एखाद्या विषयाची आवड कशी निर्माण करता येईल

Submitted by Meghana1 on 11 July, 2008 - 05:26

५/६ वर्षाच्या मुलांमध्ये भाषा, गणित ह्या विषयांची गोडी वाढावी म्हणून काय करता येईल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त धागा , दाद याची पोस्ट छान आहे माझी मुलगी ५ वर्षाची आहे.

मी दिवसातून किमान १ तास मी मुलीसोबत स्पेंड करायचा प्रयत्न करते. तीला शाळेत writing सुरु झालं तेव्हाच थोड थोड सांगायला सुरुवात केली कि, जसं तू खेळतेस , जेवण जेवतेस मस्ती करतेस तस थोड writing पण करायच , जास्त नाही फकत १५ मिनिटं, पण मग ती १५ मिनीट ओन्ली writing. मग काय हातात नसलेल्या घड्याळाच बटण दाबून आम्ही बार्बी पॉवर ऑन करतो आणि १५ पुढची मिनिटं कधी सुसाट , कधी आरामात पण writing पूर्ण करतो. तिला मुद्दाम तिच जुनं writing दाखवते आणि handwriting मधला फरक तीचा तिलाच जाणवतो.

तिच्या सांगण्याप्रमाणे writing ला अभ्यास म्हणायचं नाही ,तर फन ऍक्टिव्हिटी म्हणायचं, अभ्यास म्हटला कि आम्हाला कंटाळा येतो.

आठवड्याचे दिवस ठरवले आहेत आम्ही, writing व्यतिरिक्त १ दिवस ओरिगामी ,१ दिवस फॅक्त मराठी कविता , १ दिवस इंग्लिश पोएम्स ,
१ दिवस मनोसक्त नाच कोणत्याही गाण्यावर, १ दिवस स्टोरी बोर्डिंग , १ दिवस गोष्टीतल्या कॅरेक्टर्स ची ACTING,१ दिवस तिचा.... त्या दिवशी नो ऍक्टिव्हिटी जस तुला हव तसं - यातून तिलाही भन्नाट सुचल्याच जाणवलंय. फुल्ल टु धमाल यातुन खूप काही शिकते ते आणि मी पण ,तिचा उत्साह बघून मग माझा हि हुरूप वाढतो .

मी सातारा प्लांटेशन चा लेख लिहिला ,होता तश्या प्रकल्पाना आवर्जून नेते तीला.

मुलांसमोर एखादी गोष्ट येत नाही बोलायचं नाही ...आपण प्रयत्न करू/ जमत नाही तर वेगळ्या पद्धतीने करू अस बोलावं भाषा, गणितच काय मग सर्वच विषयांची मुलांना गोडी लागते.

मी Robin Age kids न्युज पेपरच subscription घेतल आहे. खूप छान न्युज पेपर आहे. जमल्यास अवश्य घ्या आपल्या मुलांसाठी
http://www.robinage.com/

खूपच छान धागा आणि प्रतिक्रियाही.

५/६ वर्षाच्या मुलांमध्ये भाषा, गणित ह्या विषयांची गोडी वाढावी म्हणून काय करता येईल?

या वयात मुलांना विज्ञान विषयाचे कुतूहल असते कारण अभ्यासक्रमातल्या बहुतेक गोष्टी त्यांना आसपास दिसत असतात सहाजिकच त्या विषयाची गोडी लगेच लागते, याच्या नेमके उलट भाषा आणि गणितासारख्या विषयात होते...

भाषा
घरात जी भाषा आपण बोलतो सहसा तिचा अभ्यास करताना मुलांना फार अडचण येत नाही , पण तरीही त्यांच्या अभ्यासक्रमातल्या गोष्टी पालकांनीही वाचायला हव्यात , माझा ६ वर्षाचा मूलगा आहे त्याने मला एकदा मराठी वर्णामधील क वर्ग , ट वर्ग यांच्या शेवटी न किंवा म कसा असतो ते सांगितले, त्या त्र सारख्या दिसणा-या शब्दाचा उचार न आहे हे तेव्हा कळले आणि माझ्या एकूण मराठी ज्ञानाविषयी थोडे वाईटही वाटले त्यानंतर लगेचच मी वाळींबेचे सूगम मराठी व्याकरण वाचू लागलो आणि जेवढे काही त्याच्या अभ्यासात आहे ते त्याला समजावू लागलो, मुलांचे पालक जेव्हा मुलांबरोबर अभ्यास करतात तेव्हा कोणत्याही भाषेची गोडी लागणे फारसे जड जात नाही... आणि मग मधे मधे आपण मुद्दाम चूकणे आणि मुलांनी ती चूक सुधारणे यातून त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढतो.....
त्यामुळे भाषा विषय आधी पालकांनी अभ्यासावा आणि मग मुलांबरोबर अभ्यासावा असे व्ययक्तिक मत ,,, याखेरीज आधीच्या प्रतिक्रियेत आलेले खडू , फळा , चित्रे हे ही तितकेच प्रभावी आहे..

गणित
हा विषय काहीतरी अवघड प्रकरण आहे हा गैरसमज प्रथम पालकांनी डोक्यातून काढावा आणि कधीही मूलांना या विषयाची भिती घालू नये. हे असेच असते असे सांगण्यापेक्षा हे असे का असते हे सांगता आले तर त्यांचा पाया भक्क्म होण्यास मदत होते, तसे पाहता शाळेमध्ये त्यांना सर्व काही शिकवतातच पण कधी एखाद वेळी शाळेला दांड्या मारल्या गेल्या असतील आणि त्या काळात शिकवले गेलेले आपल्या मुलांना येत नसेल तर त्यांच्या मनात न्युनगंड तयार होतो आणि तो क्लास लावून वगैरे जावू शकत नाही, यावर सरळ सोपा उपाय म्हणजे मुलांशी समरस होवून नेमके अडते कुठे हे त्याच्याकडून काढून घ्यावे आणि ढोबळ पध्दतीने त्यांना शिकवावे ,,,
उदा बेरीज शिकवताना सरळ त्यांना १० रुपये आणि ४ -५ रुपयांचे कॉईन द्यावे आणि एकून किती विचारावे , हीच गोष्ट चॉकलेट किंवा इतर खेळणी, सोंगट्या वापरुन करावे या सर्व गोष्टी मुलांना आवडतात त्यामुळे गोडी निर्माण व्हायला नक्कीच मदत होते,,,,,,

सर्वात महत्वाचे हे आहे कि........
आपला मुलगा दिलेला होमवर्क करत नाही म्हणजे त्याला अभ्यासात गोडी नाही असे अजिबात नाही

याउलट तो होमवर्क फार रेग्युलर करतो म्हणजे तो अभ्यासात फार रस घेतो असेही नाही , कदाचित ते शाळेतील शिक्षकांच्या भेतीने पण करत असेल
होमवर्क व्यतिरिक्त घरात इतर पुस्तके उपलब्ध करुन देणे आणि अभ्यास हा त्यांच्या खेळाचाच एक भाग आहे ही भावना रुजवण्यात पालकांचा सहभाग महत्वाचा

Pages