मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच्यावर अजून एक ऐकायचंय दक्षिणा माझ्या नवर्‍याला ऐकू येणारा अभंग....अर्थात सगळ्या श्रोत्यांची माफी मागून

अरे अरे ज्ञाना झाला सीताफळ ... Sad

अरे अरे ज्ञाना झाला पितामह.... >>> अरारारारारा .... पांडुरंगा, बघतो आहेस ना रे! Proud

अरे अरे ज्ञाना झाला सीताफळ ... >>>> यापेक्षा ते वरचे पितामह बरे होते म्हणायचे. Proud

झाला सी पावन असे काहीतरी आहे वाटते.

नक्की मला हि कळत नाही...
पण बहुधा,

अरे अरे ज्ञाना झालासी पावन... असे असावे.

काही काही गायक/गायिका इतकं ताणतात सूर किंवा शब्द खातात, की नक्की काय आहे तो शब्द हे कळतच नाही एकताना.(सर्व गायकांची माफी मागून अर्थातच), मला खरच हृद्यज्ञाथ(कसा लिहितात मराठीत हा शब्द?)
मंगेशकरांची बरीचशी गाणी कधी कधी समजत नाहीतच. (माफी आधीच मागितली आहे).

असेच एक गाणे, आठवले म्हणून लिहिते...
ते गेली तेव्हा रिमझिम पाउस निनावत होता... असेच एकायला येते, मग कळले निनादत असे आहे.

'ती आई होती म्हणूनी , घनव्याकूळ' हे तर असेच एकायला येते.. असो.

तरी ह्यांच्या(ह्रदयज्ञाथ) गाण्यात वाद्याचा वापर कमीच असतो. तरी आवाज समजतच नाही कधी कधी.

तसेच मानसीचा चित्रकार हे दुसरे गाणे... त्याचा उल्लेख वरती आहेच. ते मला कायम तसेच(वरच्या पोस्टीत आलेले) तसेच एकायला येते.

मामी 'जिहाले....' वरची चर्चा परत परत तीच नको म्हणून लि.न्क टाकल्या...ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मीही रडलो अशीच ओळ आहे ती.
बाकी सीताफळ आवडले.... Proud

दक्षिणा... मी यापुढची ओळ 'तूच तुझं ध्यान करू आहे' अशी ऐकते कायम.

>>>>>>> रमड, ते असं आहे ....

अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ज्ञान कळों आले
तुझा तुचि देव तुझा तुच भाव, फिटला संदेह अन्यतत्वी

ऋतु हिरवा...
१. मग नाचे बाळ गणू
२. मग नाचे चार गणू
(मदनाचे चाप जणू)

ह्या गाण्याचं कोरस गाणारी इथे परदेशी वाढलेली पोरं.
रोजच्या प्रॅक्टिसमधे इतरच इतकं सुधारावं लागत होतं की, इथे लक्षच गेलं नाही. ड्रेस रिहर्सलला माईक्स दिले आणि काय काय ऐकू यायला लागलं.
एकमेकांचं लिखित पडताळून बघत असताना त्यांनाच झालेला साक्षात्कार. मग कुणाचं बरोबर ह्यावरून आम्हाला ...
गणू नाही? बाळ नाही? मग तरी?
काय नव्हेच ते.

दाद ! Rofl

मामी: माझ्यामते दुसर्या ओळीत ज्ञान नसून ध्यान आहे. चू.भू.द्या.घ्या.
अरे अरे ज्ञाना झालासी पावन |
तुझे तुज ध्यान कळो आले ||

हे राम... सिताफळ काय, पितामह काय!! Rofl

मी ते जुन्या 'हिम्मतवाला'चं गाणं, "नैनो मे सपना, सपनों मे सजना' या गाण्यातलं एक कडवं:
"अरे अंग से आऽ अंग मिले आऽ अरमाँ खिल गये
पूरब पस्चिम से पस्चिम पूरब से कैसे मिल गये"

इथे मी अगदी आतापर्यंत 'कैसे' च्या ऐवजी 'पैसे मिल गये' ऐकुन गोंधळत होते.

रघुपति राघव राजाराम - या भजनाच्या मुखड्या मध्ये शेवटची ओळ मी अनेक वर्षे

"सबको 'सद्गती' दे भगवान…" अशीच ऐकायचो / म्हणायचो…

'इन रेशमी राहोमें, इक राह तो मोहोगी, उन तक जो पहुंचती है......'
खूप खूप सुंदर गाणं .. गेली ३५ वर्ष ऐकतोय...आणि असंच ऐकतोय..
काल शेवटी ट्युब पेटली... 'इक राह तो वो होगी' असणार ते... मोहोगी ला अर्थ नाही...

अरे बापरे, ३५ वर्षे एकून आता कळले.... Happy
एकायला पाहिजे गाणं. सुरुवात अशीच आहे का? इन रेशमी... (शोधून मिळत नाहीये)

अरे बापरे...

'इस मोड से जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते... ' आंधी मधलं...

मला वाटलं मधल्या ओळी ऐकून पटकन लक्षात येईल.. Happy

http://giitaayan.com/search.asp?s=Aandhi&browse=Film

लिंक शोधून इकडे टाकतो.. सगळेच शब्द मिळाले.. (इतके दिवस डोक्यातच आलं नाही)..

(असंबंध: चित्रपट आला तेव्हा गावात रहात असल्याने पाहिला नाही. मग पुण्याला विद्यापिठात असताना एकदा मॅटिनीला होता. उन्हाळ्याच्या भर दुपारी, सायकल वरून पूणे स्टेशन ते विद्यापीठ जाताना 'इस मोडसे जाते हैं' मोठमोठ्याने गात गेलो. )

ह्म्म... एकलं गाणं( घरून कामं केल्याचा फायदा).
आवडतं गाणं आहे पण मी हि कधीही इतके कान देवून एकले नाही. पण मलाही ते मोहोगी वाटले... बहुतेक प्रभाव असावा इथले वाचून.....
-------------------------------------------------------------------------------------------

(हे उगीच राहवले नाही म्हणून... बाकी, गाणं सुद्धा सुंदर चित्रित केलय. तेवढा तो संजीवकुमार बघवत नाही...एकदमच ताठरलेला.. ढोकळा खावून. सेन मस्त वाटते त्या साड्यात पण).

क्रिश ३ मधले 'रघुपती राघव' ऐकताना मला नेहमी ते 'नॉनस्टॉप पॉटी'च ऐकू येते. Proud
ते 'नॉनस्टॉप पार्टी' आहे असे नुकतेच लेकीकडून कळाले.

Pages