डिसक्लेमर : लेखक या विषयातील जाणकार नाही. श्री गूगळे यांच्या सहकार्याने जे काही इथे लिहीले आहे त्याचा मूळ स्त्रोत देण्यात येत आहे. धाग्याचा हेतू विषयाबद्दल चर्चा घडवून आणणे आणि या विषयाबाबत असलेल्या गैरसमजांचे निराकरण करणे हा आहे. धागा वाचून जाणकार आपले मत देतीलच हा ही एक हेतू आहेच.
------------------------------------------------------------------------------------
चित्र कसं वाचावं हे मुळातच व्यवस्थितपणे कुणी माहीत करून दिलेलं नव्हतं. ऑर्कूटवर एकदा अॅब्स्ट्रॅक्ट पोएट्रीवर चर्चा झाली तेव्हां एका कमेंट ने माझे लक्ष वेधून घेतले. अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग असू शकते तर पोएट्री का नाही असा तो प्रश्न होता.
उत्सुकता चाळवली आणि शोध घेतला तेव्हां प्रतिमांच्या माध्यमातून जसं ग्रेसजी किंवा जुने गूढ कवी व्यक्त होतात तसाच काहीसा प्रकार इथं असावा असं वाटलं. पण या क्षेत्रातले दिग्गज जसे पिकासो, व्हॅन गॉग्ज यांच्या प्रतिमा आणि त्यांचे संदर्भ पाश्चात्य जगातले. मग कशाला डोकं शिणवा म्हणून तो नाद सोडून दिला होता.
योगायोगाने कवितेतल्या प्रतिमांशी जुळणारी काही चित्रे पाहण्यात आली आणि भारतीय संकल्पना घेऊन केलेले अॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग थोडेफार उलगडून पाहण्याचा प्रयत्न करता आला. अर्थात या पाठीमागे गूढ किंवा कोडं सोडवण्याची असलेली उत्सुकता इतकाच भाग होता. ज्ञान असं नाहीच.
कुणाला प्रश्न पडेलही. सरळ सरळ चित्र काढता येत असताना हे असं उफराट्या पद्धतीने काढण्याची गरज काय ? तर त्याचं उत्तर असं आहे, व्यक्त होण्याची, अभिव्यक्तीची प्रत्येकाची शैली त्याच्या स्वभावविशेषावरून ठरत असते. समोर दिसतंय त्याचं जसंच्या तसं चित्र काढण्याला कारागिरी म्हणता येईल, त्यात सृजनात्मकता काय आहे असा प्रश्न काही बुद्धिमान कलाकारांना पडला आणि त्यांनी चित्रातून बोलायला सुरूवात केली.
व्यक्तिचित्रणाच्या, चित्रकारांच्या देखील शैली असतात. लता मंगेशकर यांचं ब्रशच्या फक्त तीन ते चार स्ट्रोकमधे बनलेलं एक अप्रतिम पोर्ट्रेट पाहण्यात आलं होतं तर जोधपूरच्या उम्मीद भवन मधे जुन्या महाराजांची तैलचित्र पाहीली त्यात वारीकसारीक तपशील भरण्यात आलेले.
अर्थात तैलचित्रांमधेही रंगांचा पोत, बॅकग्राउंड, सावल्या हे घेण्याची पद्धत, ब्रशचे फटकारे, रेषांचा ठळकपणा यात फरक असूनही प्रत्येक चित्रं हे सुंदरच भासतं. थोडक्यात काय तर दोन चित्रकारांच्या एकच वस्तूच्या पोर्ट्रेटमधेही फरक येणारच.
हाच धागा पकडून पुढे चित्रातून चित्रकार संवाद साधू लागले. त्यांनी रंगांची आणि रेषांची भाषा जाणली आणि त्यातून निर्माण झालं आजचं मॉडर्न आर्ट. या कलेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जालावर हा लेख मिळाला.
http://www.harley.com/art/abstract-art/index.html
(मूळ लेखातील चित्रं इथे देऊन माबो प्रशासनाला अडचणीत आणू इच्छित नाही सबब लिंक दिलीय).
वरील लेखात लेखक म्हणतो त्याप्रमाणे काळ, वेळ, स्थळ आणि संस्कृती याप्रमाणे अभिव्यक्तीत किती फरक पडतोय. लेखकाने उदाहरणं खूपच छान दिलीत. अर्थात तरीही अॅब्स्ट्रॅक्ट आर्टची व्याख्या कशी करायची हे समजत नव्हतं.
