कोंबडी

Submitted by फकिर बेचारा on 26 June, 2011 - 04:14

कोंबडी

नाचेल आज येथे माझीच कोंबडी ही
घालेल की तशी ती साधीच लंगडी ही

तोराच दावती हे येथे जिराफ़ आता
त्यांच्याकडे असे की लांबाड तंगडी ही

येथे अनेक आले दावावयास पाणी
माझ्यापुढे जणू की पोरेच शेंबडी ही

मी येथ आज आले घेऊन हाच हेतू
लावू कुणात झुंजी जी वाट वाकडी ही

आलीच वेळ ऐसी माझे पुसेन कुंकू
खेळेन येथ युध्द फ़ोडून बांगडी ही

पाहून येथ माझी एंट्री पुन्हा नव्याने
जी लागतील कानी कित्येक चोंबडी ही

आयुष्य घालवीले.. केली इथे फ़कीरी
माझी अशीच भाषा मर्दान रांगडी ही

फ़किर बेचारा

गुलमोहर: 
शब्दखुणा: