अतुल्य! भारत - भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक

Submitted by मार्को पोलो on 29 May, 2011 - 10:45

शिवसमुद्रम धबधबा : शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पासुन १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत. गगनचुक्की व बाराचुक्की. ह्यांची ऊंची साधारण: पणे ९० मीटर आहे. ईथे गेल्यास बाराचुक्की जवळ मिळणारे ईथल्या गोड्या पाण्यातले तिखट मासे खायला विसरू नका.

प्रचि १
भातशेती, कनकपुरा रोड.

-
-
-
प्रचि २
शिवसमुद्रमजवळील जुन्या काळचा पुल.

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
गगनचुक्की धबधबे..

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६
जलप्रपात.

-
-
-
प्रचि ७


-
-
-
प्रचि ८


-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०
कावेरी नदी.

-
-
-
प्रचि ११
रॉक फॉर्मेशन

-
-
-
प्रचि १२
बाराचुक्की धबधबे.

-
-
-
प्रचि १३


-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५


-
-
-
प्रचि १६


-
-
-

कुर्ग : कुर्ग कर्नाटकाच्या पच्शिम घाटात वसलेले एक थंड हवेचे ठिकाण असुन ते बंगलोर पासुन २५० किमी वर आहे. कुर्ग कॉफी च्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. ईथे गेलात तर कॉफी च्या मळ्यातील होम
स्टे मध्ये मुक्कामास जरूर रहा. अगदी वेगळा अनुभव असतो हा.
ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते मार्च.
-
-
-
प्रचि १८
कुर्ग शहर.

-
-
-
प्रचि१९
कुर्गचा राजवाडा.

-
-
-
प्रचि २०
ओंकारेश्वर मंदिर.

-
-
-
प्रचि २१
कॉफीचा मळा.

-
-
-
प्रचि २२
कॉफीची फळे. ह्यांच्या आतील बिया दळुन कॉफी करतात.

-
-
-

प्रचि २३
खाली कॉफीचे मळे व वर सुपारी ची झाडे.

-
-
-
प्रचि २४
पच्शिम घाटातले जंगल

-
-
-
प्रचि २५
एक पायवाट.

-
-
-
प्रचि २६
अ‍ॅबे धबधबा.

-
-
-
प्रचि २७
दुबेर चा एलिफंट कँप.

-
-
-
बायलाकुप्पे, कुशलनगर :

ईथे तिबेटी बौद्ध भिख्खुंची मोठी मोनास्टरी आहे. ही मोनास्टरी १९७२ मध्ये तिबेटी निर्वासितांनी बांधली.
-
प्रवेशद्वार.
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९


-
-
-
प्रचि ३०


-
-
-
प्रचि ३१
मुख्य सभागृह.

-
-
-
प्रचि ३२
भित्तीचित्रे.

-
-
-
प्रचि ३३


-
-
-
प्रचि ३४


-
-
-
प्रचि ३४


-
-
-

------------------------------------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - केरळ.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

चंदन तुझे प्र.ची.म्हणजे आमच्यासाठी पर्वणीचं , मनात कुठंतरी एक मस्त अनुभुती देउन जातात. धन्यवाद!

मस्त प्रची रे चंदन...
धबधब्यांचे फोटो खासच... Happy

सही... धबधबे पाहून डोळ्याचे पारणे फिटते... Happy 'कुर्ग'ला मी जाणार आहे लवकरच... Happy

रच्याकने... पहिला फोटो असा का आलाय? जास्तच काम केलेस का त्यावर?

आमचे शेजारी कुर्गी होते. कितीतरी वेळा बोलावले त्यांनी तिथे. पण कधी जमलेच नाही. त्यांनी वर्णन केलेल्या कुर्गला आज दृषरुप मिळाले.

ते लोक पण दिसायला खुप वेगळेच असतात. असामान्य उंची, भेदक नजर आणि धारदार नाक. त्यांचे पदार्थ पण चाखले. तांदूळ, कॉफी, वेलची, मिरी, अवाकाडो चा सुकाळ आहे त्यांच्याकडे.

अफाट आहेत फोटोज. कुर्ग मलाही बघायचंय, खूप ऐकून आहे.

मला तिसर्‍या फोटोवरही काम केल्यासारखं वाटतंय, शार्पनेस खूप वाटतोय. तसंच रॉक फॉर्मेशनचाही.

मंडळी,
प्रतिसादांबद्दल खुप धन्यवाद.

पहिला फोटो असा का आलाय? जास्तच काम केलेस का त्यावर?>>>
तो थोडा फार HDR चाच प्रयत्न केला आहे.
तिथे वेगवेगळ्या फोकसिंगचे २ फोटोज् मर्ज केले आहेत.

बाकिच्या फोटोज् मध्ये पाहतो काही कमी-जास्त करता येते काय.

झकास फोटोस
वॉटरमार्क विसरु नकोस Happy
बादवे - ईकडे अमेरिकन टीममेट्स ला तुमचे हे फोटोस चे कलेक्श्न आहे ना ते फॉरवर्ड करायचे होते, त्या साठी पिकासा किंवा फ्लिकर ची लिंक आहे का? लोकेशन वाईज असेल तर खुपच ऊत्तम.. (जरा त्यांना पण कळु देत व्हॉट्स सो डिफ्रंट ईन ईंडीया.. एकाने स्लमडॉग मिलेनीयर पाहुन भारत किती गलिछ् देश आहे हे सांगायचा प्रयत्न केला होता.. Uhoh )

काय सॉल्लिड फोटूज (पहिला फोटो सोडून.. नाही पटला रे).. तुझ्या प्रचिंमधून शिवसमुद्रम धबधब्याचे झालेले दर्शन नेहमीच लक्षात राहील.. Happy धन्यवाद Happy

बाकिच्या फोटोज् मध्ये पाहतो काही कमी-जास्त करता येते काय. >> नक्की बघ.. असे पण तुझे फोटोज आम्हाला पर्वणीच असते.. Happy

मस्त !
पहिल्या प्रचिमध्ये सही इफेक्ट साधला आहेस ! Happy
धबधब्यांचे आणि जंगलाचे फोटो आवडले. लाँग एक्स्पोजर ट्राय केले नाहीस का ?

आवळा,
लेखमालिका ह्या विभागात अतुल्य! भारत मालिकेचे सर्व लेख उपलब्ध आहेत (लोकेशन वाईज).
पण तरी जर का तुला फ्क्त पिकासाच्या लिंक्स हव्या असतील तर त्याही पाठ्वतो. तसे सांग.

प्रकाश,
लाँग एक्स्पोजर ट्राय केले नाहीस का ?>>>
केला रे. त्यासाठी खास ट्रायपॉड आणि ND filters पण नेले होते. पण सुर्य सरळ लेन्स वर असल्याने काही खास ईफेक्ट नाही मिळाला. पीपी करुन पण जास्त काही साध्य नाही झाले.
तुला मी त्यातले काही फोटोज् पाठवितो. बघ जर पीपी मध्ये काही जमले तर.

मार्को,
डोळ्याचं पारणं फिटलं... Happy
काय अप्रतिम फोटो काढतोस ना तू? पण मला एक सांगायचं आहे, प्रत्यक्ष ठिकाण हे तु काढतोस त्या फोटो इतकं सुंदर असेल की नाही माहीत नाही.
स्तुती करायला माझ्याकडे खरंच शब्द नाहीत...

माझ्या आवडत्या लेखनात. Happy
पुढील छायाचित्रणासाठी अतोनात शुभेच्छा!

प्रतिसादांबद्दल धन्स लोक्स.
काही प्रतिसाद्/सूचनांनुसार मी फोटोज् मध्ये बदल केला आहे. अजुन काही वाटले/खुपले तर जरुर सांगा.
आपला आभारी,
चंदन.

ग्रेट.. लई भारी फोटो... कुर्ग मध्ये कुठे ७ टेकड्यांचा समूह आहे का? पु.शी.रेगेंच्या सावित्रीमध्ये वाचून आहे त्याबद्दल. कुर्गचे फोटो बघताना तिच्याच वर्णनाची आठवण येत राहिली.. Happy

धन्यवाद लोक्स.

कुर्ग मध्ये कुठे ७ टेकड्यांचा समूह आहे का?>>>
असे काही कळले/ऐकले नाही बाबा.

मोनास्टरी म्हणजे काय ?>>
मोनास्टरी म्हणजे "बौद्धविहार".

Pages