मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खिलाडी चित्रपटातल 'वादा रहा सनम' मधले एक कडवे 'कमी ना हो वफाओ मे' मी खुप दिवस 'कमीना होगा बाहो मे' ऐकायचो Proud

मै खिलाडी तू अनाडी चित्रपटातल 'चुराके दिल मेरा गोरीया चली' ह्या गाण्यात 'तेरी गली मै चली' हे मी ' तेली गली मै चली' आस ऐकायचो Proud

शिल्पा शेट्टी तेली गली (अंधेरीला) जायला का मागतेय ते कळायच नाही. Happy

हे मला ऐकू आलेलं नाही. पण ज्यांच्या घरी स्वयंपाकाला राधाबाई येतात, त्या सर्व घरांना हे गाणं डेडिकेट करत आहे :

राधा बिना है, किचन अधूरा
छोड नही जाना राधा, छोड नही जाना .........

>>'अरे अरे ज्ञाना न्हाला टिपा म्होर' = ज्ञाना नावाचा मुलगा पिंपा समोरच आंघोळीला बसला
>>तेली गली

अशक्य Proud

काल एक गाणं ऐकलं 'मत जैय्यो नौकरिया छोडके तोरे पैय्या पडू बलमा'. हे आजपर्यंत ''मत जैय्यो नगरिया छोडके' असं ऐकत होते. नौकरी सोडून तो गेला तर हिचं काय जातंय काय माहित. नाहीतर आजपर्यंत हिरविणी हिरोच्या नोकरीच्या नावाने बोटं मोडायच्या.

'केशवा माधवा' हे गाणं आपल्या चांगलं परिचयाचं (खरंतर अतिपरिचयाचं)
यात एक ओळ आहे, 'वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती'

आमच्या शेजारच्या काकू गाताना ही ओळ अशी गायच्या
वीर धनुर्धर पारश्यासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती

मला काकूंच्या गाण्यातल्या 'वीर धनुर्धर', 'पारशी', आणि 'सुदर्शनचक्रधारी कृष्ण' यांची संगती लावताना फार त्रास झाला होता. शेवटी पुस्तकात शब्द मिळाले आणि आमची हसून हसून पुरेवाट झाली. Rofl

'मत जैय्यो नौकरिया छोडके तोरे पैय्या पडू बलमा'. >>> स्वप्ना, तिच्या घरी ड्रायवर असेल गं तो तिच्या श्रीमंत बाबांचा. मधल्या एका काळात फॅशन होती ना हिरॉइनने 'कम औकात'वाल्या हिरोच्या प्रेमात पडण्याची. त्यातही तो वडिलांचा नौकर असेल तर अजुन भारी Proud

साधना सरगम यानी गाईलेले एक छान चालीचे गाणे आहे {चित्रपटाचे नाव माहीत नाही}

~ "दिस चार झाले मन, पाखरू होऊन !"

पण ऐकताना मात्र असे वाटते नायिका म्हणत आहे :

~ "डिसचार्ज झाले मन, पाखरू होऊन !"

धमाल आहेत, हे किस्से.
विमानात मी मेरे ब्रदर कि दुल्हन बघितला. त्यात ते झुणकी झुणकी असे काय शब्द आहेत ? आणि अर्थ काय त्याचा ?

पातळ झुणका तर नव्हे ? Happy

@ अशोक.
हा हा हा.... डिसचार्ज झाले मन, आणि तेही पाखरू होऊन ! भारीच...

