पाऊस

Submitted by sancheet on 7 June, 2011 - 02:33

अशाच एका संध्याकाळी...गर्मीने मी थिजताना,
कृष्णमेघ दाटून आले बंध मातीशी जुळताना!

चाहूल लागे मनास माझ्या आभाळ दाटून येताना,
आला आला पाऊस ओला, ये रे ये रे म्हणताना!

श्रावणाची पहिली सर धावून खाली येताना,
बहरून गेली सृष्टी सारी त्याचे आगमन होताना!

प्रसन्नता दाटून आली मृद्गंध दर्वळताना,
मन उमलून गेले माझे पावसात चिंब भिजताना.

--संचित

गुलमोहर: 
शब्दखुणा: