पूर्वग्रह
by डॉ.सुनील अहिरराव on Saturday, March 12, 2011 at 9:50am
एखाद्या व्यक्तीविषयी आपण एखादा समज वा गैरसमज करून 'घेतो' ,किंवा आपला तसा तो समज 'होतो' ;त्याला पूर्वग्रह म्हणतात.पूर्वग्रह होणे हे व्यक्ती,परिस्थिती ,आणि कालसापेक्ष असते.एखाद्या व्यक्तीविषयी झालेला पूर्वग्रह दूर होणे ही फारच 'दूरची' गोष्ट असते.
आकाशातील तमाम ग्रहांपेक्षा पूर्वग्रह अधिक भंडावतात.एखाद्या व्यक्तीबद्दल आपला पूर्वग्रह झालेला असेल आणि अशी व्यक्ती आपल्याशी आता कितीही चांगली वागत असेल तरी (आपण त्या व्यक्तीकडे पूर्वग्रहदुषित नजरेने बघत असल्याने ) त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकत नाही.आपण आपल्याही नकळत त्या व्यक्तीवर अन्याय करत असतो.फारच कमी प्रकारचे पूर्वग्रह या उभ्या आयुष्यात दूर होतात.कारण त्यांची महादशा बरीच वर्षे असते,एकवेळ 'साडेसाती' परवडते.
मुळात पूर्वग्रह घडतातच का? तर त्याला काही कारण असतेच ,असे नाही! घडतात ते. कधी अगदी योगायोगाने घडतात.त्याची शास्त्रशुध्द व्याख्या याप्रमाणे करता येईल-
" एखाद्या व्यक्तीकडून विशिष्ट परिस्थितीत कळत-नकळत झालेल्या वर्तनाचा दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर दीर्घ कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी जो ठसा उमटतो,आणि जो त्या पहिल्या व्यक्तीच्या नंतरच्या बऱ्या-वाईट वर्तणुकीने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अधिकच गडद होत जातो,आणि ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे पहिल्या व्यक्तीशी आचरण दीर्घ कालावधीसाठी वा कायमचे दुषित होते,त्यास पूर्वग्रह म्हणतात!"
मी देखील अभिप्राय दिला
मी देखील अभिप्राय दिला होता!!!

@ रेव्यु,मर्यादित ऐकण्यातून
@ रेव्यु,मर्यादित ऐकण्यातून अथवा एखाद्या निरिक्षणातून्--दोन अथवा तीन उदाहरणावर अवलंबून अथवा दुसरे कुठले पूर्वदूषीत वाचून किंवा चर्चा करून आपण आपले मत त्या व्यक्तिबद्दल अथवा समूहाबद्दल करून घेतो.
मी निष्कर्ष काढताना क्रमाने भाऊ नमसकर ते आपणापर्यंत सर्वांच्या प्रतिसादांचा आशय लक्षात घेऊनच निष्कर्ष काढलेले आहेत.त्यामुळे हे निष्कर्ष बरोबर असतील तर ते आपणा सर्वांच्या प्रतिसादाचे फळ आहे असे समजावे. मात्र बरोबर नसल्यास,त्यात काही त्रुटी असल्यास तो माझ्या अभिव्यक्तीचा दोष समजावा.
Pages