मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट

Submitted by prafullashimpi on 13 July, 2011 - 10:29

मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट झाल्याची बातमी येतेय.

१० died and around 100 wounded

क्षमस्व घाई घाईत पोस्ट करतोय , क्रुपया अधिक माहिती असल्यास शेअर करा

http://www.ndtv.com/video/live/channel/ndtv24x7

maharashtratimes.indiatimes.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरपराध नागरिकांचा प्राण घेणारे हे अत्यंत नालायक राक्षस आहेत. दुर्दैवाने भारतात न्यायव्यवस्था अत्यंत दुर्बल असल्याने व अतिरेक्यांशी पाहिजे तितक्या कठोरपणे न वागणार्‍या मंडळींच्या हातात सत्ता असल्याने अतिरेक्यांचे फावले आहे.

मुंबई हे अत्यंत सॉफ्ट टारगेट आहे हे अनेकवेळा सिध्द झाले आहे. १९९३ ला १३ ठिकाणी (३०० ठार), २००२ मध्ये घाटकोपरला बसमध्ये (१० ठार), २००३ ला गेटवे ऑफ इंडियाच्या समोर (५५ ठार), २००६ ला लोकल्समध्ये (२०० ठार), २००८ मध्ये अतिरेकी हल्ला (२०० ठार) . . . दर २-३ वर्षांनी अतिरेकी मुंबईला तडाखा देतात. कायद्याची, पोलिसांची व शिक्षेची कोणालाही अजिबात भीति राहिलेली नाही.

बाटला हाऊस सारख्या ठिकाणी पोलिसांनी अतिरेक्यांना मारले तेव्हा लगेच दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल वगैरे नालायकांनी पोलिसांवरच संशय व्यक्त केला. २६/११ च्या हल्ल्यानंतर अंतुले, दिग्विजय इं. नी हिंदू संघटनांवर आरोप करून सर्वांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला व पाकिस्तानच्या हातात आयते कोलीत दिले. २००६ च्या समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटात व २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटात काही हिंदूंना गोवून कॉन्ग्रेसने भाजपवर राजकीय विजय मिळविण्याचा प्रयत्न केला, पण, त्यामुळे पाकिस्तानला संशयाची सुई भारतीयांवरच रोखायची संधी दिली. २ दिवसांपूर्वीच अत्यंत वाचाळ व बेजबाबदार व प्रक्षोभक वक्तव्ये करणार्‍या दिग्विजय नावाच्या नालायकाने पुण्यात बोलताना, "मालेगावचे संशयित (म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंग वगैरे) पकडल्यापासून भारतातले बॉम्बस्फोट बंद झाले आहेत" असे सांगून संशयाची सुई हिंदूंच्या दिशेने वळविली. (हे तारे तोडताना हा दिग्विजय नावाचा गाढव, २००८ मधला मुंबईतला अतिरेकी हल्ला, २०१० मधला जर्मन बेकरीतला स्फोट, २०१० मधलेच वाराणशीतील २ स्फोट इ. हल्ले सोयिस्कररित्या विसरला). अगदी असेच विधान पवारांनी देखील २००९ मधल्या निवडणूकीच्या प्रचार सभेत बोलताना केले होते. "हिंदू अतिरेकी हे मुस्लिम अतिरेक्यांपेक्षा जास्त खतरनाक आहेत" असे मूर्खपणाचे उद्गार दस्तुरखुद्द अमूल बेबी (राहुल) याने काढले होते. १९९८ साली कोईमतूर मधल्या बाम्बस्फोटाच्या मालिकेतला (यात ६० जण गेले होते) प्रमुख आरोपी अब्दुल नासर मदानीला जेव्हा न्यायालयाने २००८ मध्ये तुरूंगातून सोडले, तेव्हा त्याच्या स्वागताला केरळमधले कम्युनिस्टांचे व कॉन्ग्रेसचे सर्व प्रमुख पुढारी हजर होते. त्याला सोडावे अशी शिफारस चक्क केरळमधल्या काँग्रेस सरकारने केली होती व केरळमधल्या कम्युनिस्टांनी त्याला पाठिंबा दिला होता.

आजच्या बॉम्बस्फोटात लष्करेतोयबा, इंडियन मुजाहिदिन यांचा तपास करताना इतर शक्यता देखील तपासाव्यात (म्हणजे संघ परिवार), अशी बेताल फुसकुली दिग्विजय नक्कीच सोडून देईल.