ते मला खाली दिलेल्या लिंकवर उलगडलं...
http://www.art-is-fun.com/abstract-art.html#whatisabstractart
कविता जशी मुक्त झाली. छंद, बंध यापासून फारकत घेत नवी मुक्तकविता जन्माला आली तसंच आहे हे... पण पॅसिव्ह आहे ! यात बहुधा जीवनविषयक दृष्टिकोण, मानवी भावभावनांचे उमटणारे तरंग किंवा अध्यात्मिक गुढत्वाबद्दलचं भाष्य दिसून येतं. फक्त चित्रं काढणं यात हे भाष्य शक्य नाही. आकारांमधे, वक्रतेमधे असलेल्या शक्यतांमधून ते व्यक्त केलं जातं.
( याच भागाबद्दल जास्त उत्सुकता आहे खरी. अर्थात ती तपस्या आहे, अभ्यास आहे. आपला इथपर्यंतचा उद्देश हा तोंडओळख असा होता. माहीती देणं हा होता. ज्ञानासाठी तर गुरूच लागेल म्हणा... म्हणूनच या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहीतं व्हावं ही अपेक्षा आहे. )
सृजनशील व्यक्तींसाठी हे एक आव्हानच आहे. मला तर नेहमी वाटतं, कविता सुचणं, एखादी संगीत रचना सुचणं हे त्या व्यक्तीच्याही हातात नसतं. हे सर्व जाणिवांच्या पलिकडलं काम आहे. संगीतकाराची एखादी रचना तयार होते, त्यात शब्द येतात, वाद्य येतात आणि त्यांनी आपल्या भावना उद्दीपित होतात. हे संगीत कागदावर उतरवून काढलं तर ?
तर मग एक अॅब्स्ट्रॅक्ट कलासूक्त जन्माला येईल. तोच आनंद पाहणा-याला मिळणार असेल तर ते यशस्वी म्हणता येईल. अर्थात जसं शास्त्रीय संगीत समजायला किंवा कवित समजायला प्रतिभा लागते तसच इथंही आहे.
आपल्यालाही हा प्रकार शिकता येईल का ? असा प्रश्न आतापर्यंत मनात येणं साहजिकच होतं. तर काय गूगळे तयारच होते. त्यांनी लगेच माहीती हजर केली.
http://www.art-is-fun.com/how-to-paint-abstract-art.html
या चित्रांचा जसजसा अभ्यास करावा तसं आपलं ज्ञान किती तोकडं आहे हेच समजलं फक्त....
आणखी काही चित्र खालील दुव्यावर
जिज्ञासूंसाठीही श्री. गूगळे हजर आहेतच. या विषयाबद्दलची उत्सुकता जागॄत करण्याचं काम या लेखाने केलं असेल तर उद्दिष्ट सफल झालं इतकंच म्हणेन.. !
http://www.google.co.in/search?tbm=isch&hl=en&source=hp&biw=1600&bih=783...
- किरण
<< अनुभव महत्वाचा. मात्र हे
<< अनुभव महत्वाचा. मात्र हे वेगळे काढता येण्यासाठी खूप चित्रे बघायला हवीत. >> जोडीला स्वतःच्या मनातही प्रतिमांचं एक भरीव दालन असणं आवश्यक असावं; तरच अमूर्त चित्रांतील प्रतिमातून स्वतःला भावणारी अशी खास अनुभूति मिळत असावी. मला स्वतःला मात्र फारच क्वचित अमूर्त चित्रांतून अशी अनुभूति मिळाली कारण १] मीं अजूनही ' चित्र समजून घेण्याच्या' मानसिकतेतच अडकलो असेन किंवा २] प्रतिमा उमजण्यासाठी रंग- आकारांशी जी जवळीक / आत्मीयता आवश्यक असावी, तीची माझ्यात कमतरता असावी. अमूर्त शैलीत पिकासोपेक्षां मला सल्वादोर डाली अधिक प्रभावी वाटला व भावला पण त्यामुळे मला त्याचं चरित्र वाचण्याचा मोह अनावर झाला ! म्हणजेच चित्र 'समजण्याच्या प्रक्रिये'कडेच अजूनही माझा कल आहे, हें प्रांजळपणे कबूल करतो. .
+ = अनेक भाषा. अनेक प्रतिके.
