विस्तव आणि वास्तव !

Submitted by sahebrao ingole on 13 July, 2011 - 03:40

विषाची संपूर्ण बाटली पिवून हि मेलो नाही म्हणून तरुणानेच केली तक्रार! आज देश्याला भ्रष्टाचार, फसवेगिरी, भेसळ, लाच-खोरी , चोरी, दरोडा, अंधश्रद्धा अश्या अनेक रोगांनी ग्रासले आहे. नैराश्य भावनेने पेटलेल्या तरुणाने जगण्यात काही मजा नाही म्हणून एका दुकानाहून विषाची बाटली विकत घेतली...पण हे औषध पिवून त्याला साधी गुंगी हि आली नाही...केवळ जगणेच मुश्कील नाही तर मरणे देखील अवघड झाले आहे हे त्याला समजले. मग विशौषाधी निर्माता, वितरक, यांच्या नावावर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा का दाखल करू नये...?..पण गुन्हा दाखल करून काही उपयोग आहे का..? हा गुन्हाच कुणी करू नये म्हणून काही उपाय योजना का असू नये.. मग अश्या बातम्या पेपरला आल्या तर चवीने वाचतो....आमच्या अवती भोवती काय चालले आहे याची आम्हाला तसूभर हि खबर नसते...मग मिडिया ला दोष देतो..दोन चार रिकाम टेकड्या पोरांना घेवून रस्त्यावर उतरतो...सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो... यात जी भरडली जाते ती भोळी भाबडी जनता...ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे अतोनात हाल होतात... राजकारणीच काय किंवा धर्माचे ठेकेदार काय... मग ते कोणी हि का असेनात...डोळ्यात दोन खोटेपणाचे अश्रू , तोंडात दोन सांत्वनाचे फसवे शब्द, हातात अनैतिक मार्गाने कमविलेल्या पैश्यातून दोन पाकळ्या..क्षणिक दिलासा....पण हे किती दिवस चालणार माहित नाही...कोण करत माहित नाही..का करत माहित नाही...कश्यासाठी करत..हे मात्र ठरलेले... काळ्या पैश्याला पांढरी चकाकणारी किनार देण्या साठी..आपली पापं लपविण्यासाठी...
जो उठतो तो जनतेच्या जीवावर ! या महा ठक्कानी हवा आणि पाणी देखील सोडले नाही...दुषित पाणी आरोग्यास घातक आहे म्हणून आज आपण पाण्याची बाटली घेवून फिरतो उद्या खांद्यावर शुद्ध हवेचा सिलेंडर घेवून फिरण्याची वेळ हि येवू शकते. आज जिकडे तिकडे उपास-तापास, नवस आणि जागरण गोंधळ चालू आहे. एकंदरीत हा अनिष्ट रूढी आणि परंपरा यांचाच गोंधळ आहे.. जो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहे. पण देव आहे किवा नाही याचा थांग पत्ता लागत नसल्या मुळे नवनवीन गुरु उदयास येत आहेत.
शांती, सुख,समाधान, मोक्ष, ईश्वर प्राप्ती, जन्म मरणाच्या चक्रातून सुटका अश्या प्रकारचे गोड स्वप्न दाखविले जातात. इथे लाचार आणि दुबळ्यांची कमी नाही...दोन चार हाता खाली धरून शिष्य बनवायचे...आपण स्वामी, बापू, महाराज बनायचे..
.भक्तीचा व्यापार करायचा..पुस्तके सी डी, विकायच्या...चूर्ण औषधे विकायची...हा धंदा नव्हे तर काय आहे...आम्ही फक्त यांनाच जबाबदार समजतो, स्वताची बुद्धी गहाण ठेवतो..विचार चक्राला खुंटीला टांगून ठेवतो...अमक्याने फसविले म्हणून रडत राहतो सरकार कुचकामी आहे म्हणून ओरडतो...पण काय उपयोग पुन्हा त्यांनाच निवडून देतो... कुणी बाबांच्या वा-या करतात,
