शेअर मार्केट टेक्निकल, डे ट्रेडिंग , शॉर्ट टर्मसाठी ग्राफ

Submitted by जागोमोहनप्यारे on 27 June, 2011 - 09:33

हा शेअर मार्केटसाठी स्वत्म्त्र बीबी आहे.

१. इथे शॉर्ट टर्मसाठी ग्राफ आणि त्याचे इंटर्प्रिटेशन पोस्ट करावे.इन्ट्रा डे टिप्सही इथे चालतील ... ग्राफ बघून उद्याची डे ट्रेडिंग्साठी सजेशन दिल्यासही चालेल .. पण शक्यतो ग्राफ असावा.

२. इन्ट्राडे, शॉर्ट टर्म साठी हे ग्राफ्स उपयोगी पडतील.

३. त्याचा रेगुलर फॉलो अप घ्यावा, म्हणजे आपली दिशा कितपत योग्य आहे, हे कळेल.

४. ग्राफ्स इम्तरनेटवर फ्री उपलब्ध असतात, सोफ्टेअर असल्यास त्याचीही कॉपी दिल्य चालेल. पन ग्राफ महत्वाचा.

५. टेक्निकलचे बेसिक्सही शिकता येतील.

http://www.icharts.in/charts.html साधारण सायंकाळी ७ न्म्तर रोजचा डेटा अपडेट होतो.

आता इथे दोन ग्राफ देत आहे. आजच्या क्लोजिंगनंतर काढलेले ग्राफ आहेत.

१. मार्केट भसा भसा वर गेले.. पण ५३०० च्या आसपास एक गॅप आहे... मार्केट परत ती गॅप भरेल का? पुन्हा ५३०० ला थोड्यच दिवसात मार्केट येईल का?

getImageFromSession.JPG

२. फास्ट स्तॉकॅटिक पार अगदी १०० ला टेकून खाली वाकलं.. आता काय गडगडणार काय..? .. कुणीतरी बघून सांगा रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! स्टोकॅटिक फास्ट व स्लो कसे वापरायचे?

fast stoch.JPG

करेक्शन येईल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार | 27 June, 2011 - 18:18
वा वा जामोप्या आता तू ही गॅप बद्दल बोलत आहेस, चार्टशिक्षण घेतो आहेस ते वाचून बरे वाटले.

गॅप घडायच्या आधी पाहा. बुलिश एनगल्फिंग कॅन्डल आहे, त्याच्या दुसर्‍या दिवशी गॅप अप ओपन होणार हे गृहित असते. त्यामुळे ती गॅप.

मार्केट दोलायमान आहे ते ५३०० च्या खाली परत येणार ह्यात वाद नाही, पण ते गॅप मुळे नाही तर मार्केट मुव्हमेंटमुळे.

दुसर्‍या ग्राफबाबत काय? त्याचा स्लो स्टो. चाही ग्राफ पाहिला आहे, त्यातही ८० ला गेला आहे. पं अजून लोअर साइडकडे क्रॉसिंग नाही आहे. मला तरी वाटते... द पार्टी ईज ओवर ! Happy करेक्शन येणार. ५५५० च्या असपास सेल करणे चांगले.

http://www.in.com/videos/watchvideo-nifty-may-end-june-series-around-535...

बातमी पहता आली नाही. पण हेडिंग आहे.. निफ्टी जून एक्स्पायारी ५३५०.. मोतीलाल ओस्वाल. कुणी पूर्ण बातामी पाहिली तर मेटर इथे सांगा.. बातमी २०११ ची आहे का माहीत नाही

'निफ्टी वीकली ' बीबी कधी सुरु होणार?

टेक्नोइकल अ‍ॅनॅलिसिस मध्ये नेमके काय येते?

१. काही लोक नुसत्या ग्राफवर रंगीत रंगीत रेघा मारतात . कुठलेतरी टॉप, बॉटम जुळवत बसतात. आणि रेषेच्यावर / खाली काही झाले की काय तरी होणार असे सांगतात.

२. इंडिकेटरचा स्टडी करणारे...

