बाराचा

Submitted by नितीनचंद्र on 2 June, 2011 - 03:22

कोण व्यक्ती राजकारणात जायला लायक यावर मी बरेच दिवस संशोधन करतो आहे.

राजकारणातला प्रत्येक माणुस हा टग्या असावाच लागतो अस नाही पण बाराचा असावा असा नियम असावा.

बारा हा शब्द अकरा नंतर येणारा बारा असा नसुन "बा" आणि "रा" पासुन सुरु होणार्‍या अनेक शब्दांशी नाते सांगणारा आहे. मराठीतला "बाराचा" हा शब्दप्रयोग इतका चपखलपणे राजकारणी लोकांशी संबंधीत आहे हे मला आत्ताच पटले आहे. "बारा" गावच पाणी पिलेला किंवा पाजलेला हे शब्द सुध्दा समानार्थी आहेत हे ही या कारणाने मला पटले.

बाराचा म्हणजे बारामतीचा किंवा १२ जन्मतारीख किंवा १२ वा महिन्यातला जन्म अस नव्हे पण यात काही अर्थ जरुर असावा. किंबहुना १२ तारीख व १२वा महिना ( डिसेंबर ) जन्माला आलेले सर्व राजकारणात महत्वाची भुमिका बजावतात हे पडताळुन पहाण्यासाठी आणखी काही अभ्यासाची गरज आहे.

( वरील सर्व मा. शरद पवार यांना व मा. गोपीनाथ मुंडे यांना लागु पडत असल्यास तो योगायोग समजावा )

राजकारणात लोक एकतर "बा" चे म्हनजे बाईला मानणारे असावे लागतात.

उदा. सोनीयाबाई, इंदिराबाई, ममताबाई, जयललिताबाई इ.....

किंवा "बा"बांना मानणारे असावे लागतात.

उदा. बाळासाहेब ठाकरे, बाजपेयी ( हिंदीत असाही उच्चार होतो),

धार्मिक बाबांना मानणारे अनेक राजकारणी पुरुष व स्त्रीयांचा यात समावेश आहे.

सत्यसाईबाबा यांचे अनेक शिष्य राजकारणात आहेत आणि धिरेंद्र ब्रम्हचारींच्या शिष्यांमध्ये इंदिरा गांधींचाही समावेश होता.

देव दुध पितो या अफवेने भल्या भल्या राजकारणी लोकांची गोची झाली होती. नाही म्हणाव तर जनता नाराज आणी हो म्हणाव तर पत्रकार नाराज. या अफवेमागे एक बाबाच होते म्हणे.

"बा" चा आणखी एक अर्थ होतो.

"बा"रकावे जाणणारा. राजकारणी माणसाच्या प्रत्येक कृतीत काहीतरी कावा असतोच त्यातही बारीक कावा जाणणारा हा सच्चा राजकारणी असतो.

उदा.

एकदा विलासराव देशमुख निवडणुकीच्या भाषणात म्हणाले की मी मामुली लोकांची पर्वा करत नाही. हे विधान साधे होते पण राजकारणी लोकांनी त्याचा बारीक अर्थ मातंग्,मुसलमान आणि लिंगायत असा लावला. परिणामी विलासराव त्या विधानसभा निवडणुकीत ५००० मतांनी पडले. ( हा संदर्भ जरी १५ वर्षांपुर्वीचा आहे. )

आणखी विचार केल्यानंतर "बा" चे अजुनही अर्थ लागले.

"बा"लबुध्दीचा ज्याला भाषण लिहुन दिले की जसेच्या तसे वाचणारा.
"बा"लब्रम्हचारी असल्याचा आव आणणारा.
( मी ब्रम्हचारी नाही, अविवाहीत आहे असे खुलेपणाने सांगणारा एखादाच )
"बा"दरायणी संबंध जोडणारा.
( आपल्या देशात राजेशाही संपली असली तरी त्याचा प्रभाव अजुन राजकारणात आहे. या राज घराण्याशी संबंधीत किंवा गांधी, नेहरु, असे आडनाव असलेला किंवा येणकेण प्रकारे स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्याशी बादरायणी संबंध जोडणारा )

"बा"ईलवेडा किंवा "बा"टलीवेडा हे शब्द फारसे लागु पडत नाही कारण राजकारणी होण्यासाठी हे क्लॉलोफिकेशन नाही. राजकरणात पडल्याचा तो आफ्टरइफेक्ट आहे.

अर्थात मुळच्या वृत्तीनुसार राजकारणात यशस्वी झाल्यानंतर ज्या कृती दिसतात त्या अश्या.

१) कोणी "बा"रबालांच्या भवितव्यासाठी झटतो.
२) कोणी "बा"ईलवेडा होऊन धर्म बदलुन, मंत्रीपद त्यागुन लग्न करतो.
३) कोणी संसदेत/विधानसभेत "बा"चा, "बा"ची करतो.
४) कोणी मंत्री झाल्यावर सर्वकाही आपल्याच "बा"चे असल्यासारखे वागतो.

काही राजाकारणी "रा" ला मानणारे असतात.

उदा. राजीव, राजसाहेब, राहुल, सर्व "रा"ष्ट्रीय पक्ष इ.

"रा" चा आणखी एक अर्थ होतो फक्त रात्री कार्यरत असणारे. उदा. चोर, दरोडेखोर

"रा" चा आणखी एक अर्थ राक्षसी महत्वाकांक्षा असाही घ्यावा लागतो.

सारा देश विकत घेण्याची असो किंवा सारा देश आपल्या फायद्यासाठी विकण्याची असो. राजकारणात महत्वाकांक्षा असल्याशिवाय माणुस टिकत नाही आणि पुढेही जात नाही.

ज्यांना "रा" चा खरा अर्थ माहित असतो ते राजनितीज्ञ असतात. विदुरनीती कृष्णनीतीचे अभ्यासक असतात. अर्थातच वैयक्तीक स्वार्थाचा यात मागमुस नसतो. राजकारणात राहुन राजनीतीचे नवीन मापदंड निर्माण करणार्‍या मंडळीत फारच थोड्या लोकांचा आज समावेश होतो. उरलेले सर्व राजनितीच्या नावाखाली झुंड्शाही, पुंड्शाहीचा पुरस्कार करताना दिसतात.

नावात "रा" असेल म्हणजे ती व्यक्ती कुशल राजकारणी असेलच असे नाही. अन्यथा रामदास आठवलेंना सध्याचा वनवास भोगावा लागला नसता. कोकणचा वाघ असलेले रामदास कदम यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळायला इतका उशीर लागला नसता.

"रा" पासुन सुरु होणार्‍यांमधे रामदास स्वामी येतात ज्यांचे वर्णन राजकीय गुरु असे करावे लागेल. आता ही जागा सध्याच्या काळात "रा"मदेवबाबा घेतील अस चित्र आज ४ जुन २०११ पासुन दिसु लागेल अशी चिन्ह दिसत आहेत.

गुलमोहर: 

मस्त

बार बार दिल ये गाये..... नितीन बाबा की जय हो!!! Happy

सही लिहिलंय नितीन... मला हा लेख वाचायला अंदाजे बारा मिनिटे, त्याचा अर्थ समजायला आणि पचायला पुढची बारा मिनिटे आणि प्रतिसाद लिहायला त्या पुढची बारा मिनिटे लागली असावीत असा माझा अंदाज बारकाईने वेळ न पाहिल्यामुळे झालेला आहे. Proud

ह्या बारा गावचे पाणी दाखवणार्‍या आणि तरीही बाराच्या भावात न निघालेल्या बावनखणी राजकीय लेखासाठी तुम्हाला बारा मोदक, बारा वेळा शाबासकी आणि यापुढच्या बारा लेखांसाठी इन अ‍ॅडव्हान्स प्रत्येकी बारा शुभेच्छा!!! Happy

हुश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श.... दमले!!! बारा मिनिटे शांत बसते आता Proud

Pages