मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे एक.. अरुण दाते यांच..

जेंव्हा तिची नी माझी, चोरुन भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे घरात आली..असे ऐकू यायचं Proud

नंतर कळाले ते भरात आली असं आहे.

साधारण पणे १९८९-९० ची गोष्ट आहे; गावि (मु.पो. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग) बेकारीचे दिवस अनुभवत होतो तेव्हाची... कॉलेजमधल्या सिनियर मित्राच्या निमंत्रणा वरुन तो कामाला असलेल्या हायस्कूल मधे (मु. पो. घावनळे, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग) त्यांचं 'वार्षीक स्नेह-संमेलन' बघायला गेलेलो. चित्रपट ऊद्योगावर तेव्हा VCP/ VCR चं बर्‍यापैकी आक्रमण झालेलं होतं, आणि त्याचाच परीणाम मला प्रेक्षक म्हणुन अनुभवता आला.
शाळेच्या स्नेह-संमेलना मधे गावातील एका सु-प्रसिद्ध गायीकेला (?) शाळेने गाणं म्हणण्याचा चान्स दिलेला. सोबत गावातलेच भजन-सम्राट हार्मोनियम आणि 'नाळ' (ढोलकी आणि मृदंग यांमधला ताल-वाद्याचा प्रकार) घेऊन आपल्या परीने 'साथ' करत होते. गाण्याची चाल, गायीका आणि हार्मोनियमचा सूर, आणि ताल यांचा एकमेकाशी कशाही रितीने संबंध येत(च) नव्हता. आणि त्यात भर पडली ती गायीकेने उच्चारलेल्या शब्दांची.
गायीकेने उच्चारलेले शब्द होते: -
हाँsss, जब तक हय जान, जाने जहान, मै ना चुही...
Happy

मुळ गाणं 'शोले' सिनेमा मधलं: "हाँ, जब तक है जाँ, जाने जहाँ, मै नाचुंगी..."

चुही.:हाहा:

शाहिद आणि सोनाक्षी (आईशप्पथ काय जोडी आहे :अओ:) या जोडीच्या नवीन पिक्चर (राजकुमार बहुतेक) मधल गाण "गंदी बात",
मी पहिल्यांदा ऐकल तेव्हा"कंजी बार"ऐकु आल, दुसर्‍या वेळेस "गंजी बार" आणि तिसर्‍या वेळेस"गंजीफ्रॉक"अस ऐकु आल. काल बॉसच्या बायकोशी बोलताना तो उच्चार गंदी बात आहे अस समजल.

ए हो पियु ते पण याच मुव्ही मधल आहे.... साडीसे फॉलसा कभी मॅच कीया रे, कभी तोड दिया दिल कभी स्क्रॅच किया रे... अरे काय गाण ए का? कै च्या कैच श्शी: Angry

त्या सहजयोग वाल्या माताजींच्या एका कार्यक्रमात काही फिरंगी तरुणी गात होत्या....आईच्च्चा....जोग्वा....जोग्वा मागते.

त्या सहजयोग वाल्या माताजींच्या एका कार्यक्रमात काही फिरंगी तरुणी गात होत्या....आईच्च्चा....जोग्वा....जोग्वा मागते.>>>>>>>> आई ग... ती आई सत्वरी धावत येईल यांच्या खच्चुन कानाखाली पेटवायला.

टिक टिक वाजते डोक्यात हे गाणे मला बरेच दिवस 'किती ग वाजते डोक्यात' असेच ऐकू यायचे आणि मी तसेच म्हणायची, शेवटी नवऱ्याने एकदा सांगितले, गाणे नीट ऐक, 'टिक टिक वाजते डोक्यात' असे आहे तरी मला बरेच दिवस 'किती ग वाजते डोक्यात' असे आहे वाटायचे.

पहिल्यांदा सिंघम च गाणं बघितलं तेव्हा मला ते असं ऐकु "मेरा बलमा है डायपर" , पुन्हा ऐकलं तर "वायपर" असं ऐकु आलं. Uhoh
गूगलून बघता ते "स्नायपर" असं होतं. त्या हनी च्या कलकलाटात शब्द कळतच नाही. Sad

चित्रपट- कोयला
देखा तुझे तो हो हो गयी दिवानी पालू तुझे तो मर ना जाउ कहीं

यात पालू तुझे तो याचा अर्थ मी पाळणे असा घेतला होता मग शाहरुख खान कुत्रा आहे का ? त्याला पाळायला माधूरी विचारतेय असा काहीतरी गैरसमज मी कित्येक वर्षे करुन बसलो होतो. Happy

Pages