(व्हॅन गॉग.. पोस्ट इंप्रेशनिस्ट कलाकारांमधलं खूप महत्वाचं नाव. त्याच्या रंग, रेषा जशा भुरळ घालतात तसाच त्याच्या आयुष्याचा प्रवासही. स्टारी नाईट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या ३ कलाकृती. Starry Night Over the Rhone, Cafe Terrace at Night आणि The Starry Night)
------------------------------------------------------------------------------------
निळेपणाच्या छटा नवीन नव्हत्याच मला कधी,
आठवणी येतात त्याच्या कितीतरी आधीपासून वाहतेय निळाई श्वासात..
पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधार पण असा..
इतका रंगीत असेल?
खरंच, ती कोणती वेळ होती,
जेव्हा तुझ्या मनातल्या अंधाराचं लखलखीत प्रतिबिंब पडलेलं आकाशात?
घनगर्द निळा आणि गूढ हिरवाईच्या छटा लेऊन आभाळ डोकावत राहिलं पाण्यात..
कोणालाही कळू न देता तूच रुजवलीस ना स्वप्नं त्यांच्या डोळ्यांत..
आणि मग त्यातली काही तूच उधळूनही लावलीस आभाळात
अंगभूत लहरीपणानुसार...
वेडे लोक त्यालाच चांदण्या म्हणतात अजूनही..
जग कधीच नव्हतं तुझ्यासाठी..
तुलाही सोसलंच नसतं ते..
पण सारंकाही तसंच राहिलय तुझ्यानंतर..
अजूनही रात्री सगळं गाव शांत झोपलेलं असतं..
एखाद्या कॉफीशॉपमधली तुरळकशी वर्दळ सोडता,
जर्द पिवळ्या प्रकाशाला शोषत असतो गूढ अंबर..
परमेश्वरही दुसर्या दिवसापर्यंत निश्चिंत झालेला असतो..
पण त्या स्वप्नांचं काय?
तुला माहितेय?
अजूनही त्या स्वप्नांचे ढीग पेटत असतात आकाशात
डोळे कितीही मिटून घेतले तरी आभाळ येतच अंगावर..
जगाला तेव्हाही कोणाशी घेणंदेणं नव्हतं...
आताही नसतेच..
गावकुसाबाहेर कुठल्या वेदनेचं पातं,
कुठल्या प्रतीक्षेत आभाळ तोलून उभं आहे आज परत,
याची तशीही कुणाला कल्पना असते?
व्हॅन गॉग.. स्टारी नाइटस्..
Submitted by मी मुक्ता.. on 31 May, 2011 - 02:24
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सर्वांचे पुनश्च खूप आभार..
सर्वांचे पुनश्च खूप आभार..
खूप छान चर्चा आणि माहिती.. इतक्या जिव्हाळ्याने बोलतायेत सगळे हे पाहून खूप मस्त वाटतय मला..
सांजसंध्या, इतक्या भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! खरय अगदी, त्याच्या या चित्रांनी वेडं केलय अनेकांना. अनेक कलाकृतींचा उगम आहे यात..
चिनूक्स, aschig
नविन माहितीबद्दल धन्यवाद..!
भाऊ, चेतना, आगाऊ,
खूप आभार.. अजून लिहा.. वाचायला आवडेल...
तुमचं त्याच्याविषयी इतकं भरभरुन बोलणंच सगळं काही सांगुन जातय.
दाद,
बस्स.. अजून काय हवं असतं तुमच्याकडून...
खूप आभारी आहे दिनेशदा..!
तुमचा प्रतिसाद येईल असं वाटलं होतं.. 
अवल, भरत, चिन्नु, फकिर, Maitreyee, लाजो, ऋतूवेद,
खूप धन्यवाद..! 
इतकं भरभरुन कौतुक.. खरतर हे त्याचंच देणं.. त्याच्याच रंगरेषांसाठी,,
मुक्ता राहवलं नाही गं. त्या
मुक्ता
राहवलं नाही गं. त्या तिस-या चित्राने मंत्रमुग्ध केलंय. हा माझा एक वेडा प्रयत्न ....
आस एका कुंचल्याला
===========
गावभर चाललेले
गोंगाट थांबती
रात्रीच्या चाहुलीने
तारांगण हासती
काळ्या पटावर एक
आसमंत जागा
मुशाफिरीसाठी निघे
कॅनव्हासचा राजा
आता सुस्त गावावर
नभ जागे होते
चांदण्यांच्या मैफिलीचे
निमंत्रण होते..
