घरच्या घरीच शिक्षण - खरंच सर्वसमावेशक होईल का?

Submitted by शांतीसुधा on 2 July, 2011 - 15:36

दि. १२ जून २०१० च्या दैनिक लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये "घरीच शिक्षण किंवा होमस्कूलिंग" या संकल्पनेवर आधारित ‘घरात शाळा’ हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची ’पायवाट’ हा वंदना अत्रे यांचा आणि ’शिकतं घर’ हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहिती सांगणारा, असे तीनही लेख वाचनात आले. सर्व शिक्षण अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरुवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या लेखांच्या परीक्षणामध्ये करत आहे.

तशी होमस्कूलिंग ही संकल्पना आपल्याकडे नवीन नाही. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांना त्या काळातील शालेय शिक्षण खूपच तोकडे वाटत असल्याने आणि त्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करण्याऐवजी शिक्षक त्यांच्यावरच आगपाखड करत असल्याने दोघांनाही घरीच स्वतंत्रपणे शिकवण्यास शिक्षक येत असत. अमेरिकेत ही संकल्पना राबविणारे पालक सुद्धा एकेक विषय शिकवायला स्वतंत्र शिक्षक ठेवतात. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या नियतकालिकात असे ’होमस्कूलिंगसाठी शिक्षक पाहिजेत’ अशा भरपूर जाहिराती असतात. मला आठवतंय एका जाहिरातीत तर चक्क नमूद केलेलं होतं की “रोज जेवण करताना आमची मुलांबरोबर विविध विषयांवर चर्चा होते. तर इच्छुक उमेदवाराने आमच्याच बरोबर कुटुंबात राहावे आणि मुलांबरोबर त्या चर्चांमध्ये सहभाग घ्यावा.”

माझा पहिला प्रश्न याच गोष्टीशी संबंधित आहे. वर उल्लेखलेल्या लेखांमधील उदाहरणांत आणि मी दिलेल्या उदाहरणांत घरीच शिक्षण या व्यतिरिक्त अजून एक साम्य आहे. ते म्हणजे त्यांची घरची पार्श्वभूमी. या सर्व उदाहरणांतील पालक धनिक आणि अत्यंत सुशिक्षित किंबहुना उच्चशिक्षित आहेत. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांचे पालकांनी त्यांना स्वत: भले शिकवलं नाही पण स्वतंत्र शिक्षक ठेवले. सखी बोरकर, सहल कौशिक, प्रल्हाद यांच्याबाबतीत त्यांचे पालक त्यांना शिकवत होते. वेळप्रसंगी स्वतंत्र शिक्षकही नेमले. काहीं आई नाहीतर वडील यांनी स्वत:चा व्यवसाय, करिअर बाजूला ठेवून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूपच वेळ दिला आहे. माझ्या परिचयातील पुण्यामधील जालनापूरकर नामक कुटुंबीयांनीसुद्धा आपल्या मुलांना असेच होमस्कूलिंग दिले आहे. या सर्व पालकांनी आपल्या ज्ञानाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्याचा, आणि संदर्भांचा उपयोग केला आहे असे दिसते. मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होवू नये यासाठी विशेष काळजी घेऊन त्यांच्याच आपल्याच घरात विविध उपक्रम राबवून, इतर मुलांना आपल्याच घरी बोलावून, मुलांचे समवयस्क मुलांमध्ये मिसळणे सुकर करणे, त्यांना विविध छंदवर्ग, खेळ यांसाठी पाठवणे अशाही पूरक गोष्टी केलेल्या दिसतात. हे सगळं शक्य झालं ते केवळ पालकांकडे असलेला पैसा आणि पालकांचे उच्चशिक्षित असणे या वस्तुस्थितीमुळे. याला अपवाद डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचा. चतुरंग मध्येच त्यांच्या मुलाने, अमृत अभय बंग याने, त्यांच्याविषयी लिहिलेला लेख वाचनात आला. अमृतला सुध्दा होमस्कूलिंगच मिळालं. त्याच्यासाठी पण त्यांनी भरपूर कष्ट घेतले. त्याचे पालकही उच्चशिक्षित पण तरीही त्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वास्तव्य करून तेथील आदिवासींसाठी काम करून आपल्या मुलांमध्येसुध्दा समाजाचे ऋण फेडण्याची प्रेरणा निर्माण केली. पण जिथे ह्या गोष्टी नाहीत; म्हणजे पालक धनिक नाहीत, सुशिक्षित नाहीत किंवा अल्पशिक्षित आहेत; तिथे हे घरीच शिक्षण शक्य आहे का? या संकल्पनेचा मुलांवर शैक्षणिक दृष्ट्या जरी सकृद्दर्शनी चांगला परिणाम दिसत असला तरी इतर दूरगामी परिणामांचं काय? या मुलांना अगदी समवयस्क मुलांना घरी आणून सोशलाइज करण्याचा प्रयत्न केला तरी त्या मुलांमध्ये “मी कोणीतरी विशेष” ही भावना कशावरून वाढीस लागलेली नसेल? सध्याच्या परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धतीमध्ये मुलं शाळेत जातात ती ते फक्त परीक्षांमध्ये गुण मिळवण्यास असाच काहीसा अर्थ निर्माण झाला आहे. तसेच एकूणच शिक्षणाचा, शाळांचा दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारतात स्थायिक होणार्‍या किंवा उच्चशिक्षित पालकांनाच काय पण सामान्य पालकांना सुद्धा मुलांच्या भवितव्याची चिंता असणं साहजिक आहे. पण होम स्कूलिंग हा पर्याय किती व्यवहार्य आहे याचाही विचार व्हायला हवा असं मला वाटतं.

