खोल खोल आतवर तुझी नजर्[तरही]

Submitted by छाया देसाई on 8 July, 2011 - 06:42

खोल खोल आतवर तुझी नजर
ईश्वरा कृपे तुझ्या बहर बहर

श्वास श्वास गुंफुनी तुझ्या कृपे
नीर्जिवास ईश्वरा तुझा पदर

चेतना चराचरात गुंजते
घोषणा तुझी तुझी तुझा गजर

एकटा नसे इथे कुणी कुणी
तू सवे सवे सदा हजर हजर

राज्य हे तुझे तुझीच संपदा
लाभुदे धरोहरातली नजर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चेतना चराचरात गुंजते
घोषणा तुझी तुझी तुझा गजर....

वा .. सुंदर.

कमलेशजी,गझलच आहे की. कसीदा म्हणू शकता.

प्रत्येक शेर स्वतंत्र आहेच की.:)

सुंदरच गझल आहे. कमलेशजी उर्दूमधे पण इशस्तुतीसाठी गझलेचा वापर झालेला आहे. पूर्वासुरींनी जे केलं त्यापेक्षा वेगळं काही असेल तर छानच कि..