मृत्यूचा ये गाव मनोहर! (साती)

Submitted by साती on 30 June, 2011 - 01:27

कैलासरावांचा उपक्रम चालू ठेवल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद बेफिकीर!

माझाही एक प्रयत्न -

आवरता बघ आवरतो का,जगण्याचा हा वेग अनावर
श्वासाचा मी ब्रेक दाबता, मृत्यूचा ये गाव मनोहर ||१||

शिफ्ट संपली या जन्माची,तरी होइना मुक्त ड्रायव्हर
चक्र फिरे चौर्‍यांशी योनी, टाक नव्याने पहिला गीयर ||२||

फसवे जग हे बावन पानी,बदाम सत्ती राणी किलवर
राजाला बाजूला सारे, बाजी मारे फसवा जोकर ||३||

असते नित्यच क्षुल्लक कारण,येण्याला हमरीतुमरीवर
फुटून जाते परत एकदा,माझे कोपर तुमचे ढोपर ||४||

प्रश्न कळीचे दाबुन ठेवा, हाती द्या आरक्षित गाजर
तुम्हांस पडल्या नाहित भेगा, तुम्हा कशाला फुटेल पाझर ||५||

स्वतःच घसरा सालीवरुनी, पाय टाकण्या जाता भरभर
गप्प उभी मी बाजूला तर, माझ्यावरती उगीच खापर ||६||

मी बोलावे लटके काही ,'नेमक्यांस' ते सले आतवर
ते सर्वांना सांगत फिरती, साती आहे किती अगोचर ||७||

********************************************************************************

तरही द्यावी ऐसी देवा, वृत्त असावे साधे सुंदर
गझलेचा या घाट घालण्या, किती बसावे लिहित पानभर || *||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तरही द्यावी ऐसी देवा, वृत्त असावे साधे सुंदर
गझलेचा या घाट घालण्या, किती बसावे लिहित पानभर || *|| Happy छान.....

चक्र फिरे चौर्‍यांशी योनी, टाक नव्याने पहिला गियर ||२|
इथे अध्यात्मातून रोजच्या जगण्याच्या कृत्रीमतेत उडी घेतल्यासारखे वाटले and vice a versa .इथे एक मात्रा कमी आहे का? आशय चांगला.

होतकरू, धन्यवाद!
ही तरही असल्याने दुसरी ओळ तरही सूचविणार्‍यांने दिलेलीच वापरण्याचे बंधन असते.

सगळयांना धन्यवाद!
भुंगा क्षुल्लक बदल करत आहे. Happy
बेफिकीर,तुम्ही कैलासरावांनी काढलेल्या तरहीच्या पानावर प्रतिसाद दिलाय.
तिथेच गझल पहिल्यांदा लिहिली होती.

तेथला प्रतिसाद येथे पेस्ट करत नाही, पुन्हा वाचली.

फसवे जग हे बावन पानी,बदाम सत्ती राणी किलवर
राजाला बाजूला सारे, बाजी मारे फसवा जोकर >>

वा वा!

असते नित्यच क्षुल्लक कारण,येण्याला हमरीतुमरीवर
फुटून जाते परत एकदा,माझे कोपर तुमचे ढोपर ||४||

स्वतःच घसरा सालीवरुनी, पाय टाकण्या जाता भरभर
गप्प उभी मी बाजूला तर, माझ्यावरती उगीच खापर ||६||

मी बोलावे लटके काही ,'नेमक्यांस' ते सले आतवर
ते सर्वांना सांगत फिरती, साती आहे किती अगोचर

Lol

एकदम विदारक सत्ये! मतलाबंद गझल! खाली पाहा:

आवरता बघ आवरतो का,जगण्याचा हा वेग अनावर
श्वासाचा मी ब्रेक दाबता, मृत्यूचा ये गाव मनोहर ||१||

शिफ्ट संपली या जन्माची,तरी होना मुक्त ड्रायव्हर
चक्र फिरे चौर्‍यांशी योनी, टाक नव्याने पहिला गीयर ||२||

फसवे जग हे बावन पानी,बदाम सत्ती राणी किलवर
राजाला बाजूला सारे, बाजी मारे फसवा जोकर ||३||

असते नित्यच क्षुल्लक कारण,येण्याला हमरीतुमरीवर
फुटून जाते परत एकदा,माझे कोपर तुमचे ढोपर ||४||

प्रश्न कळीचे दाबुन ठेवा, हाती द्या आरक्षित गाजर
तुम्हांस पडल्या नाहित भेगा, तुम्हा कशाला फुटेल पाझर ||५||

स्वतःच घसरा सालीवरुनी, पाय टाकण्या जाता भरभर
गप्प उभी मी बाजूला तर, माझ्यावरती उगीच खापर ||६||

मी बोलावे लटके काही ,'नेमक्यांस' ते सले आतवर
ते सर्वांना सांगत फिरती, साती आहे किती अगोचर ||७||

मी आपले घाईघाईत सुचवले लयीप्रमाणे, एकदा मात्रा मोजून पाहाव्यात सर्व ओळींच्या आणि मगच मी सुचवलेली र्‍हस्व दीर्घ तपासावीत. (शेरांना आकडे कशाला दिलेत ?) Happy

Happy

शुभेच्छा, धन्यवाद व अभिनंदन!

-'बेफिकीर'!

फसवे जग हे बावन पानी,बदाम सत्ती राणी किलवर
राजाला बाजूला सारे, बाजी मारे फसवा जोकर

वाह वाह्...सही ,आवडले

आवरता बघ आवरतो का,जगण्याचा हा वेग अनावर
श्वासाचा मी ब्रेक दाबता, मृत्यूचा ये गाव मनोहर ||१||>>> अप्रतिम गझल!!!! खुप आवडली... शेर न शेर भावला!! Happy