाटी काढून दुसर्‍या दुकानाची पाटी त्या शटरच्या शेजारी लागली होती म्हणे!
आता भिंत फोडताहेत....

हो अकु, बोर्ड काढलेला दिसतो आहे एका चित्रात... कोणत्यातरी दुकानदाराने मजबूत पैसे दिले असतील त्याशिवाय हे असले प्रकार करणे शक्य नाही..

हुजुरपागेच्या सर्व आजी / माजी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांचे स्नेहसंमेलन

म.ग.ए.सोसायटी, हुजुरपागा, लक्ष्मी रस्ता, पुणे ३० येथील माजी विद्यार्थिनी माजी शिक्षक संघातर्फे

सर्व विद्यार्थिनी आणि शिक्षिकांचे स्नेहसंमेलन दि.१९ जानेवारी २०१३ रोजी आयोजित केले आहे.

यामध्ये श्याम भुर्के आणि गीता भुर्के यांचा "मेजवानी विनोदाची" हा कार्यक्रम होणार आहे.
नंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रम संपेल.

दिनांक: शनिवार १९ जानेवारी २०१३
वेळ: दुपारी ४ ते ७
स्थळ : अमृतमहोत्सव सभागृह

हत्ती पडलाय अजून आमच्या घरी.. ह्या वर्षी मुलीच्या भोंडल्याला वापरणार..>>> ही मुलींची शाळा ना , मग हिम्सकुल कडे हत्ती कसा ?

काल गेले होते कार्यक्रमाला. अलका काळे बाई, पानसे बाई, सुमन परांजपे बाई, माधवी जोशी बाई आणि काकतकर बाई भेटल्या. काकतकर बाई दिसल्या फक्त, कारण त्यांना लवकर जायचे होते. मनोरंजन कार्यक्रम ठीक ठीकच झाला. आपल्या ८वी,९वी,गायन वर्गाच्या इथे बांधलेली इमारत प्रथमदर्शनी तरी पूर्ण झालीये असे दिसले, पण अजून आजूबाजूचे पत्रे काढले नाहीयेत. थोडेफार काम राहिले असावे. शाळेचे मुख्य प्रवेशद्वारही त्यामुळे अजून खुले केलेले दिसत नाहीये.
काल कॅमेर्‍यात हा फोटू बंदिस्त केला :

huj1.jpg

पूर्वीही एकदा हा उल्लेख केला होता की कायसं वाटयंत. तरीही लिहिते:
माझीही सांगलीची शाळा: हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कुल.
तर आम्ही गंमतीने हिहाराचीपहासांगली असं म्हणायचो!

आहा.. धन्स अकु!
आपले ९-१० वीचे वर्ग , चित्रकला, गायनाचे वर्ग असलेली बिल्डींग गेली याचं इतकं वाईट वाटतंय ना..
कोपर्‍यातल्या खिडकीत बसायचे आणि शिकवण्यापेक्षा बाहेरची झाडी, ग्राऊंडवर काय चाललंय ते बघत रहायचं, जाता-येता कधीही वर्गाचा दरवाजा न वापरता खिडकीतूनच जायचं यायचं.. ती मजा अशक्य होती.

नीरजा, गुलमोहराच्या व अशोक-जांभळाच्या झाडांकडे बघताना वेळ किती भुर्रकन् उडून जायचा!!

नव्या इमारतीच्या बांधकाम पसार्‍यात व सिमेंटच्या धुळीत शाळेतल्या उरल्या सुरल्या झाडांची जी काय स्थिती झाली आहे ना...

मस्त बाफ.. मी पण हुजुरपागेची " Happy

आज वाचला हा बाफ.. एक दोन दिवसा आधी वाचला असता तर मग कार्यक्रमाला जाता आलं असत... Sad

वा अकु!!
आत्ताच फेबुवर एका मैत्रिणीने टाकलेले फोटो पाहिले.
१५ वर्षे झाली मला शाळेतून बाहेर पडून.इतके सारे बदल झाले आहेत.आता परत कधी शाळेत गेले तर तसंच पूर्वीसारखं वाटेल का? असा प्रश्न पडतो Happy
वी,९वी,गायन वर्गाच्या इथे बांधलेली इमारत प्रथमदर्शनी तरी पूर्ण झालीये असे दिसले, पण अजून आजूबाजूचे पत्रे काढले नाहीयेत. थोडेफार काम राहिले असावे. शाळेचे मुख्य प्रवेशद्वारही त्यामुळे अजून खुले केलेले दिसत नाहीये.>>
तरीच गेल्या महिन्यात लक्ष्मी रोडवरचे दार बंद होते.

दर वर्षी शाळेत अमृतमहोत्सव मध्ये गुरुपौर्णिमेला माजी विद्यार्थिनी माजी शिक्षक संघातर्फे कार्यक्रम असतोच असतो! तिथे बर्‍याच जुन्या शिक्षकांची भेट होते. गुरुपौर्णिमेचे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे प्लॅन करा. मग शाळेचीही भेट होईलच! Happy

आज आपल्या शाळेचा १३१ वा वाढदिवस.
फेबुवर माजी विद्यार्थिनी शिक्षक संघ असा जो ग्रुप आहे त्यात शाळेच्या सुरूवातीच्या वर्षातला एक फोटो शेअर केलाय.
त्या फोटोतल्या विद्यार्थिनी नऊवार नेसून येणार्‍या. त्यांनी आणि त्यांच्या घरातल्यांनी धाडस करून पाठवले शाळेत मुलींना. काय विचार केला असेल तेव्हा त्यांनी?
कल्पना करून काटा आला अंगावर.