निरोप
ठीक आहे तर, आता आपल्या वाटा वेगळ्या
तू पूर्वेकडे जा, मी पश्चिमेकडे...
हो! चुकूनही भेट व्हायला नको पुन्हा...
आता मोठ्ठे झालोत ना आपण?
क्षणात कट्टी..क्षणात बट्टी करायला,
लहान का आहोत आता?
असं करु यात.. सीमारेषाच आखू यात,
हा भाग तुझा, तो भाग माझा..
वाटून घेऊ सगळं..
तू माझ्या भागात यायचा नाहीसच,
(आणि मला तुझ्या भागात यायची बंदीच आहे)
ए, पण तुला खरं सांगू का?
आपल्या दोघांमधलं नातं..
च्च! नातं म्हणलेलं चालेल ना?
अंऽऽ! किंवा असं म्हणू यात..
कुठलंही नातं, असं 'संपलं' म्हणून संपतं,
यावर माझा खरंच विश्वास नाहीये..
तू मला विचारलंच नाहीयेस म्हणा, असो.
तर कुठे बरं होतो आपण... हं सीमारेषा..वाटणी
तर कुठून बरं सुरुवात करु यात?
या किबोर्डपासून... चालेल?
आपण चॅट करायचो तेव्हा,
आपल्यात "बॅकस्पेस" वापरायची बंदी होती
ती आता वापरायला शिकेन मी.. लागेलच वापरायला
माघार घ्यायला तुच शिकवलंस ना मला अखेर..?
मग ठरलं तर "बॅकस्पेस" माझ्याकडे..
बाकी सगळाऽऽ किबोर्ड तू घे
अरे हो! "स्पेस" कि खूप मोठी आहे..
ती विभागून घेऊ यात का?
थोडी "स्पेस" देशील मला? थोडी..?
तू ज्या ठीकाणी माझी वाट पहात थांबायचास,
तो रस्ता टाळणं शक्यच नाहीये..
पण त्या रस्त्याच्या तो तेवढाच भाग,
तो तुझ्याकडे घे..
या इमारतीतली ती खिडकी,
जिथून 'ती' जागा दिसते ती पण तुझ्याकडेच ठेव,
म्हणजे पुन्हा चोरुनही तुझी वाट मी पाहू शकणार नाही..
अरे हो! तुला सांगितलं नव्हतं मी.....पण..
तुझ्यासाठी एक भेट आणून ठेवली होती..
तुझ्यासाठी वाढदिवसाचं सरप्राइज गिफ्ट..
ते ....जाऊ देत....
ते गाणं? तू मला दिलं होतंस भेट म्हणून?
तू परत मागितलं नाहीस..
पण आता ते माझ्यासाठी नसेल ना..?
ते तुला परत करु ना? म्हणजे...
डीलीट करुन टाकेन माझ्या मशिनवरुन..
तू दुसर्या कुणाला देऊ शकशील.....
तुझ्या कानात अजूनही घुमत असतील..
माझे काही चुकार शब्द, माझे उसासे तर..
हुसकावून लाव त्यांना..
तू परवा माझ्या स्वप्नात आला होतास..
असू दे, असू दे, चुकून असेल ते..त्याचं काय एवढं?
तुझ्या माझ्यातलं ते कनेक्शन...
ते तोडायची रिक्वेस्ट कुणाकडे पाठवायला लागेल रे?
कुठला फॉर्म भरायला लागतो त्यासाठी तेवढं सांग फक्त..
आणखी एक..जाता जाता तुला एक विनंती करायची होती,
तो रस्ता, जिथे सिग्नलला गजरेवाला उभा असतो..
तो तेवढा तुझ्याकडे घे..
मोगरा सहन नाही व्हायचा आता..
एवढं करशील ना रे,
तुझ्या एकेकाळच्या जीवलग मैत्रिणीसाठी...?
जाता जाता तुला एकदा कडकडून मिठी मारायची होती..
आणि......असो.
थोडीशी ' मेरा कुछ' ची आठवण
थोडीशी ' मेरा कुछ' ची आठवण झाली.
चांगली आहे.
आई गं!!!!!!!! शुभेच्छा!
आई गं!!!!!!!!
शुभेच्छा!
जबरदस्त!!!! अफाट..!! खूप खूप
जबरदस्त!!!! अफाट..!!
खूप खूप खूप आवडली!!
धन्यवाद
धन्यवाद प्रतिसादाबद्दल..
मिलिंदा हो मलाही 'मेरा कुछ सामान.. ' ची आठवण झाली होती हे लिहीताना..
व्वा...! अफाट.. ग्रेट..!
व्वा...! अफाट.. ग्रेट..!
सुपर्ब आपल्यात "बॅकस्पेस"
सुपर्ब
आपल्यात "बॅकस्पेस" वापरायची बंदी होती
ती आता वापरायला शिकेन मी.. लागेलच वापरायला
माघार घ्यायला तुच शिकवलंस ना मला अखेर..?
मग ठरलं तर "बॅकस्पेस" माझ्याकडे..
बाकी सगळाऽऽ किबोर्ड तू घे
अरे हो! "स्पेस" कि खूप मोठी आहे..
ती विभागून घेऊ यात का?
थोडी "स्पेस" देशील मला? थोडी..?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> हे प्रचंड आवडलं..... सगळीच कविता प्रचंड आवडली................... खूप छान लिहिलय
खल्लास गं मीनू
खल्लास गं मीनू
धन्यवाद मुक्ता, चिमुरी, नीधप
धन्यवाद मुक्ता, चिमुरी, नीधप
मेरा कुछ सामान.. बॅकस्पेस>>>
मेरा कुछ सामान..
बॅकस्पेस>>> केवळ जीवघेणं आहे हे...
अफाट ! >>>अरे हो! "स्पेस" कि
अफाट !
>>>अरे हो! "स्पेस" कि खूप मोठी आहे..
ती विभागून घेऊ यात का?
थोडी "स्पेस" देशील मला? थोडी.
....
तो तेवढा तुझ्याकडे घे..
मोगरा सहन नाही व्हायचा आता..<<<< जबरदस्त !
जीवघेणी. मलाही मेरा कुछ
जीवघेणी. मलाही मेरा कुछ सामानची आठवण झाली वाचताना
मनस्वी... बॅकस्पेस .. मोगरा
मनस्वी...
बॅकस्पेस .. मोगरा ... !!!
प्रचंड आवडल !!!
प्रचंड आवडल !!!
आज्जी भारीच की एकदम...
आज्जी भारीच की एकदम...
मस्त!!
मस्त!!
श्यामली, हम्म जीवघेणं
श्यामली, हम्म जीवघेणं धन्यवाद..
अमल, कविता, गिरीश, स्मित, सात पुर्ण, इन्द्रधनु धन्यवाद!
मस्त मस्त मस्त..
मस्त मस्त मस्त..
क्लासच!!!
क्लासच!!!
तो रस्ता, जिथे सिग्नलला
तो रस्ता, जिथे सिग्नलला गजरेवाला उभा असतो..
तो तेवढा तुझ्याकडे घे..
मोगरा सहन नाही व्हायचा आता..
आणि बॅकस्पेस..जबराट!
खूप दिवसानंतर आज मायबोलीवरची
खूप दिवसानंतर आज मायबोलीवरची कविता वाचली.
मीनू, तू जुनीचं मीनू का? की नवीन आहे इथे? असो..
ही कविता "यावर माझा खरंच विश्वास नाहीये.." इथेचं संपायला हवी होती. नंतर फार पोरकट झाली. पण छान आहे.
हो रे बी मी
हो रे बी मी मीनूच.
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद