घरच्या घरीच शिक्षण - खरंच सर्वसमावेशक होईल का?

Submitted by शांतीसुधा on 2 July, 2011 - 15:36

दि. १२ जून २०१० च्या दैनिक लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये "घरीच शिक्षण किंवा होमस्कूलिंग" या संकल्पनेवर आधारित ‘घरात शाळा’ हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची ’पायवाट’ हा वंदना अत्रे यांचा आणि ’शिकतं घर’ हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहिती सांगणारा, असे तीनही लेख वाचनात आले. सर्व शिक्षण अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरुवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या लेखांच्या परीक्षणामध्ये करत आहे.

तशी होमस्कूलिंग ही संकल्पना आपल्याकडे नवीन नाही. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांना त्या काळातील शालेय शिक्षण खूपच तोकडे वाटत असल्याने आणि त्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करण्याऐवजी शिक्षक त्यांच्यावरच आगपाखड करत असल्याने दोघांनाही घरीच स्वतंत्रपणे शिकवण्यास शिक्षक येत असत. अमेरिकेत ही संकल्पना राबविणारे पालक सुद्धा एकेक विषय शिकवायला स्वतंत्र शिक्षक ठेवतात. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या नियतकालिकात असे ’होमस्कूलिंगसाठी शिक्षक पाहिजेत’ अशा भरपूर जाहिराती असतात. मला आठवतंय एका जाहिरातीत तर चक्क नमूद केलेलं होतं की “रोज जेवण करताना आमची मुलांबरोबर विविध विषयांवर चर्चा होते. तर इच्छुक उमेदवाराने आमच्याच बरोबर कुटुंबात राहावे आणि मुलांबरोबर त्या चर्चांमध्ये सहभाग घ्यावा.”

माझा पहिला प्रश्न याच गोष्टीशी संबंधित आहे. वर उल्लेखलेल्या लेखांमधील उदाहरणांत आणि मी दिलेल्या उदाहरणांत घरीच शिक्षण या व्यतिरिक्त अजून एक साम्य आहे. ते म्हणजे त्यांची घरची पार्श्वभूमी. या सर्व उदाहरणांतील पालक धनिक आणि अत्यंत सुशिक्षित किंबहुना उच्चशिक्षित आहेत. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांचे पालकांनी त्यांना स्वत: भले शिकवलं नाही पण स्वतंत्र शिक्षक ठेवले. सखी बोरकर, सहल कौशिक, प्रल्हाद यांच्याबाबतीत त्यांचे पालक त्यांना शिकवत होते. वेळप्रसंगी स्वतंत्र शिक्षकही नेमले. काहीं आई नाहीतर वडील यांनी स्वत:चा व्यवसाय, करिअर बाजूला ठेवून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूपच वेळ दिला आहे. माझ्या परिचयातील पुण्यामधील जालनापूरकर नामक कुटुंबीयांनीसुद्धा आपल्या मुलांना असेच होमस्कूलिंग दिले आहे. या सर्व पालकांनी आपल्या ज्ञानाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्याचा, आणि संदर्भांचा उपयोग केला आहे असे दिसते. मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होवू नये यासाठी विशेष काळजी घेऊन त्यांच्याच आपल्याच घरात विविध उपक्रम राबवून, इतर मुलांना आपल्याच घरी बोलावून, मुलांचे समवयस्क मुलांमध्ये मिसळणे सुकर करणे, त्यांना विविध छंदवर्ग, खेळ यांसाठी पाठवणे अशाही पूरक गोष्टी केलेल्या दिसतात. हे सगळं शक्य झालं ते केवळ पालकांकडे असलेला पैसा आणि पालकांचे उच्चशिक्षित असणे या वस्तुस्थितीमुळे. याला अपवाद डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचा. चतुरंग मध्येच त्यांच्या मुलाने, अमृत अभय बंग याने, त्यांच्याविषयी लिहिलेला लेख वाचनात आला. अमृतला सुध्दा होमस्कूलिंगच मिळालं. त्याच्यासाठी पण त्यांनी भरपूर कष्ट घेतले. त्याचे पालकही उच्चशिक्षित पण तरीही त्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वास्तव्य करून तेथील आदिवासींसाठी काम करून आपल्या मुलांमध्येसुध्दा समाजाचे ऋण फेडण्याची प्रेरणा निर्माण केली. पण जिथे ह्या गोष्टी नाहीत; म्हणजे पालक धनिक नाहीत, सुशिक्षित नाहीत किंवा अल्पशिक्षित आहेत; तिथे हे घरीच शिक्षण शक्य आहे का? या संकल्पनेचा मुलांवर शैक्षणिक दृष्ट्या जरी सकृद्दर्शनी चांगला परिणाम दिसत असला तरी इतर दूरगामी परिणामांचं काय? या मुलांना अगदी समवयस्क मुलांना घरी आणून सोशलाइज करण्याचा प्रयत्न केला तरी त्या मुलांमध्ये “मी कोणीतरी विशेष” ही भावना कशावरून वाढीस लागलेली नसेल? सध्याच्या परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धतीमध्ये मुलं शाळेत जातात ती ते फक्त परीक्षांमध्ये गुण मिळवण्यास असाच काहीसा अर्थ निर्माण झाला आहे. तसेच एकूणच शिक्षणाचा, शाळांचा दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारतात स्थायिक होणार्‍या किंवा उच्चशिक्षित पालकांनाच काय पण सामान्य पालकांना सुद्धा मुलांच्या भवितव्याची चिंता असणं साहजिक आहे. पण होम स्कूलिंग हा पर्याय किती व्यवहार्य आहे याचाही विचार व्हायला हवा असं मला वाटतं.