आपल्याकडे ज्या पद्धतीच्या शाळा मिशनरी लोकांनी सुरू केल्या त्या पाश्चात्य शिक्षणपद्धतीवर आधारित होत्या. अमेरिका-युरोप मध्ये जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली तसतसे त्यांचे शैक्षणिक धोरणही बदलत गेले. जशा आपल्याकडे सुधारणा होत गेल्या तशा अमेरिकन शैक्षणिक पद्धतीतील बदलाचे वारे काही वर्षांचे अंतर ठेवून आपल्याकडेही वाहू लागले. आता पूर्वीच्या तुलनेत जागतिकीकरणामुळे अमेरिकेत जाऊन राहणार्‍या भारतीयांचे प्रमाण तसेच अमेरिकेत काही वर्षं काढून भारतात स्थायिक होणार्‍याचं प्रमाण वाढत असल्याने आपल्याकडील काही सामाजिक स्तरांमध्ये हे बदलाचे वारे लगेचच येतात. अमेरिकेत सर्वांना समान शिक्षण देणे या संकल्पनेवर आधारिरीत पण औद्योगिक जगताशी जोडली गेलेली गोष्ट म्हणजे विविध वयोगटांप्रमाणे वर्गांची विभागणी आणि घाऊक पद्धतीने सगळ्यांना शिक्षण देणे. त्यात प्रत्येक मूल स्वतंत्र क्षमतेचं असतं ही संकल्पना लक्षातच घेतली नव्हती. ही संकल्पना आता खूपच जोर धरीत आहे. तसेच काही ठिकाणी ही विभागणी गुणांवर आधारित करण्यात आली. जसजसे या सगळ्यांचे तोटे लक्षात यायला लागले तसतसे अमेरिकन शिक्षणपद्धतीमध्ये आणि पर्यायाने सगळ्याच फर्स्ट वर्ल्ड देशांतील शिक्षण पद्धतींमध्ये बदल होत गेले. त्यात तंत्रज्ञानातील प्रगतीने अधिकच भर टाकली. पाश्चात्य देशांत काही शाळांमध्ये तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप (उर्ध्वपट) वापरायला दिला जातो. कित्येक ठिकाणी दूरस्थ शिक्षणपद्धतीचे वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत. त्यातच मग एम आय टी सारख्या नामवंत विद्यापीठांनी आपल्या शिक्षकांना/प्राध्यापकांना ते वापरत असलेले किंवा त्यांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य, मजकूर महाजालाच्या (इंटरनेटच्या) साहाय्याने जे विद्यार्थी प्रत्यक्ष तिथे प्रवेश घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी खुला केला. शालेय पातळीवर सुद्धा मग शैक्षणिक संसाधनांचे साठे (लर्निंग ऑबजेक्ट रिपॉझीटरीज) तयार करण्यात आले. अशा साठ्यांची माहिती असलेले सर्वच जण म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक असे सगळेच त्यांचा वापर करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी, त्याला शिकावं असं वाटेल तो वेळ प्रत्येकाचा वेगळा या अशा संकल्पना अस्तित्वात आल्या. अमेरिकेत सगळी अंतरं खूप लांब आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा शाळेत जाण्याचा खर्च आर्थिक आणि वेळ यादृष्टीने खूप. म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वतंत्र गरजेनुसार शिक्षण द्यायचं असेल तर एका व्यक्तीसाठी एक शिक्षक शाळेत येणं हे सुद्धा परवडणारे नाही. ढासळलेली कुटुंबव्यवस्था. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अमेरिकेत डी-स्कूलिंग म्हणजेच शाळेत न पाठवण्याची संकल्पना अस्तित्वात आली. यातूनच होमस्कूलिंग ही संकल्पना जन्माला आली आहे. एका विशिष्ट वयापर्यंत सगळ्याच मुलांना शाळेत शिकणं बंधनकारक असल्याने जे खूप श्रीमंत नाहीत अशांची मुलं सरकारी शाळांमध्ये जातात. होमस्कूलिंग ही संकल्पना तिथे सुद्धा धनिक आणि उच्चशिक्षित पालकांमध्ये अधिक प्रचलित आहे.

शाळेत मुलांनी एकत्रं शिकणे हे त्यांच्या निकोप वाढीसाठी अत्यावश्यक मानलं गेलं आहे. मुलं ही समवयस्क मुलांकडून खूप काही शिकत असतात. पूर्वीच्या काळी घरांमध्ये एकत्र कुटुंबपद्धतीमुळे अनेक भावंडं असायची त्यामुळे जरी घरी शिक्षक शिकवायला आले तरी मुलांना मिळून-मिसळून राहण्याचं शिक्षण मिळत असे. अगदी पूर्वी आपल्याकडच्या गुरुकुल पद्धतीमध्ये सुद्धा या सगळ्याचा सखोल विचार झालेला आढळतो. त्यामध्ये अगदी राजपुत्रांपासून ते गरीब ब्राह्मणांची मुलं गुरूगृही राहून एकत्रितपणे शिक्षण घेत असत. गुरुजी प्रत्येक शिष्याच्या क्षमतेनुसार त्याला शिक्षण देत. त्यामुळे राजपुत्रांचे पायही जमिनीवर राहण्यास मदत होत असे. सर्वांना सर्व प्रकारची कामं करायला लागत असत. (उदा: श्रीकृष्ण, सुदामा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकले असल्याची कथा माहीती आहेच.) वयाने मोठे असलेले किंवा पुढच्या इयत्तेत असलेले विद्यार्थी आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना मदत करत असत. (अजुनही आपल्याकडच्या आय आय टी सारख्या तसेच अनेक जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ऑक्सफर्ड, केंब्रीज सारख्या विद्यापीठांतून हे प्रयोग चालू असतात.)

त्याच्या बरोबर उलट सध्याची परिस्थिती आहे. संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे तसेच लोकसंख्या विस्फोट, आर्थिक विवंचना या सगळ्या कारणांमुळे प्रत्येक घरात एक ते दोन मुलं असतात. पण हे सुद्धा मध्यमवर्गीय सुशिक्षित घरांतील चित्रं आहे. मग विद्यार्थ्यांना जर समवयस्कांकडून शिकायची, त्यांच्यात मिळून-मिसळून राहायची संधीच मिळाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर होतील असं नाही का वाटत? अशा पद्धतीने शिक्षण घेतल्याने ती मुलं स्वत:विषयीच्या तयार झालेल्या अवास्तव संकल्पना बाजूला ठेवून पुढे समाजात मिसळतील का इथपासून शंका येते. बरं, भारताच्या तुलनेने अमेरिका हा श्रीमंत देश आहे. तिथली पाश्चात्य संस्कृती ही मुळातच व्यक्तिकेंद्रित आहे. त्यामुळे तिथे अशा संकल्पनांनी जोर धरला तरी त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने तसा फरक पडत नाही; उलट ते पोषकच ठरते. पण भारतासारख्या पदोपदी विषमतेच्या दर्‍यांचं दर्शन होत असलेल्या कुटुंबकेंद्रित, समाजकेंद्रित संस्कृतीमध्ये अशा प्रकारे सामाजिक विषमतेमध्ये वाढीस भर घालणारी आणि व्यक्तिकेंद्रित संस्कृतीकडे नेणारी पद्धत कितपत सयुक्तिक आहे? होमस्कूलिंग ही संकल्पना जरी चांगली आणि परिणामकारक वाटत असली तरी आपल्या देशातील एकूण परिस्थिती बघता तिचा आपल्या देशात विस्तार होणं अवघडच आहे. काही मोजकी धनिक आणि उच्चशिक्षित कुटुंबच हे करू शकतील. तंत्रज्ञानातील प्रगतीने आणि त्या अनुषंगाने उपलब्ध व्यावसायिक संधींमुळे आय.टी. आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस त्याचे प्रमाणही वाढते आहे. आय.टी. मधील पालकच आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये घालत आहेत. त्यातील काही जणांना होमस्कूलिंग हा पर्यायही चांगला वाटेल आणि शक्यही असेल. पण इतर मुलांचं काय?