आभाळीचा दंगा त्याच्या
कुंचल्याने होतो
अजगरी नाच त्याच्या
नभांगणी होतो
निशा अशी पसरते
केशकुंतलाने
कॅनव्हास रंगतो हा
भान दंगल्याने
लाटालाटांनी ही रात
आवेगात येते
सर्पाकृती लहरींनी
पैलतीरी नेते
निजते मग स्वप्नसृष्टी
वेड्या नजरांची
आस एका कुंचल्याला
तारा बनण्याची
- संध्या
२६/५/२०११
अज्ञानामुळे हे धाडस केलं हेच खरं...
> बाकी कलाकाराची कला हिच
> बाकी कलाकाराची कला हिच त्याची ओळख. त्यासाठी त्याच्या खाजगी आयुष्याचे संदर्भ जोडण्याची गरज नसते हे माझं वैयक्तिक मत.
आज लंडनच्या नॅशनल आर्ट गॅलरीत ३ तास सार्थकी लावले. प्रकाशाचा वापर करणारे, बारीक कलाकुसरवाले जे कलाकार होते त्यांच्या चित्राबद्दलच्या ऑडिओत, चित्राचे बारकाईने वर्णन असे. पण ईंप्रेशनीझमच्या दालनात मात्र बहुतांश ऑडिओ हा चित्राबरोबरच कलाकाराच्या स्थितीबद्दलही असे. त्यावरुन त्यांचे आयुष्य वेगळे करता येत नाही हेच दिसते. उदा. व्हँगो वेड्यांच्या इस्पितळात असतांना (त्याने स्वतःला भरती करुन घेतले होते व आत्महत्येचेही प्रयत्न केले) एका वर्षात त्याने ८०० चित्रे + पेंटींग्स केली. बाहेर पडल्यावर ३ महिन्यात ७००. क्लॉड मोनेनी त्याच्या बागेतील पुलाची १८ चित्रे काढली - त्याच्या दोन्ही डोळ्यांना तेंव्हा कॅटॅरॅक्ट झालेला होता.
अर्थात फ्रॉईड सारख्याच्या तडाख्यातुन ईंप्रेशनीस्ट नसलेले लिओनार्दो सारखेही वाचले नाहीत - खालील दुव्यातील चौथा पॅरा वाचा (पहिले तीन पुर्णपणे फ्रॉईडीयन म्हणजे भंकस आहेत):
http://en.wikipedia.org/wiki/Leonardo_da_Vinci,_A_Memory_of_His_Childhood
आस्चिग.. छान माहिती
आस्चिग.. छान माहिती आहे.
मुक्ताबाई - काही चुकलं का हो आम्चं ?
सांजसंध्या, खूप छान.. आपल्या
सांजसंध्या,
खूप छान.. आपल्या कवितेच्या धाग्यावर दिलाय प्रतिसाद..! 
aschig, खरय अगदी.. इंप्रेशनिस्ट कलाकारांमधली ही समानता आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. वानगीदाखल फ्रिडा काहलो.. तिने एका काळात वेड लावलेलं.. खूप छान माहिती. धन्यवाद..!
अनिल, नाही हो.. असं का म्हणताय?
अप्रतिम आहे चारही कलाकृती
अप्रतिम आहे
चारही कलाकृती पुन्हा पुन्हा नजरेखालून घालाव्याशा वाटतायेत
खूप छान आहे 
नि:शब्द
नि:शब्द
वा! मस्त कविता. आवडली.
वा! मस्त कविता. आवडली.
सौमित्रच्या 'आणि तरीही मी' या
सौमित्रच्या 'आणि तरीही मी' या कविता संग्रहातला पहीलाच भाग त्याने व्हॅन गॉगवर लिहीलेल्या कवितेचा आहे त्याची आठवण झाली तुझ्या कवितेमुळे.
त्याने ह्या चित्रांवर लिहीलेली अंधाराचं चित्र कविता मिळाली वाचायला तर जरुर वाच.
