रा . रा. मायबोलीकरांची भेट.. २५ जून २०११

Submitted by मिलिंदा on 30 May, 2011 - 08:11
ठिकाण/पत्ता: 
लंडन

सध्या मायबोलीवर सगळीकडे गटग चे वारे वाहत आहेत . राणीच्या राज्यात असलेल्या मायबोलीकरांची अशी एक भेट घडावी असे बर्‍याच दिवसांपासून मनात होते, पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही... तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे ती रा . रा. मायबोलीकरांच्या भेटीची...

कधी : २५ जुन २०११ - १४:३० - १९:०० लंडनच्या वेळेप्रमाणे
कोठे : लंडन - टॉवर ब्रिज

Wagamama

http://www.wagamama.com/locations/showlocation/549

2b tower place (the big glass building next to the tower of london)
tower hill
london
EC3N 4EE
phone : 0207 283 5897

transport information : nearest tube: tower hill

कोण कोण: नोंदणी केलेले सर्व मायबोलीकर

अधिक माहितीसाठी पानाला भेट द्यायचे विसरु नका.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 25, 2011 - 09:30 to 14:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठरतंय ठरतंय दम धरा...
मला वाटलच इथल्या number of posts वर अजुन expert comments कश्या नाही आल्या ते Happy
आता आम्हाला च आमची लाज राखायला हवी...लोकहो पाडा १०० पोस्टीं...:-)
सायो, स्वाती, तुम्ही च हातभार लावा आता..

ठिकाण बर्‍यापैकी हवामानावर अवलंबून आहे त्यामुळे अजून निश्चित केले नाहीये.>>>>> खरय.. थांबवा रे या पावसाला.. आणी उन्हाची order द्या

>>लोकहो पाडा १०० पोस्टीं >> Lol माधुरी, १०० पोस्टी नाही पाडल्या तरी चालतील, भेटा आणि मस्त गप्पा मारा, एंजॉय करा आणि वृ वाचायला मिळूदेत आम्हांला Happy

>> लोकहो पाडा १०० पोस्टीं
Proud
माधुरी Happy
ठरवा लवकर. मजा करा आणि वृत्तांत लिहा. Happy

अमोल, तू येणार आहेस हे जर इथे लिहिले असतेस तर आनंदाने भेटलो असतो तुला.. अजूनही ये Happy

मृदुला, साधारण २-२.३० ते ७-७.३० असा स्लॉट मनात आहे. हवेने अनुमती दिली तर जास्त वेळ थांबू शकू अन्यथा आपल्याला पण कोणत्या तरी रेस्तराँ मध्ये भेटावे लागेल.

सध्याच्या अंदाजानुसार हवा चांगली असणार आहे, पण आजकाल ते अमेरिकेचे आपल्या ( पक्षी भारताच्या) शेजार्‍यांबद्दलचे धोरण जसे दिवसागणिक बदलते तसे बदलते आहे.

अजून जागा आणि वेळ ठरलीच नाही काय? Proud

मी आणि आशिष (aschig) नं काल ब्रसेल्समध्ये एक छोटं आणि जलद गटग केलं पण ( एकही पोस्ट न टाकता Wink )

हो, मजा आली. Happy
ब्रसेल्स मधे भटकणे (ग्रँड प्लेस, प्लेस्/पॅलेस ऑफ जस्टीस, चर्चेस, मन्नेकेन पिस् वगैरे), नाणी एक्सचेंज करणे, चवदार टोमॅटो खाणे, मोनास्टरीचे कॉपीराईट (हो, ईथेही आले) असलेली बीअर पिणे (ट्रॅपिस्ट), डीनर व अर्थातच गप्पा. छोटे म्हणजे चारच तास.

माझे २५ ला लंडनला येणे हे बहुदा २४ ला च ठरेल. तोपर्यंत बहुदा जागा व वेळ नक्की झाली असेल.

शनिवारी पाऊस दाखवत आहेत. म्हणजे एखाद्या खानपानाच्या ठि़काणीच भेटावे लागेल.
कुणाला काही चांगले पर्याय माहिती आहेत का?
१. ग्लोब थिएटरजवळ पिझ्झा एक्सप्रेस
२. मॅन्शन हाऊस स्टेशनजवळ किंवा टॉवर ऑफ लंडनला wagamama.
३. बेकर स्ट्रिट स्टेशनजवळ पिझ्झा हट

यापैकी कुठला पर्याय चालेल? नाहीतर दुसरे पर्याय तुम्ही सुचवा, बुकिंग मी करते.
माधुरी, तुझ्यापासुन जवळ काही चांगले पर्याय असतिल तरी चालतिल.