त्या दृष्टीने विचार करता मला ’शिकतं घर’ ही संकल्पना आपल्या देशाच्या नाळेशी घट्ट नाते सांगणारी वाटली. ह्यात सुद्धा जागरूक आणि सुशिक्षित पालक यांचाच सहभाग आहे. मग इतर मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्या देशात सुद्धा महाजालाचा (इंटरनेटचा) वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मग प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या शाळांनीच या तंत्रज्ञानाचा वापर का करून घेऊ नये? तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे. याचा उपयोग आपल्याला महाकाय लोकसंख्या आणि प्रचंड विषमता असलेल्या देशात करता आला तर खूप चांगले होईल. तंत्रज्ञान, संगणक यांचा वापर शालेय स्तरावर करणे याचा अर्थ शिक्षकांची जबाबदारी किंवा काम कमी करणे असा होत नाही. उलट शिक्षकांनी पूरक म्हणून त्याचा विचार करावा आणि स्वत:चा अधिक विकास घडवून आणावा असे वाटते. संगणक आणि महाजाल याचा सयुक्तिक वापर खरंतर आपल्या देशातील शहरी-ग्रामीण, गरीब- श्रीमंत यांमधल्या शैक्षणिक दर्जातील दरी कमी करण्यास मदतगार ठरू शकते. शैक्षणिक दर्जा सुधारणे हे सर्वस्वी आपल्या हातात (जनतेच्या) आहे. आपण जर उत्तमतेचा ध्यास घेतला आणि उत्तमतेची कास धरली तर दर्जा घसरण्याऐवजी वाढेलच यात शंका नाही. डी-स्कूलिंग, होम स्कूलिंग सारख्या संकल्पना जरी चांगल्या आणि परिणामकारक वाटल्या तरी त्याचे दूरगामी आणि आपल्या संस्कृतीवर होणारे परिणाम आणि आपल्या विषमतेने भरलेल्या समाजात त्याचा परिणामकारक विस्तार कितपत होवू शकतो यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाटते.

गुलमोहर: 

कारण आपला 'कल' हा घरच्याघरी शिक्षणावर आहे. मनातुन आपल्याला यालाच अनुमोदन द्यायचे आहे. >>>>

मला तर लेख वाचुन एकदम उलटे वाटले. मला वाटले की त्यांना घरच्याघरी शिक्षण हे मान्य नाहि.

टीकायुक्त किंवा टीकेवीना असलेल्या आणि भरक्टलेल्या प्रतिक्रीयांना उत्तर देण्यास लेखिका बांधील नाही. >>> नक्किच नाहि. पण जर तुम्हि तुमच्या लेखाला चांगल्या म्हणलेल्या प्रतिसादाला जर केवळ धन्यवाद दे असाल तर त्यावर टिका करण्याचा मला नक्किच अधिकार आहे.

जेंव्हा एखादा धागा संवादाची सुरुवात करण्यासाठी केला जातो तेंव्हा लेखक विचारपूर्वक स्वतःचे मत देण्याचे टाळतो >>> मी मला लेख समजला नाहि असे म्हणले आहे, जर लेखिकेने त्यांचे मत जत थोडक्यात व्यकत केले तर सोपे जाइल. लेखात/विचारात खुप गोंधळ आहे.

उदा - एकाच लेखात तुम्हि म्हणता की " तंत्रज्ञानातील प्रगतीने आणि त्या अनुषंगाने उपलब्ध व्यावसायिक संधींमुळे आय.टी. आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे" आणी तुम्हि हे पण म्हणता की "तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे >>>>> तुम्हि स्वता:चा वैचारिक गोंधळ आधी काढला आणी मग लेख लिहिला तर बरे होइल वाचणार्यांना.
शिवात या मुद्द्याचा आणी घरच्या घरि शिक्षणाचा काय संबध ?

दुसरे म्हणजे तुमचे विचार फक्त पांढरपेशा लोकांचा विचार करणारे आहेत. अहो या देशात गरिबांना प्रार्थमिक शिक्षण देखील मिळत नाहि, परवडत नाहि तेथे तुम्हि होमस्कूलिंग वगैरेवर चर्चा करत आहात आणी परत त्यात संगणक , मायाजाल आणायला पाहिजे म्हणता. इथे मुलांना पाटी आणी खडु घेयलाही परवडत नाहि हो! नगरपालिकेच्या शाळेत काम करणार्या शिक्षकांना तुटपुंजे पगार असतात. त्यात परत जनगणना, निवडणुका यांची कामे करावी लागतात. जाउ दे! लिहु तेवढे थोडे आहे. टाइम पास म्हणुन तुमचा लेख काहि लो़कांना छान वाटत असेल किंवा विचारप्रवर्तक वाटत असेलही.

या लेखावर दोन पातळींवर विचार करू शकतो.
सिध्दांत व लागू होण्याची शक्यता(concept and applicability)
दोन्ही निकषांवर हा समाधानकारक पणे उतरत नाहीये.

शांतीसुधा मॅडम प्लिज...

मी आपल्या लेखावर केलेली टिका दाखवुन द्यावी...वाट पाहत आहे.

१)आपला लेख खुप लांबला आहे असे मी म्हणालो थोडक्यात सर्व सांगीतले असते तर वाचण्यास बरे वाटले असते. हे (फक्त) सुचवले - एक वाचक या नात्याने हे एक सजेशन दिले. तेवढी स्वतंत्रता वाचकाला असतेच/आहेच.

२)घरच्याघरी शिकवुन पाल्याचा त्या त्या वयांत सर्वांगीण विकास होणार नाही असे म्हणालो - हे संपुर्ण लेखावरचे (एका प्रश्नाचे उत्तर) माझे 'मत'.

३)लेख मोठा वाटल्यामुळे तो मी कश्या प्रकारे वाचुन समजुन घेतला, हे सांगीतले. - ही एक माझी पध्दत सांगीतली.

यांत 'टिका' कोणती हे मला नाही कळले. कृपया ध्यानी आणुन द्यावे ही विनंती.

वेळवाया घालवुन पुढे असली मत प्रदर्शन करत सुटणार नाही.

वाट पाहत आहे...

@ स्वाती २, तुम्ही प्रतिक्रीयेत उल्लेख केल्या प्रमाणे जागरूक पालकच "होमस्कूल्ड" मध्ये आलटून पालटून वेगवेगळे विषय शिकवायचे ही संकल्पना लोकसत्तामधील "शिकतं घर" संकल्पनेशी मिळतीजुळती आहे. खरंतर ज्या लेखांवर आधारित हा लेख मी लिहीलेला आहे त्या लेखांच्या लिंक्स द्यायला हव्या होत्या पण सध्या लोकसत्तावर त्या उपल्ब्ध नाहीत. त्यामुळे देऊ शकत नाही.

@टाईम प्लीज, खरंतर इथलं स्कूलिंग म्हणजे शब्दशः शालेय पातळीवरील शिक्षण असा आहे. त्यामुळे इंजीनीअरींग शिक्षण त्यात मोडत नाही. असो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सर्वच ठीकाणी महाविद्यालयीन शिक्षणाची अवस्था अशी आहे की लेकचरला न बसता सुद्धा विद्यार्थी व्यवस्थीत पास होऊ शकतात. जर मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील आणि स्वयंअध्यन कसं करावं याचं तंत्र आत्मसात केलेलं असेल तर टॉपर (तुमच्यासारखे) देखिल होऊ शकतात. कॅंटीन मध्ये मित्रांशी गप्पा मारून आणि मुलींकडे बघुन सगळेच टॉपर होत नाहीत हे सुद्धा तोतकेच खरे. आजच सकाळ मध्ये लेख आहे "अभियांत्रिकीचे कारखाने थांबवा" http://72.78.249.107/esakal/20110702/4697627975891892654.htm त्यात सुरूवातीलाच उल्लेख आहे की "भारतातील ७५ टक्के पदवीधर अभियंते नोकरी मिळविण्याच्या पात्रतेचे नाहीत, असा अहवाल नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (नास्कॉम) या प्रतिष्ठित संस्थेने गेल्या वर्षी जाहीर केला होता." यात अतिशयोक्ती नाहीये हे देखिल खरे. शालेय जीवनात (सुरूवातीच्या जीवनात) जर मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या आणि अभ्यास कसा करायचा (हसतखेळत) हे शिकवलं तर बरेचसे प्रश्न सुटतील असं वाटतं. मग अभियांत्रिकीला इतकी भाऊगर्दी होणार नाही. असो.

>> जगाच्या शाळेत मिळालेलं ज्ञान शाळेतल्या चार भिंतीत किंवा घरातल्या चार भिंतीत मिळत नाही. >> १००% अनुमोदन. खरं तर जीवन ही एकच अशी परीक्षा आहे की जी दिल्यावर माणूस शिकत असतो. इतर परीक्षांसाठी आधी शिकावं लागतं. (काहीजण न अभ्यास करताच परीक्षा देतात तो भाग वेगळा). वरील लेख फक्त शालेय स्तरावरील शिक्षण हे होमस्कूलिंग असावं की नाही यावर आधारित आहे कारण हा लेख ज्या लेखांचे परीक्षण म्हणून लिहीलेला होता त्यांचाही स्कोप शालेय शिक्षण हाच होता. (जीवन शिक्षण नव्हे. :-))

@ चातक, तुम्हाला माझ्या सविस्तर प्रतिक्रीयेसाठी थोडी वाट पहावी लागेल. कारण तुमच्या आधी ज्यांनी प्रतिक्रीया लिहीलेल्या आहेत त्यांना प्रतिसाद देणे चालू आहे. याआधी मला प्रतिक्रीयांत सरळपणा दिसला नव्हता म्हणून प्रतिक्रीया दिली नव्हती. आता जिथे सरळपणा दिसतोय त्यावर प्रतिक्रीया देईन पण आधीच्या प्रतिसादांनंतर. Happy

धाडसी विचार आहे. तेंडुलकरांनी त्यांच्या मुलीच्या (प्रिया) बाबतीत हा प्रयोग केल्याचे कुठेतरी वाचल्याचे आठवते. नक्की माहीत नाही.

वरील लेख फक्त शालेय स्तरावरील शिक्षण हे होमस्कूलिंग असावं की नाही यावर आधारित आहे कारण हा लेख ज्या लेखांचे परीक्षण म्हणून लिहीलेला होता त्यांचाही स्कोप शालेय शिक्षण हाच होता. (जीवन शिक्षण नव्हे. )>>> म्हणजे बाकी जे अशा प्रकारे प्रतिसाद आहेत ते.... ते निष्फळ फुटकळ आहेत आपल्या मते....पाल्याची १५-२० शालेय वर्षे (जी अत्यंत संवेदनशील असतात)...यांचा मुळ जिवनाशी काडीभर संबंध नाही.. Uhoh व्वा...!!! ________^________!

वरील लेख फक्त शालेय स्तरावरील शिक्षण हे होमस्कूलिंग असावं की नाही यावर आधारित आहे कारण हा लेख ज्या लेखांचे परीक्षण म्हणून लिहीलेला होता त्यांचाही स्कोप शालेय शिक्षण हाच होता. (जीवन शिक्षण नव्हे. स्मित हसणे ) >>>> म्हणजे आपल्याला सारासार विचार नको आहेत तर...! फक्त आपण जो विचार करत आहात सेम टु सेम तसाच विचार वाचकांनी करावा. अशी आपली 'अट'. Lol

जर सारासार विचार करायचाच नव्हता तर हा लेख का? ही बोंब का? शिकायचेच आहे ना? कसं शीकु का विचारत आहात?

@ बेफिकीर, तुम्ही सुरूवातीला जेव्हा प्रतिक्रीया दिलीत तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात काहीच अर्थ नव्हता कारण तुम्ही लेख पूर्ण (कोणत्या का कारणाने असेना) वाचलेला नव्हतात. आता तो वाचलेला आहे अशी मला तुमच्या नंतरच्या प्रतिसादांवरून खात्री पटली आहे. म्हणून प्रतिक्रीया देत आहे.

>>> १. घरच्या घरी शिक्षण असावे असे तुम्हाला म्हणायचे आहे की नसावे असे?>>> आपण जर चाणक्य यांनी लिहीलेली प्रतिक्रीया {चाणक्य. | 3 July, 2011 - 13:31

कारण आपला 'कल' हा घरच्याघरी शिक्षणावर आहे. मनातुन आपल्याला यालाच अनुमोदन द्यायचे आहे. >>>>

मला तर लेख वाचुन एकदम उलटे वाटले. मला वाटले की त्यांना घरच्याघरी शिक्षण हे मान्य नाहि.}

वाचलीत तर लक्षात येईल की लेखात मी माझं मत पुरेसं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न केला आहे फक्त ठामपणे हेच खरं आणि दुसरं वाईट असं लिहीलेलं नाही. याचं कारण रेव्यु यांच्या पहिल्या प्रतिक्रीयेत आहे. मला लेखाच्या अनुषंगाने होणारी चर्चा ही चर्चा व्हावी असं अपेक्षित आहे. न की लेखिकेचं मत चुकीचं की बरोबर या अनुषंगाने. पहिल्या दोन प्रतिसादांनी चर्चेला चांगली सुरूवात झाली होती पण तुमचा तिसरा प्रतिसाद "मी पुढे वाचूच शकत नाही" आता मला या प्रश्नांची उत्तरं द्या असा होता. तुम्ही लेख वाचलाच नाहीत हे आधीच म्हणताय आणि मग प्रश्न विचारताय की लेखात मला काय म्हणायचंय ते.....अशा प्रतिसादावर चर्चा काय होणार? आता लेख वाचल्यामुळे चर्चेला दरवाजे मोकळे आहेत. आता यातच तुमच्या प्रश्न क्रमांक दोनचही उत्तर मिळालं असेलच. Happy

घरच्या घरी शिक्षण सर्व समावेशक होउ शकत नाही तसच सध्य परीस्थितीत शाळेत दिल जाणार शिक्षण
सर्वसमावेशक आहे असही नाही .म्हणून मुलांबरोबर संवाद साधत मुलांच्या शाळेतील प्रगतीकडे व्यवस्थीत लक्ष देत त्याच्या कलाप्रमाणे त्याच्या आवडीच्या विषयात नैपुण्य येण्यासाठी वेगळे प्रशिक्षक आयोजीत केले तर ते मुलांच्या प्रगतीला पूरक होईल हे निश्चित .मी गिरगावातल्या राममोहन शाळेत शिकले .आम्हाला संस्क्रुतचे शिक्षक''जोशी सर'' एक सुभाषित शिकवताना तो फक्त श्लोक समजावत नसत तर तो कुठल्या ग्रंथातला आहे,तो ग्रंथ कोणी लिहीला ,त्या लेखकाची ओळख ,त्याच्या आयुष्यातील उद्बोधक गमती जमती अस सर्व मोठ्या आवडीने सांगत .मराठी शिकवणार्‍या गोखले टीचर पसायदान शिकवताना'' विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ''व त्यानंतरच ''जो जे वांछील तो ते लाभो''हा क्रम तन्मयतेने शिकवत असत.त्यामुळेच आपली इच्छासुद्धा स्वधर्माला अनुसरून कशी असावी हा नकळत होणारा संस्कार .आज असे शिक्षक असतील की नाही याची शंकाच वाटते .माझे वडील माझ प्रगतीपुस्तक बघून ज्या विषयात मी फारच वर्गामागे आहे ते विषय माझ्या डोक्यात उतरेपर्यंत कळकळीने शिकवत असत त्यामुळे फारशी हुषार नसूनही छोट्या वयात सुद्धा त्यानी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला .मला वाटत त्यामुळेच आपल्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करत आपली तसच इतरांची प्रगती करण गरजेच असत हा नकळत झालेला संस्कार .यापुढेही जाऊन जर शक्य असल तर आपल्या मुलांबरोबर इतरांच्या गरजु मुलाना आपण मदत करू शकलो तर तो चांगला आदर्शच असेल .गरीब देशातील असूनही प्रगत देशात केवळ आचार ,विचार व आपल्या विषयातील नैपुण्यामुळे भारतीय विद्यार्थी प्रगती करताना पाहिले की मला भारतात त्याना मिळालेल्या शिक्षणाचा अभिमान वाटतो .शांतीसुधा ,मला आपले दोन्ही लेख विचारप्रवर्तक वाटले .धन्यवाद.

घरच्या घरी शिक्षण सर्व समावेशक होउ शकत नाही तसच सध्य परीस्थितीत शाळेत दिल जाणार शिक्षण
सर्वसमावेशक आहे असही नाही .म्हणून मुलांबरोबर संवाद साधत मुलांच्या शाळेतील प्रगतीकडे व्यवस्थीत लक्ष देत त्याच्या कलाप्रमाणे त्याच्या आवडीच्या विषयात नैपुण्य येण्यासाठी वेगळे प्रशिक्षक आयोजीत केले तर ते मुलांच्या प्रगतीला पूरक होईल हे निश्चित . >>> छायाताई आपले विचार लेखीकेच्या विचारांशी जुळत नाहीयत...

माझे वडील माझ प्रगतीपुस्तक बघून ज्या विषयात मी फारच वर्गामागे आहे ते विषय माझ्या डोक्यात उतरेपर्यंत कळकळीने शिकवत असत त्यामुळे फारशी हुषार नसूनही छोट्या वयात सुद्धा त्यानी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला . >>>> छायाताई आपले विचार लेखीकेच्या विचारांशी जुळत नाहीयत... 'आत्मविश्वास' या शब्दाशी याच्या अर्थाशी लेखीकेला काहीच देणे घेणे नाहीय.

लेखीकेला अपेक्षीत मत 'वरील लेख फक्त शालेय स्तरावरील शिक्षण हे होमस्कूलिंग असावं की नाही यावर आधारित आहे' हे आहे..दुसरं काही नाही.

याआधी मला प्रतिक्रीयांत सरळपणा दिसला नव्हता म्हणून प्रतिक्रीया दिली नव्हती. >>> आता हे काय 'या आधी' म्हणजे? मी प्रतिसाद एडिट केलाला नाही. या प्रकारचे प्रतिसाद अन्य कुठे मी दिलेले नाही.

कोणता प्रतिसाद वाकडा तिकडा वाटला हो....?

काय... कशी चाल्लीय तुमच्या मनाची घालमेल ? Sad

शांतीसुधा, माझ्या माहितीतली मुले, एक वगळता, सर्व अमेरिकन होती. सर्वच पालक उच्चशिक्षित आहेत अशातला भाग नाही. ग्रुप असल्याने तशी गरजही नसते. मुलांना शिकवायची आवड आणि त्या त्या विषयाची आवड असेल तर एपी लेव्हल सोडता १०वी पर्यंतचे विषय शिकवणे फार कठिणही नाही. उच्चशिक्षित असाल तर एपी देखिल सहज जमते. मात्र खेळात प्राविण्य असलेल्या मुलांच्या बाबतीत कुठला खेळ यावर होमस्कुलिंग करायचे की नाही हे ठरवावे लागते. जिमनॅस्ट, पोहोणे वगैरे असेल तर ६-७ तास सराव आणि होमस्कुलिंग असा पॅटर्न असतो पण बास्केटबॉल, फुटबॉल वगैरे साठी हायस्कूल-कॉलेज-प्रोफेशनल असाच नियम असल्याने शाळेला पर्याय नाही. तसेच पोहोणे वगैरे नॅशनल लेवलचे नसेल तर हायस्कुल- कॉलेज स्कॉलरशिप असा विचार केला जातो. मुळात अमेरिकेत सरकारी शाळा, चार्टड शाळा, प्रायवेट शाळा वगैरे बरेच पर्याय आहेत. गुणवत्ता असेल तर प्रायव्हेट शाळेतही स्कॉलरशिपवर शिक्षण घेता येते. सरकारी शाळेत केव्हाही प्रवेश मिळतो. त्यामुळे प्रयोग फसला तरी पाल्याचे फारसे नुकसान होत नाही.
भारतात माझ्या ओळखीचे कुणीही होमस्कुलवाले नाही त्यामुळे तिथे काय आणि कसे शक्य आहे हे मला माहित नाही.

अवांतर : वाचक म्हणून लेख खूप विस्कळित वाटला.