आपल्याकडे ज्या पद्धतीच्या शाळा मिशनरी लोकांनी सुरू केल्या त्या पाश्चात्य शिक्षणपद्धतीवर आधारित होत्या. अमेरिका-युरोप मध्ये जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली तसतसे त्यांचे शैक्षणिक धोरणही बदलत गेले. जशा आपल्याकडे सुधारणा होत गेल्या तशा अमेरिकन शैक्षणिक पद्धतीतील बदलाचे वारे काही वर्षांचे अंतर ठेवून आपल्याकडेही वाहू लागले. आता पूर्वीच्या तुलनेत जागतिकीकरणामुळे अमेरिकेत जाऊन राहणार्‍या भारतीयांचे प्रमाण तसेच अमेरिकेत काही वर्षं काढून भारतात स्थायिक होणार्‍याचं प्रमाण वाढत असल्याने आपल्याकडील काही सामाजिक स्तरांमध्ये हे बदलाचे वारे लगेचच येतात. अमेरिकेत सर्वांना समान शिक्षण देणे या संकल्पनेवर आधारिरीत पण औद्योगिक जगताशी जोडली गेलेली गोष्ट म्हणजे विविध वयोगटांप्रमाणे वर्गांची विभागणी आणि घाऊक पद्धतीने सगळ्यांना शिक्षण देणे. त्यात प्रत्येक मूल स्वतंत्र क्षमतेचं असतं ही संकल्पना लक्षातच घेतली नव्हती. ही संकल्पना आता खूपच जोर धरीत आहे. तसेच काही ठिकाणी ही विभागणी गुणांवर आधारित करण्यात आली. जसजसे या सगळ्यांचे तोटे लक्षात यायला लागले तसतसे अमेरिकन शिक्षणपद्धतीमध्ये आणि पर्यायाने सगळ्याच फर्स्ट वर्ल्ड देशांतील शिक्षण पद्धतींमध्ये बदल होत गेले. त्यात तंत्रज्ञानातील प्रगतीने अधिकच भर टाकली. पाश्चात्य देशांत काही शाळांमध्ये तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप (उर्ध्वपट) वापरायला दिला जातो. कित्येक ठिकाणी दूरस्थ शिक्षणपद्धतीचे वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत. त्यातच मग एम आय टी सारख्या नामवंत विद्यापीठांनी आपल्या शिक्षकांना/प्राध्यापकांना ते वापरत असलेले किंवा त्यांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य, मजकूर महाजालाच्या (इंटरनेटच्या) साहाय्याने जे विद्यार्थी प्रत्यक्ष तिथे प्रवेश घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी खुला केला. शालेय पातळीवर सुद्धा मग शैक्षणिक संसाधनांचे साठे (लर्निंग ऑबजेक्ट रिपॉझीटरीज) तयार करण्यात आले. अशा साठ्यांची माहिती असलेले सर्वच जण म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक असे सगळेच त्यांचा वापर करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी, त्याला शिकावं असं वाटेल तो वेळ प्रत्येकाचा वेगळा या अशा संकल्पना अस्तित्वात आल्या. अमेरिकेत सगळी अंतरं खूप लांब आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा शाळेत जाण्याचा खर्च आर्थिक आणि वेळ यादृष्टीने खूप. म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वतंत्र गरजेनुसार शिक्षण द्यायचं असेल तर एका व्यक्तीसाठी एक शिक्षक शाळेत येणं हे सुद्धा परवडणारे नाही. ढासळलेली कुटुंबव्यवस्था. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अमेरिकेत डी-स्कूलिंग म्हणजेच शाळेत न पाठवण्याची संकल्पना अस्तित्वात आली. यातूनच होमस्कूलिंग ही संकल्पना जन्माला आली आहे. एका विशिष्ट वयापर्यंत सगळ्याच मुलांना शाळेत शिकणं बंधनकारक असल्याने जे खूप श्रीमंत नाहीत अशांची मुलं सरकारी शाळांमध्ये जातात. होमस्कूलिंग ही संकल्पना तिथे सुद्धा धनिक आणि उच्चशिक्षित पालकांमध्ये अधिक प्रचलित आहे.