@ म्हमईकर Lol

@ दिनेशदा
ते झुणकी नाही धुनकी असेल कदाचित
विमानात तुम्हाला विमान कंपन्यांचे केक आणि कटलेट खाउन कंटाळा आला असेल आणि मस्त खमंग झुणका आठवला असेल हो ना....... Happy

दिनेशदा ~ मीही ते 'मेरे ब्रदर की दुल्हन' मधील गाणे ऐकले होते त्यावेळी 'झुणकी' ऐवजी मला 'डुलकी डुलकी' असे ऐकत आहे असे वाटत होते. अर्थात तसा तो शब्द असणे शक्य नव्हते. पुढे तो "धुनकी धुनकी' आहे असे स्पष्ट झाल्यावर त्याचा अर्थ शोधून काढला तर 'धुनकी लागे' म्हणजे रमी खेळताना सिक्वेन्सला नेमका हवा तो पत्ता लागणे असा आहे. चित्रपट पाहिला नसल्याने पडद्यावर याप्रसंगी काय दृष्य आहे हे माहीत नाही. पण साधारणतः गीता दत्तचे जे एक जुने गाणे आहे 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो ये दाँव लगा ले' यात असे जे नायकाला प्रोत्साहनात्मक आवाहन आहे, तसेच 'धुनकी लागे' त असावे असे वाटते [खात्री नाही].

साधना सरगम यानी गाईलेले एक छान चालीचे गाणे आहे {चित्रपटाचे नाव माहीत नाही}

~ "दिस चार झाले मन, पाखरू होऊन !"

पण ऐकताना मात्र असे वाटते नायिका म्हणत आहे :

~ "डिसचार्ज झाले मन, पाखरू होऊन !"
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> Proud

चित्रपट : आईशप्पथ

'तेरे घर के सामने' चित्रपटातल्या 'देखो रूठा ना करो, बात नजरों की सुनो' गाण्यात नुतनच्या तोंडी असलेल्या कडवं :

जान पे मेरी बिती, आपकी ठेहरी हॅंसी
हाय मै जान गयी, प्यार की इतनागरी

असं मी इतके दिवस म्हणत होते. आताच लिरीक्स पाहिले त्यात तो शब्द फितनागरी असा आहे हे कळलं. पण याचा अर्थ काय????

मामी नेहमीच्या ऐकण्यातले गाणे, पण त्या गाण्यात हा शब्द किती चपखल बसलाय ना ? (अर्थ ? )

मी, सैंया झुठोंका बडा सरताज निकला
मधली,
मैने इक दिन जरासी जो की मस्करी

हि ओळ,

मैने इक दिन जरासी जो किमत करी... अशी गुणगुणायचो !

अशोक,
त्या गाण्यातला उच्चार भयानकच आहे. (आणि मला झुणका आठवणं शक्यही आहे.)

त्या पारशीबाबा वाल्या बाई, नक्कीच एखाद्या अग्यारीसमोर रहात असणार. किंवा भायखळ्याला, खडा पारश्याच्या समोर.

होय दिनेशदा ~ मीही मुद्दाम "धुनकी" गाणे आत्ताच नेटवर ऐकले. तोच उच्चार नव्हे तर सारे गाणेच अशाच भयावह वाटू शकणार्‍या उच्चारांचेच आहे. [यातच एक 'मधुबाला' ला केन्द्रीत ठेवून रचलेले एक गाणे दिसले, पण ऐकले नाही अजून, पाहिले तर नाहीच... उगाच मधुबाला ईज इक्वल टु कॅटरिना ऑर व्हाईस व्हर्सा असा काही प्रकार असेल या भीतीपोटी]

@ मामी

इतकी वर्षे देव आनंद आणि नूतन यानी सिमला रोडवरील त्या किरकोळ स्कूटर अपघातानंतर म्हटलेले गाणे ऐकत/पाहात होतो, पण मलाही ते 'फितनागरी' आहे हे आत्ता तुमची पोस्ट वाचल्यावर समजले. अर्थ अर्थातच डोक्यात गेला नाहीच. गुगलले तर 'फितना' चा अर्थ = Seduction or Temptation आहे असे दिसले. आता त्या अनुषंगाने "हाय मै जान गयी प्यार की फितनागरी" असे लंगडत लंगडत लटक्याने हिरवीण म्हणते म्हणजे "मी जाणून घेतले प्रेमाचा मोह म्हणजे काय असते" असा घेतला तर चालू शकेल ?

Pages