माझ्या मित्रांच्या मला आवडणार्‍या / नावडणार्‍या सवयी

Submitted by durandar on 15 July, 2008 - 03:02

प्रत्येकाच्या काही सवयी असतात तुम्हालाही असतिल अश्याच काही मित्रांच्या सवयींचे भंडार उघडूयात का.

या आधिचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा,

अगदी पटले तुमचे . पण एक उदाहरण देउन तुम्हाला सांगतो मी हे कस सहन करतो ते.

इथे आम्ही जिथे राहतो तिथे वॉशर्/ड्रायर ची वेगळी रूम आहे. (अपार्ट्मेंट च्या लोकांसाठी). तिकडे वॉशिन्ग ३५ मिनिटे आणी ड्रायर ६० मिनिटे असतो.
लोक्(जास्त करुन आपले देशबांधव) वॉशिंग ला टाकतात आणि ३५ मिनिटे सम्पल्यावर काढुन ड्रायर मधे टाकायला विसरतात. आरामात येतात नंतर.
ड्रायर ची ६० मिनिटे सम्पल्यावरही तेच.
इथे ड्रायर मधे एक जाळी असते ती प्रत्येक सायकल च्या आधी साफ करावी लागते. (आपले देश्बांधव ती जाळी स्वतःचे ड्रायरचे काम सम्पल्यावर कधिही साफ करत नाहीत. अमेरिकन मात्र आठवणीने स्वच्छ करतात).
वरील वर्तन गेली कित्येक वर्षे सुरु आहे त्यात काही फरक नाही. आता त्याबद्दल
चिड्चिड करुन काय होणार?

म्हणुन मी
१. प्रत्येक वेळी धुण्याच्या वेळी घड्याळ न चुकता लाविन जातो. वेळ नोट करतो आणि वॉशिन्ग ड्रायिन्ग सायकल सम्पायच्या आधी हजर राहतो.(त्याचे आणखी एक कारण म्हणजे मला माझ्या कपड्याना दुसर्‍या कोणी किंवा दुसर्‍या,च्या कपड्याला हात लावयला आवडत नाही). जर मशिन ऑक्क्युपाय असेल तर बसुन राहतो.
२. प्रत्येक ड्रायर सायकल नंतर मी जाळी न चुकता साफ करतो.(एक दोनदा माझे बघुन लाजेकाजेस्तव एक दोन देसी लोकानी जाळी साफ केली होती).

उगाच त्रागा करुन काय फायदा? लोक आपले वर्तन कधिही सुधारणार नाहीत मग स्वतःला त्रास का करुन घ्यायचा?

तुम्ही मैत्रीणीला सांगुन पाहिलेत. नाही ऐकत ठीक आहे. पण तुम्ही मात्र योग्य वागणे सोडु नका. तिला नक्की तिच्या वागण्याची लाज वाटेल तुमचे वर्तन पाहुन आणि ती सरळ होइल.

मी गेले चार् वर्षे घराबाहेर आहे. वर्किंग वूमन्स हॉस्टेल, तीन मुलीनी एक फ्लॅट घेऊन राहणं आणि त्यानंतर एकटीने राहणं आणि आता परत वर्किंग वूमन्स हॉस्टेल. या सर्व दरम्यान मला कुणाचाही त्रास झालेला नाही. बर्‍याच जणाना माझा त्रास जरूर झाला. कारण मी घरी अगदी लाडावून ठेवलेली कारटी आहे. चहाचा कप सुद्धा आई उचलून ठेवते. (आजदेखील!!!)
अशावेळेला बाहेर राहून सर्व काही मॅनेज करणं मला कठीणच होत.. पण तरीही सर्व मॅनेज झालं. यामधे माझ्या सर्व मैत्रीणीचा आणि मित्राचा सहभाग आहे,
सुरुवातीला मला माझी स्वतःची प्लेट पण धुवून ठेवायला लागतेय याचा खूप वाईट वाटायचं. Sad
पण हळू हळू सवय होत गेली. याचं मुख्य कारण म्हणजे माझा मुळातच बोलका असलेला स्वभाव. मी मोकळेपणाने बोलते. दुसर्‍याला नक्की काय त्रास आहे हे समजून घेते. एकदा कुठलीही व्यक्ती तुमची मैत्रीण झाली की कधी कसलाच त्रास होत नाही. उलट एक चांगली मैत्रीण तुमचा त्रास कमी करायचा प्रयत्नच करेल.

