बासुंदी लागली आहे, वास कसा जाईल?

Submitted by चारूता on 1 July, 2011 - 18:15

आताच ४ तास आटवून बासुंदी केली, पण तळाला लागली आहे Sad , तर वास जाण्यास काय करु?

वेलदोडा पूड घातली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही केल्या हा जळका वास जात नाही असा अनुभव आहे Happy
जरासा कमी झाला तरी खाल्ल्यावर एक विचित्रशी आफ्टर टेस्ट राहातेच.

काही केल्या हा जळका वास जात नाही असा अनुभव आहे Happy
जरासा कमी झाला तरी खाल्ल्यावर एक विचित्रशी आफ्टर टेस्ट राहातेच.

चारुता, बासुंदी अजुन टाकुन दिली नसशिल किंवा काही दुसरे प्रयोग त्यावर क्लेल नसशिल तर हे करुन बघ,

एका ओव्हनप्रुफ डिशला बटर्/तुपाचा हात लावुन त्यामधे पावाचे स्लाईस कडा काढुन त्रिकोणी कापुन लेयर्स मधे अरेंज कर.
ज्या प्रमाणात बासुंदी असेल त्या प्रमाणात १-२ अंडी हलकी फेटुन घे.
या फेटलेल्या अंड्यात बासुंदी मिक्स कर.
यात जरा जास्तच जायफळाची पुड घाल.
हव तर थोडी साखर घाल.
हे मिश्रण पावाच्या लेयर्सवर ओत. वरतुन थोडी रॉ शुगर भुरभुरव आणि बेक कर.
शाही ब्रेड पुडिंग म्हणुन खपव Happy
अंड घातल्यामुळे जळका वास खुप्पच कमी होईल.
तुला हव तर ब्रेड स्लाएसेस ना बटर लावु शकतेस पण जरुरी नाही.
यात तुला हवे तर थोडे बेदाणे, बदामाचे काप वगैरे घालु शकतेस.
जायफळाऐवजी आमंड इसेन्स पण घालु शकतेस. पण जायफळच छान लागेल Happy

एकदा मी अशी लागलेली बासुंदी मुगडाळीच्या शिर्‍यात (दुधाऐवजी) घालुन संपवली आहे. आता प्रमाण वगैरे काही आठवत नाहीये!

इथे कोणीही येऊन वोट करु शकतं का:?? की फक्त गृप सदस्य?

सकाळी पॉझिटीव्ह असलेली पोस्ट्स आता -३ वगैरे Uhoh

फन्नीच वाटतय जरा Lol

चारुता, प्लीज काय केलस आणि तो उपाय लागू पडला का ते सांग ना लवकर्,कारण मी आत्तच कस्टर्ड केल आणि ते खाली लागलं आहे आणि जळका वास येतो आहे Sad

शूम्पी , काही केल तरी वास गेला नाही. caramel dessert चा प्रयोग केला तरी आफ्टर टेस्ट राहीलीच (saati ने सान्गितल्यासारखे) आज खोबरं घालून वड्या करेन बहुतेक.