2011Jun-CEAT LIMITED-800x600.png

ceat चा हा चार्ट कुणी अ‍ॅनालाईझ करेल का?
माझ्या साठी १०० D अ‍ॅव्हरेजवर पॉझिटीव्ह ब्रेकआउट /हाय वोल्युम डबल बॉट्म सकट मुळे शॉर्ट टर्म बाय वाटतोय ११२ च्या आसपास बाय स्ट्रीक्ट स्टॉप लॉस १०३ आणी टारगेट १२० - ७ त ८ सेशन्स मधे.

निफ्टी चा आजचा चार्ट देत आहे. हा hanging man आहे का ते उद्या कनफर्म होइल.

The Hanging Man is a bearish reversal pattern that can also mark a top or resistance level. Forming after an advance, a Hanging Man signals that selling pressure is starting to increase. The low of the long lower shadow confirms that sellers pushed prices lower during the session. Even though the bulls regained their footing and drove prices higher by the finish, the appearance of selling pressure raises the yellow flag. As with the Hammer, a Hanging Man requires bearish confirmation before action. Such confirmation can come as a gap down or long black candlestick on heavy volume.

Nifty 2.jpg

म्हणजे तुम्ही पहिल्या प्रकारात आहात तर. Happy .. मी दुसर्‍या प्रकाराने काय उत्तर येते ते बघून सांगतो.

१. स्लो स्टोकॅटिक ५० -६० च्या असपास आहे. अजून थोडा वर जाऊ शकेल. पण फार नाही कारण फास्ट स्टो. ९० ला गेला आहे.
२. शेअरची ९०-११० ही मुख्य मूव तर कधीच होऊन गेली. आता फार वर जाणार नाही अजून. १२० जाईल, पण त्यापलीकडे नाही वाटत

निफ्टीचा ग्राफ.. मीही अगदी हाच ग्राफ द्यायच्या विचारात होतो. तो वरचा हँगिंग मॅन काय टेंड दाखवतो ?

समजले.... शेजारी चित्र आहे, त्यात कळले !!!:) वरची माहितीही पाहिली.. ...

मी कालच लिहिले होते... ' असे' होणार असे वाटते म्हणून Proud

पाटील
तुमचे म्हणणे बरोबर वाटते.
सिएट्ने क्लोझ ११०.८. हाय वॉल्युम वर ब्रेक दिला आहे. कारण माहीत नाही. १२२ -१२३ ला रेझिस्टंट वाटत आहे. वॉल्युम टिकला तर काही दिवसातच १२२ दाखवेल.

हा हँगिंग मॅन वाटत नाहि. हँगींग मॅन च्या आधी येक स्टेडी अप मुव्ह नंतर दोन तीन दिवस गॅप अप बुलिश कँड्ल्स आणि नंतर हॅमर असा पॅट्रन असायला हवा. इथे स्टेडी अप मुव्ह दिसत नाहिये मला तरी.

जामोप्या-- इंडीकेटर्स हे कन्प्र्मेटरी म्हणुन वापर्ले जातात , त्यामुळे ओवरलेयस वापरुन किंवा पॅटर्न वरुन आधि टार्गेट काढले जाते . म्हणजे दुसरा प्रकार कारयच्या आधी पहिला प्रकार करावा लागतो. ईंडिकेटर्स मधे सुद्धा अर्ली ईंडीकेटर्स आणी लेट ईंडीकेटर्स असे दोन प्रकार असतात.

....... ..

म्हणजे तुम्ही पहिल्या प्रकारात आहात तर.>>>

मी कुठल्याही प्रकारात नाही. उभ्या, आडव्या रेषा, फारश्या मारत नाही. कारण त्या फार सबजेक्टिव्ह होतात. पण रिट्रेसमेंटचे प्रिन्सीपल बघतो. रेशा मारल्या नाहीत तरी आकडेमोड करता येते. जापनीझ क्यानडल क्वचीत कधीतरी बघतो. त्यावर कमांड नाही. ग्राफस वरून स्विंग ट्रेडींग साठि शेअर सिलेक्ट करताना अजून गडबड होत आहे. ५०% वर यश जात नाहीये. प्रयत्न चालू आहेत.