+
=
अनेक भाषा. अनेक प्रतिके. अनेक उद्बोधक कथा.
वाचतोय.
(किरनकाका पर्स्नल घेउ नका)
अमूर्ताची ओळख घडवणे म्हणजे
अमूर्ताची ओळख घडवणे म्हणजे ग्रेसच्या कवितांचा आस्वाद घ्यायला शिकव्ण्यासारखं आहे असं उगाच आपलं मला वाटतं..
(वेरावळीय समुद्राच्या दृष्टांतात बुडालेला) इब्लिस...
हाऊ कॅन आय डेझर्ट यू मागधी?
द फाऊंडेशन ऑफ माय ओन मिराज...
Kiran: लेख अतिशय आवडला, कारण
Kiran:
लेख अतिशय आवडला, कारण नवीन काही ज्ञान झाले. तुमचे व्यक्तीमत्व अधिकाधिक प्रगल्भ होत चालले आहे हे खूपच आनंददायक आहे. अनेक आशिर्वाद.
निंबुडा मान्यय प्रद्युम्नजी
निंबुडा
मान्यय

प्रद्युम्नजी
भाऊ - मनातल बोललात
..
..
एखादी नवी गोष्ट जाणून
एखादी नवी गोष्ट जाणून घेण्याची असलेली उत्सुकता, जिज्ञासा आणि एखादी गोष्ट केवळ आपल्याला कळत नाही म्हणून पूर्वग्रहदूषित मतांचा प्रसार करणे यातलं अंतर हल्ली दिसून येत आहे. एखादी कला, अभिव्यक्ती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार या जगात कुणालाच नाही. आपल्याला काय आवडतं, समजतं हे सांगण्याचा अधिकार मात्र प्रत्येकाला आहे. स्टारी नाईटस ची चित्रमालिका ही एखाद्या वेडसर माणसाचं काम आहे इथपासून ते चित्रकाराचा मानसिक प्रवास आणि त्याच्या महत्वाकांक्षा यांचा अभ्यास करून त्याचा सुसंगत अर्थ लावणारी मंडळी यांच्यापर्यंत अनेकांना त्यातून हजारो अर्थ दिसले. हे त्या कलाकृतीचं यश नाही का ? मुळात ते चित्र पाहताक्षणी त्याचा अर्थ जाणून घ्यावासा वाटणे हेच त्या कलाकृतीचं यश नाही का ? ही चित्र पाहताना जसा अलौकिक आनंद पाहणा-याला मिळतो अगदी तसाच काही कविता, शिल्पं, म्युरल्स यातून मिळतो. काही वेळा असा आनंद होत नसल्यास तिथं डोकं आपटण्याची काहीच गरज नाही. पण इतरांबद्दल शंका घेणं कितपत योग्य आहे हे ज्याचं त्यानं ठरवावं.
नृत्य किंवा गायन, वादन या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत. त्यात अॅब्स्ट्रॅक्ट असं काही नाही. तसंच अॅब्स्ट्रॅक्ट म्हणजे बेसूर असंही नाही. नृत्यातूनही व्यक्त होता येतं. उदय शंकर यांच्या गाजलेल्या काही रचना आहेत. मात्र याबाबतीत त्या त्या क्षेत्रातले तज्ञ, जाणकार यांनी बोललेलं योग्य राहील. प्रत्येक सृजनशील कलाकाराला प्रयोगाचं स्वातंत्र्य आहे. त्याचा उद्देश आणि विचार जाणून घेऊन केलेल्या टीकेचाच विचार अशा प्रयोगाला समृद्ध होण्यास मदत करत असतो. नकारात्मक टीका विचारात न घेणे अनेकांना श्रेयस्कर वाटते.
नृत्य किंवा गायन, वादन या
नृत्य किंवा गायन, वादन या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत. त्यात अॅब्स्ट्रॅक्ट असं काही नाही. <<<
भारतीय (हिंदुस्थानी व कर्नाटिक दोन्ही) शास्त्रीय संगीत अॅब्स्ट्रॅक्ट नाही?
असो मला काय कळते म्हणा. तुम्हाला नक्कीच जास्त माहित असणार.
कॉपी पेस्ट करताना नेहमी मागची
कॉपी पेस्ट करताना नेहमी मागची पुढची वाक्ये संदर्भासहीत घेऊन कोट करावीत.
नृत्य किंवा गायन, वादन या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत. त्यात अॅब्स्ट्रॅक्ट असं काही नाही. तसंच अॅब्स्ट्रॅक्ट म्हणजे बेसूर असंही नाही. नृत्यातूनही व्यक्त होता येतं. उदय शंकर यांच्या गाजलेल्या काही रचना आहेत. मात्र याबाबतीत त्या त्या क्षेत्रातले तज्ञ, जाणकार यांनी बोललेलं योग्य राहील.
असो मला काय कळते म्हणा. तुम्हाला नक्कीच जास्त माहित असणार. >>>>> असा अर्थ का काढला हे समजेल का ? प्लीजच समजावून सांगा. तसं असल्यास माफी मागण्याची तयारी आहे. नाही तर हे असं का लिहीलंय हे मला समजेल असं समजावून सांगा.
तुम्ही जाणकार असाल तर माहिती द्यावी ही विनंती लेखकाने ही केलेली आहे. तुम्हाला कुणी कळत नाही असं म्हटलंय का हे दिसलेलं नाही. हे स्वतःवर ओढवून घेणं लोक कधी थांबवतील देव जाणे ! कि कोण चुकतोय तितकीच काकदृष्टी काहींकडे असते हे ही कळत नाही. किमान पुढची मागची वाक्यं देखील पाहण्याचा काहींना धीर नसतो. हे बरेचदा पाहण्यात आलेले आहे. असो.
मला या कलांना अॅब्स्ट्रॅक्ट म्हणता येईल कि नाही याबद्दल काहीही माहिती नाही.
कॉपी पेस्ट केलेल्या ओळीच्या
कॉपी पेस्ट केलेल्या ओळीच्या पुढच्या ओळी परफॉर्मिंग आर्टस अॅब्स्ट्रॅक्ट आहेत की नाहीत याबद्दल काहीही बोलत नाहीत. संदर्भ सोडून काहीही क्वोट केलेले नाही.
एकदा तुम्हीच म्हणताय या कलांमधे अॅब्स्ट्रॅक्ट काही नाही आणि मग तुम्हीच म्हणताय अॅब्स्ट्रॅक्ट म्हणता येईल की नाही माहिती नाही. नक्की ठरवा.
पण तुम्हाला इतरांना मूर्खात काढण्याचा छंद असल्यास काहीच म्हणणे नाही <<
असल्या वाकड्यात शिरण्यानंतर इथे तुमच्यापेक्षा वेगळे मत असलेला कोण कशाला बोलेल?
जाऊदे तुमच्याशी बोलणं म्हणजे स्वतःच्या डोक्याला ताप हा अनुभव एकदा आलेला असताना बोलायला गेले हेच चुकलं.
कि कोण चुकतोय तितकीच
कि कोण चुकतोय तितकीच काकदृष्टी काहींकडे असते हे ही कळत नाही. किमान पुढची मागची वाक्यं देखील पाहण्याचा काहींना धीर नसतो. हे बरेचदा पाहण्यात आलेले आहे. <<
या बडबडीनंतर तुम्हाला तुमच्या पोस्टसना वा व्वा म्हणलेले हवेय एवढेच सिद्ध झाले. धन्यवाद.
परत तुमची पोस्ट दिसल्यावर न दुर्लक्ष करणे हे आणि एवढेच करणार.
तुमचा उद्देश तोच आहे. तुम्ही
तुमचा उद्देश तोच आहे. तुम्ही माहितीही देत नाही, मागची पुढची वाक्ये जोडूनही पाहत नाही. जाणकारांनी बोललेलं योग्य राहील याचा अर्थ लक्षात घेत नाही, इथे तुम्हाला कुणी काही बोललेलं नाही.. असं असताना नेहमीप्रमाणे अकारण वाकड्यात प्रतिसाद देऊन भांडणं उकरून काढताय. मी तरी इथून पुढे अनुल्लेख करणे पसंत करीन. तुमच्या बाबतीत हाच अनुभव सगळीकडे येतो हे खरं. वैतागवीरांची कमी नाही इथे.
असो मला काय कळते म्हणा. तुम्हाला नक्कीच जास्त माहित असणार. >>>>
या प्रकारच्या प्रतिसादांना वाकड्यात शिरणे म्हणत नसतील तर माझं मराठी सुधारण्याची गरज आहे हे नक्की.
विस्मया अनुमोदन...
विस्मया अनुमोदन...
Pages