वेगवेगळ्या तीर्थाचे दर्शन घेतात . उपासाच्या नावाखाली पोट फाटेस्तोवर खातात .जागृत मानल्या जाणा-या देवाला मोठमोठे नवस बोलतात आणि फेडतात..आपल्या खाण्याच्या सोई साठी देव हि वेगवेगळे केलेत...काहीना कोंबडे बकरे चालते तर काही शुद्ध शाकाहारी आहेत. आवडीच्या गोष्टी सोडणे, मंदिरांना दान देणे, हे मोठेपणाचं मानल जातं. धार्मिकता हे एक ढोंग आहे... बहुजनांचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले संत तुकाराम, संत कबीर यांनी या अश्या भोन्दुन्चा समाचार घेतला आहे. अडीच हजार वर्ष्यापूर्वी महाकारुनिक तथागत सिद्धार्थ गौतमाने अनीश्वर वादी सिद्धांत मांडला...तो आज हि
जसा च्या तसा खरा आहे...तुम्ही आता जे काही आहात ते तुम्ही काही क्षणा पूर्वी केलेल्या कर्मा मुळे...यात तुमच्या पूर्व जन्माचा , नशिबाचा , देवाचा कोप वगैरे काही नाही....आम्हाला अभिमान वाटावा कि आम्ही या पवित्र बुद्ध भूमीत जन्मास आलो आहोत.
मानवी जीवनाच्या दुखाच कारण म्हणजे त्याच्या अतृप्त इच्छा.जेवढ्या इच्छा कमी माणूस तेवढा जास्त सुखी.. .. पण आज यावर विचार करण्यास कुणाला वेळ कुठे आहे... या सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवे, काहीतरी मिळावे म्हणून देवाला लोणी लावतात.... असेच भिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतो. गाडी,बंगला, चांगली नोकरी..सुंदर बायको... पगारदार नवरा... ही यादी संपत नाही. मात्र भीक मागण्यात आयुष्य संपून जाते. आपले कुटुंब, शेजारी, सहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक यांच्या मनाचा, विचारांचा, गरजांचा विचार करायला वेळच उरत नाही. दगडासमोर डोकं टेकवून टेकवून जिवंत जीवांना विसरून जातो. अशाने देव खूश होईल काय..? दुसऱ्यांची मने दुखवणा-यांवर देव खूष होईल तरी कसा! मुलांना देण्यास दोन मिनिटं नसणारे लालबागच्या राजासमोर सात-सात तास रांगा लावतात. याला भक्ती म्हणावे काय..? स्वामी विवेकानंदांनी म्हटले तेचे खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात-
" जे का रंजले गांजले , त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधू ओळखावा , देव तेथेची जाणावा | ". आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने जाणा.. सर्वांशी प्रेमाने वागा, जिओ और जिने दो..जगावर थोडा विश्वास ठेवा. माणूस सोडून कुत-या मांजराना पूजता......हि कसली पूजा?. चार वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतात. दोन दु:खद प्रसंग घडले की, नशीब खोटे वाटू लागते. नजर जाईल तिथे खोटेपणा, लबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होते. मनात कपट, द्वेष, शंका आणि लबाडी ठेवून कोणत्याही देवळात गेलात, कितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी पदरी निराशाच येणार. देवाकडे भ्रष्टाचार हा प्रकार चालत नाही. तिथे लाच देऊन चांगले आयुष्य घेता येत नाही. तिथे चालते फक्त मनुष्यप्रेमाचे नाणे.

