सरसों(मस्टर्ड ग्रीन, रापिनी) ची १ जुडी, पालकाची पानं साधारण २ मुठी, १ कांदा बारीक चिरुन, आलं लसूण पेस्ट १ टीस्पून प्रत्येकी, हळद साधारण १ ते दीड टी.स्पून, लाल तिखट चवीप्रमाणे, बटर भरपूर, फ्रेश क्रिम साधारण पाव ते अर्धा कप, जिरं एक टीस्पून, धणे जिरं पावडर १ टीस्पून, मीठ चवीप्रमाणे.
सरसोंची पानं आणि पालकाची पानं स्वच्छ धुवुन घ्यावीत. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवून त्या उकळत्या पाण्यात दोन्ही पानं ७,८ मिनीटं शिजवून घ्यावीत. नंतर मिक्सरमधून काढावीत.
पातेल्यात १ टे.स्पून बटर घेऊन त्यात जिरं घालून फोडणी करावी. त्यावर कांदा परतावा. लालसर झाल्यावर आलं लसूण पेस्ट घालून परतावे. त्यातच हळद, लाल तिखट, धणे जिरं पूड घालावी. गरज लागल्यास आणखीन बटर घालून गॅस बारीक करावा. व तेल सुटू द्यावे. नंतर त्यात सरसों व पालकाची प्युरे घालून झाकण घालून बारीक गॅसवर शिजू द्यावे. अधून मधून एखादा छोटा चमचा बटर टाकल्यास छान चव येते. सगळ्यात शेवटी फ्रेश क्रिम व मीठ घालावे व शिजू द्यावे.
सरसोंमध्ये पालक मिसळल्यास उग्र आणि उष्णपणा कमी होतो. भाजीत बटर जास्त घातल्याने चव छान येते. पण 'वेट वॉचर्स' नी जपूनच खावी. तरीही वजनात वाढ झाल्यास मला आणि माझ्या रेसिपीला दोषी ठरवू नये.
मस्त
मस्त रेसिपी....
काही काही भाज्यांची लज्जत त्यात विशिष्ट पदार्थ घातल्यानेच जास्त वाढते, जसे अळुच्या भाजिला लसणाची चरचरीत फोडणि किंवा कांदापातीत भरपुर बेसन... तसेच ही रेसिपी वाचल्यावरच वाटते की यात भरपुर लोणि पाहिजेच....
मी पण "वेट वॉच" करते पण मधुन मधुन असले खातेही..... त्या दिवसी इतर चमचमीत खाणे थोडे कमी खाते....उगाच वजन वाढणार या भितीने जीव मारुन कशाला राहायचे...
साधना.
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
छान लागते
छान लागते ही भाजी, सायो! तुझ्याच कडुन शिकलेय
तुझी पनीर माखनी ची पण रेसिपी टाक!
बरोबर ashbaby.
बरोबर ashbaby. भरपूर बटर / लोणी हवंच ह्या भाजीत. म्हणजे एकदम मऊ होते.
टाकेन गं पनीर मखनी पण लवकरच
पन्ना,
सायोनारा,
सायोनारा, मला सरसों कसे दिसते हेच माहित नाही. तू शक्य असेल तर त्या पानांचा फोटो टाकू शकतेस? तसंच ही भाजी अगदी सर्रास मिळते का पुण्यात? काही कल्पना?

बाकी, मी पालक पनीर मात्र अगदी सेम याच पद्धतीने करते- अर्थातच सरसों वगळून
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
सरसोची
सरसोची पाने साधारण मूळ्याच्या पानासारखीच दिसतात. थोडी जास्त हिरवी असतात. घरच्या घरी टप्पोरी मोहरी पेरून हि भाजी मिळवता येते.
लोणी नको असेल तर या भाजीत, दही घालून खावे तसेच याची चव थोडी सौम्य करण्यासाठी, आपला चंदन बटवा मिसळला तर चांगले.
युरपमधे टिनमधे हि भाजी मिळायला हवी.
घरच्या घरी
घरच्या घरी हि भाजी कशी मिळवता येते? साधारण थंडीत येते ना हि भाजी? कधी आणि कशी पेरायची? कुंडीत येते का?
पूनम, मी
पूनम, मी टाकेन ग फोटो. तुला ब्रोकोली माहितेय कां? त्याची फुलं असतात ह्या भाजीत मधे मधे. आणि खूप उग्र वास येतो. तू चौकशी करुन बघ जिथे पालेभाज्या असतात तिथे.
पूनम, हा बघ
पूनम, हा बघ ग फोटो सरसों चा.
मोहरी
मोहरी कधीही पेरता येते. दीड दोन महिन्यात हि भाजी कुंडीत तयार होईल. वास मूळ्याच्या पानासारखाच पण जरा उग्र असतो. मला वाटते मष्टर्ड ग्रीन्स म्हणूनही हि भाजी मिळते.
मूळा, कोबी, मोहोरी, फ्लॉवर, अलकोल या सगळ्या एकाच कुळातला भाज्या.
पूनम, मी
पूनम, मी फोटो टाकायचा प्रयत्न केला पण तो अपलोड झालेला दिसत नाहीये. मी लिंक टाकते थांब.
http://www.foodsubs.com/Greenckg.html
ह्यातला ब्रोकोली रेबचा फोटो पहा. बघ येतोय का अंदाज.
ह्याला
ह्याला ऑथेंटिक टच म्हणजे मोहोरी चं तेल वापरायचं असतं आणि भाजी एकजीव करायची असेल तर उकडलेली सरसों आणि पालक मक्याचं पीठ घालून घोटून घ्यायचं .. आणि मक्कई की रोटी बरोबर खातात ..
सशल, हो ते
सशल, हो ते लिहायला विसरलेच की माझी रेसिपी ऑथेंटिक नाहीय. ते मक्याचं पीठ वगैरे लावून केली होती ट्राय पण अजिबातच आवडली नाही. त्यामुळे 'बॅक टू माय ओन रेसिपी'. पण ज्यांना आवडत असेल त्यांनी करुन बघायला हरकत नाही.
सायो, आता
सायो, आता आलं लक्षात. धन्स गं.. बघते इथे मिळते का ते.. सरसों का साग आणि

मेक्के की रोटीबद्दल इतकं ऐकलंय की खाऊन बघायची इच्छा आहे
त्या लिंकवर एकसेएक 'पाले' आहेत गं, लोक इतक्या सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खातात? कौतुक आहे! आमची गाडी नेहेमीच्या ४-५ पालेभाज्यांच्या पुढे जात नाही!
----------------------
Invention requires an excited mind;
Execution, a calm one.
सायो ह्या कृती लिहतात खर्या
सायो ह्या कृती लिहतात खर्या पण तुम्ही स्वतः करुन बघतात की
नेट वरुन कॉपी करुन सरळ इथे टाकटात??
नाही राग मानु नका कारण बर्याच लोकांना तुम्ही आरोप करतात की नेट वरच ठापुन इकडे प्रकाशीत करता म्हणन....
कारण मानुस जसा असतो तसाच विचार करतो म्हणन फक्त एक शंका उपस्थीत केली
किश्याचे बंड
किश्याचे बंड
बर्याच लोकांना तुम्ही आरोप
बर्याच लोकांना तुम्ही आरोप करतात की नेट वरच ठापुन इकडे प्रकाशीत करता म्हणन..>>>>> ठापून म्हणजे काय ते कळलं नाही. शुद्ध लिहिलं त तर कदाचित कळलं असतं.
बर्याच लोकांना? म्हणजे नक्की कोण कोण? आयडी टाका बरं.
नेटवरुन ढापलेली रेसिपी समजा किंवा मी करुन बघितलेली रेसिपी समजा, तुम्ही काही समजलात म्हणून मी धागा उडवत नाहीये.
>>>>>
कारण मानुस जसा असतो तसाच विचार करतो म्हणन फक्त एक शंका उपस्थीत केली>>>> बरोबर आहे. पण हा विचार योग्य व्यक्तींना करु देत की, त्यांच्यावतीने तुम्ही का करताय?
आणि काही शंका,प्रश्न आहेत का?
सायोतै, प्वाईंट आहे हो
सायोतै, प्वाईंट आहे हो किश्याच्या बोलण्यात. तुम्हीही रेसिपीबरोबर तुमचे फोटो टाकत चला बघू म्हणजे तुम्ही ठापून टाकत नाही आहात ते आम्हांलाही कळेल. हो की नाही किश्या?
म्हणजे काय ते कळलं नाही.
म्हणजे काय ते कळलं नाही. शुद्ध लिहिलं त तर कदाचित कळलं असतं.
>>
आम्ही काय हो गावाकडची लोक, अडाणी काहीच कळत नाही बघा.....
नेटवरुन ढापलेली रेसिपी समजा किंवा मी करुन बघितलेली रेसिपी समजा, तुम्ही काही समजलात म्हणून मी धागा उडवत नाहीये.
>>>
माझी अपेक्षाही नाहीये की तुम्ही हा धागा उडवावा म्हणुन......
बरोबर आहे. पण हा विचार योग्य व्यक्तींना करु देत की, त्यांच्यावतीने तुम्ही का करताय?>>
कस आहे सायो काही माणसे खुप निर्मळ मनाची असतात हो त्यामुळे त्यांना शेणात दगड टाकुन शिंतोडे अंगावर घेणे जमत नाही...
गावकडच्या लोकांना सवयच असते कि शेणाची.......
तुम्ही शहरात रहाणारी माणसे तरीही लोकांना पुरावा नसताना बोलतात अस बघीतल्यावर आम्ही आडाणी माणसांनी काय करायच हो तुम्हीच सांगा...
कस आहे हेच बघाना बिन बुडाचे आरोप केले की जसा तुम्हाला राग येतो तसाच लोकांनाही राग येतो हेच मला सांगायचे आहे...
त्यामुळे आपल्याला जे कळत त्यातच डोक चालवावे नाही त्यात चालवु नये हे माझे प्रामाणीक मत आहे.....
कस आहे सायो काही माणसे खुप
कस आहे सायो काही माणसे खुप निर्मळ मनाची असतात हो त्यामुळे त्यांना शेणात दगड टाकुन शिंतोडे अंगावर घेणे जमत नाही>>>>>:खोखो:
किश्या, तुमचे फु स (फुकट
किश्या, तुमचे फु स (फुकट सल्ले) तुमच्याकडेच ठेवा. मला गरज नाहीये त्याची. पुन्हा तुमच्या मित्राने प्रकाशचित्र टाकली की मी माझं काम सुरु करणार आहे.
बाकी ती गावाकडची लोकं, शेण बिण ठेवा तुमच्याजवळच.
>>पुन्हा तुमच्या मित्राने
>>पुन्हा तुमच्या मित्राने प्रकाशचित्र टाकली की मी माझं काम सुरु करणार आह>><<
किति ते एखाद्याच्या मागे लागायच्चं अस टार्गेट कर्ण बरं नव्हे फर्रच्च रिकामा वेळ दिस्तोय
किश्या , जशास तसे .... धटासी
किश्या ,
जशास तसे ....
धटासी व्हावे धट | उध्द्टासी उध्द्ट ||
अॅडमिन, इथले ह्या भाजीशी
अॅडमिन, इथले ह्या भाजीशी संबंधित नसलेले प्रतिसाद कृपया उडवा.