माझी सध्याची रूममेट देबोलिना. ती माझ्या रूमवर आल्यावर पहिल्या पंधरा मिनिटातच आमचे फॉर्मल इंट्रो वगैरे संपलं आणि बिनदिक्कत नंदु आणि डेबो हाक मारणं चालू झालं. ती आय आय टीची रँकर आहे. तरीही आम्ही अत्यंत क्रेझी गोष्टी करतो. लव्हस्टोरी २०५० आणि थोडा प्यार थोडा मॅजिक सारखे पिक्चर पाहणं.. रात्री तीन चार वाजता पावसात भिजायला बाहेर पडणं.

यापलीकडे जाऊन देखील एकमेकीना हवा तेव्हा आधार देणं हेही महत्वाचं आहेच ना? छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून नातं बळ्कट होत असते. मला यायला उशीर झाल्यावर डेबोने माझं जेव काढून ठेवणं किंवा तिला यायला उशीर झालेला असताना मी तिचं जेवण होइपर्यंत जागणं या वाटताना तितक्या मोठ्या गोष्टी वाटत नाहीत. अजून चार वरर्षानी याच आठवणी डोळ्यात पाणी आणतात!
महत्वाचं काय... तर तुम्ही इतराशी कसे वागता ते!!
सवयी हा तर व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. पूर्ण व्यक्तिमत्व नव्हे, आणि एकदा ती व्यक्ति आपली झाली की मी या सवयी पण त्रासदायक होत नाहीत.
--------------
नंदिनी
--------------

१००% अनुमोदन नंदिनी .
आम्ही ३ रुममेट राहत होतो , नंतर दुसर्‍या वर्षी एक जण बहिनी सोबत राहु लागला अन आम्ही दोघे डीग्री पुर्ण होइपर्यंत सोबत राहत होतो .
माझा सुरुवातीला त्यांना त्रास झाला पण नंतर मी सुधारलो . आता आम्ही तिघांनी एकाच सोसायटी मधे पुण्याला फ्लॅट्स घेतले आहेत . Happy
छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून नातं बळ्कट होत असते. >> खरंय , अनुभवाचे बोल Happy

जसे वाजती नुपुर सुखाचे ...

श्रध्दा, नंदिनी. तुमचे मुद्दे पटले. हॉस्टेलला वगैरे रहाण्याची वेळ आली नाही. पण आमचं घर आमच्या ग्रुपचा अड्डा होता. आम्ही दोघं घरी पोचण्याआधी हे सारे जण पोचुन अगदी गाद्या सुद्धा घालुन गप्पांचा फड सुरु असायचा. दोघांचाच स्वयंपाक मी कधी केलाच नाही तेव्हा. नंतर एकेकाची लग्न व्हायला लागली. आपल्या-आपल्यात रहाणं सुरु झालं, जितक्या मोकळेपणाने आमच्या घरी वावरायचे तो स्वतःच्या घरी या, येत रहा म्हणताना नसायचा. तेव्हा खुप त्रास झाला ह्या सगळ्या बदलाचा. ग्रुपच्या भेटीगाठी एकदम कमी झाल्या. मात्र आता ८-१० वर्षांनी सगळ्याना आठवतोय तर फक्त आमच्या घरचा अड्डा आणि गप्पांचा नियमित फड.. आता कधीमधीच भेटतो तेही काहीतरी निमित्ताने. पण त्या आठवणी प्रत्येकाचा नॉस्टॅल्जिया आहे... मीही त्यातली कटुता केव्हाच विसरलेय. २ खोल्यातल्या आम्हा दोघांच्या, सगळ्या मित्रांना सोबत घेउन केलेल्या संसाराच्या (म्हणजे बाकीचे त्याला संसार म्हणतात म्हणुन मी ही तोच शब्द वापरला. Happy ) आठवणी माझाही नॉस्टॅल्जिया आहे...