शाळेत मुलांनी एकत्रं शिकणे हे त्यांच्या निकोप वाढीसाठी अत्यावश्यक मानलं गेलं आहे. मुलं ही समवयस्क मुलांकडून खूप काही शिकत असतात. पूर्वीच्या काळी घरांमध्ये एकत्र कुटुंबपद्धतीमुळे अनेक भावंडं असायची त्यामुळे जरी घरी शिक्षक शिकवायला आले तरी मुलांना मिळून-मिसळून राहण्याचं शिक्षण मिळत असे. अगदी पूर्वी आपल्याकडच्या गुरुकुल पद्धतीमध्ये सुद्धा या सगळ्याचा सखोल विचार झालेला आढळतो. त्यामध्ये अगदी राजपुत्रांपासून ते गरीब ब्राह्मणांची मुलं गुरूगृही राहून एकत्रितपणे शिक्षण घेत असत. गुरुजी प्रत्येक शिष्याच्या क्षमतेनुसार त्याला शिक्षण देत. त्यामुळे राजपुत्रांचे पायही जमिनीवर राहण्यास मदत होत असे. सर्वांना सर्व प्रकारची कामं करायला लागत असत. (उदा: श्रीकृष्ण, सुदामा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकले असल्याची कथा माहीती आहेच.) वयाने मोठे असलेले किंवा पुढच्या इयत्तेत असलेले विद्यार्थी आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना मदत करत असत. (अजुनही आपल्याकडच्या आय आय टी सारख्या तसेच अनेक जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ऑक्सफर्ड, केंब्रीज सारख्या विद्यापीठांतून हे प्रयोग चालू असतात.)

त्याच्या बरोबर उलट सध्याची परिस्थिती आहे. संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे तसेच लोकसंख्या विस्फोट, आर्थिक विवंचना या सगळ्या कारणांमुळे प्रत्येक घरात एक ते दोन मुलं असतात. पण हे सुद्धा मध्यमवर्गीय सुशिक्षित घरांतील चित्रं आहे. मग विद्यार्थ्यांना जर समवयस्कांकडून शिकायची, त्यांच्यात मिळून-मिसळून राहायची संधीच मिळाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर होतील असं नाही का वाटत? अशा पद्धतीने शिक्षण घेतल्याने ती मुलं स्वत:विषयीच्या तयार झालेल्या अवास्तव संकल्पना बाजूला ठेवून पुढे समाजात मिसळतील का इथपासून शंका येते. बरं, भारताच्या तुलनेने अमेरिका हा श्रीमंत देश आहे. तिथली पाश्चात्य संस्कृती ही मुळातच व्यक्तिकेंद्रित आहे. त्यामुळे तिथे अशा संकल्पनांनी जोर धरला तरी त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने तसा फरक पडत नाही; उलट ते पोषकच ठरते. पण भारतासारख्या पदोपदी विषमतेच्या दर्‍यांचं दर्शन होत असलेल्या कुटुंबकेंद्रित, समाजकेंद्रित संस्कृतीमध्ये अशा प्रकारे सामाजिक विषमतेमध्ये वाढीस भर घालणारी आणि व्यक्तिकेंद्रित संस्कृतीकडे नेणारी पद्धत कितपत सयुक्तिक आहे? होमस्कूलिंग ही संकल्पना जरी चांगली आणि परिणामकारक वाटत असली तरी आपल्या देशातील एकूण परिस्थिती बघता तिचा आपल्या देशात विस्तार होणं अवघडच आहे. काही मोजकी धनिक आणि उच्चशिक्षित कुटुंबच हे करू शकतील. तंत्रज्ञानातील प्रगतीने आणि त्या अनुषंगाने उपलब्ध व्यावसायिक संधींमुळे आय.टी. आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस त्याचे प्रमाणही वाढते आहे. आय.टी. मधील पालकच आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये घालत आहेत. त्यातील काही जणांना होमस्कूलिंग हा पर्यायही चांगला वाटेल आणि शक्यही असेल. पण इतर मुलांचं काय?

त्या दृष्टीने विचार करता मला ’शिकतं घर’ ही संकल्पना आपल्या देशाच्या नाळेशी घट्ट नाते सांगणारी वाटली. ह्यात सुद्धा जागरूक आणि सुशिक्षित पालक यांचाच सहभाग आहे. मग इतर मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्या देशात सुद्धा महाजालाचा (इंटरनेटचा) वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मग प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या शाळांनीच या तंत्रज्ञानाचा वापर का करून घेऊ नये? तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे. याचा उपयोग आपल्याला महाकाय लोकसंख्या आणि प्रचंड विषमता असलेल्या देशात करता आला तर खूप चांगले होईल. तंत्रज्ञान, संगणक यांचा वापर शालेय स्तरावर करणे याचा अर्थ शिक्षकांची जबाबदारी किंवा काम कमी करणे असा होत नाही. उलट शिक्षकांनी पूरक म्हणून त्याचा विचार करावा आणि स्वत:चा अधिक विकास घडवून आणावा असे वाटते. संगणक आणि महाजाल याचा सयुक्तिक वापर खरंतर आपल्या देशातील शहरी-ग्रामीण, गरीब- श्रीमंत यांमधल्या शैक्षणिक दर्जातील दरी कमी करण्यास मदतगार ठरू शकते. शैक्षणिक दर्जा सुधारणे हे सर्वस्वी आपल्या हातात (जनतेच्या) आहे. आपण जर उत्तमतेचा ध्यास घेतला आणि उत्तमतेची कास धरली तर दर्जा घसरण्याऐवजी वाढेलच यात शंका नाही. डी-स्कूलिंग, होम स्कूलिंग सारख्या संकल्पना जरी चांगल्या आणि परिणामकारक वाटल्या तरी त्याचे दूरगामी आणि आपल्या संस्कृतीवर होणारे परिणाम आणि आपल्या विषमतेने भरलेल्या समाजात त्याचा परिणामकारक विस्तार कितपत होवू शकतो यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाटते.

गुलमोहर: 

घरच्या घरीच शिक्षण - खरंच सर्वसमावेशक होईल का? >>> मला वाटतं " नाही" , शिक्षण हे पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादीत न राहता मुलांच्या सर्वागीण विकासाचाही विचार होणं तितकचं गरजेचं आहे, त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांनी शाळेत मोकळ्या वातावरणात शिक्षण घेणं गरजेचं आहे असं मलावाटतं . तुम्ही मुलांचं घरच्या घरी शिक्षण करु शकाल पण त्यांनी बाहेरचं जग बघणही तेवढचं महत्वाच आहे. ( कदाचीत त्यामुळेच पुरातन काळातही राजपुत्रांना घरी न शिकवता आश्रमात शिकण्यासाठी पाठवतं असावेत.)
अमेरिकेत ही संकल्पना राबविणारे पालक सुद्धा एकेक विषय शिकवायला स्वतंत्र शिक्षक ठेवतात. >>> बिलिनेयर्स च्याबाबतीत कदाचीत हे शक्य असेल , पण अगदी मिलिनेयर्सनाही हे कितपत परवडेल शंकाच आहे ?
बाकी लेख चांगला आहे.

आमच्या ओळखीची जी मुलं होमस्कूल्ड आहेत ती सर्व होमस्कूल ग्रुपचा भाग होती. त्यामुळे सर्व पालक आलटून पालटुन वेगवेगळे विषय शिकवायचे. शाळेचा वर्ग १८-२२ मुलांचा असतो त्या ऐवजी ८-१० मुलं एकत्र शिकतात.तसेच काही विषय शिकायला किंवा हायस्कूलसाठी यातील मुलं सरकारी शाळेतही जायची. सॉकर, बेसबॉल वगैरे टिम्स मधे खेळायची. जोडीला स्काऊट, 4-H वगैरेत सहभाग असायचा. त्यामुळे सर्वांगिण विकास व्हायला फारशी अडचण आली नाही. यातील काही मुलं गिफ्टेड असल्याने २-३ ग्रेड स्किप करुन हायस्कुल पास झाली. काहींच्या बाबतीत पालकांची धार्मिक मते हे होमस्कुलिंगचे कारण होते तर काहींच्या बाबतीत शाळेने हायपर किंवा तत्सम शिक्का मारला तेव्हा होमस्कुलिंग असे होते. या पालकांपैकी कुणीही धनिक नाहित, मध्यमवर्गीय आहेत. सर्व मुले आपल्या आवडीच्या विषयात कॉलेजचे शिक्षण घेत आहेत. २००८ च्या निवडणूकांसाठी माझ्या मुलाबरोबर काही होमस्कुल मुलं युथ जर्नालिस्ट म्हणुन होती. टिम प्लेयर म्हणून ती कुठेच कमी पडली नाहित.
माझ्या मुलासाठी आम्हालाही होमस्कुलिंगचा सल्ला दिला गेला होता. पण माझ्या मुलाला ते नको होते. प्रीस्कुल ते पहिली पॅरोकिअल शाळा करुन नंतर त्याने सरकारी शाळेत प्रवेश घेतला. माझ्या मुलाचा सरकारी शाळेचा अनुभव इतका छान होता की पुढल्या वर्षी त्याच्या बर्‍याच मित्रमैत्रिणींनी पॅरोकिअल शाळा सोडून सरकारी शाळेत प्रवेश घेतला.

शांतीसुधा,

शाकाहार नंतर वाचलेला हा तुमचा दुसरा लेख! माफ करा, पण तुम्ही इतके मोठे लिहिता की मी तरी पहिल्या दोन उतार्‍यांनंतर (आता या 'लेखा'तील रवींद्रनाथांना घरी शिकवायला कुणीतरी आले यानंतर) वाचूच शकत नाही. (एक वाक्य मात्र आठवते की लोकसत्तातील काही लेख वाचून आपल्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरुवात केली.)

कृपया पुढच्या प्रतिसादात इतकेच लिहिता का?

१. घरच्या घरी शिक्षण असावे असे तुम्हाला म्हणायचे आहे की नसावे असे?

२. की तुम्हाला हेच पब्लिकला विचारायचे आहे?

धन्यवाद! Happy

-'बेफिकीर'!