कित्येक जन मूल होण्यासाठी साधू, बैरागी यांच्याकडून अघोरी उपचार करून घेतात. तसंच होणारं मूल हा मुलगा असावा म्हणून सुनेचा अतोनात छळ केला जातो..त्या बिचारी च्या हातात आहे तरी काय...ती तर तुमच्या वासनेची बळी गेलेली बिना शेपटीची बकरी! अमुक काही मंत्राने , पूजेने, विधीने किंवा गंडे दोरे घातल्याने, एखाद्याचे तोंड पाहिल्याने मुलगा होतो ही पूर्णपणे भोंदू समजूत आहे. पोटात वाढणारा गर्भ मुलगा की मुलगी हे, स्त्री पुरुष बीज एकत्र येत असतानाच ठरत असतं आणि आत्ताच्या शास्त्राप्रमाणं हे लिंग कोणीही आणि कोणत्याही उपायानं बदलू शकत नाही. त्याच प्रमाणे . मुल होणं न होणं हे स्त्री आणि तिचा जोडीदार पुरुष यांच्यावर अवलंबून असते...जर त्यांच्यात काही उपजत दोष असतील तर किती हि मंत्र पुटपुटले, याग यज्ञ केले, अभिषेक केले, कथा -पुराण वाचले, उदेपण केले किंवा सत्यनारायण पूजा केली तरी व्यर्थच होय. निपुत्रिकेला पुत्रवती होण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचारच उपयोगी पडतील. कारण व्याधीचा संबंध शरीराशी आणि दुःखाचा आपल्या मनाशी असतो. मन स्थिर ठेवायचं....त्यावर संयमाच कॉन्क्रिट घालायचं....थोडासा जरी वारा आला तर गवताच्या झोपड्या भुर्कन उडून जातात...मोठ मोठी वादळ जे पेलतात तेच खऱ्या अर्थान जगत असतात....
संध्याकाळ झाली कि पक्षी घरट्या कडे निघतात....ज्यांना घरटे बनविता येत नाहीत ते झाडाच्या ढोलीत शिरतात... कधी जगतात तर कधी सापाचे भक्ष्य ठरतात...काही उडता उडता पंख मोडून पडतात...काही अंड्यातच मरतात...काही शोधत राहतात वडाच झाड.....आज गरज आहे ती वडाच्या झाडाची...कि जेणे करून ज्यांना कुणीच नाही...ज्यांचे काहीच नाही...निदान एका रात्रीचा निवारा तरी मिळेल... आणि म्हणून मूल होऊ शकलं नाही म्हणून दुख करत बसायचं नाही....तर काय करायचं ? मुख्य म्हणजे निराश व्हायचं नाही. आजारी माणसावर आपण उपचार करत असतो. खूप काळजी घेतो. पण दुर्दैवानं त्यातूनही तो दगावला तर आपण काय करू शकणार ? निसर्गान जेवढ आयुष दिलंय ते आनंदानं जगायचं..
.इतरांना आनंद देवून.. आपल्याला मूल होणार नाही अस जरी पक्क कळालं तरी निराश न होता, एका मुलाची आई होता येत नाही, तर आपल्या समाजातल्या अनेक अनाथ मुलांची आई तुम्ही होऊ शकालच की नाही ? स्त्री ही मातृहृदयी असते. प्रेम माया तिनं लावली तर अनाथांची आई होणं अवघड नाही. आता गरज आहे समाजात नवीन सिंधुताई सपकाळ बनण्याची....

दिनांक : 13/07/2011
साहेबराव इंगोले
औरंगाबाद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"दुषित पाणी आरोग्यास घातक आहे म्हणून आज आपण पाण्याची बाटली घेवून फिरतो उद्या खांद्यावर शुद्ध हवेचा सिलेंडर घेवून फिरण्याची वेळ हि येवू शकते."
अनुमोदन अणि हि वेळ नजिकच्या भविष्यातच येइल...
आपल्या सन्स्क्रुतीत पाण्याला कधिही नाही म्हनत नसत.... आज याच देशात पाणी विकयचे कारखाने काढले आहेत. (अगदी मी लहाअन असताना सुद्धा शहरात पाण्पोइ अस्तित्वात होत्या.... आज सार्वजनिक थिकाणी पाणी प्ययचे तर बातलिच विकत घ्यवि लागते...)

आता सहजिकच हेच लोक हवेचे सिलेन्डर बाजारत आण्तिल... आणी मग मर्केतिन्ग च्या जोरवर पुढिल ५-१० वर्षात लोकन्च्या गळी उतरवले जातिल.. यात कहीही दुमत नाहि