काही गोष्टी खरोखरच मांडाव्याशा वाटतात. मला एक तमीळ रूममेट मिळाला. मी रेहमानचा मोठा फॅन असल्याने मला वाटले खूप छान जमेल याच्याशी. पण या साहेबांचे, माझ्या खोलीत येऊ नकोस. माझ्या गोष्टी वापरु नकोस आणि त्याला हात लावू नकोस ई.ई. कुठल्या गोष्टी न वापरव्यात त्याचे ज्ञान मलाही आहे Wink कारण गेले साडेचार वर्षे रुमवर राहतो आहे आणि ते ही भारतातल्या जवळपास सगळ्या राज्यातल्या लोकांबरोबर राहिलो आहे, अगदी हा तमिळी सोडून दुसरा तमिळी सुद्धा. आणि माझे सगळ्यांबरोबर खूप छान जुळले. काही दिवस मी या साहेबांचे सहन केले पण नंतर मात्र माझे सटकले. मी म्हणालो - भावा ४ लोकांच्यात राहताना इतके नखरे नसतात रे ठेवायचे. घराचे भाडे मी पण भरतो. तुझ्या खोलीवर माझाही हक्क आहे आणि आपण इथे मित्र म्हणुन राहतो आहोत. थोडीफार तडजोड तुलाही करायला हवी आणि मलाही. उगाचच छोट्या गोष्टींचा बाऊ करु नकोस. थोडे दिवस ठीक गेले आणि नंतर मात्र एक दिवस भांडण कडाक्याला गेले ते ही मी त्याचा स्पिकरफोन वापरला म्हणून. मी तसा मनमिळाऊ आणि पटकन मैत्री करणारा. कदाचित माझे चुकलेही असेल कारण काही लोकांना पर्सनल हायजीन, स्वच्छता याची आवड असते. मी कदाचित जास्तही केले असेन. पण माझे स्वतःचे असे मत आहे की अशा लोकांनी चार लोक राहतात तेथे राहूच नये. सरळ वेगळे राहावे. कारण असे लोक २०% असतात(बहुधा सोन्याच्या चमच्यातून जेवणारी). बाकी ८०% माझ्यासारखी. वापर न यार मला काळजी करण्यासाठी अजून हजार गोष्टी आहेत म्हणणारी.
त्यानंतर मी अमेरिकाच सोडली. ३ महिने त्याच्याबरोबर राहिलो आणि डाव एकदाचा संपला. अजूनही तो ट्च मधे आहे पण ...... बाकीच्यांसारखा नाही.

माझ्या आत्तापर्यतच्या रूममेटच्या काही खटकलेल्या सवयी:
माझा एक रूममेट कितीही वास आला तरी आपले सॉक्स लवकर धुवायचाच नाही. त्याला स्वताला याचा त्रास कसा व्हायचा नाही कुणास ठाउक...
आणि दुसरा एक रूममेट मी पीसीवर वगैरे काही काम करत असलो तरी माझ्याशेजारी ठाण मांडुन बसायचा... म्हणजे मी काही पर्सनल मेल वगैरे चेक करत असलो तरी हे साहेब शेजारुन हलायचेच नाहीत.... म्हणजे काही करायचा नाही पण नुसता तिकडे बसुन रहायचा... तस म्हणल तर छोटी गोष्ट आहे पण कधीकधी फार त्रास व्हायचा...
एक मित्र असाच सकाळी अगदी गडबडीच्या वेळीही तासतासभर कॉइल लावुन आंघोळीचे पाणी गरम करत बसायचा... म्हणजे जरा पाणी गरम झाल की कॉइल बंद करणार, पेपर वाचत बसणार... पेपर वाचुन होइपर्यंत परत पाणी गार... मग परत एकदा कॉइल चालू... मग काय तर व्यायाम करणार... परत तेच कॉइल चालू-बंद... मग आमच्या कुणाच्या तरी सहनशक्तीचा अंत होइपर्यंत त्याचा तो खेळ चालू असायचा...
एकजण तर इतका कंजूश होता की पावडर असुदे पेस्ट किन्वा डिओ एकदम छोटा पॅक घेउन येणार आणि तो संपला की अरे मला आणायलाच वेळ नाही झाला करुन बाकीच्यांच्या स्टॉकवर महीनाभर तरी काढणार!