@ चाणक्य, >>>>शिर्षकच चुकिचे आहे. " घरच्या घरीच शिक्षण " आणी " सर्वसमावेशक " या दोन्ही गोष्टी विरोधाभास आहेत.>>>> शिक्षण हे तत्त्वतः सर्वसमावेशक असावं अशी सामान्य अपेक्षा असते. जेव्हा माणसं चालू असलेल्या पद्धतींपेक्षा नवी पद्धत शोधतो आणि ती कशी चांगली आहे हे सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा रूढ पद्धतींत आढळलेल्या कमतरतां वर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच "घरच्या घरी शिक्षण" हे खरंच सर्वसमावेशक आहे का? असा प्रश्नच शीर्षकात विचारला आहे. म्हणजे शीर्षकातून लेखाची दिशा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बरं शीर्षकात प्रशन्चिन्ह नसतं तर एकवेळ तुमचा मुद्दा विचार करण्यासाठी घेतला असता. पण प्रश्नचिन्हामुळे सगळं स्पष्ट आहे.
तुमच्या एका प्रतिक्रीयेत तुम्ही "मला तुमचा लेख वाचावासा वाटत नाही याला अनुमोदन देता का तर तो मुद्दे सूद नाही किंवा पाल्हाळ आहे म्हणून.......आणि लेखाचे शीर्षक संक्षिप्त पणे लेखाची दिशा दर्शवत असलेलं तुम्हाला पटत नाही आणि ते अयोग्य वाटतं....आता याला नक्की काय म्हणावं? जर असं म्हंटलं की संक्षिप्त पणे शीर्षकातून व्यक्तकेलेली दिशा ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी पहिल्या परिच्छेदाचा उपयोग. आता जर सुरूवात तुम्हाला पाल्हाळ आणि संक्षिप्त शीर्षक अमान्य यावरून तुम्ही लेख वाचावासा वाटत नाही याला अनुमोदन देता आणि मग मला लेखाचा उद्देश स्पष्ट करा असं म्हणता..........ह्यात विरोधाभास नाही का?

अजुनही असेच विरोधाभास दाखवते. तुमच्या एका प्रतिक्रीयेत तुम्ही म्हणालात {चाणक्य. | 3 July, 2011 - 12:22

श्री आणि स्वाती, प्रतिसादाबद्धल धन्यवाद >>> जे तुमच्या लेखावर टिका करतात त्यांनाही धन्यवाद दिला तर बरे होइल. नाहितर मग लिहुच नका सोशल साइटवर. जे टिका करतात त्यांच्यामुळे टीआरपी वाढतो खरे तर!}

आणि पुढच्याच एका प्रतिक्रीयेमध्ये असंही म्हणता: {चाणक्य. | 3 July, 2011 - 13:33 <<<<पण जर तुम्हि तुमच्या लेखाला चांगल्या म्हणलेल्या प्रतिसादाला जर केवळ धन्यवाद दे असाल तर त्यावर टिका करण्याचा मला नक्किच अधिकार आहे.} तसेच पहिल्या दोन प्रतिक्रीयांना मी नुसते धन्यवाद न देता माझाही प्रतिसाद चर्चेच्या स्वरूपात दिला आहे.चाणक्य. आपण फक्त धन्यवादाचेच वाक्य उचललेत तर मी काय करू? आणि या दोन प्रतिक्रीयांमध्ये तुम्ही दोन वेगवेगळ्या स्वरूपात विरोधाभासाचं प्रदर्शन केलं आहेत.

अजुन एकः {चाणक्य. | 3 July, 2011 - 13:33>>> मी मला लेख समजला नाहि असे म्हणले आहे, जर लेखिकेने त्यांचे मत जत थोडक्यात व्यकत केले तर सोपे जाइल. लेखात/विचारात खुप गोंधळ आहे.} आणि त्या प्रतिसादाच्या बरोबर आधीचा प्रतिसादः {चाणक्य. | 3 July, 2011 - 13:31

कारण आपला 'कल' हा घरच्याघरी शिक्षणावर आहे. मनातुन आपल्याला यालाच अनुमोदन द्यायचे आहे. >>>>

मला तर लेख वाचुन एकदम उलटे वाटले. मला वाटले की त्यांना घरच्याघरी शिक्षण हे मान्य नाहि.} असा आहे. आता यादोन्ही पाठोपाठच्या प्रतिसादांमध्ये तुम्हाला विरोधाभास (बेसीकली सेल्फकॉन्ट्रॅडीक्शन) दिसत नाही काय?.

{>>>एकाच लेखात तुम्हि म्हणता की " तंत्रज्ञानातील प्रगतीने आणि त्या अनुषंगाने उपलब्ध व्यावसायिक संधींमुळे आय.टी. आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे" आणी तुम्हि हे पण म्हणता की "तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे >>>>> तुम्हि स्वता:चा वैचारिक गोंधळ आधी काढला आणी मग लेख लिहिला तर बरे होइल वाचणार्यांना. शिवात या मुद्द्याचा आणी घरच्या घरि शिक्षणाचा काय संबध ?>>>} तुम्ही बरोबर तुम्हाला सोयीचे वाटतील तेच शब्द (मुद्दे नाहीत) उचलले आणि त्यावर विरोधाभास निर्माण करण्याचा निष्फळ प्रयत्न केला आहे. कारण मी असं लिहीलेलं आहे. "पण भारतासारख्या पदोपदी विषमतेच्या दर्‍यांचं दर्शन होत असलेल्या कुटुंबकेंद्रित, समाजकेंद्रित संस्कृतीमध्ये अशा प्रकारे सामाजिक विषमतेमध्ये वाढीस भर घालणारी आणि व्यक्तिकेंद्रित संस्कृतीकडे नेणारी पद्धत कितपत सयुक्तिक आहे?"
"तंत्रज्ञानातील प्रगतीने आणि त्या अनुषंगाने उपलब्ध व्यावसायिक संधींमुळे आय.टी. आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस त्याचे प्रमाणही वाढते आहे. आय.टी. मधील पालकच आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये घालत आहेत. त्यातील काही जणांना होमस्कूलिंग हा पर्यायही चांगला वाटेल आणि शक्यही असेल. पण इतर मुलांचं काय?"
"आपल्या देशात सुद्धा महाजालाचा (इंटरनेटचा) वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मग प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या शाळांनीच या तंत्रज्ञानाचा वापर का करून घेऊ नये? तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे. याचा उपयोग आपल्याला महाकाय लोकसंख्या आणि प्रचंड विषमता असलेल्या देशात करता आला तर खूप चांगले होईल. तंत्रज्ञान, संगणक यांचा वापर शालेय स्तरावर करणे याचा अर्थ शिक्षकांची जबाबदारी किंवा काम कमी करणे असा होत नाही. उलट शिक्षकांनी पूरक म्हणून त्याचा विचार करावा आणि स्वत:चा अधिक विकास घडवून आणावा असे वाटते. संगणक आणि महाजाल याचा सयुक्तिक वापर खरंतर आपल्या देशातील शहरी-ग्रामीण, गरीब- श्रीमंत यांमधल्या शैक्षणिक दर्जातील दरी कमी करण्यास मदतगार ठरू शकते."