ठरवू या का लवकर? आमचे कलत्र आणि रत्न.. आणि मातोश्री.. ह्यांना आपापला पिलान काराचा हे! Proud

मी सकाळपासून लंडनात जायच्या विचारात आहे.. म्हणजे पिल्लू आणि आईची छोटीशी धमालपण होईल. त्यांना लंडन डोळा आणि टूरीस्ट बस.. अशी दोन अत्यंत महत्वाची कामे करायची आहेत .. Wink

मिलिंदा, आम्हाला ती ट्रीप प्लॅन करायला फार वेळ मिळाला नाही. त्यात मला माहीत नव्हते कोण आहे तेथे. पुढच्या वेळेस नक्की आधी कळवेन. आणि लंडन प्रचंड आवडले, त्यामुळे पुन्हा नक्कीच येणार.

तुम्ही सर्व मजा करा आणि लिहा कसे झाले गटग.

बीबीसीचा हवामानाचा अंदाज :
>>Warmer on Saturday and probably staying dry with bright or sunny intervals.

दुपारी ३ ला म्हणजे जेवून खाऊन यायचे ना आपापले? Happy

नाही. घरुन भरपुर नाश्ता करुन निघायचे आणि सगळ्यानी दुपारी ३ ला जेवायचे Happy

खालच्या लिंकवर बघ, लाईट रेन दाखवत आहेत पण क्लिक केले की तु म्हणतेस तसे सांगत आहेत. नक्की काय ते कळत नाहीये.
http://news.bbc.co.uk/weather/forecast/2574?area=London%20Bridge

जाजु, तुला लंडन डोळा करायचे असेल तर ग्लोब किंवा टॉवर ऑफ लंडन बरे पडेल. तिकडे बाहेर गप्पा मारत बसायलाही जागा आहे भरपुर (जर टुरिस्टांची गर्दी नसेल तर ). लंडन डोळ्याहुन क्रुस करून टॉवर ऑफ लंडनला जाता येईल, तेव्हढीच त्या दोघींची क्रुस टुरसुद्धा होईल.

बाकींच्याना टॉवर ऑफ लंडन चालेल का? न चालणार्‍यांनी हात वर करा.
अमित, तू रोमातून बाहेर येऊन नाही म्हण. Happy

.

हो चालेल... जाईजुई संपर्कातुन मेल केला आहे...
हवामानाची पण आपल्या वर मर्जी आहे बहुतेक ... 'सनी' दाखवत आहे... Happy
ऑल सेट?????

टॉवर हिलला उतरायचे का?>>>>> हो..

उतरायचे का ? <<<<< असंच काही नाही... नाही उतरलात तर पुढच्या स्थानकावरुन मागे चालत यायचं Happy हाकानाका.

>>पुढच्या स्थानकावरुन मागे
कुठेतरी उतरायलाच लागणार ना? Happy

पॅडींग्टनहून टॉवरहिलला जाणार्‍या गाड्या शनिवारी चालू आहेत असे टीएफएलवर वाचले. पण इतर पुष्कळ गाड्या बंद आहेत.

>> कोणाचा तरी नंबर देऊन ठेवा.. म्हणजे हरवले तर सापडून घेईन.
मलाही.

>>कुठेतरी उतरायलाच लागणार ना?
बरोबर. सांगायचा मुद्दा हा की टॉवर हिललाच न उतरता कुठेही उतरलात, तुम्हाला वाटेल तिथे, तरी चालेल Happy दिवे घ्यालच.

बरं, आता सगळ्यांनी कितीजण येणार आहात तेही सांगाल का? पाऊस असेल असे गृहित धरुन wagamama चे बुकिंग करते.
मी, मिलिंद (+ २ मोठे, २ छोटे ) = ६
माधुरी + २ ( १ मोठा, १ छोटी) = ३
अमित + २ (१ मोठी, १ छोटी) = ३

बाकी?

Pages