असो पण याच रूममेट्सनी कधी चुकुन मी आजारी वगैरे असलो तर अगदी गरमागरम नाश्ता पार्सल घेउन ये पासुन अगदी चहा कॉफी करुन देणे अश्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत... आणि याच कंजूश मित्राने स्वताच्या पीसी साठी बाजुला ठेवलेल्या पैशातुन एका मित्राच्या अगदी अडचणीच्या वेळेला मदत केलेली मी बघितली आहे..

एक्सेप्ट इट एज अ पार्ट एन्ड पार्सल ऑफ देट रिलेशनशिप!

आमच्या ३ जणींतही नातं चांगलं आहे. मुख्य म्हणजे आम्ही भरपूर भांडतो, पण भांडण कॅरी करत नाही. "तू तेव्हा, तसं म्हणालेलीस, मी कधीही विसरणार नाही"अशी वाक्यं आम्ही शक्यतो कधी बोलत नाही. रागच्या भरात वाटतं ते बोलून टाकतो, पण तिघीही हे जाणून आहे की ते पर्मनंट स्टेटमेंट नाही. नॉसटॅल्जिक व्हावं असं नातं फक्त या दोघींबरोबरच आहे. आधीही बर्‍याच रूममेट्स होत्या, त्या सगळ्याच वाईट नव्हत्या, पण तेव्हा रूममेट ही काय 'चिज' असते हेच मूळी कळायचं नाही.
सध्याच्या मैत्रिणिंची आई, बहीण आमच्याकडे येऊन रहातात, पण मला कधीही इनकन्व्हिनियंट होत नाही. मानलं तर होऊ शकतं, पण मी ते मानत नाही, उलट त्या म्हणतात की तुझ्याही बाबांना इकडेच रहायला बोलवत जा.
मला ऑफिसातून यायला उशिर होतो, कधी माझ्याकडे कोणी येणार असेल तर मी घरी येईपर्यंत त्या आवर्जून बसवून त्यांचे आदरातिथ्य करतात. माझी मैत्रिण किंवा कुणिही 'माझं' जेवायला येणार असेल तर निम्मा स्वयंपाक तर कधी कधी पूर्णं ही स्वयंपाक करतात. आमच्याकडे पडेल ती कामं जी घरात असेल ती करते. हे माझं काम नाही, किंवा कामांची स्पेसिफिक वाटणी, असले प्रकार नाहीएत. मी आठवडाभर घरात काहीच काम ऍज सच करू शकत नाही, पण वीकेन्ड ला मात्रं करते. एखाद्या वेळेस कंटाळा आला तर वीकेन्ड ला ही करत नाही. पण त्याची मोजणी नाही होत. आमचा स्वयंपाक एकत्र होतो, खाणंपिणं ही एकत्रं होतं कुणाच्याही घरून खाऊ आला तरीही तो माझा - तुझा नाही तर 'आपला' म्हणून ट्रीट केला जातो. (बर्‍याच वेळा माझा खाऊ मला उरत नाही ही गोष्ट वेगळी... :डोमा:) अगदी तुपापासून ते सुक्या मेव्यापर्यंतच्या गोष्टी शेअर होतात.
घरातले सर्व खर्च कॉन्ट्रीब्यूशन काढून केले जातात. मात्रं टी.व्ही. वर कोणी काय पहायचं यावरून जाम भांडणं होतात... मध्यंतरी एका मैत्रिणीने उपाय सुचवला की दिवस ठरवून घेऊ... मग एका कागदावर दिवस आणि जिने पहायचा तिचे नाव असं लिहीण्यात आलं.. मी ते बेधडक अमान्य केलं.... Proud (हा माझा अगावूपणा)
अर्थात अशा लिहिण्याजोग्या खूप गोष्टी आहेत, काही वाईट (माझ्यामते) काही चांगल्या (त्या ही माझ्याच मते) पण आम्ही अपापली घरं सोडून एकत्र राहतोय गेली कित्येक वर्षं. जाम भांडणं झाली, पण आम्ही ती कधीच कॅरी केली नाहीत ही गोष्ट सर्वात महत्वाची. rather मी इथे काय काय लिहीते हे ही त्यांना माहीती आहे. पण त्या त्याचे काही वाईट मानून घेत नाहीत. उलत स्पोर्टींगली घेतात आणि म्हणतात, मन मोकळं करायला एक तरी जागा आहे. :O
कधी कधी आम्ही चिंतेतही पडतो की उद्या जर अपापल्या वाटांनी जायचं ठरलं तर डिपार्ट होताना खूप त्रास होईल. Sad मग आपण अशी वेळ येण्याअगोदर पासूनच वेगळं राहायचा प्रयत्न करू, तशी उपाययोजना करू यावर खूप वेळी चर्चा झाली. पण दरवेळी निकाल एकच, तेव्हाचं तेव्हा पाहू, सध्या मनसोक्त भांडून तर घेऊ... Happy