यासगळ्यावरून असे स्पष्ट दिसते की एकतर आपण प्रतिक्रीया देताना लेख व्यवस्थित आणि पूर्ण्पणे न वाचताच प्रतिक्रीया द्यायला सुरूवात कराता. आपला प्रतिक्रीया देण्याचा होरा "लेखन वाचावंसं वाटत नाही, पाल्हाळ आहे आणि तुम्हीच पुन्हा सांगा लेखात काय म्हणायचंय ते" असा असतो. आपल्याच प्रतिक्रीयांमधील अनेक स्वयंविरोधाभासाची उदाहरणे मी दखवून दिलीच आहेत. पुढच्यावेळी प्रतिक्रीया देताना चर्चेची सुरूवात होणं अपेक्षित असेल तर लेख नीट आणि व्यवस्थित वाचावा येवढीच विनंती. Happy

अवांतरः सर बरर्टड रसेल यांनी शोधलेला रसेल्स पॅराडॉक्स सेल्फ कॉन्ट्रॅडीक्षन संबंधीच सांगतो.

@ रेव्यु, <<<घरच्या घरी शिक्षण दिल्यास
-सहजीवनाच्या फायद्यास पाल्य मुकेल
-आयुष्यास सामोरे जायला जो कणखर पणा हवा तो बहुतंशी येणार नाही
-युनिफॉर्मिटी रहाणार नाही-अर्थात ती हवी का ,हा मुद्दा ही तितकाच खरा!!
-खर्च??
-कॉमन फॅसिलिटिज??>>>
तुम्ही म्हणताय तेच मुद्दे मी उदाहरणं देऊन उपस्थित केले आहेत. भारतासारख्या देशात खर्च हा मुद्दा अधिक महत्त्वाचाअ वाटतो कारण आपल्याकडे नीम्न आर्थिक स्तरातील मुलांची संख्या सधन स्तरातील मुलांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त आहे. म्हणूनच आहेत त्याच शाळांत संगणक आणि जालीय तंत्रज्ञान याचा उपयोग करून घ्यावा असे सुचवले आहे. आपलं त्याबद्धल काय मत आहे?

>>>या लेखावर दोन पातळींवर विचार करू शकतो.
सिध्दांत व लागू होण्याची शक्यता(concept and applicability)
दोन्ही निकषांवर हा समाधानकारक पणे उतरत नाहीये.>>>

लेखामध्ये होमस्कूलिंगची concept and applicability हे दोन्हीही मुद्दे घेतले आहेत. पण लेखाचा उद्देश हा परीपूर्ण मत मांडणे हा नसून होमस्कूलिंग असावे की नसावे? त्याचे फायदे तोटे काय? भारतासारख्या देशात ते शक्य आहे का? नसेल तर त्यावर काही उपाय सुचवता येतायत का? येवढ्यावरच लेख थांबतोय. मला या विषयावर चर्चा अपेक्षित आहे.

@ छाया देसाई, छायाताई चर्चेत सहभागी झाल्याबद्धल धन्यवाद. अगदी खरं आहे.....घरच्या घरी शिक्षण सर्वसमावेशक होणार नाही. सद्य परीस्थीतीत शाळेत दिलं जाणारं शिक्षणही सर्वसमावेशक नाही हे सुद्धा तितकंच खरं. तुम्ही तुमच्यावेळचे अनुभव सांगीतलेत त्यावेळची परीस्थीती (लोकसंख्या, शाळेतील मुलांची संख्या, शाळेत शिकवण्यास येणार्‍या शिक्षकांचा स्तर, शिक्षकांमागे लागलेली अशैक्षणिक कामं इ.) वेगळी होती आणि आताची वेगळी आहे. त्यामुळे तुमच्यासाठी जसे तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला समजेपर्यंत कळकळीने शिकवण्याची मेहनत घेतली तशी सद्य परीस्थीतीत शक्य नाही. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा उपयोग दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी करता येईल असं मी सुचवलं. सध्या केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येक सरकारी आणि महापालिकेच्या शाळेला संगणक दान करण्याचा प्रघात चालू केला आहे. पण संगणक जरी स्वस्तात मिळाले तरी त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठीची सॉफ्टवेअर्स (मायक्रोसॉफ्ट्ची) महाग असल्याने तसेच शाळेतील शिक्षकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने मागे पडत आहेत. मग संगणकाचा तसेच महाजालिय तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग होत नाहीये. त्यासाठी जागरूकतेने प्रयत्न व्हावेत असे मला वाटते. बाकी चारित्र्य जडणघडण, आत्मविश्वास निर्मिती यांसाठी वैयक्तीक लक्ष आणि प्रत्येक विद्यार्थी हा "एकमेव/विशेष" (युनिक/स्पेशल) आहे अशी भावना रूजणं महत्त्वाचं आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हे जरा अवघडच आहे. त्यामुळे सर्व्हायवल स्ट्रगल करूनच, इतरांशी स्पर्धा करून काहीतरी मिळवुनच बर्‍याच जणांना आत्मविश्वास मिळवायला लागतो.

@ स्वाती २, मी अमेरिकेशी संबंधीत आपल्या विचारांशी सहमत आहे. भारतातील परिस्थीतीत अमेरिकेतून केवळ मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी (संस्कार इ.) भारतात स्थलांतरीत झालेली काही कुटुंब मला माहीती आहेत. इथे आल्यावर इथल्या शाळांचे एकूण रागरंग बघून त्यांचा भ्रमनिरास झालेलाही पाहिला आहे. मग अमेरिकेत परत जाणे यापेक्षा ते मध्यम मार्ग स्विकारतात आणि तो म्हणजे एक तर कोणत्यातरी इंटरनॅशनल स्कूल मध्ये घालतात किंवा होमस्कूलिंग करतात. मी लेखात जालनापूरकर कुटुंबियांचा उल्लेख केलेलाच आहे. आता ही इंटरनॅशनल स्कूल्स कितपत चांगली आहेत हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.
हे झालं अमेरिकेतील आणि अमेरिकेतून भारतात स्थलांतरीत झालेल्या कुटुंबा विषयी. पण भारतात विविध आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक गटांतील लोक राहतात. त्यांचा विचार करता आणि इतर अडचणींचा विचर करता भारतात होम स्कूलिंग सगळ्यांसाठी अवघड आहे.

डेलिया, >>>पण देशात होम स्कुलिंग चा पर्याय आहे का? म्हण्जे घरीच अभ्यास करून फक्त वार्षिक परीक्षेला किन्वा डायरेक्ट १० वीच्या परीक्षेला बसणे शक्य आहे का? नाहीतर केवळ होम स्कुलिन्ग केले तर त्या शिक्षणाला बाहेरच्या जगात 'मान्यता' कशी मिळेल?>>> आपल्याकडे पहिलीपासून शाळेत न जाता घरी अभ्यास करून घेऊन डायरेक्ट बोर्डाच्या परीक्षेला बसवण्यास मान्यता आहे. म्हणूनच बोर्डाच्या परीक्षांना (दहावी आणि बारावी) बहि:स्थ विद्यार्थी म्हणून विद्यार्थी बसू शकतात. शाळेत न जाण्याचे काही तांत्रिक तोटे असल्याने पालक शक्यतो मुलांना शाळांत पाठवतात. १) अनेक महाविद्यालयांत बहि:स्थ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं अवघड जातं. २) विद्यार्थांची मानसिक जडण्घडण ( कारण अगदी सोशलायझेशन्साठी इतर ठीकाणी पाठवलं तरी मित्र-मैत्रिणी, त्यांच्याशी मिसळून वागणं-भांडणं, शाळेतील इतर उपक्रम यासाठी जरी पर्यायी उपाय शोधले तरी) अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच या जडणघडणीत विद्यार्थी बाहेरच्या जगाशी इन्टरॅक्ट करून जे काही शिकत असतो ते इतर कृत्रिम उपायांनी मिळणं वघड आहे. एकूणच आपल्या शिक्षण पद्धतीचा सर्वांगाने विचार व्हायला हवा आणि ते अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग कसा करता येईल याचा विचार झाला पाहिजे.