कुठल्याही संकल्पनेला विरोध करण्याआधी ती राबवू देऊन तिचे परिणाम पाहणं योग्य. त्या आधी मतमतांतरं जाणून घ्यायला विरोध नसावा. अर्थात शिक्षण हे व्यक्तिविकासासाठी, ज्ञानार्जनासाठी न राहता अर्थाजर्नासाठी झाल्याने आजच्या सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत. खूप पूर्वी गुरूकुल पद्धतीत दिलं जाणारं शिक्षण आजच्या काळात टाकाऊ आहे. तो अभ्यासक्रम शिकलेला विद्यार्थी स्पर्धेत कुठंही उतरणार नाही. पण त्याने जे शिक्षण घेतलं ते त्या काळच्या सामजिक परिस्थितीनुसार जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण प्रगल्भ करणारं, सांस्कृतिक आणि राजकिय भान देणारं नक्कीच होतं. ज्याची वानवा आजच्या शिक्षणात आहे.

व्यावसायिक शिक्षण आणि संपूर्ण व्यक्तिविकासातून जबाबदार नागरिक घडवणारं शिक्षण हा वाद चालत राहणार आहे. गुरूकुल पद्धतीत शिक्षक त्या विद्येत पारंगत असणं आणि मुलांशी त्याची प्रिक्वेन्सी जुळलेली असणं या गोष्टी मला महत्वाच्या वाटतात.

मी इंजिनियरिंगला असताना शिक्षक लिहून द्यायला सुरूवात करीत किंवा फळ्यावर एक आकृती काढून सिलॅबस पूर्ण करायच्या मागे लागत. त्यात ना आत्मियता होती ना कळकळ. शिक्षक नक्कीच विषयात तज्ञ होते पण कसं शिकवावं हे त्यांना माहीत होतं कि नाही सांगता येत नाही. एक दिवस त्यांनी इग्निशन सिस्टम शिकवायला सुरूवात केली. तेव्हां एक विद्यार्थी उठून उभा राहीला आणि मला काहीच समजत नाही कृपया इग्निशन सिस्टमचं मॉडेल किंवा चित्र तरी दाखवा म्हणू लागला. शिक्षक म्हणाले इतरांना समजतय तुला काय प्रॉब्लेम आहे ? बाकिच्यांना काय तीन तीन डोळे आहेत का ?

चांगल्या कॉलेजातली ही कथा,तर घरी हा अभ्यास शिकवायचा.. तर इन्फ्रास्ट्रक्चर अभावी कसा शिकवणार हा एक प्रश्न मनात उभा राहतो खरा. मटेरियल सायन्स सारखा विषय आम्ही कॅण्टीनला गप्पा मारत शिकलो. त्या विषयाचे सर फक्त लिहूनच द्यायचे म्हणून लेक्चरलाच बसलो नाही. उलट मुलांशी गप्पा मारत कॅण्टीनमधे चहा पीत, मुली पाहत शिकल्यामुळे आम्ही त्या विषयात टॉपर होतो. लेक्चरला बसून बोअर झालेल्यांना निम्मेसुद्धा मार्क्स नव्हते. असा विषय घरी शिकायला चांगला.

इतिहास, भूगोलासाठी शाळेत जायची गरज नाही. पण इतिहासाची साधने कशी हाताळावीत हे शिकायला गुरूच हवा. संगीत शिकायला गुरूच हवा. समाजात मिसळल्याने जे भान येतं ते घरात बसल्याने मिळत नाही हा मुद्दाही सर्वमान्य आहेच. जगाच्या शाळेत मिळालेलं ज्ञान अ‍ॅकेडेमिक सिलॅबसमधे मिळू शकत नाही. दोन्हीची सांगड घालणं गरजेचं आहे.

हे कसं होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

घरच्या घरीच शिक्षण - खरंच सर्वसमावेशक होईल का >>>>>

शिर्षकच चुकिचे आहे. " घरच्या घरीच शिक्षण " आणी " सर्वसमावेशक " या दोन्ही गोष्टी विरोधाभास आहेत.

तुमचा लेख खुपच गोंधळलेला वाटतो आहे. तुमचा विचार मला तरे कळला नाहि. तुमचे मत काय आहे ते स्पष्ट शब्दात मांडा मगच चर्चा करता येइल

घरच्या घरी शिक्षण म्हणजे शिकुनही 'बाजीराव अडाणी'.

पण तुम्ही इतके मोठे लिहिता की मी तरी पहिल्या दोन उतार्‍यांनंतर (आता या 'लेखा'तील रवींद्रनाथांना घरी शिकवायला कुणीतरी आले यानंतर) वाचूच शकत नाही. >>> सहमत.

मी हा लेख पाहुन सुरुवातीचा पहीला, मग मधला, मग शेवटचा असा 'भागां'त वाचला. आणि मग सुरुवातीचे प्रतिसाद पाहुन समजुन घेतले काय म्हणायचे आहे ते.

