मासे ३२) पापलेट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 June, 2011 - 02:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पापलेट
हळद
मसाला
मिठ
आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या खालील प्रमाणे.

हे चिरा पाडलेले पापलेट स्वच्छ धुवुन घ्या. बघा कशी मस्त चकचकीत गोरी गोरी दिसतायत.

आता पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन जर धिर असेल तर थोडावेळ मुरवा.

आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.

२-३ मिनीटांनी पलटा ती बाजु शिजली की परत पलटा आणि पहीली बाजू शिजवुन परत दुसर्‍या बाजूला पलटून गॅस बंद करा. समजला का अलटी पलटी गेम ? जर कठिण वाटत असेल तर पाच मिनीटे एक बाजु शिजवुन पलटी करुन दुसरी बाजु पाच मिनीटे शिजवा आणि गॅस बंद करा. शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ पापलेट पाहिजेच ना.
अधिक टिपा: 

ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो महागच असतात छोटे असतील तर १०० ला ४-५ मोठे असतील तर कधी १५० तर कधी २०० ला जोडी. वरचे आम्हि मुरुडला गेलेलो तेंव्हा घेतले आणि केले होते. तिथे स्वस्त मिळाले ४०० रुपयांत ९ मोठे मिळाले.

माश्यांच्यात पण वय होऊ लागलं की सुरकुत्या पडतात का? Lol हा मासा झूलॉजीच्या प्रॅक्टीकलच्या वेळी हातात धरला होता.

माझ्या तोंडातुन पाणी गळेल अस वाटायला लागलं होतं मला.
अगदिच तळहाता एवढी असली तर मी पापलेट अख्खी तळते. नाहीतर नाही. तुकड्या केल्या की मस्त खरपुस तळल्या जातात Happy

अश्विनी त्या माश्याच भाग्य उजळल असेल.

किरण Happy

अमी नेहमीच नाही ग जर पुरवायचे असतील तर तुकड्याच कराव्या लागतात. पण जर स्पेशल ऑकेजन असेल तर असे केलेले चांगले वाटतात.

अखी हे मोठे मासे म्हणजे पापलेट, सरंगा, हलवा, घोळ, रावस ह्या गटातले मासे महाग असतात तर बोंबिल, मांदेली, बोईटे असे छोटे मासे स्वस्त असतात.

मी खपली पापलेट जे खरचं खुप मोठं होतं ते १५०० ल जोडी असं ऐकलं आणि स्वप्न बघत होते की मी हे कधी घेईन. माझ्या भावाने एकदा आणंलं होतं

१५०० ला असत तर त्याचा फोटो वरती लावला असता फक्त न घेतल्याने मी तयार पापलेटचा फोटो नसता टाकला.

<< तुम्ही अख्खे पापलेट फ्राय करता? >> अख्खे पापलेट 'खाय' पण करतो ! Wink
हा प्रकार मस्त आहेच पण मीठ, किंचित चिंचेचा कोळ व हळद लावून थोडा वेळ ठेवून मग तिखट लावून [ हवं तर थोडं पिठात घोळवून] तळलेले -शॅलो फ्राय - पापलेटही छान लागते. रायगड जिल्ह्यात कांही ठीकाणी भाजून वाटलेलं सुकं खोबरंही वाटपात घालतात. छान स्वाद येतो.

<< जर धिर असेल तर थोडावेळ मुरवा. >> जागूजी, हे पापलेटच्या बाबतीत महत्वाचं असावं कारण पापलेटला स्वतःची अशी जोरदार चव नसते .
<< ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत. >> ताजं व मोठं पापलेट ओळखून झालं व नोटांचं बंडल खिशात नसेल तर कोळणीला ' चेक किंवा क्रेडिट कार्ड चालेल ना' , असं आधीच विचारा; पापलेट ऐवजी मग शिव्या नको खायला !! Wink

खपली पापलेट >> खपली नाही गं कापरी. (खपली नांव ऐकुनच पापलेटाला कापरं भरेल बहुधा). रविवारी १००० रु जोडी होती कापरी पापलेटाची. ८०० पर्यंत द्यायला तयार होती. एकादशी असल्याने फारसं गिर्‍हाईक नव्हतं म्हणुन कदाचित. मी नेहमीची आणली २०० रु जोडी.