विद्यार्थांची मानसिक जडण्घडण ( कारण अगदी सोशलायझेशन्साठी इतर ठीकाणी पाठवलं तरी मित्र-मैत्रिणी, त्यांच्याशी मिसळून वागणं-भांडणं, शाळेतील इतर उपक्रम यासाठी जरी पर्यायी उपाय शोधले तरी) अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच या जडणघडणीत विद्यार्थी बाहेरच्या जगाशी इन्टरॅक्ट करून जे काही शिकत असतो ते इतर कृत्रिम उपायांनी मिळणं वघड आहे. एकूणच आपल्या शिक्षण पद्धतीचा सर्वांगाने विचार व्हायला हवा आणि ते अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग कसा करता येईल याचा विचार झाला पाहिजे.
*******************************************
वर आपण लिहले आहे..मानसिक जडण घडण आणि सोशलायझेशन्स्..वैगरे...

आणि तेच मी एका ओळीत सांगीतले...'बाहेरचे जग' म्ह्नजे इतरांत मिसळुन शिकणे. तर आपले हे खालील उत्तर...
*******************************************

१००% अनुमोदन. खरं तर जीवन ही एकच अशी परीक्षा आहे की जी दिल्यावर माणूस शिकत असतो. इतर परीक्षांसाठी आधी शिकावं लागतं. (काहीजण न अभ्यास करताच परीक्षा देतात तो भाग वेगळा). वरील लेख फक्त शालेय स्तरावरील शिक्षण हे होमस्कूलिंग असावं की नाही यावर आधारित आहे कारण हा लेख ज्या लेखांचे परीक्षण म्हणून लिहीलेला होता त्यांचाही स्कोप शालेय शिक्षण हाच होता. (जीवन शिक्षण नव्हे. )
*********************************************

आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे ते आधी ठरवा शांती मॅडम....
कुणी असा प्रतिसाद दिला तर आपण तो कसा चुकीचा आहे हे दाखवुन देण्याचा निष्फळ प्रयत्न करता
कुणी तसा प्रतिसाद दिला तरी आपण तो कसा बरोबर नाही हे ठासुन सांगु लागता.

तरी मी आपल्यावर केलेल्या टिकांचे दर्शन झाले नाहीय अजुन...

याआधी मला प्रतिक्रीयांत सरळपणा दिसला नव्हता म्हणून प्रतिक्रीया दिली नव्हती. आता जिथे सरळपणा दिसतोय त्यावर प्रतिक्रीया देईन पण आधीच्या प्रतिसादांनंतर. >> उपकार करत आहात काय..? Uhoh

मी दोन तिन्दा 'प्लिज' यासाठी म्हणालो आहे की, नाह़्क आपण मला जे मी नाही ते म्हणत आहात.
आपण याचा सरळ सरळ गोड गैरसमज करुन घेउ नये.

याआधी मला प्रतिक्रीयांत सरळपणा दिसला नव्हता म्हणून प्रतिक्रीया दिली नव्हती. >> वाकडेपणा दाखवुन द्या. (या वेळेस प्लिज नाही म्हणत...या आधीचाच एक प्रश्न पेंडीग आहे.)

आता यादोन्ही पाठोपाठच्या प्रतिसादांमध्ये तुम्हाला विरोधाभास (बेसीकली सेल्फकॉन्ट्रॅडीक्शन) दिसत नाही काय?. >>> यातील एक प्रतिक्रिया माझी नाहि, दुसर्याच्या प्रतिक्रियेवरिल ती प्रतिक्रिया आहे.

आता जर सुरूवात तुम्हाला पाल्हाळ आणि संक्षिप्त शीर्षक अमान्य यावरून तुम्ही लेख वाचावासा वाटत नाही याला अनुमोदन देता आणि मग मला लेखाचा उद्देश स्पष्ट करा असं म्हणता..........ह्यात विरोधाभास नाही का? >>> यात कसला विरोधाभास ? दोन्हि गोष्टी बरोबरच आहेत. क्रुपया काय विरोधाभास आहे ते सांगा.

आपण प्रतिक्रीया देताना लेख व्यवस्थित आणि पूर्ण्पणे न वाचताच प्रतिक्रीया द्यायला सुरूवात कराता.पुढच्यावेळी प्रतिक्रीया देताना चर्चेची सुरूवात होणं अपेक्षित असेल तर लेख नीट आणि व्यवस्थित वाचावा येवढीच विनंती >>> मला वाटते तुम्हि लेख लिहिताना जरा विचार करुन, स्वतःचे मत काय आहे हे आधी तपासुन पाहिले तर तुमचा असा गोंधळ होणार नाहि. तुम्हि लेख लिहितान जसे confused आहात तसेच प्रतिकिया वाचताना/ देतानाहि दिसता.

सर बरर्टड रसेल यांनी शोधलेला रसेल्स पॅराडॉक्स सेल्फ कॉन्ट्रॅडीक्षन संबंधीच सांगतो.>> बरे झाले तुम्हाला हा माहित आहे, त्याचे जरा अध्ययन केलेत तर पुढचा लेख जरा बरा लिहु शकाल (अवांतर सल्ला )

लेखाचा विषय चांगला आहे. पण लेख जरा भरकटलाय. वर छाया म्हणतात तसं शाळेय शिक्षण जसं सगळ्यांना सूट होत नाही तसं घरीच शिक्षण देणं हे विद्यार्थी, पालक या दोघांवर अवलंबून आहे. पण १००% home schooling न करता शाळेतल्या आभ्यासाला पूरक घरी शिकवलं तर जास्त फायद्याचं ठरेल. एकंदर महागड्या शाळेत घालून आपली जबाबदारी संपली असं पालकांनी मानू नये. असं मला वाटतं. पण व्यवस्थित नियोजन करता येत असेल तर home schooling मुळे काही वाईट परिणाम होतील (जे शाळेत पाठवलं तर होत नाहीत) असं मला वाटत नाही.
[प्रतिक्रिया एवढ्या मनावर घेउ नका]
[लेखिकेच्या मागच्या लेखाचा संदर्भ इथे देणे लेखिल चुकिचे वाटते, विषय आणि लेख महत्वाचा]

Pages