(शाकामांसाहार लेख मी खालुन वर वाचला होता....प्रत्येक प्रतिसादाअंती असा... )

श्री आणि स्वाती, प्रतिसादाबद्धल धन्यवाद. अमेरिकेत आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना होमस्कूलिंग परवडते (म्हणजे पालकांनीच घरी शिकवणे) मी ज्या होमस्कूलिंगचा उल्लेख केला (अमेरिकेच्या धनिक वर्गाच्या बाबतीत) तो घरीच प्रत्येक विषयाला वेगवेगळा ट्युटर बोलावणे यादृष्टिने. अमेरिकेतील मध्यमवर्गीय (तुम्ही उल्लेखलेले भारतीय) हे नक्कीच उच्चशिक्षीत असणार. त्यामुळे घरी मुलांना नक्की काय आणि कितपत शिकवायचं हे ठरवणं सहज शक्य होत असणार. माझा प्रश्न हा भारतातील सर्वस्तरातील विद्यार्थांसाठी आहे. होमस्कूलिंग करून सुद्धा जर मुलं व्यव्सथीत सोशलाईज (आम्हीच फक्त शहाणे या कॅटेगरीत गेली नाहीत) झाली हे ऐकून छान वाटलं. हे घरातील संस्कारांचे परीणाम आहेत. कारण काही मुलं अगदी रेग्युलर शाळेत जाऊन सुद्धा आम्ही म्हणजे कोण आणि किती शहाणे असेच वागतात. तो सुद्धा घरातील संस्कारांचाच एक भाग आहे.
आपले याबाबतीतले अमेरिकेतील आपले अनुभव शेअर केल्याबद्धल धन्यवाद!

मी हा लेख पाहुन सुरुवातीचा पहीला, मग मधला, मग शेवटचा 'पॅरा', असा 'भागां'त वाचला >>>

छान आहे. अशुद्ध लिहिले असतेत तर प्रश्न निर्माण झाले असते. उदा. भागांत एवजी भांगात! Wink

हलकेच घ्या!

बेफिकीर, चाणक्य, चातक, मोठा लेख वाचायचा नसेल तर कोणीही सक्ती केलेली नाही. त्यामुळे वाचला नाहीत तरी चालेल.
आपण ज्या पद्धतीने प्रतिक्रीया देता याचं मूळ कारण आपल्या लेख वाचनाच्या पद्धतीत आहे.....हे आपल्याच प्रतिक्रीयेत स्पष्ट केल्याबद्धल धन्यवाद. अशाप्रकारे वाचन करणार्‍या वाचकांकडून तुम्ही ज्या पद्धतीच्या प्रतीक्रीया देत आहात तशीच अपेक्षा आहे. माफ करा, माझीही अशा प्रतिक्रीयांवर येवढीच प्रतिक्रीया आहे. Happy

श्री आणि स्वाती, प्रतिसादाबद्धल धन्यवाद >>> जे तुमच्या लेखावर टिका करतात त्यांनाही धन्यवाद दिला तर बरे होइल. नाहितर मग लिहुच नका सोशल साइटवर. जे टिका करतात त्यांच्यामुळे टीआरपी वाढतो खरे तर!

@ चाणक्य, आपला खरंच एक मोठा प्रॉब्लेम आहे. आपण लेखच नाही तर प्रतिसाद सुद्धा नीट वाचत नाही. माझ्या प्रतिसादामध्ये शेवटून दुसरी ओळ धन्यवादाचीच आहे. Happy

खरंतर वरील प्रतिक्रीयेत मी नावं न लिहीता फक्त टीकाकार असंच लिहायला हवं होतं. कारण तुमच्यासारख्या टीकाकारांना नावं नसतात. माझ्या लेखावर टीका करूनका असं मी कधीच म्हणाले नाहीये. फक्त टीका करताना लेख नीट वाचा, उगाच प्रतिक्रीया आपल्याला वाटेल त्या गोष्टीकडे भरकटत नेऊ नयेत.
टीकायुक्त किंवा टीकेवीना असलेल्या आणि भरक्टलेल्या प्रतिक्रीयांना उत्तर देण्यास लेखिका बांधील नाही.
टीकाकारांना लेखाचे टीआरपी वाढतील याची चिंता असेल तर कृपया त्यांनी प्रतिक्रीया देऊ नयेत....म्हणजे टीआरपी वाढणार नाही.
@बेफिकीर, माझा रेशीमगाठी हा लेख फार लांबलचक नव्हता. अर्थात तसाही फारसा उपयोग झालाच नसता.....तुम्ही ज्या पद्धतीने लेख वाचता त्यावरून म्हणते आहे.
एकूणच काय टीकाकारांना सुद्धा मोठा धन्यवाद.......(आधीच्या प्रतिक्रीयेत दिसला नाही म्हणून हो.)! Happy

लेख विचारप्रवर्तक आहे.
जेंव्हा एखादा धागा संवादाची सुरुवात करण्यासाठी केला जातो तेंव्हा लेखक विचारपूर्वक स्वतःचे मत देण्याचे टाळतो.या प्रकारात मोडणारा हा लेख आहे.
त्यामुळे अधिक चर्चा व्हावी हे योग्य नाही का?