गॉघच्या संदर्भातील माझ्या
गॉघच्या संदर्भातील माझ्या शाळा-कॉलेजच्या दिवसातील मी जपून ठेवलेली एक आठवण सांगावीशी वाटली होती पण ती कांहीशी पाल्हाळीक होईल व हा धागा मुख्यत्वे एका सुंदर कवितेवर असल्यामुळे ती इथं द्यावीशी वाटली नाही. पण << अजून लिहा.. वाचायला आवडेल... >> या कवियत्रीच्याच आग्रहामुळे सांगण्याचा मोह आवरता नाही येत -
आमच्या खूप जवळच्या परिचयाचे एक ज्येष्ठ आर्टीस्ट आकारने खूप मोठं 'म्यूरल' एका हॉलमधे रंगवत होते. खेळ सोडून मी बर्याच वेळां तें बघत बसायचो. तासनतास एकाग्रतेने काम करताना विरंगुळा म्हणून अधुन मधून फिरकी घ्यायला त्यानाही गिर्हाईक मिळायचं. मीही कुठंतरी वाचलेलं व न समजलेलं 'क्युबिस्ट', इंप्रेशनीस्ट' इ.बद्दल विचारून त्यांच्यावर इंप्रेशन मारायला बघायचो. ते हंसून दुर्लक्ष करायचे. एकदां सहज मी गॉघचा विषय काढला तेंव्हा मात्र चमकून, गंभीर होत त्यानी रोखून माझ्याकडे पाहिलं; मग," खबरदार आता त्याच्याही वाट्याला गेलास तर", असं मिष्किलपणे दटावत ते बाजूच्याच बांकावर बसले. " काका, आताच त्याचं चरित्र वाचलं आणि त्याच्यावरचा सिनेमाही येतोय, म्हणून विचारलं ", मी बचावाचा पवित्रा घेत म्हटलं. मला बांकावर आपल्या बाजूला बसायची खूण करत त्यानी गॉघला भक्तीभावानं दिलेलं हें प्रशस्तिपत्र -
" फक्त तुला म्हणून हे सांगतोय. जे.जे.मधून कौतुक होऊन बाहेर आलो, खूप चांगली कामंही मिळायला लागली; जागतिक किर्तीची स्वप्नं पहात होतो. मग कलाकारांच्या ग्रूपमधून युरोप दौर्यावर गेलो; महत्वाच्या गॅलर्या , आर्किटेक्चर सारं पाहिलं. पण डोक्यात जो गॉघ भिनला तो तिथून हलायला तयार नव्हता. मग पैसे साठवून पुन्हा युरोपात गेलो व फक्त गॉघच्या चित्रांपुढे तासनतास उभा राह्यचो. प्रत्येक ब्रशचा स्ट्रोक , रंगांचा वापर, कंपोझिशन यामागे किती चितन, विचार असावा हे बघून अवाक झालो. गॉघ पूर्ण समजायला आणखी एक जन्म घ्यावा लागेल, याची जाणीव झाली. डोक्यातील हवा गायब झाली व थोडी फार स्वतःच्या कलेत प्रगतिही झाली. हे न फिटणारे उपकार आहेत त्या गॉघचे माझ्यावर. मी काय सांगतोय हें कदाचित कळेलही तुला कांही वर्षांनंतर ".
त्यावेळी , एका मोठ्या कलाकाराने फक्त मलाच विश्वासात घेऊन हे सांगावं यानेच मी हुरळून गेलो होतो.
कलेची माझी समज आजही तेवढीच असली तरी त्यांचं भारावून जाणं मात्र दिवसेंदिवस मला अधिकाधीक तीव्रतेने समजतंय !
Harshalc, जोतिराम खूप आभार..
Harshalc, जोतिराम
खूप आभार..
मीन्वा,
नक्की वाचेन. मला माहितच नव्हतं हे सौमित्रचं.. गुलजार साहेबांनी पण लिहिलय.. व्हॅन गॉघ के नाम खत असं काहीतरी आहे..
भाऊ, मस्तच आठवण आहे.. त्याचं देणं कितीजणांना आणि कितीप्रकारे हे त्यालाही ठाऊक नसेल कदाचित. आयुष्याचा विरोधाभास म्हणा की अजून काही पण, अख्ख्या आयुष्यात तो स्वतःचं फक्त एकच चित्र विकू शकला होता. काय बोलावं त्याच्याबद्दल आपण..
कविता आवडली. आयुष्यभर स्वतःचा
कविता आवडली. आयुष्यभर स्वतःचा वेडेपणा गॉ धुंडाळत राहिला. कवितेत ते सूचकपणे दिसते. धन्यवाद.
आशिष, नॅशनल गॅलरीत गॉचे 'खुर्ची'चे चित्र पाहिलेस का?
डॉन मॅक्लीनचे स्टारी स्टारी नाइट्स हे गाणे अवश्य ऐका. सुंदर शब्द व गायन.
अफाट...!
अफाट...!
चित्र ,कविता अप्रतीम .
चित्र ,कविता अप्रतीम . चित्रांतील सौंदर्य शेअर केल्याबद्दल धन्यवाद .
मला यातलं काही समजलं नाही.
मला यातलं काही समजलं नाही.
अरभाटजी,गॉघच्या चित्रातून
अरभाटजी,गॉघच्या चित्रातून त्याची वेदना आर्ततापूर्वक मांडणारं भावपूर्ण गाणं ऐकवल्याबद्दल धन्यवाद.
कविता आवडली
कविता आवडली
मुक्ता, कविता मनापासून आवडली.
मुक्ता,
कविता मनापासून आवडली. बाकी चर्चाही खूप मस्त..
सर्वांचे पुनश्च खूप आभार..
सर्वांचे पुनश्च खूप आभार..
अरभाट.. ते फारच प्रसिद्ध आणि खूप सुंदर गाणं आहे..
बेफिकीर, ह्म्म...!