निफ्टी वर गेला आणि सिअट खाली गेला. Sad प्रत्येक सिस्टिमचे काही प्लस पोइम्ट आहेत आणि काही दोषही आहेत. आता त्यातल्या त्यात यशस्वी करणारा फॉर्मुला/उपाय कोणता ?

तुम्हच्यासारखे एक्स्पर्ट ५० % सक्सेस रेट देतात. मग आमच्यासाराख्या नवशिक्यांचा रेट किती ? Sad

जर स्टॉप लॉस लाउन ट्रेड केले तर ५०% सक्सेस रेट चिकार झाला समजा दहा ट्रेड केले ५ ने स्टॉप लॉस हिट केला आणि ५ ने टार्गेट अचिव्ह केले तर फाय्दाच होईल जर स्टॉप लॉस योग्य कॅल्युलेट केला असेल तर. उदा. माझे CEAT चे पोस्ट आज १०८ च्या आसपास खरेदि केलाय जर टार्गेट अचिव्ह केले तर १२ रु चा फायदा जर स्टॉप लॉस हिट केला तर ५ रु नुकसान. ५०% सक्क्सेस रेशो बक्कळ झाला.

निफ्टीचा ग्राफ आज असा आहे...

nifty.JPG

निफ्टी अजून किती वर जाणार? आजही गॅप आहे.. ओ एन जी सी देखील मोठ्या गॅपने ओपन झाला होता दोन दिवसाम्पूर्वी, आज कमी होऊन गॅप थोडी भरली आहे.

ongc.JPG

GANN RRR नावाची एक टेक्निकल मेथोड आहे असे समजले. विशेष डिटेल्स मिळाले नाहीत. कुणाला याबाबत माहीत आहे का?

मी कुठलाही एक्सपर्ट नाही. १०% लोकानाच चांगल्या डॉक्टर सारखी मार्केटची नाडी ओळखता येते. अनफॉरट्युनेटली मी उरलेल्या ९०% त येतो.

CEAT चा ग्राफ विक होताच. फक्त वॉल्युमनी आणखी एक दिवस पुश दिला असता तर १२० दाखवला असता.
0.1 लाख डेली वॉल्युम वरुन एका दिवसा साठी ८.४९ लाखावर गेला. इंडिविज्युअल शेअर मध्ये बरेच असे प्रकार होवू शकतात. सामान्य जन ह्यात मोठ्या प्रमाणात अडकतात.

आज नीफ्टीने ५६०८ दाखवला. ह्या आधी ३/६ ला त्याने ५६०४ दाखवला होता. डबल टॉप झाला. उद्या २ गोष्टी होवू शकतात. १. ५६०० च्या वर जर राहीला तर लाँग टर्म बुलीश फेझ ईंट्याक्ट राहील. मग वरचे पहिले टार्गेट आधीचा हाय २८/४ ला ५७७५ आहे तो.
२. आत्ताची rally ५१९५ पासून चालू झाली ती आज ५६०८ पर्यंत. ४१३ पाँईंट. एक तर्फी एवढे गेले की बरेच वेळा एखादा पुल ब्याक येतो. हीच रिट्रेसमेंट. ही ३८%, ५०% वा ६२% असते. ३८% धरली तर ५४५२ टार्गेट येते.

रिट्रेसमेंट काय असते >
GANN RRR नावाची एक टेक्निकल मेथोड आहे असे समजले >
आता त्यातल्या त्यात यशस्वी करणारा फॉर्मुला/उपाय कोणता ? >>

पहिला रूल: मार्केट मधील नॉईसकडे जो दुर्लक्ष करू शकतो, तो यशस्वी होतो.
दुसरा रुल : मार्केट मधील प्रत्येकजण स्वतःला एक्स्पर्ट समजतो. दुर्लक्ष करावे.

मार्केट ओळखायचे हजारो इंडिकेटर्स आहेत आणि हजारो टेक्नीक आहे. प्रत्येक माहिती असायची गरज नाही. आणि आज ही मेथड, उद्या ती असे करायची काही गरज नाही.

