सर्प ...

Submitted by सेनापती... on 31 May, 2011 - 05:47

पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे..

१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...

२. चेना नाल्याच्या सुकलेल्या पात्रापाशी साप सोडायचे ठरले होते.

३. धामण (Indian Rat Snake) हाताळताना :
रच्याकने ... तो मागे पिवळा टी-शर्ट घालून मुलगा उभा आहे त्याच्याकडे बघा. आणि पुढच्या फोटोत त्याचे हावभाव पण बघा... Happy

४. ह्या सापाचे नाव कोणी सांगेल का?

५. विषारी दात नसल्याने धामण आपले भक्ष्य गुदमरून मारते. बचाव ही तसाच.

६. मग काही जणांना ती धामण हाताळायला दिली.

७. घोणस (Indian Viper) जातीचे विषारी दात.

८. हा आपल्या सर्वांचा लाडका.. नाग (Indian spectacle cobra)

9. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!

१०. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!

११. पिवळा नाग...

१२. मण्यार (Indian Commom cret) -

१३. पिवळी धामण - बिन विषारी.

तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल???

गुलमोहर: 

बाप्रे, डेंजरच आहे, लली ला मोदक, मी पण ह्या जन्मी साप हाताळू शकणार नाही , अगदी दात कढलेला असला तरी/
तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??? >>>> त्याने आडव करायच्या आत उभ्याने पोबारा, दुसर काय ???

रुनी.. तू मला सर्पमित्र म्हणू शकतेस... Happy मी बिन-विषारी साप हाताळू शकतो.. विषारी साप हाताळायचे अजूनतरी माझे प्रशिक्षण झालेले नाही... इच्छा मात्र नक्की आहे.. Happy

सेन्या फोटो अप्रतिम रे ... साप पकडणं ही सुध्दा एक वेगळीच नशा आहे, धामण हा प्रकार आमच्याकडे फार पहायला मिळतो आणि त्याच्या आकाराकडे आणि रूपाकडे पाहून लोकही त्याचे बर्‍यापैकी दुष्मन होते आता तो समज कमी होत चाललाय.
तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??? >>>>> तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, जर त्याच्यापासून माणसाला किंवा माणसांपासून त्याला धोका वाटला तर आणि तरच त्याला उचलून दूर सोडून येईन Happy

दोन नंबरच्या फोटोतला साप "कवड्या" वाटतोय.
त्याच इन्ग्रजी नाव माहिती नाहिते.
पिवळी धामण आहे तिलाच धुळनागीण म्हणतात काय??

तो नागाचा फोटो कसला सुरेख आहे. मस्त पोज् दिलेय नागाने. Happy

तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल???>>>>> सागरला एकदा तंद्रीत रस्त्याने चालले असताना समोरून साप आडवा जात होता. डोळ्यांना साप दिसत होता, पण डोक्यात इतर विचार चालू असल्याने 'आपल्याला थांबले पाहिजे' हे काही सुचले नाही. अगदी त्याच्यावर पाय पडणार इतक्यात एकदम तंद्रीतून बाहेर आले आणि मागे सरकले. वाचला बिचारा. Proud

तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल???>>>>>>>>

साप मला आडवा जात नाही, तर मी सापाला आडवी जाते Proud (डिडिएलजे मधल्या 'मै किसी लडकी-वडकीसे प्यार नही करता........ च्या चालीवर ;))

मस्त फोटो आणि उपक्रम
माझ्या घरामागे ही पिवळी धामण आणि मुंगुसांचा खेळ पाहिला होता.
आमची चाहूल लागल्यावर झाडीत पळून गेले.
sap1.jpg

सर्व फोटो खतरनाक आहेत......

गुलमोहराच्या शेंगा लटकलेल्या दिसल्या तरी त्यातली एखादी हलत नाहिये ना बघते. > Rofl

Pages