काँग्रेसच्या पुढार्‍यांच्या अशा बेताल विधानांमुळे अतिरेक्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढत असणार. आपल्याविरूध्द कठोर कारवाई करायला सरकार मतांच्या हिशेबामुळे कचरत आहे अशी त्यांची समजूत होत असणार. जरी आपण पकडले गेलो तरी अफझल गुरूप्रमाणे आपल्याला शिक्षा द्यायची सरकारची हिंमत होणार नाही असे त्यांना वाटत असणार. त्यात भर म्हणजे आपली पोलिस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा इ. फारशा प्रभावी नाहीत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अतिरेकी दर २-३ वर्षांनी मुंबईला आपले टारगेट करतात.

आजच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना माझी श्रध्दांजली! निदान यापुढे तरी निरपराध नागरिकांना आपल्या प्राणांची किंमत द्यायला लागू नये.

निष्पापांच्या रक्ताला चटावलेल्यांना फक्त बंदुकीचीच भाषा समजते हे आपण अजून का शिकलेलो नाही, हे समजत नाही.

>>> मा. आबा आले नाहीत अजून 'बाइट' द्यायला?

आबा हे अत्यंत निष्क्रीय गृहमंत्री आहेत हे यापूर्वी अनेकवेळा सिध्द झाले आहे. नुसते पोकळ इशारे देणारे बोलबच्चन अशी त्यांची प्रतिमा आहे. २००८ च्या हल्ल्यात त्यांच्या मोडक्यातोडक्या हिंदीत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांचे हसे झाले होते. यावेळी तसे होऊ नये म्हणून ते कॅमेर्‍यासमोर आले नसतील किंवा हिंदीत द्यायची प्रतिक्रिया आपल्या सेक्रेटरीकडून लिहून घेऊन पाठ करून मगच कॅमर्‍यासमोर येतील.

is there any Emergency Management body in Mumbai that co-ordinates first response in such situations? बघ्यांची गर्दी आणि एकंदरीच सगळा कारभार ढिसाळ वाटतोय फोटो बघुन.

मुंबैमधे (सगळ्याच शहरात) मोहल्या मोहल्यात फर्स्ट रिस्पोंडर टीम्स तयार करणे गरजेचे आहे.

National Disaster Management Authority ही भारताची EM body आहे. पण बहुतेक ती अजून पाळण्यात आहे...

Vicky Nanjappa provides an insight into the Indian Mujahideen

Operation Bangalore, Ahmedabad and Delhi (BAD) announced the arrival of the Indian Mujahideen. Although this outfit is an offshoot of the Students Islamic Movement of India had carried out blasts at a court in Uttar Pradesh, it was operation BAD which put the IM on the world terror map.
The police were led to believe that this organisation is on the back foot and therefore investigations continued to take place at a snail's pace -- which is precisely why the IM could regroup and possibly carry out today's terror attack.

पुनः एकदा मुंबई... संताप, चीड, दु:ख, ई. सर्व पुन्हा एकदा... दुष्टचक्र कधी संपायाचं?
ऊद्या/गुरू सं ६ वाजता कबूतर खान्या समोरच्या गल्लीत अ‍ॅपॉईंट्मेंट होती. Sad नेमके आज घरून निघण्या आधी टिव्ही लावला आणि मग बातमी कळली. प्रवास रद्द करायला मी आज घरी होतो हे सुदैव म्हणायचे की आज त्या वेळी तिथे जे ऊपस्थित होते त्यांच्या दुर्दैवाबद्दल हळहळ व्यक्त करायची..? Sad

आता पुन्हा एकदा तोच तमाशा पुढील आठवडभर पहायला मिळेल- कसाब, अफजल गुरू, पाक, राजकारण, मतांसाठी लांगूलचालन, पुन्हा याही वेळी गृ. आबा पाटील (काय पण नशीब आहे माणसाचं!), कॉ. सरकार ईत्यादी ईत्यादी... सामान्यांनी मरायचं तरीही त्यांनी शांत रहायच.. सद्भावनेचे डोस गपचूप प्यायचे.. आणि सरकार काय करणार- काहीही नाही. ओसामा स्टाईल कारवाईचा जोर धरला जाईल, विरोधी पक्ष मिळून पुनः कॉ. ला धारेवर धरतील (हेच व्ह्यायचं बाकी होतं!), आणि पुनः पुनः मृतांच्या करूण कहाण्या, जखमींचे हाल, मदतनीसांचे शौर्य, बघ्यांचे हसू... पुनः सर्व तेच दिसेल.
पावसाळा संपला की सर्व पुनः धुवून निघेल......

देवा वाचव आम्हाला आणि आमच्या देशाला.. किंवा आम्ही त्याही लायकीचे राहिलो नाही असे त्याला वाटत असेल का?

वर लिहील्याप्रमाणे नसिरूद्दीन खरच अवतरेल काय? Sad

>>is there any Emergency Management body in Mumbai that co-ordinates first response in such situations?
अर्थात! त्याचं नाव सामान्य मुंबईकर!

सगळं झाकायला आता 'मुंबईकर स्पिरिट' चे नको इतके गोडवे गायले जातील. होरपळलेल्या, घाबरलेल्या सामान्य जनतेच्या जखमेवर व्यवस्थित कौतुकाचे मीठ चोळले जाईल.

वर लिहील्याप्रमाणे नसिरूद्दीन खरच अवतरेल काय?

रामदेवबाबाच्या रुपात अवतरलेल्याचे काय झाले पहिलेत ना? जनतेने कुचकामी या षंढ सरकारला वचक बसवल्याशिवाय काहीच अर्थ नाहि!

आता आपण जिवंत आहोत हेच खूप असे कोडगे अणि निर्लज्ज जगायची सवय झालीय. संसदेवर हल्ला झाला तेंव्हा वाजपेयी तोतरले होते.... पॉझ घेत,"अभी आरपार की लडाई होगी", हिंदूहृदयसम्राट कडाडले होते,"त्या दाउदला १०० दिवसात पकडून आणू" विलासीराव बेशरमपणे थुंकले होते," दिलाय ना राजीनामा; झाले समाधान?" साले हे मरत नाहीत जोपर्यंत यांच्या ** खाली बाँब फुटून, तोवर यांना काही फरक पडणार नाही. आणि आपली सुरक्षाव्यवस्था कशी आहे मोठ्या शहरांमधली हो? रोज बाँब फोडणे शक्य आहे भडव्यांना. स्टेशन, बसस्थानके, अगदी एअरपोर्टचा बाहेरचा भाग, मंदीरे, धरणे येथे कोठे आहे दक्ष सुरक्षा यंत्रणा? कोणीही यावे, बाँब ठेवूनी जावे! जय आबा आणि पोलीस.
जाउ दे, मेले ते मेले, जगले तेही मरतीलच पुढल्या वेळी. आपण जिवंत आहोत ना? भाड मे जाये! चलो बोतल निकालो. (पण या भूमीवर मोठे मोठे संत, अवतार उदा; नरेंद्रमुनी, अनिरूद्धबापू, बाबा, दादा, अम्मा, भैय्यूशेठ, स्वामीसमर्थ, साईबाबा, शंकराचार्य, विठूमाउली, असतांना येथे स्फोट होऊन निरपराध माणसे मरतातच कशी? आँ? आत्ता कळले! जे मेले ते एकतर वारीला गेले नव्हते किंवा या किलोभर सोने घेऊन इन्-बिल्ट एसी महाराजांच्या दर्शनाला. पापी कुठले! म्हणून ते मेले हो. बघा बुवा..बिल्ला लावा लवकर! निदान बुक्का तरी )

तीव्र निषेध....चिडून काहीतरी लिहावं, तर संतापायला पण होत नाहीये, असं कितीतरी वेळा पूर्वी हे घडलं आहे. त्यांनी मारायचं आपण मरायचं आणि एरवी मन मोहत जाईपर्यंत 'अमूल बेबी' ला कुरवाळायचं...

इतका संताप दाटला की, आता तो व्यक्त ही करावासा वाटत नाही.
मृतात्म्यांना शांती मिळो, मुंबैकरांना देव सहनशीलता देवो.

आज सहज बॉम्ब स्फोटांचा मागोवा घेतला. पुणे स्फोटाच्या धाग्यावर गेलो तेंव्हा सहजच मी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहिली.

टिल्लू | 14 February, 2010 - 00:53
प्रत्येक महिन्याच्या १३ व २६ तारखेला थोड जास्तच सतर्क राहायला हवे .

महेश | 14 February, 2010 - 01:14
टिल्लू, १३ आणि २६ च का ?
२६/११ कळाल , पण १३ का ? ११ का नाही ? ९/११ ?

टिल्लू, १३ आणि २६ च का ? >> तस तर प्रत्येक दिवशी काळजी घ्यावी लागेल.
तरी पॅटर्न पाहीला तर १० - १३ व २२ - २६ तारखेस जास्त ब्लास्ट झालेत. अस माझ एक मत.
23 November 2007 Uttar Pradesh serial blasts
13 May 2008 Jaipur bombings
25 July 2008 Bangalore serial blasts
26 July 2008 Ahmedabad serial blasts
13 September 2008 Delhi serial blasts
२६/११ मूंबई
आता(पुणे) १३ फेब २०१०.

आत्ताच काही फोटो पाहिलेत महाराष्ट्र टाईम्स वर

http://maharashtratimes.indiatimes.com/photoshow/9214731.cms

हरामखोर साले, ह्यांच्या कुटूंबियांसोबत एकत्र बॉम्बने ऊडवायला पाहिजे ह्या सर्व अतिरेक्यांना.
ह्यांना जर सामान्य माणसांच्या जिवाचे मोल नसेल तर ह्यांच्यासोबत ही असेच करायला पाहिजे.

साले राजकारणी मरत नाहीत, फक्त मुंबईकरांच्या स्पिरीट बद्दल (जबरदस्ती लादलेल्या), जयजयकार करतांना दिसतात

मृतात्म्यांना शांती मिळो,

मुंबैकरांना देव सहनशीलता न देवो.... अनुमोदन

परत एकदा स्फोट ! आता परत मंत्र्यांची भाषणे, आश्वासने, मृतांना ५ लाख, जखमींना १ लाख (खरेच मिळतात की नाही ते पण ठाऊक नाही), मुंबईकर शेकडो-लाखो मेणबत्त्या लावणार, लोकं सोशल नेटवर्क वरती आणि साईट वरती बातम्यांच्या खाली जळजळीत प्रतिक्रिया लिहिणार, दुस-या दिवशी मुंबई परत आहे तशी रुटीन चालू करणार, त्याला सगळे "मुंबई स्पिरीट" नावानी गौरवणार.. परत सहा महिन्यांनी अजून २-३ स्फोट ...परत मंत्री, ५ लाख-१ लाख, मेणबत्त्या, कॉमेंट्स, मुंबई-स्पिरीट.... आम्ही परत एकदा आमच्या रुटीन मध्ये ...छान ..म्हणजे आता आपल्या सगळ्यांना याची सवय झालीये नाही का? .. अतिरेकी लोकांनो, तुमच्या या स्फोटांची आता सवय झाल्यावर एक प्रोब्लेम झाला आहे .. एकदा असे स्फोट वगैरे दर सहा महिन्यांनी सुरु ठेवा नाहीतर आम्हा भारतीयांना ते झाल्यावर हे जे काही करायचे त्याची सवय चालू पाहिजे नाहीतर कळतच नाही की कशी प्रतिक्रिया द्यायची.. मागच्या हॉटेल ताज च्या वेळेस लोकं जेवून खाऊन "टाईम पास" सारखे पान खात खात ताज हॉटेल च्या बाहेर "मजा" बघायला मुलांना कडेवर घेउन वगैरे आले होते..ते तरी काय करणार म्हणा ? शूटिंग म्हटलं की गर्दी करायची एवढेच त्यांना ठाऊक.......

मी तरी हे लिहून काय फारसे ग्रेट करणार आहे म्हणा ? हे सगळे वाळूत मुतल्या सारखेच आहे, ना ते दिसणार ना त्यावर काही उगवणार. लिहिल्यावर मनातली जळजळ तरी निवल्या सारखी वाटेल आणि उद्या परत काही झालेच नाही असे रुटीन सुरु करताना थोडे कमी अपराधी वाटेल एवढेच......

प्रशांत, अगदी मनातले लिहिलेत... मुंबईकर नसूनही तुमच्या अतीव त्रासाची, त्राग्याची भावना मनात खोलवर पोहोचली. Sad

जर तेरा तारखेला या आधी पण हल्ला झाला होता, मग या वेळी आपण बेसावाध का?