आधीही लिहिले की दोन चार इंडिकेटर्स पकड आणि तेच अथ पासून इति पर्यंत ने मग त्यातील गंमत कळते.

तुम्हच्यासारखे एक्स्पर्ट ५० % सक्सेस रेट देतात. मग आमच्यासाराख्या नवशिक्यांचा रेट किती ? >> बुल्स मेक मनी, बेअर्स मेक मनी, पिग्स गेट स्लॉटर्ड - कधी कधी मी तिन्ही असतो. नवशीके फक्त पिग्स अस्तात. त्यामुळे सावधान, रस्ता वळणाचा आहे, गाडी सावकाश हाका.

पेपर स्टडीला आणि मेहनतीला पर्याय नाही!

केदारशी सहमत. कुणी पॅटर्न बघते, तर कुणी canslim तर तिसरा elliott wave फॉलो करत असेल. काही महिने पेपर स्ट्डी करुन आपल्याला योग्य वाटतात ते टेक्निक आणि आपण सिलेक्ट केलेले कंन्फर्नेटरी इंडीकेटर्स वापरावेत. आपल्या चुकातुन शिकुन आप्ला नार्ग नक्की करावा.
हा BB शॉर्ट टर्म साठी आहे डे ट्रेड किंवा BTST साठी नाही ( हेडर प्रमाणे) . त्यामुळे आज शेअर घेतला तर उद्या लगेच वाढेल असे नाही पण जर स्टॉप लॉस न हीट करता त्याने काही सेशन्स मधे टार्गेट गाठले तर फाय्दाच होइल.
१.स्वतःच्या अ‍ॅनॅलिसिस वर विश्वास ठेवावा आणि चुकातुन शिकत जावे.
२. स्टॉप लॉस आणि टार्गेट वरुन रिस्क टु रिवॉर्ड रेशो किती आहे ते पाहुन सौदा किती फायदेशिर ठरु शकतो ते पहावे आणि नंतरच ट्रेड करावे.
३. मिनिमाईझ लॉसेस आणि मॅग्जिमाईज प्रॉफीट. म्हणजे स्टॉप लॉस हिट झाला तर लगेच शेअर काढुन टकायचा ( अ‍ॅव्हरेज वगैरे करायच्या भानगडीत न पडता) तर टार्गेट अचिव्ह झाले आणि ईंडिकेटर्स +ve असतील तर टप्प्प्या टाप्याने शेअर विकायचे. त्यामुळे अगदी ५०% ट्रेड जरी सक्सेस्फुल झाले तरी या प्रीसिंपल मुळे फायदा होइल किंवा कमित कमी तोटा होईल.
मी अजुन तरी कॅश सेगमेंट मधेच इन्वेस्ट करतोय आणि जेव्हा आत्मविश्वास वाढेल तेव्हाच डेरिवेटिव्ज मधे हात घालेन.
डे ट्रेड शक्य नाही कारण त्यात खुप जास्त रिस्क आहे आणि वेळही द्यावा लागतो.

BTW मी CEAT अजुन होल्ड करतोय कारण माझा स्टॉप लॉस अजुन हिट झालेला नाहिये.

buzzingstock कुणी फॉलो करते का?
http://www.buzzingstocks.com/in/index.pl?t=CEATLTD

इन्ट्रा डे टिप्सही इथे चालतील की... आजच्गा ग्राफ बघून्ब उद्ताच्गी डे ट्रेडिंग्साठी सजेशन दिल्यास चालेल की.. इथे ग्राफ महत्वाचा आहे. त्याप्रमाने हेडर बदलत आहे.

गॅप भरणे आवश्यक असते असे मी कुठेतरी वाचले आहे... म्हणजे त्या गॅप प्राइसला काही काळात तो शेअर येतोच म्हणे. ( लॉजिक मला माहीत नाही.)

ट्रेन्ड लाइन मी खुप फॉलो करत नाही. हे क्यालक्युलेशन पण करता येते. कसे ते नंतर देइन. सध्या तरी मंथली चार्ट टाकत आहे. ५७०४ रेझिस्टंट दाखवते.

Nifty 1.jpg

Pages