जागु, पोटात मसाला भरुन मग तळायची ही रेसिपी आहे कां??

हो साधारण तशीस पण हे भरले पापलेट नाही. भरले पापलेट करण्यासाठी कलाकुसर करुन व्यवस्थित पापलेट्च्या पोटाला मधुन चिर द्यावी लागते.

पुर्वी कोळणी कापून द्यायच्या, भरले पापलेट करायचे असेल तर.
वहीनी ससून डॉक हून (म्हणजे जागूच्या समोरचा किनारा ) आणते कधीतरी. तिथे अगदी पहाटे गेलात, तर चांगले आणि स्वस्त मिळतात मासे.

जागू छान रेसिपी... Happy
तव्यावर तळायला ठेवलेल्या माश्यांना डोळे दिसतायंत. खाताना त्यांचं काय करता तुम्ही लोक? Uhoh
फारच मुर्ख प्रश्न असेल तर उत्तर नको देऊ.. Sad

डोळ्यांचं आम्ही काही नाही करत, पापलेटं भरल्या डोळ्यांनी आम्हाला बघतांत! Wink मी डोकं काढुन टाकतो, आणि मग त्याला तळतो वगैरे. पापलेट मी कधिच कापुन आणत नाही, स्वत: घरी कापतो. कारण मला त्याचं तळलेलं डोकं खायला फार आवडतं आणि कोळणी तेच कापुन टाकतात.

अशा तळलेल्या पापलेटावर लिंबु पिळुन खायचं, मस्त लागतं.

भरल्या पापलेटाची रेसिपी कधी टाकतेस??

कारण मला त्याचं तळलेलं डोकं खायला फार आवडतं आणि कोळणी तेच कापुन टाकतात. >>>

कोळणीला सांगायचं कापुन टाकु नकोस. मध्ये एक चीर देउन साफ कर आणि ठेव. माझी कोळीण विचारते.

भाऊ ह्या कोळणिंच्या बाबतीत खुप जपुन रहाव लागत. त्यांना साध विचारल ना ताजा आहे ना मासा तर पाठि घेतात रागाने आणि बोलतात ताजा हाय का विचारते जा नको घेउ त्यांचा आवाज इतका मोठा असतो की चार लोकही आपल्या कडे बघतात व आपण काहीतरी चोरी बिरी केलेय असा भास होउन आपल्यालाच लाज वाटते.

भ्रमर माझ्याकडे पण काती आहे. कोळणीकडे आपल्याला हवे तसे तुकडे करुन मागायचे अर्थात ती जर रोजची असेल तर आनंदाने देते. एखादी वरच्यासारखी वागते, एखादी कटकट करत का होईना पण देते.

निकिता, नंदीनी भरले पापलेट ची रेसिपी थोड्या दिवसांत देते चांगले मिळाल्यावर.

दिनेशदा मी मे महिन्यास ससुन डॉकला जाता जाता राहिले आता पावसाळा संपल्यावर. आता लाँच खुपच हलते. आणि तिथे तर मचवा जातो.

दक्षिणा अग डोळे नाहि खात ते काट्यांसारखे टाकुन द्यायचे.

मामी मी २-३ वेळा भेंडीच्या पानांत छोटे मासे भाजले आहेत. मस्त लागतात.

निलु, रोहीत, तात्या धन्यवाद.

जागु तोंपासु . पापलेट बघूनच ते खायची इच्छा झाली आहे , पण माझ्या सासरी कोणालाच आवडत नाही त्यामुळे कधी आणले जात नाही , तेव्हा तुझ्या फोटोंवरून्च समाधान मानते.

Pages