पोलिस पब मधे काय धाडी टाकात होते गेले चार दिवस, का मुद्दाम लक्श दुसरिकडे वेधतात.

मुंबईत स्फोट झाला की असं वाटतं की माझ्या घरातच स्फोट झाला आहे!!
मृतात्म्यांना शांती मिळो,

मुंबैकरांना देव सहनशीलता न देवो.... अनुमोदन
खरच आता पुरे झालं!!!!!!!!!!!!!

परत सहा महिन्यांनी अजून २-३ स्फोट ...परत मंत्री, ५ लाख-१ लाख, मेणबत्त्या, कॉमेंट्स, मुंबई-स्पिरीट.... आम्ही परत एकदा आमच्या रुटीन मध्ये ...छान ..म्हणजे आता आपल्या सगळ्यांना याची सवय झालीये नाही का?>>>१००% अनुमोदन!

खरोखर आता लष्कराच्या हातात सत्ता द्यायची वेळ आलीये. काँग्रेस असो वा भाजपा कोणीही सत्तेत आलं तरी काही फरक पडत नाही आणि या पुढेही पडणार नाही. एकदा मिलिटरी राज यावं आणि देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या शत्रूंचा एकदाच आणि कायमचा सोक्षमोक्ष लावला जावा..

मुंबई बाँबस्फोटात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बळी पडलेल्यांना मनापासून श्रद्धांजली !

निष्पापांच्या रक्ताला चटावलेल्यांना फक्त बंदुकीचीच भाषा समजते हे आपण अजून का शिकलेलो नाही, हे समजत नाही. >>>>>>>>

आपण शिकलो आहोत, पण करणार काय ?
आपल्या हातात काही नाही. लोकशाही फक्त नावापुरती आहे.
हे जे काही घडत आहे यामध्ये नेत्याचा हात असणार आहे अस नाही वाटत ?

यामध्ये सामान्य जनताच का बळी जाते ?
ही मोठी लोक का जात नाहीत ?

आजपर्यतचा इतिहास पहा. कुणाचा बळी गेला आहे कळेल.

हरामखोर साले, ह्यांच्या कुटूंबियांसोबत एकत्र बॉम्बने ऊडवायला पाहिजे ह्या सर्व अतिरेक्यांना.
ह्यांना जर सामान्य माणसांच्या जिवाचे मोल नसेल तर ह्यांच्यासोबत ही असेच करायला पाहिजे.>> अनुमोदन.

अजमल कसाबला दादरला, अफजल गुरुला झव्हेरी बाझारला व उरलेल्या अनेकांना चौकात फाशी द्या. खड्ड्यात गेली न्यायव्यवस्था. त्यांच्यासोबत संरक्षणाची जबाबदारी असुनही ढिलाई करणार्‍यांनाही चढवा. अशी जरब बसली पाहीजे की परत विचार करायलाच १० वर्षे जातील.

भयंकर संताप, राग, चीड. Sad

मुंबईकरांनो २-३ दिवस बंद पाडा मुंबई, त्यांना जरी तेच हवे असले तरी होऊदे देशाचे नुकसान. सरकारला एकदा जनमताचा हिसका दाखवायलाच पाहीजे. कारण रोजीरोटीकरता तुम्ही परत उभे राहीलात तर तुमच्या स्पिरीटचे गोडवे गात अशाच नविन स्पॉटमधे बाँबरुपी स्पिरीट लागलेले असेल.

दुर्दैवाने भारत या देशाचे लोकेशन असे आहे की आपल्याला युद्ध सुरू होऊ शकेल असे कृत्य सहजगत्या परवडणारे नाही. अमेरिकेने जसे ओसामाला पाकिस्तानातच खलास केले तसे आपण करू शकत नाही याची कारणे:

१. पाकिस्तान आपल्या सरहद्दीला लागून असल्याने भडका उडाला तर आपलाही काही भाग होरपळू शकेल.

२. संपूर्ण मुस्लिम जगत पाकिस्तानला लागून असल्याने ते आपल्या विरुद्ध जाईल व त्यात आपल्याला कोणाची साथ मिळेल की नाही ते सांगता येणार नाही.

तसेच वर चीन आहे, जो आपल्याला पुरून उरेलच! त्यामुळे तीही बॉर्डर धोक्यात आलेली आहेच.

अमेरिका या कार्यात आपली कितपत साथ देईल (किंवा देणार नाही) ते सांगता येणार नाही. रशियाने दिली असती पण ते संपलेले आहेत.

त्यामुळे सध्या तरी आपण एकटे आहोत असे मानायला हवे बहुधा!

अशात आपण आपल्या न्यायप्रक्रियेप्रमाणे (कितीही मेंगळट वाटली तरीही) न्यायदान करणे आवश्यक आहे. फक्त कसाबला मारले तर त्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण असे किती कसाब मारणार? मुळात दहशतवादाला जशास तसे उत्तर देण्यातून जे युद्ध स्वरुपाचे प्रश्न उभे राहू शकतील ते आर्थिकदृष्ट्याही सोसण्यासारखे आहेत की नाही हा प्रश्नच आहे.

थोडक्यात, आपण देशाची भरभराट होत राहावी या हेतूने मेंगळटपणा करत आहोत. काही देश असेही असावेत की ज्यांना सुबत्तेपेक्षाही स्वायत्तता व सुरक्षितता अधिक महत्वाची वाटते. हा मातीचा गुण असावा.

आपली माती मेंगळट आहे हे पुर्वीही सिद्ध झालेले आहे. ब्रिटिशांनी केलेले राज्य, चीनसमोर पत्कर्लेली हार वगैरे!

आपल्यात क्रांतीकारक निर्माण झालेच तर ते स्थानिक पातळीवर होतात. देश इतका अवाढव्य आहे की ज्योत पेटली तरी फोफावत नाही.

हे सगळे जेव्हा अती होईल तेव्हा लोक रस्त्यावर उतरतील. मात्र ते होण्यास अजून चिक्कार काळ जावा लागेल असेही वाटते.

महात्मा गांधींच्या विचाराने या जगात राहता येणे अशक्य असावे. आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापासूनच्या इतिहासाच्या प्रत्येक पानाला गांधीझमने व्यापलेले आहे.

डॉ. सर मुहम्मद इक्बाल यांचा मिसरा खरा असावा.

मुस्लिम है हम, वतन है, सारा जहां हमारा

काश्मीर दिले तरी हे होतच राहणार!

आता काल स्फोट झाल्यावर 'हाय अ‍ॅलर्ट' घोषित केले. याचाच अर्थ आपल्याकडे असा मेकॅनिझम नाही की नेहमीच हाय अ‍ॅलर्ट राहील. कारण स्टाफ कमी पडतो. स्वप्नात वावरणारे नेते आहेत. २६/११ ला तर कुणी तिथे गेलेही नाही. अर्थात, सुरक्षिततेच्या कारणास्तव जाऊ दिले नाही हेही खरेच! पण लाजलज्जा म्हणून तरी स्वतःची सुरक्षितता गाढवाच्या **त घालून नेत्यांनी ताजपाशी जाऊन उभे राहायला हवे होते. कोणीही गेले नाही, बहुधा फक्त मुंडे गेलेले होते.

वुई आर हेडिंग नो व्हेअर. अनलेस अ कॉमन मॅन डील्स विथ ऑल धिस.... हिमसेल्फ!

कांपो,
पण ज्यांची हातावर पोटं आहेत त्यांना २-३ दिवस काम न करता राहून कसं चालेल? Sad त्यांचीच जास्ती किव येते.
भारत सरकारचं गुळमुळित धोरण अख्ख्या देशाला बुडवणार एक दिवस. Sad

खुपच वाईट झाल॑. या बॉम्बस्फोटा॑च्या मालिका था॑बणार कधी..............

मायबाप अतिरेक्यांना ( मग ते कुठल्याही गटाचे असोत) एक विनंती. या देशातल्या १०० निष्पाप नागरींकांना मारण्यापेक्षा एखादा वजनदार नेताच उडवुन द्या. कुठल्याही पक्षाचा असला तरी चालेल. फारतर पक्षपात नको म्हणुन आळीपाळीने सगळ्यांचा एक एक उडवा. सामान्य माणसाची सरकारी "किंमत" फार तर ५ लाख असते, पण एक नेता म्हणजे कमीत कमी ५० कोटींचा मामला. त्यामुळे चिल्लर खुर्दा उडवण्यापेक्षा कुछ किंमती सामान उडावो, मजा आ जायेगा!

बाकी शब्दांचे बुडबुडे ईथे ऊडत राहतीलच!

सडेतोड, संसदेत आले होते की ते! ५७२ खासदार होते तिथे!

पण मोठी माणसे वाचतात, दादर बिदरची सामान्य माणसे मरणारच, ती जगून काय दिवे लावणार आहेत???????

हे सगळे जेव्हा अती होईल तेव्हा लोक रस्त्यावर उतरतील. मात्र ते होण्यास अजून चिक्कार काळ जावा लागेल असेही वाटते. <<<<<<< बरोबर .

मला हा विचार येतो कि, या अतिरेक्याना मंत्र्याची घरे माहित नाहीत का ?

करा ना त्यांच्या घरी स्फोट, उडवा सगळ्यांना.

का सारे हरमखोर सामिल आहेत ?

पुन्हा एकदा मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन २१ जणांचा बळी गेला.१५ दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी तशी पूर्वसूचना दिली होती.आता "माहिती मिळूनही सुरक्षा यंत्रणा पुनः एकदा निष्पापांच्या हत्या रोखण्यात अपयशी ठरली आहे.हे वारंवार होणारे बॉम्बस्फोट आमची सुरक्षा व्यवस्था किती कुचकामी आहे,आणि भारतावर हल्ला करणे किती सोपे आहे,तेच साऱ्या जगाला दाखवून देत आहेत".असे आरोप आमच्यावर होतच असतात त्यात काय विशेष? निषेध व्यक्त करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?बदला घेण्यासाठी आम्ही काही अमेरिका वगैरे थोडेच आहोत !
आम्ही गांधीजींच्या अहिंसेआड लपून स्वत:च्या चुकांचे समर्थन करतो.आता आहे ती आमची जुनी सवय-."अरे त्या महात्म्याला का उगाच ढाल बनवता"? असेही प्रश्न आम्हाला लोक विचारत असतात.पण काय करणार,त्याचे या देशावर असोत,नसोत;आमच्यावर मात्र कायमचे उपकार आहेत.कारण 'तुम्ही कृती का करत नाही?' असा प्रश्न आला की आम्हाला अश्या महापुरुषांचा खूप उपयोग होतो."त्याचा जगण्याचा साचाच वेगळा होता.तो वेगळ्याच मुशीत बनलेला होता.तो मूर्तिमंत सत्य होता,त्याग होता,अहिंसा होता!!!ते फक्त तोच करू जाणे; ते तुम्हाला आम्हाला कैक पिढ्या जमणार नाही"-असेही कुणी म्हणतात.म्हणोत बिचारे;आता हे का आम्हाला कळत नाही?.त्यामुळे आम्हाला काय फरक पडतो?आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांची सोय लावण्यात मग्न आहोत.त्यामुळे आमचे सामान्य नागरिक जगले/मेले,त्याच्याने आम्हाला काय फरक पडतो? आम्ही आमच्या जगात सुखी आहोत.आमचा थाट बघुनच तुम्ही दंग व्हा!लाल दिव्याच्या गाड्या,पंचतारांकित सुविधा,सिक्युरिटी वगैरे.
लोकांना मुर्ख बनविण्यात आमचा कोण हात धरू शकेल? अशी काही घटना घडण्याची अधुनमधून शक्यता असतेच.त्यामुळे अधुनमधून आम्ही 'हाय अलर्ट' घोषित करत असतोच. 'हाय अलर्ट' किती विनोदी शब्द आहेत! पण हं,उद्या कुणी म्हणायला नको,उगाच आमचं पद धोक्यात का म्हणून घालायचं?देश धोक्यात आला तर ते चालतं! असो.
.... तर पुन्हा एकदा मुंबईवर नव्हे तर भारतावर अतिरेकी हल्ला झालेला आहे.आमच्या संवेदना आम्ही त्याप्रती जाहिर करतो.तपास चालू आहे.घटनास्थळी आमची पथके पाहणी करत आहेत.अमुकतमुक संघटनेचा यात हात असल्याचा संशय आहे.आम्ही अतिरेक्यांना लवकरच पकडण्यात यशस्वी होऊ याबद्दल खात्री बाळगा.अफवांवर विश्वास ठेवू नका.गरज असल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका.आणि आमच्या सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करा.धन्यवाद.

Pages