उदय३२१.. तुमच्य रूममेटच वाचून मला माझी रूममेट आठवली. तिला अजिबात तिखट चालायचे नाही आणि रोज पोळ्याच लागायच्या. मग आम्ही तिच्या साठी भाजी वेगळी काढून ठेवत असू आणि नन्तर पोळ्या करणे बन्द केले. अभ्यासाच्या व्यापत जमणे कठीण जाउ लागले. पण मग तिही भात खायला शिकली.

नंदिनी, तुझं पोस्ट खुप म्हणजे खुप आवडलं.. आणि पटलं. या गोष्टीचा बाहेर मैत्रिणीं बरोबर राहतानाच नाही, तर कुठेही उपयोग होतो.

दक्षिणे,
"कॅरी न करणे"-- खुप आवडलं... खरंतर click झालं एकदम..
या गोष्टी माहीत असतात आपल्याला, पण उदाहरणा सहीत समोर आल्या तर एकदम मनाला भिडतात-- क्लिक यु नो !!!

अनघा
-----------------------------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

वाचून मजा आलि,आठवणि ताज्या झाल्या. माझे रूम्मेट्स बरोबर सिरियस प्रोब्लेम्स कधि झाले नाहित. तुफान धमाल करायचो आणि सर्वजण वेगवेगळ्या फिल्ड मधले होतो त्यामुळे अजुन दंगा व्हायचा- एकसोएक टवाळ्या,आणि जोक्स 'कंप्लिट ब्लिस'!!
मला वाटत यासाठि समानशिल लोक भेटणं हेच गरजेचे आहे.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

खुप प्रकारची माणस ही जगात असतात. मला काही भेटलेली मड्ळी ,एक कुटुब अस की त्याना सतत त्या कुटुबातली व्यक्ती इतकी एककल्ल्ली की तीच जर आम्ही एक् ल तर च आम्ही त्याचे मित्र नाहीतर नाही तीला जर कुठ्ल्या गोष्टीला नाही म्हण् ट्ल तर ती नत् र ओळ ख पण द्यायला तयार नाहे. चाग् ली माण् स मीळण खरच आवघ् ड आहे.

माझ्या मिताची एक सवय मला अजिबात आवडत नाही ....

खूप खूप प्लॅनिंग करतात ...

आपण गाडी काढु
बीचवर जाउ ..

बीयर घेवु .

वगैरे वगैरे ...

अन ऐन वेळी म्हणतात काम आले ..बीझी आहे ...कॅन्सल ...:फिदी:

Pages