सांधण दरी ! येणार का ?

Submitted by Yo.Rocks on 1 June, 2011 - 06:42
ठिकाण/पत्ता: 
सांधण दरी !

मे महीना उलटला नि आकाशात काळ्या पांढर्‍या ढगांची मैफील जमू लागली.. पावसाचीच चाहूल ती.. साहाजिकच उन्हाळ्यात उकाड्यामुळे मंदावलेल्या ट्रेकर्संना उत्साहाने नव्या जोमाने "तयार" होण्याची वेळ... पावसात कुठे कुठे जाता येइल नि कधी कधी सुट्ट्या टाकता येतील हे तपासण्याची वेळ.. ! पावसात आपले शूज/फ्लोटस धोका तर नाही ना देणार हे बघण्याची वेळ ! सॅकमधील सगळे सामान भिजू नये म्हणून एक भलीमोठी प्लॅस्टीकची पिशवी शोधण्याची वेळ ! पावसाळा सुरु होईल तेव्हा होईल पण जून महिना उजाडला की ट्रेक सुरुच झाले पाहिजेत..

तेव्हा यंदाच्या सिजनमध्ये पहिलाच साधा छोटा ट्रेक करावा म्हणून आम्ही काही भटके मायबोलीकर सांधण दरीला (श्रेणी - सोप्पी) जाण्याचा बेत आखत आहोत..

सांधण दरी हा एक नैसर्गिक आश्चर्याचाच भाग.. उंचच्या उंच सह्याद्री रांगानी वेढलेली अशी ही दरी नाशिकजवळील साम्रद गावाजवळ वसलेली आहे.. अर्थात दरी म्हटली की खोल असणारच.. पण आकर्षण असे की अत्यंत अरुंद मार्ग आहे तिकडून जाण्याचा.. दोन्ही बाजूस उंचच्या उंच कातळ नि त्यातून जाणारी ही अरुंद वाट.. . जमिनीला पडलेली भेग म्हटले तर उत्तम.. दुसरे म्हणजे इथे वाटेत लागणारे पाण्याचा साठा.. पावसात इथे जाणे अशक्य.. थंडीतदेखील कमरेपर्यंत पाणी असते.. तेव्हा आता जाउन यावे म्हणतोय... तेव्हा येणार का ?
शनिवारी रात्री (अंदाजे साडेनऊ वाजता)निघून रविवारी संध्याकाळी परत... उर्वरीत माहिती (कसे जायचे, कुठे भेटायचे, किती वाजता निघायचे इति..) नंतर कळवण्यात येईल..

येत असाल तर पटापट हात वर करा Happy (संख्या १० नाहीतर १५ पर्यंत मर्यादीत)

आमचे नियम :
१. आमच्या ग्रुपचा लिडर आमचा ग्रुपच असतो.. घेतले जाणारे निर्णय सर्वानुमते असतात.. 'पाहीजे तसेच झाले पाहीजे' अशा एकाच गोष्टीवर जास्त अडून बसत नाही..
२.प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीने यावे.. पण संपूर्ण ट्रेकमध्ये 'एकमेकां साह्य करू नि पुढे जाऊ' हेच तत्व वापरतो.. मग 'कुणाच्या काँफीडन्सची बोंब लागूदे.. वा पॅच करताना कुणाची बोबडी वळूदे..' पण मदत करताना जास्त लाड केले जात नाहीत हेही तितकेच खरे.. Proud
३. प्रत्येकाने पाठीवर स्वतःच्या सॅकचे ओझे वाहण्याव्यतिरीक्त ट्रेकमध्ये लागणार्‍या 'ह्या ना त्या' कामात मदत करणे आवश्यक..
४. ट्रेकमध्ये मद्यपान करण्यास वा मद्यपान करून ट्रेकमध्ये येण्यास मनाई.. धुम्रपान ट्रेकच्या आधी वा ट्रेक समाप्त झाल्यावर..
५. सॅकमधून केवळ स्वतःलाच पुरेल असे खाद्य आणू नये.. इतरांनाही लाभ घेता येइल असे बघावे.. Proud खाताना "लाजायचे नाही.. मागायचे नाही" हे तत्व लक्षात ठेवावे नि सरळ हात मारावा.. नाहीतर उपाशी राहील्यास तुम्हीच जबाबदार !
६. ग्रुपमध्ये चालताबोलता 'हा ग्रुपमध्ये नविन आहे वा जुना आहे' अशा ओळखीची तमा बाळगत नाही..
७. नाक मुरडायची, कपाळ्यावर आट्या पाडण्याची सवय असेल तर आमच्याबरोबर नाही आलात तर उत्तम !
८. ट्रेकसाठी अत्यावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी दिलेल्या यादीप्रमाणे सर्व सामान/वस्तू आणायचा प्रयत्न करावा.. यादीव्यतिरीक्त अतिरिक्त सामान घेउन येत असाल तर सोबत गडी घेउन यावा Proud
९. ग्रुपसाठी आणलेले सामान वगैरे प्रत्येकाच्या पाठीवर थोडाफार अतिरीक्त भार टाकून आनंदाने विभागण्यात येइल..
१०. ट्रेकमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी..
११. ट्रेक मध्ये चालताना मागे राहिल्यास तसेच मागच्या मागे घरी निघुन जावे.. उगीच मोठ्याने येओ येओ करुन जंगलातील पशु-पक्षांना त्रास देऊ नये
१२. फोटोसेशनमध्ये एक तरी उडी घेणे आवश्यक Proud
१३. घरापासून ते भेटण्याच्या ठिकाणापर्यंतचा खर्च सोडला तर ट्रेकमध्ये बाकी होणारा सर्व खर्च (अगदी स्वतःहून आणलेल्या चॉकलेटचा पण) सर्वांमध्ये विभागला जाईल. कुणालाही 'फुकटात खाण्यास' संधी दिली जात नाही Proud
१३. वरिल नियमांस पात्र असल्यास येण्याची तसदी घ्यावी अन्यथा नाही.. बाकी नियम ट्रेकमध्ये आल्यावर कळतीलच..

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 4, 2011 - 21:30 to रविवार, June 5, 2011 - 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृतांत,वृतांत, वृतांत, वृतांत, वृतांत, वृतांत, वृतांत, वृतांत, वृतांत,
लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर
टाका टाका टाका टाका टाका टाका टाका टाका टाका टाका
रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे Happy

फोटो पण नाय आणि वृत्तांत पण. तो ड्युआय कुठे गेला? जल्ला दरीत घुमला नाय तर नाय वृत्तांत तरी लिही म्हणावं.

लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh लिंक्स Uhoh

Pages