आर्भाटा स्टारी स्टारी नाइटस
आर्भाटा स्टारी स्टारी नाइटस मस्त रे ! धन्यवादम.
मुक्ता, आरभाट .. धन्यवाद!
मुक्ता, आरभाट .. धन्यवाद!
आई शप्पथ! काय मस्त चित्र
आई शप्पथ! काय मस्त चित्र आहेत!
माफी, कविता वाचलेली नाही. वाचून त्यावरही प्रतिसाद देईन.
अप्रतिम चित्रांचं अप्रतिम
अप्रतिम चित्रांचं अप्रतिम वर्णन! प्रतिसादांमधली चर्चा खासच.
ही गुलजारजींची कविता
आणि हे ते चित्र, ज्यावर ती आधारित आहे.
ऋयाम यांच्या प्रतिसादासारखा
ऋयाम यांच्या प्रतिसादासारखा प्रतिसाद द्यायची इच्छा मी आपली डावलली.
कविता या सदरात प्रकाशित केल्याने कविता वाचायला लागलो तर चित्रकार व चित्रांची माहिती होती. मग ती वाचली तर कविताही वाचता आली. मग काहीच कळेनासे झाले. त्यात पुन्हा कविता गद्य! तीन चित्रांना एक कविता !
आता क्रान्ती काय म्हणत आहेत ते वाचतो एकदा!
कविता हा कलाप्रकार दुसर्या
कविता हा कलाप्रकार दुसर्या एका कलेवर अवलंबून आलेला आहे यात!
अंधार रंगवायला काढलास आणि सारं काही तसंच राहिलंय तुझ्यानंतर - या अप्रतीम ओळी!
ही कविता स्वतंत्रपणे आशयाच्या दृष्टीने अतिशय उत्तम!
आणि ती त्या चित्रांना अनुसरून रचलेली असल्याबद्दल कळवळून निषेध !
-'बेफिकीर'!
अरभाट, गाणे छान आहे. त्यातील
अरभाट, गाणे छान आहे. त्यातील चित्रे क्रोनॉलॉजीकल आहेत का हे कुणाला माहीत आहे का?
खुर्ची पाहिली. त्यासमोर उभे राहुन खालिल विचार मनात आले होते:
"आपल्याला जेंव्हा खुर्ची (किंवा तत्सम वस्तु) काढायची असते तेंव्हा नकळत त्यात एक अॅव्हरेज खुर्ची साकारते - म्हणजे सामान्य नाही तर आपल्या डोळ्यांना व डोक्याला रजीस्टर झालेल्या खुर्च्यांची सरासरी असलेली खुर्ची. हे लोक मात्र मन लावुन बरोब्बर त्यांच्या समोर असलेली, किंवा त्यांच्या डोक्यात आलेली खुर्ची काढु शकतात. त्यात त्यांची कसब कुठेतरी आहेच, पण त्यांच्या डोक्यात त्या सरासरीचे काय होते? (म्हणजे ती कुठे जाते?)"
ते अॅव्हरेज काढुन टाकण्याकरताच हुबेहुब चित्र (पाहुन) काढायचे असले की त्याचे डब्बे-डब्बे करुन उलटे धरायचे व उलटे काढायचे - गोष्टी अनोळख्या वाटतात व जास्त चांगल्या उतरतात.
तसे पाहिले तर मनुष्यांच्या बाबतीत सगळ्यात प्रपोर्शनेट देह सर्वात सुंदर असतात्/वाटतात (हो, सरासरी). पण पुन्हा चित्रकारांनी काढलेले डिसप्रपोर्शनेट मानव देखील ईंप्रेसीव्ह वाटतात (बहुदा त्यांचा - त्या मानवांच्या खुबी-खासियतींमुळे). असो, भरकटतोय.
aschig, क्रांति, ते चित्र लय
aschig,
क्रांति, ते चित्र लय भारी! बघताक्षणी थांबवून ठेवतं!
धन्यवाद!
मुक्ताबाई कुठे गेले आपले चरण
मुक्ताबाई
कुठे गेले आपले चरण ?
काय लिहीत सुटलीहेस ! अफाट आहेस एकदम ..
व्हॅन गॉग ला माझा णमस्कार सांग
<< आणि ती त्या चित्रांना
<< आणि ती त्या चित्रांना अनुसरून रचलेली असल्याबद्दल कळवळून निषेध ! >> बेफिकीरजी, जर अनुभूति कवितेत व्यक्त करणं स्वागतार्ह आहे तर एखाद्या अनुभूतिचा स्त्रोत वाचकांमोर ठेवून कविता सादर करणं कसं निषेधार्ह ठरूं शकतं, तें खरंच नाही कळलं .
खुप सुंदर..... चित्र तर
खुप सुंदर..... चित्र तर अप्रतिम
Pages