@ रेव्यु, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत. पण इथल्या काही लोकांना फक्त वाद-चर्चा-हुज्जत यातच रस आहे. ते कंपू करून लेखावरअ‍ॅटॅक करतात. मग लेखकाने त्यांच्या असंबद्ध प्रतिक्रीयांना प्रतिसाद दिला नाही की एकमेकांच्याच प्रतिक्रीयांवर प्रतिक्रीया देत बसतात. वर पुन्हा लेखकाच्या नावाने ओरड......टीआरपी वाढवण्यासाठीचा लेख वगैरे! गंमतच आहे. Happy

मी टीका केलेली नाही. मी आपल्याला एक शंक विचारली होती. आणि माझे हासणे हे एका प्रतिसादावर होते. प्रतिसादावर हासायला येथे स्वातंत्र्य असावे असा अंदाज अहे माझा!

Happy

मोठा लेख वाचायचा नसेल तर कोणीही सक्ती केलेली नाही. त्यामुळे वाचला नाहीत तरी चालेल.>>> अहो रागावलात...का..? मत प्रदर्शन केले आहे फक्त....यात इतकं रागवण्या सारखी बाब काय...आपले हात तर धरले नाहीय टंकण्यापासुन...वाचकांचा ही विचार व्हावा इतकंच मत. Happy

**
अशाप्रकारे वाचन करणार्‍या वाचकांकडून तुम्ही ज्या पद्धतीच्या प्रतीक्रीया देत आहात तशीच अपेक्षा आहे. >>> किती हा राग मना सारख्या प्रतिक्रिया नाही आल्या म्हणुन.

पण याने होत्याचे नव्हते होणार आहे का? घरातल्या घरात शिकवुन डबक्यातील बेडुक बनवायचे का मुलांना.. मॅडम? शिकली तरी पुस्तकी ज्ञान. ज्याचा उपयोग पैशासाठीच. (अमेरीकेत असायला हरकत नाही...तेथील स्थानीक लोकं आपल्याहुन कैकपटीने पुढे आहेत... आतुन-बाहेरुन... सांगण्याचा अर्थ थोडक्यात समाजा...., आणी आपण अजुनही रामायण महाभारत घेउन आहोत..(बाहेरुन दाखवण्यासाठी तरी))

बाहेरील जग ही खरी शाळा. जिवनात आलेल्या सुख-दुखांच्या प्रसंगांना कसे सामोरे जावे हे शिकवणारी. अशा वयांत मुलांना या जगाची जाणीव होणेही अत्यावश्यक आहे. असे मला तरी वाटते.

बेफिकीर आपण स्वतः तर खुप मोठमोठ्या कादंबर्‍या लिहिता, आपल्याला हा लेख मोठा वाटला याचे जरा आश्चर्य वाटले.

घरच्या घरी शिक्षण दिल्यास
-सहजीवनाच्या फायद्यास पाल्य मुकेल
-आयुष्यास सामोरे जायला जो कणखर पणा हवा तो बहुतंशी येणार नाही
-युनिफॉर्मिटी रहाणार नाही-अर्थात ती हवी का ,हा मुद्दा ही तितकाच खरा!!
-खर्च??
-कॉमन फॅसिलिटिज??

महेश,

उत्तम प्रश्न! आवडला.

१. लेखक व वाचक म्हणून भूमिका भिन्न असू शकतात.

(मग हे तुम्हीच म्हणताय तर येथे प्रतिसाद देताना ते लक्षात आले नाही का असा तुमचा प्रश्न असल्यास)

२. लेखन असे असावे की पहिल्या दहा ओळीत वाचकाचे मन रंगले पाहिजे. हे निदान मी तरी 'लेखन करताना' कटाक्षाने पाळतो. जेथे मनच गुंतत नाही तेथे मनात मुळातच एक विरोधी भावना निर्माण होते वाचताना! (मी माझे लेखन तसे करतो हे म्हणताना त्यातही सापेक्षतावाद आहेच हेही मान्य आहेच ). वरील लेखात मनच रंगत नाही.

म्हणूनच माझे आपले गरीबाचे म्हणणे असे आहे की कोणतीही साहित्यकृती ही किमान रंजक असायलाच हवी. उगाचच ' फक्त ' पाल्हाळ, अती जड शब्दांच्या आकर्षणातून आलेले 'फक्त' उतारे वगैरेपासून सावध राहावे लेखकाने!

आता मी 'लेखकाने' असे म्हणत आहे तेव्हा मी स्वतःला लेखक समजत आहे असे मुळीच नाही.

Happy

-'बेफिकीर'!

