मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट

Submitted by prafullashimpi on 13 July, 2011 - 10:29

मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट झाल्याची बातमी येतेय.

१० died and around 100 wounded

क्षमस्व घाई घाईत पोस्ट करतोय , क्रुपया अधिक माहिती असल्यास शेअर करा

http://www.ndtv.com/video/live/channel/ndtv24x7

maharashtratimes.indiatimes.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय चीड, संतापजनक घटना. वारंवार अतिरेकि हल्ले होउनहि गृहखात्याचं इंटेलिजंस काय लायकिचं आहे याचा दुर्दैवी पुरावा.

भुजबळसाहेबांचे विधानः

"मुंबईकरांनी यापुर्वीही मोठ्या धीराने या प्रसंगांना तोंड दिलेले आहे"

अच्छा, म्हणजे मुंबईकरांच्या धीरावर सगळे सोडून देणार तर सरकार! बिचारे मारले जात आहेत, असुरक्षित आहेत हे गेले कुठेच!

अवघड झाले आहे सगळे इतकेच खरे!

इन्डियन मुजाहिद्दीनवर संशय आहे. अजून काही शतके संशयच व्यक्त करत बसा म्हणाव!

... आणि मोठ्या शहरांत अशा छोट्या-छोट्या घटना होतातच!
(आपण आता याची सवय करायची.)

मा. आबा आले नाहीत अजून 'बाइट' द्यायला?

Sad मगाशीच ही बातमी वाचण्यात आली... हे सत्र का सुरु आहे? यातून काय साधते आहे, हेच समजत नाहीये.... आधीच्याच स्फोटांचा निकाल अजून लागायचाय आणि आता हे परत!!! भारतीयांच्या जीवावर उठणार्‍या संघटनांचा बंदोबस्त कधी होणार???? फार वाईट बातमी आहे.... Sad
खरंच, सावलीने लिहिलेय, तेच विचारतेय, सगळे माबोकर सुखरुप आहेत ना?

बाकीची चिडाचिडी नंतर करू या.

सर्व मृतात्म्याना शांती लाभो, आणि त्याच्या कुटुंबीयाना या संकटाला तोंड देण्याची शक्ती येवो, ही देवाकडे प्रार्थना. Sad

.

आता उद्या मुंबईकरांच्या स्पिरीटची तोंड फाटेतो स्तुती केली जाईल पेपर आणि मेडियातून. जसं काय सामान्य माणसाला दुसरा काही पर्याय असतो... पोटाची खळगी भरायची तर सगळं बाजूला टाकावंच लागतं पण सामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी काही करायच्या ऐवजी त्याच्या स्पिरीटचे गोडवे गाणं सोपं ना...

'Wednesday' या फिल्म मधले श्री. नसिरुद्दिन शाह प्रत्यक्ष अवतरायला पाहिजेत...........

सर्व मृतात्म्यांना शांती मिळो...

हे थांबण्यासाठी काय करायला हवे?
आपण काही करू शकतो का?
का असहाय्य्पणे फक्त पहात रहायचं?
सरकारने काय करायला हवं?
अर्थात् निषेध, चीड......
मृतात्म्यांना शांती मिळो.....
आहेच!

....मुंबईतील अनेक दुकानातून तात्काळ मेणबत्या मिळवून वाघासरहद्दीवर त्या पेटवून निषेध व्यक्त करायला पाकीप्रेमी निघाले आहेत असे कळते....

छे छे विचारच करवत नाही. खरच कुठे चाललाय आपला देश. राज्यकर्ते तर षंढ आहेतच पण जनतासुधा मुकाट सहन करते. Sad श्रध्दांजली शिवाय अजून काय म्हणणार!! Sad

खुप वाईट बातमी आहे ही आणि तरिही पोटासाठी उद्या सगळे तसेच धावणार आणि मिडीया त्याला स्पिरिट म्हणून स्वतःची पानं भरणार Sad दादरला स्फोट झाला तेव्हा आमची ट्रेन दादर स्टे. शिरत होती. चढलेल्या काहिंनी मोठ्ठा फटाक्यासारखा आवाज चढण्यापुर्वी २ मिनिट आधी ऐकल्याचं सांगितलं पण तेव्हा नव्हतं ठावूक काहीच. नंतर समस आले तेव्हा कळलं त्यांनी कसला आवाज ऐकला ते

ज्यांनी ह्यात स्वत:चे नातेवाईक गमावले त्यांना देव हे सहन करायची शक्ती देवो. श्रध्दांजली शिवाय अजून काय म्हणणार

घटनेचं गांभीर्य पाळून या धाग्यावर अवांतर प्रतिसाद देणे टाळावे ही विनंती.<<<<<< १०० % अनुमोदन....

अवांतर प्रतिसाद म्हणजे काय पण? लोक चीड व्यक्त करणारच, सरकारवर टीका करणारच! येथे कोणी गंमतीदार प्रतिसाद दिलेला नाहीच आहे. राग येणारच की?

निवांतराव, आपण काय म्हणता?

बहुधा कसाबच्या वाढ दिवसाबद्दल अवान्तर प्रतिसाद म्हणायचे असावे आणि ते बरोबर आहे. कशाला पाहिजे ते विकृत कुतुहल् ? Angry

लिहीताना खुप लाज वाटते आहे आणि आर्श्चय ही कारण ह्या बॉम्ब स्फोटांची सवय झाली आहे. की आमच्यातला माणुस मेला आहे. हेच कळत नाही आहे . स्फोटांची बातमी कळताच आम्ही न्युज लावली सगळ्यांना फोन केले.
आपली माणस सुखरुप आहे हे कळल्यावर हायस आणि ज्यांचा ह्यात जीवगेला त्या बद्द्ल दु:ख .हे केवळ दिड ते दोन तासां पुरतच ह्या नंतर आमच्याकडे सिरीयल चालु झाल्या आणि पुन्हा रुटीन. मी येऊन नेट वर बसलो. माला कळत नाही आहे की मी हे लीहुन बरोबर करतो आहे कि चुक. माला खरच कळत नाही आहे की मी कस रिअ‍ॅक्ट व्हाव.खुप गोंधळलो आहे.
आमच्या बाजुची मुलगी त्यावेळी दादरला होती आणि त्यानां ती सुखरुप असल्याच कळल्याव्रर तीथे ही हेच वातावरण झाले.

Pages