बेफिकीर आपण स्वतः तर खुप मोठमोठ्या कादंबर्‍या लिहिता, आपल्याला हा लेख मोठा वाटला याचे जरा आश्चर्य वाटले.
>>> महेश कमाल आहात Lol कथा, कादंबर्‍या या मोठ्या लांबलचकच असतात हो... चांगल्या शेपाचशे पानाच्या Biggrin

माफ करा पण रहावलं नाही Lol

महेश, आणखीन एक म्हणजे कादंबरी हे कथाकथन आहे व हा धागा चर्चेचा! आपण जर धाग्याच्या सुरुवातीचा पॅरा पाहिलात तर 'कोणत्या कारणांनी काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरुवात केली आहे' हे सांगण्यासाठी तो वापरला आहे. कदाचित ते लिहिलेच नसते तर? तरी चालले नसते का?

मला आपली तुलना काहीशी गफलतीची वाटली.

चांगल्या विषयाला सुरवात केली आहे.
पण देशात होम स्कुलिंग चा पर्याय आहे का? म्हण्जे घरीच अभ्यास करून फक्त वार्षिक परीक्षेला किन्वा डायरेक्ट १० वीच्या परीक्षेला बसणे शक्य आहे का? नाहीतर केवळ होम स्कुलिन्ग केले तर त्या शिक्षणाला बाहेरच्या जगात 'मान्यता' कशी मिळेल?
बाकी होम स्कुलिन्ग हे उच्चशिक्षित पालकांनाच शक्य आहे, हे पटले.

@ रेव्यु, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत. >>> शांतीसुधा आपण सैरभैर झाला आहात्..जरा शांत व्हा..! रेस्ट घ्या....आपण प्रतिसादकांवरच टिका करणे सुरु केले आहे.

खरंतर वरील प्रतिक्रीयेत मी नावं न लिहीता फक्त टीकाकार असंच लिहायला हवं होतं. >> माझ्या कोण त्या प्रतिसादात आपल्याला 'टिका' आढळली दाखवुन द्या. भरकटुन उगाच काहीतरी खरडु नका.

कृपया दाखवुन द्या....आढळल्यास मी इथे प्रतिसाद देणे थांबवेन..!

ते कंपू करून लेखावरअ‍ॅटॅक करतात. >>> जर तुम्हि मी आणी बेफिकिर किंवा मी आणी चातक यांचा कंपु आहे असे म्हणत असाल तर तुमचा मोठा गैरसमज आहे.

<<शिर्षकच चुकिचे आहे. " घरच्या घरीच शिक्षण " आणी " सर्वसमावेशक " या दोन्ही गोष्टी विरोधाभास आहेत.>>आनुमोदन.
माझ्या मते आपण सारे शाळा शिकुनच आज या स्टेजला आहोत ना? फक्त काही विषय आणि दोन चार एक्टीवीटिज येवढीच म्हणजे शाळाका? शाळेतले वर्ष भराचे एक्टीवीटिज आणि त्याचा मुलांन वर होणारा व्यक्तिमत्व विकास. याचा वीचार करा.
र्वगाच मॉनेटर होण्,निबंध,शुध्द लेखन,व़क्रुत्व्,चित्रकला,खेळ या आणि अश्या अनेक शाळेतल्या स्पर्धा आणि शाळेचे प्रतिनीधीत्व करुन अन्य शाळांमधे जाउन केलेल्या स्पर्धा. हे सगळ मुलांना घरी मिळणार आहे का?

तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे. याचा उपयोग आपल्याला महाकाय लोकसंख्या आणि प्रचंड विषमता असलेल्या देशात करता आला तर खूप चांगले होईल.>>>

सुंदर कल्पना! खरच लेख चांगलाच आहे. पण तरीही अशा चर्चा अंतिमतः चर्चा व वादावादी यातच आटोपतात हे नैराश्यही तातडीने आलेच मनात!

-'बेफिकीर'!

पण देशात होम स्कुलिंग चा पर्याय आहे का? म्हण्जे घरीच अभ्यास करून फक्त वार्षिक परीक्षेला किन्वा डायरेक्ट १० वीच्या परीक्षेला बसणे शक्य आहे का? नाहीतर केवळ होम स्कुलिन्ग केले तर त्या शिक्षणाला बाहेरच्या जगात 'मान्यता' कशी मिळेल?>>

यावरच त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे की तंत्रज्ञानाच्या (संगणकीय तंत्रज्ञान) सहाय्याने सर्वदूर पोचावे व सर्वांना शिक्षण द्यावे. पण यात अडचणी येणारच म्हणा!

शाती सुधा मी सांगीतलेले मुद्दा/मुद्दे हे आपल्याला पुढील अनेक प्रतिसादांत..., खरे म्हणजे खुप जणांनाच ते मान्य असेल असे दिसतील. आणि मला माहीत आहे आपल्याला ते पटणार नाही. कारण आपला 'कल'
हा घरच्याघरी शिक्षणावर आहे. मनातुन आपल्याला यालाच अनुमोदन द्यायचे आहे.

शांतीसुधा हे मान्य करा... ना...की तुम्ही घरच्याघरी शिक्षण पध्दतीच्या पक्षाने आहात्...काय हरकत आहे. मग बघु काय नुकसान आणि काय फायदे ते.
प्रतिसादाकां बरोबर सगळा वाद तुमचा यासाठीच आहे. आणखी काही नाही.

Pages